ग्रहस्थिती : हर्षल वृषभ राशीत, मंगळ मिथुनेत, रवि-बुध-गुरु कर्केत, प्लूटो मकरेत, राहू कुंभ राशीत, शनि नेपच्यून मीनेत, केतू सिंहेत, शुक्र कन्या राशीत. दिनविशेष : २३ ऑगस्ट पुत्रदा एकादशी, २५ ऑगस्ट भीमप्रदोष, २६ ऑगस्ट ईद-ए-मिलाद, २७ ऑगस्ट नारळी पौर्णिमा, २८ ऑगस्ट रक्षाबंधन.

मेष : कामाची शिस्त पाळा. नोकरी-व्यवसायात कामाचे व आर्थिक नियोजन करा. बँकेच्या कामात फसवणूक होऊ शकते. मित्र, नातेवाईकांची उत्तम साथ मिळेल. तरुणांना यशासाठी भरपूर कष्ट पडतील. व्यवसायात सामोपचाराचे धोरण ठेवा. कामानिमित्ताने नव्या ओळखी होतील. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. नोकरीत अतिविश्वास दाखवून काम करू नका. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. मुलांना शिक्षणात यश मिळेल. नव्या व्यवसायाच्या कल्पना सुचतील. घरात एखादे शुभकार्य घडेल. वातावरण आनंददायी राहील. महिलांना ध्येय गाठण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतील. मनाचे दडपण वाढणार्या घटना घडतील.

वृषभ : मनासारख्या गोष्टी न घडल्याने वातावरण बिघडेल. काही गोष्टींचा फार विचार करू नका. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. पत्नीबरोबर वाद टाळा. घरात वाद घडतील. बँक व्यवहारात गोंधळ उडू शकतो. घरात आनंद वाढेल. नोकरीत जमवून घ्या. तरुणांना नव्या नोकरीच्या संधी चालून येतील. आर्थिक बाजू भक्कम राहील. वेळेचे योग्य नियोजन करा. व्यवसायात अनपेक्षित लाभ होईल. चुका टाळा. सरकारी कामे मार्गी लावताना घाई टाळा. लेखक, पत्रकार, कलाकार, संगीतकार, चित्रकारांना मानसन्मान मिळेल. शिक्षक, प्राध्यापकांना यश देणारा काळ.

मिथुन : आरोग्याचे प्रश्न डोकेदुखी वाढवतील. अचानक प्रवास करावा लागेल. शक्यतो तो टाळा. महागड्या वस्तूंची काळजी घ्या. तरुणांना यश मिळेल. नोकरीची संधी चालून येईल. वाहन चालवताना जपून. कुटुंबाला वेळ द्याल. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. सल्ले देऊ नका. घरात आनंददायी बातमी कळेल. व्यवसायात सबुरीने घ्या. बँक व्यवहारात चुका टाळा. कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक सहलीचे योग आहेत. मेडिकल क्षेत्रात चांगले अनुभव येतील. नवीन ओळखीचा फायदा होईल.

कर्क : कामांत अडथळे येतील. वाहन चालवताना काळजी घ्या. नोकरी-व्यवसायात वेळापत्रक कोलमडून पडेल. धावपळ होईल. प्रवासात काळजी घ्या. मोठे निर्णय घेताना कागदपत्रे तपासूनच पुढे जा. मित्रमंडळींना आर्थिक मदत करताना काळजी घ्या. सरकारी कामे पुढे नेण्यासाठी घाई करू नका. तरुणांचा मौजमजेकडे कल राहील. सामाजिक क्षेत्रात नावलौकिकात भर पडेल. आत्मविश्वास वाढीला लागेल. जुने आजार डोके वर काढतील. जनसंपर्क क्षेत्रात चांगला काळ. नवी नोकरी मिळेल. मुलाकडे लक्ष द्या. अनोळखी व्यक्तीबरोबर व्यवहार करताना योग्य खबरदारी घ्या.

सिंह : पत्नीशी वाद होईल. कामात घाई नको. अपघाताला निमंत्रण मिळेल. सार्वजनिक ठिकाणी काळजी घ्या. नोकरीत कामाशी काम ठेवा. तरुणांना वाढीव काम पडेल. बँक व्यवहारांत काळजी घ्या. महिलांना यश मिळेल. आरोग्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष नको. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. सामाजिक क्षेत्रात चांगले अनुभव येतील. व्यवसायात आर्थिक बाजू भक्कम राहील. विदेशातील कामातून लाभ मिळेल. संततीच्या वागण्याकडे लक्ष द्या. मार्केटिंग एजंट, ब्रोकर यांना यश मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील.

कन्या : शेअर, सट्टा, लॉटरीपासून दोन हात दूर राहा. नवीन वास्तू घेण्याचा विषय पुढे सरकेल. व्यवसायात मोठे यश मिळेल. सरकारी कामे झटपट पुढे सरकतील. येणे वसूल होईल. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. नव्या कामाची जबाबदारी खांद्यावर पडेल. घरात मोठ्यांचे ऐका. तरुणांच्या मनाविरुद्ध घटना घडतील. कामात आळस जाणवेल. देवदर्शनातून समाधान लाभेल. रखडलेले काम मार्गी लागेल. जुन्या ओळखींचा फायदा मिळेल. फायद्याच्या गोष्टी जगजाहीर करू नका. अति आत्मविश्वास दाखवू नका. संततीकडून चांगली बातमी कानावर पडेल. वाहन जपून चालवा.

तूळ : तरुणांचा भाग्योदय करणारा काळ. भागीदारीत वाद होतील. व्यवसायात चांगल्या गोष्टी घडतील. आर्थिक बाजू भक्कम राहील. नोकरीत कामाशी काम ठेवा. वरिष्ठ कौतुक करतील. आत्मविश्वास व मनोबल वाढेल. नवीन गुंतवणूक कराल. नव्या ओळखींमधून कामे पुढे सरकतील. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. अडकलेली सरकारी कामे पुढे जातील. मित्रांना आर्थिक मदत करताना विचार करा. येणे वसूल होईल. खिशात पैसे राहतील. आरोग्याची काळजी घ्या. विमा, वित्त क्षेत्रात चांगला काळ. नातेवाईक, मित्रांना सल्ले देणे टाळा. कलाकार, संगीतकारांना कामे मिळतील. खेळाडूंना यशासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील.

वृश्चिक : प्रतिक्रिया देणे टाळा. गुरुचे चांगले बळ राहील. अडलेली कामे, सरकारी कामे पुढे सरकतील. महिलांनी आरोग्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे. कामात यश मिळेल. मित्रांची मदत मिळेल. व्यवसायात मोठे निर्णय काळजीपूर्वक घ्या. नोकरीनिमित्त दूरचे प्रवास कराल. लॉटरी, सट्टा यांच्या प्रेमात पडू नका. गोड बोलून कामे पूर्ण करा. घरात जबाबदारी वाढेल. अचानक मोठा खर्च निर्माण होईल. ज्येष्ठांशी वाद टाळा. मामा-मावशींची मदत मिळेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. लेखकांचा सन्मान होईल. सामाजिक कार्यात सन्मान मिळेल. नोकरदार विदेशात जातील.

धनु : ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. वास्तूचे प्रश्न मार्गी लागतील. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. पण, संयम ठेवा. व्यवसायात घाई टाळा. अनोळखी व्यक्तीवर अवलंबून राहू नका. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. काही गोष्टी मनातच ठेवा. ध्ााडस टाळा. तरुणांना यशदायी काळ. सामाजिक कार्यात भरपूर वेळ खर्च होईल. कलाकारांचा सन्मान होईल. संगीतकार, पत्रकार, संपादकांसाठी चांगला काळ. स्पर्धात्मक यश मिळेल. नव्या ओळखी होतील. कामाच्या संधी लाभतील. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

मकर : परिस्थितीचे भान ठेवून निर्णय घ्या. मोठी कामे करताना, नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. नोकरीत वाद होतील. संसर्गजन्य आजार त्रास देतील. कोर्ट-कचेरीची कामे लांबणीवर पडतील. कामानिमित्ताने प्रवास होईल. आडमुठेपणा टाळा. व्यवसायात कसरत करावी लागेल. कामाचा आळस येईल. बँकेत कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. व्यवसायात नवीन संधी लाभतील. कलाकार, अभियंते यांना चांगले अनुभव येतील. खेळाडू चमकदार कामगिरी करतील. जुने आजार डोकेदुखी वाढवतील.

कुंभ : निर्णय चुकतील. घाई टाळा. व्यवसायात मनासारखी स्थिती राहील. सामाजिक क्षेत्रात भरपूर वेळ खर्च होईल. उधार-उसनवारी टाळा. बँकेची कामे संयमाने मार्गी लावा. आरोग्याकडे लक्ष द्या. तरुणांना वाढीव कष्ट पडतील. स्पर्धेत यश मिळेल. घरात सुसंवाद ठेवा. दूरचे प्रवास कराल. नियमबाह्य काम करू नका. भागीदारीत सबुरीने घ्या. मित्रांबरोबर आर्थिक व्यवहारांत वाद होतील. सुगंधी द्रव्याच्या व्यावसायिकांसाठी चांगला काळ. कलाकार, संगीतकारांना मान-सन्मान मिळेल. ज्येष्ठांची प्रकृती सांभाळा. संसर्गजन्य आजारापासून काळजी घ्या. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.

मीन : काम झाले नाही म्हणून नकारात्मक विचार करू नका. घरात चांगले वातावरण ठेवा. मुले डोकेदुखी वाढवतील. नोकरीत कामाचा ताण वाढेल. नाराजीचा सूर आळवू नका. महिलांना अधिकचे कष्ट घ्यावे लागतील. व्यवसायात अडचणी येतील. आर्थिक बाजू चांगली राहील. मित्रांची चांगली साथ मिळेल. शेजार्यांना सांभाळून घ्या. घरात आनंददायी घटना घडेल. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. धार्मिक कार्यासाठी वेळ खर्च होईल. कुटुंबीयांसोबत बाहेरजावी जाल. सामाजिक कार्यातून प्रतिष्ठा वाढेल. नवीन वाहन घेण्याचा विचार पुढे ढकला. नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या.
