• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

फ्रॉड कॉलने भुलवले, सजगतेने वाचवले!

सुधीर साबळे सायबर जाल

Marmik Team by Marmik Team
August 21, 2026
in सायबर जाल
0
फ्रॉड कॉलने भुलवले, सजगतेने वाचवले!

चित्र-नचिकेत कामतेकर

रविवारची सुटी संपली होती. सोमवारी कामाचा दिवस सुरू झाला होता. डॉ. विद्यार्थी नेहमीप्रमाणे आपल्या क्लिनिकमध्ये आले. सकाळचे सव्वादहा वाजले होते, त्यांच्याकडे पेशंटची गर्दी झाली होती. डॉ. विद्यार्थी हे निष्णात डॉक्टर असल्याने त्यांच्याकडे कायमच पेशंटची गर्दी असे. त्यांचे सामाजिक भान चांगले होते, त्यामुळेच सरकारी सुरक्षा यंत्रणेमध्ये काम करणारी मंडळी, कामगार वर्ग यांच्याकडून डॉ. विद्यार्थी कोणतीही कन्सल्टेशन फी घेत नसत. त्या दिवशी निवृत्त कर्नल सेन हे त्यांच्या क्लिनिकमध्ये तब्येत दाखवण्यासाठी आले होते. डॉक्टरांच्या केबिनमध्ये प्रवेश केल्यावर त्यांची तपासणी पूर्ण झाली. त्यानंतर थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. डॉक्टरांनी त्यांना विचारले, सध्या काय सुरू आहे? त्यावर सेन म्हणाले, काही नाही, निवृत्तीचे आयुष्य सुखाने जगतो आहे. एका कंपनीला सल्लागार म्हणून सेवा देतो आहे. बाकी काही विशेष नाही.

हा संवाद सुरू असतानाच डॉक्टरांच्या मोबाईलची रिंग वाजली, समोरून आवाज आला, हॅलो, डॉक्टर, विद्यार्थी बोल रहे है क्या? त्यावर डॉक्टर म्हणाले, हाँ, मैं बोल रहा हूं, आप कौन? त्यावर पलीकडून उत्तर आले, सर, मैं शेखर कुमार बोल रहा हूँ, जयपूर से. आमचा कारखाना आहे. आम्ही कारचे स्पेअर पार्ट बनवतो. दोन महिन्यांमध्ये आम्ही पुण्याजवळ आमचा नवीन प्लँट सुरू करणार आहोत. या कंपनीत जे नवे कामगार येतील, त्यांची मेडिकल चाचणी करायची आहे. हे काम आपण कराल का?
त्यावर डॉक्टरांनी विचारलं, किती लोक आहेत तुमचे? त्यावर शेखर कुमार म्हणाला, १०० ते १५० लोग होंगे. डॉक्टरांनी विचारलं, मग तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये का नाही चाचणी करून घेत सगळ्यांची? तो म्हणाला, सर, उधर बहुत भीड रहती है, तुमचं नाव खूप ऐकलं आहे, तुम्हीच करा प्लीज. तुमचे किती चार्जेस असतात मेडिकल चेकअपचे?

डॉक्टर म्हणाले, एरवी मी एका माणसाच्या चेकअपचे पाचशे रुपये घेतो. पण तुम्ही नवी कंपनी आहे, कामगार जॉइन करतायत तर त्यांच्याकडून पैसे नाही घेणार. ते ऐकून शेखरकुमार म्हणाला, नही सर, आपको पैसा लेनाही पडेगा, हम फोकट में कुछ काम नही
करते. त्यावर ठीक है, म्हणत डॉक्टरांनी त्याला ‘कधी चेकअप करायचा आहे ते कळवा,’ असं सांगितलं आणि त्याने ओके म्हणून फोन ठेवून दिला.

डॉक्टर फोनवर जे बोलत होते, ते सगळे कर्नल सेन ऐकत होते. ते म्हणाले, डॉक्टर तुमचे सामाजिक काम चांगले दिसते आहे. डॉक्टर म्हणून तुम्ही काही ठिकाणी पैशाची अपेक्षा न ठेवता सेवाभाव म्हणून काम करता आहात ही गोष्ट आमच्यासाठी खूपच मोठी आहे. हे ऐकून डॉक्टर खूष झाले. ते काहीतरी बोलणार इतक्यात कर्नल सेन म्हणाले, डॉक्टर, तुम्हाला माहित असेलच आजकाल गोड बोलून फसवण्याचे खूप प्रकार होतात. महत्त्वाचे म्हणजे आजकाल सायबर फ्रॉड खूपच वाढले आहेत, त्यामुळे समाजसेवा करत असताना त्याचे देखील भान ठेवा. तुमची कुठे फसगत होऊ देऊ नका. दोन दिवस निघून गेले. शुक्रवारी संध्याकाळी डॉक्टर विद्यार्थी यांच्या मोबाइलवर पुन्हा शेखर कुमारचा फोन आला. सर, नमस्ते, लेबर लोगो के मेडिकल के बारे मे फोन किया था? हां बोलो, डॉक्टर म्हणाले. शेखर कुमार म्हणाला, सर, परवा म्हणजे रविवारी मेडिकल चेकअप होऊन जाईल का? डॉक्टर म्हणाले, होईल, पण एकत्र सगळ्यांचं नाही होणार. संध्याकाळपर्यंत ६० लोकांचं चेकअप करू, बाकीच्यांचं पुढच्या रविवारी होईल. त्यावर शेखर कुमार म्हणाला, ओके सर. या कामाचे ७५ हजार रुपये होतात ना? डॉक्टर म्हणाले, मी तर घेणार नव्हतो, तुमच्या आग्रहामुळे घेतोय. माझ्या नावाचा चेक घेऊन या.

शेखर कुमार म्हणाला, सर, हम चेक नही देते, हमारे इधर ऑनलाइनही पैसा ट्रान्सफर होता है, जैसे कि फोन पे, यूपीआय. आता तुम्हाला मी दोनचार यूपीआय नंबर देतो. तुम्ही तुमच्या ऑफिसातल्या तीन चार जणांच्या आणि तुमच्या अकाऊंटमधून त्या त्या नंबरवर यूपीआयच्या माध्यमातून आम्हाला १ रुपया पाठवा. म्हणजे आम्ही तुम्हाला द्यायची रक्कम त्या नंबरांवर विभागून पाठवतो. मोठी रक्कम आहे ना? आम्ही ती एकरकमी देऊ शकत नाही आणि कोणत्याही कामाचे पूर्ण पैसे दिल्याशिवाय आम्ही ते काम करून घेत नाही. शेखर कुमारचे हे बोलणे ऐकून डॉ. विद्यार्थी थबकले. शेखर घाई करत बोलू लागला, हॅलो, सर, अभी वक्त मत बिताओ, जल्दी से हमको एक रुपया डालो. डॉक्टरांनी तो फोन कट केला आणि ते विचार करू लागले. हा माणूस असा काय म्हणतो आहे, सायबर फसवणुकीचा हा प्रकार आहे का, अशी शंका त्यांच्या मनात आली. इतक्यात पुन्हा त्यांचा फोन वाजला, सर, एक रुपया डाला नही आपने, सर हमारी बात सुनो. त्यावर डॉक्टर म्हणाले, हे पाहा, मी ठरवलेलं आहे की मी तुमच्या कामगारांकडून पैसे घेणार नाही. त्यांचं मेडिकल चेकअप समाजसेवा म्हणून मोफतच करणार आहे. माझ्याकडून मेडिकल करून घ्यायची असेल, तर ती फुकटातच करून घ्यावी लागेल. नाहीतर दुसरा डॉक्टर शोधा. हे बोलताना डॉक्टरांचा आवाज चढला होता.

हे ऐकून शेखरकुमार म्हणाला, सर, हमारा प्लॅन कॅन्सल कर देते है, आप पैसा नही लेते तो क्या फायदा, असे म्हणून त्याने फोन ठेवून दिला. हा संवाद सुरू असताना डॉक्टरांना सेन यांनी सांगितलेले वाक्य आठवले होते, सामाजिक काम करताना सायबर फ्रॉ डपासून सावध राहा.

त्यानंतर आपल्याबाबत घडलेला प्रकार त्याची सायबर क्राइममध्ये काम करणार्‍या एका मित्राला सांगितला, तेव्हा तो म्हणाला, तुला ऑनलाइन पैसे टाकायला लावून फसवण्याचा त्यांचा प्लॅन होता. मात्र, तू पैसे पाठवलेच नाही, त्यामुळे तू बचावलास. रोज सकाळी झोपेतून उठल्यावर मेंदूला एक गोष्ट सांगत जा, मला कोणत्याही अनोळखी नंबरवरून फोन आला आणि त्याने मला काही माहिती विचारली तर मी ती सांगणार नाही. सायबर गुन्ह्याच्या बाबत मी जागरूक राहीन.

अशी घ्या काळजी

  • आपला यूपीआय-पिन कधीही कोणालाही सांगू नका.
  • बँक कर्मचारी, पोलीस, कस्टमर केअर किंवा मित्र, कोणीही यूपीआय-पिन मागत असेल तर तो देऊ नका, पैसे मिळवण्यासाठी यूपीआय-पिन लागत नाही.
  • पैसे स्वीकारण्यासाठी क्यूआर कोड
  • स्कॅन करणे, पिन टाकणे आवश्यक आहे, असा दावा कोणी केला तर सावध व्हा.
  • क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी रक्कम तपासा.
  • क्यूआर कोड स्कॅन करून पिन टाकणे म्हणजे अनेकदा पैसे पाठवण्याची प्रक्रिया असते.
  • कलेक्ट रिक्वेस्ट काळजीपूर्वक तपासा.
  • अनोळखी व्यक्तीकडून आलेली पैसे मागण्याची विनंती घाईघाईने स्वीकारू नका.
  • ओटीपी, यूपीआय, पिन आणि कार्डची माहिती गुप्त ठेवा.
  • ओटीपी सांगितल्याशिवाय व्यवहार होत नाही, असे सांगूनही कोणी माहिती मागत असेल तर फोन बंद करा.
  • स्क्रीन-शेअर किंवा रिमोट-अ‍ॅक्सेस अ‍ॅप डाउनलोड करू नका.
  • ‘तुमचे पेमेंट अडकले आहे’, ‘केवायसी‘ अपडेट करा’ किंवा ‘रिफंड मिळवून देतो’ असे सांगून अशी अ‍ॅप्स डाउनलोड करण्यास सांगितले जाऊ शकते.
  • यूपीआय अ‍ॅप फक्त अधिकृत अ‍ॅप स्टोअर किंवा प्ले स्टोअरवरूनच डाउनलोड करा.
  • मोबाइल हरवल्यास तातडीने पोलिसांकडे तक्रार करा.
  • आपण केलेल्या व्यवहाराची एसएमएस किंवा अ‍ॅपमधील सूचना तपासा.
  • पैसे पाठवल्यानंतर किंवा मिळाल्यानंतर व्यवहाराची रक्कम आणि प्राप्तकर्ता तपासण्याची सवय लावा.
  • ‘चुकून पैसे पाठवले’ म्हणून आलेल्या संदेशांवर लगेच विश्वास ठेवू नका.
  • यूपीआय पिन ही तुमच्या पैशांची चावी आहे, ती कोणालाही देऊ नका.
  • सायबर फसवणूक झाली असे लक्षात आल्यास वेळ न दवडता आपल्या बँकेशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
Previous Post

राशी भविष्य २२ ते २८ ऑगस्ट

Next Post

हॅपी रिपब्लिक!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.