• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

दिग्गजांच्या उपस्थित रंगला पुस्तक प्रकाशन सोहळा

प्रतिनिधी

Marmik Team by Marmik Team
August 11, 2026
in विशेष लेख
0
दिग्गजांच्या उपस्थित रंगला पुस्तक प्रकाशन सोहळा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डिंपल प्रकाशनातर्फे प्रकाशित तीन पुस्तकांचे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच मुंबईत झाले. शिवसेनेचे प्रवक्ते आणि जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी लिहिलेल्या ‘मार्मिक प्रबोधनाचे शतक’ या पुस्तकात प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यापर्यंतच्या वैचारिक परंपरेचा आढावा घेतलेला आहे. त्यांनीच लिहिलेल्या ‘मर्मभेद’ या पुस्तकात विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण राजकीय लेखांचे संकलन आहे. ‘ज्वलंत रेषा बाळ केशव ठाकरे’ हे बाळासाहेबांच्या कुंचल्यातून उमटलेल्या ज्वलंत व्यंगचित्रांचे संकलन ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांनी संपादित केले आहे.

या तीनही पुस्तकांच्या संयुक्त प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर युवासेनाप्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे, सौ. रश्मी उद्धव ठाकरे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी, साप्ताहिक मार्मिकचे कार्यकारी संपादक मुकेश माचकर, दै. नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत, पत्रकार, लेखक, संपादक विजय सामंत, शिवसेनेचे उपनेते भाऊ कोरगावकर, नितीन नांदगावकर, शिवसेना प्रवक्ते अखिल चित्रे, डिंपल प्रकाशनाचे अशोक मुळ्ये, कौतुक मुळ्ये आदी अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. अश्विनी भोईर यांनी सूत्रसंचालन केले.

Previous Post

हे घ्या पुरावे आणि करून दाखवा कारवाई!

Next Post

मोदींनी पेरले तेच उगवले!

Next Post
मोदींनी पेरले तेच उगवले!

मोदींनी पेरले तेच उगवले!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.