• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नवे महाभारत!

टोक्या टोचणकर टोचन

Marmik Team by Marmik Team
August 11, 2026
in टोचन
0
नवे महाभारत!

जेन झी म्हणजेच खुळखुळा आणि खेळण्यांऐवजी हाती मोबाईल घेऊन जन्माला आलेली पिढी. या पिढीने मोबाईल पाहिला तसंच आजूबाजूला झपाट्याने होत असलेला बदलही पाहिला. दुनिया मेरी मुठ्ठी में म्हणत मोबाईलवर सर्पिंâग करण्यात मग्न असलेल्या या पिढीला आत्मकेंद्री म्हणून नावं ठेवण्यात येत असली तरी ती अतिशय बुद्धिमान आहे, याबाबत कुणाचंच दुमत नाही. ती बिनधास्त आहे, मनमोकळी आहे हे तिच्या वागण्याबोलण्यातून प्रत्ययास येतं. मुलींनी काकूबाईसारखं जगावं आणि मुलांनी आईबापाच्या धाकात राहावं, हेही तिला मान्य नाही. ती राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रेमी आहे. मात्र स्वार्थासाठी जर कुणी तिच्या शैक्षणिक प्रगतीआड येऊन तिच्या भवितव्याचा चोळामोळा करू पाहत असेल तर ती वाघिणीसारखी चवताळून उठते आणि कसल्याही संकटाची पर्वा न करता स्वत:ला शहेनशहा समजणार्‍या सत्ताधार्‍यांना कशी हादरवून सोडते याचं प्रत्यंतर सार्‍या जगाने पाहिलं. जेव्हा हे विद्यार्थी पोलिसांना न जुमानता बॅरिकेड्सचे अडथळे पार करून संसद भवनाच्या प्रांगणात घुसले त्यावेळी मात्र आपली गय नाही हे जाणून नकली शहेनशहा शरण आले. कळसूत्री बाहुले असलेले शिक्षणमंत्री पदावरून उतार झाले. पुढचा सगळा इतिहास तुम्हाला माहीत आहे… माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या त्या विजयदिनादिवशी माझ्या घरासमोर जमलेल्या हजारो तरुण मुलामुलींसमोर भाषण देत होता. दिल्लीतील तरुणाईचा जोश इथेही होता. नेहमी राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेणार्‍या पोक्याची मुलाखत घेण्यासाठी प्रख्यात खुबसुरत चॅनेलची सुंदर युवती सकाळपासूनच फौजफाटा घेऊन पोक्याच्या मागे लागली होती. समोरच्या उंच
टॉवरमध्ये चोवीसाव्या मजल्यावर राहणार्‍या त्या युवतीला पोक्या पत्रकार म्हणून आधीपासूनच ओळखत होता. पण त्याने तसं अजिबात दाखवलं नाही. युवकांचा जल्लोष शांत झाल्यावर तिने पोक्याला गाठले तेव्हा पोक्या हसत म्हणाला, तरुणाईच्या या यशस्वी आंदोलनातून सर्वांनाच खूप काही शिकायला मिळालं. कुणालाही न जुमानणार्‍या सरकारला या तरुणाईने नाक मुठीत धरून शरण यायला लावलं. सत्तेचा माज कितीही भयानक असला तरी कोणीतरी तो उतरवतोच. ही नियतीची किमया असते. या वेळी अभिजीत दिपके हा तरुण देवासारखा धावून आला, संकटात सापडलेल्या तरुण मुलामुलींची सत्ताधीशरूपी क्रूर राक्षसाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी, तेही अमेरिकेतील आपल्या उज्वल भवितव्यावर लाथ मारून.
-म्हणजे, या सार्‍यामागे नियतीचा वरदहस्त होता असं म्हणायचंय तुम्हाला!
-होय. नाहीतर कोण कुठले सुप्रीम कोर्टातले आंदोलकांना झुरळ म्हणून संबोधणारे सरन्यायाधीश. त्यांना कायमचा धडा शिकवण्यासाठी परदेशातून श्रीकृष्णाप्रमाणे क्षणात धावून येणारा अभिजीत दिपके, त्याच्या एका शब्दाखातर त्याच्या पाठीमागे जिवाची पर्वा न करता जंतर मंतर या कुरुक्षेत्रावर लाखोच्या संख्येने उभे राहून तिथे महाभारत घडवणारे जेन झी म्हणजे दुसरं काय होतं?
-म्हणजे हे आधुनिक महाभारत होतं?
-अलबत! एकीकडे सत्तेने आंधळे झालेले धृतराष्ट्रासारखे कौरव होते. त्यातील दुर्योधन कोण आणि दु:शासन कोण, भीष्म कोण आणि शकुनीमामा कोण हे तुम्हीच ओळखा. दुसरीकडे सत्वशील धर्मराजाप्रमाणे लडाखचे लढाऊ आणि संयमी वीरपुरुष सोनम वांगचुक तर आंदोलक तरुणाईला पाठिंबा देण्यासाठी आमरण उपोषणाला बसले होते. अभिजीत जंतर मंतरवर अवतीर्ण झाला, त्यावेळी त्याने हाक देताच देशभरातून तरुणाईचा लोंढा अंगात वारं शिरल्यासारखा जंतर मंतरवर दाखल झाला. प्रचंड ऊर्जेचा स्त्रोत त्यांच्या अंगातून कसा वाहत होता, हे आपण त्यांच्या देहबोलीवरून अनुभवत होतो. मोबाईलच्या आधुनिक तंत्राद्वारे त्यांनी पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर मांडली. घराघरात पोलिसी अत्याचाराचे कारनामे पोहोचले. त्यांनी संसदेवर केलेली चाल हा या आंदोलनातील सर्वोच्च बिंदू होता. शेवटी राजा झुकला आणि सपशेल शरणागती पत्करून आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य करत त्याने जणू लोटांगण घातलं. ही आधुनिक महाभारताची लढाई होती.
-दीपकेंच्या रुपाने आंदोलकांना मिळालेलं नेतृत्व इतकं परिपक्व कसं होतं?
-सांगितलं ना, हा नियतीचा दैवी चमत्कार होता. मुँहमे राम बगलमे छुरी असणार्‍या सत्ताधीशांना नियतीने अभिजीतच्या रुपाने धडा शिकवला. तो आणि त्याचे सहकारी हे पाच पांडव सत्ताधारी कौरवांना धडा शिकवून गेले. आंदोलनात लढताना विखुरलेल्या तरुणतरुणींच्या अंत:करणाला जोडलेला धागा समान होता. तो प्रवाह सर्वांच्या अंगप्रत्यांगातून एकाचवेळी प्रवाहित होत होता. त्यामुळे नेत्याच्या आदेशाची वाट न पाहत प्रत्येकजण स्वतंत्र बुद्धीने लढत होता. त्यातसुद्धा एक समान सूत्र होतं. एकच अंत:प्रेरणा होती. हे बळ त्यांना नियतीनेच दिलं होतं. भीती हा शब्दच त्यांनी शब्दकोशातून काढून टाकला होता. ते कुणाच्याही हातचं बाहुलं झाले नाहीत. सर्व मागण्या मान्य झाल्यावर त्यांनी आंदोलन समाप्त झाल्याच जाहीर करून विजयोत्सव साजरा केला. डोक्यात हवा शिरू दिली नाही किंवा हे सरकार उलथून टाका अशा वल्गनाही केल्या नाहीत. ज्यांच्या पापाचा घडा भरत आला आहे, ते आपल्याच कर्मानेच जाणार ही दूरदृष्टी त्यापाठी आहे. अभिजीतनेही नम्रपणे, मी नेता नाही, मी निमित्तमात्र होतो, अशी प्रतिक्रिया देऊन विषय्ा तात्पुरता संपवला असला तरी सरकारने दगा दिल्यास तो पुन्हा कधीही उसळी मारेल. जगाच्या इतिहासात न्याय मिळवण्यासाठी सरकारविरुद्ध इतके यशस्वी तुंबळ युद्ध आजपर्यंत कोणत्याही तरुणाईने केलं नसेल. अहिंसात्मक मार्गाने आजच्या काळातही सरकार नमू शकतं हे एका मराठी तरुणाने सिद्ध करून दाखवलं याचा अभिमान वाटतो. या सरकारचा एकेक चिरा ढासळण्यास आता सुरुवात झाली आहे! यदा यदा ही धर्मस्य…

Previous Post

नाय नो नेव्हर

Next Post

राशीभविष्य ८ ते १४ ऑगस्ट २००६

Next Post
राशीभविष्य ( २१ ते २७ फेब्रुवारी २०२६)

राशीभविष्य ८ ते १४ ऑगस्ट २००६

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.