• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा, रत्नागिरी आणि पुण्यात; मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या नवीन मार्गिकेची करणार पाहणी

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 10, 2020
in घडामोडी
0
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा, रत्नागिरी आणि पुण्यात; मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या नवीन मार्गिकेची करणार पाहणी

मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवास सुपरफास्ट होणार आहे. खोपोली ते पुसगाव येथे नवीन मार्गिकेचे काम प्रगतिपथावर असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी 10 डिसेंबर रोजी या मार्गिकेची पाहणी करणार आहेत.

मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोली ते खंडाळादरम्यान नवीन मार्गिकेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गावर उभारण्यात येणारा केबल स्टड पूल हे पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. यामुळे प्रवासासाठी लागणारा वेळही कमी होणार असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या दुपारी 2.50 वाजता करणार आहेत.

रत्नागिरीतील पोफळी प्रकल्पाची करणार पाहणी

रत्नागिरी जिह्यात पोफळी जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येत असून या प्रकल्पाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी 10.00 वाजता करणार आहेत. पोफळी जलविद्युत प्रकल्पातील विद्युतगृहाचीही पाहणी मुख्यमंत्री यावेळी करणार आहेत.

साताऱ्यात कोयना धरण व परिसराची पाहणी

मुख्यमंत्री ठाकरे 12 वाजण्याच्या सुमारास साताऱ्यात पोहोचणार आहेत. या ठिकाणी ते कोयना धरण व परिसराची पाहणी करणार आहेत.

असा असेल दौरा

गुरुवारी 10 डिसेंबर रोजी सकाळी 9.05 वा. जुहू विमानतळ येथून हेलिकॉप्टरने कोयनानगरकडे रवाना होतील. सकाळी 10 वाजता कोयनानगर हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर मोटारीने रत्नागिरी जिल्ह्यातील पोफळी जलविद्युत प्रकल्पाकडे प्रयाण करतील. सकाळी 10.50 वा. पोफळी जलविद्युत प्रकल्प कोयना टप्पा-4 विद्युतगृहाची पाहणी ते करणार असून दुपारी 12.05 वाजता कोयना धरण येथे ते आगमन व परिसराची पाहणी करणार आहेत. दुपारी 2 वाजता मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील बोगदा क्र. 2 च्या प्रकल्पस्थळाकडे प्रयाण करणार असून मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते पुसगाव यादरम्यानच्या नवीन मार्गिकेच्या बांधकामाची पाहणी करणार आहेत. 2.50 वा. पॅम्प ऑफिस येथे आगमन व मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली–पुसगाव दरम्यानच्या नवीन बांधकामाचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांना करण्यात येणार आहे.

Previous Post

पिडीतेला उंची राहणीमानासाठी दोष देता येणार नाही; न्यायालयाचा निर्णय

Next Post

राज्य सरकारचे इन्क्युबेशन सेंटर लवकर, नवीन उद्योजकांना पूरक वातावरण देणार

Next Post
राज्य सरकारचे इन्क्युबेशन सेंटर लवकर, नवीन उद्योजकांना पूरक वातावरण देणार

राज्य सरकारचे इन्क्युबेशन सेंटर लवकर, नवीन उद्योजकांना पूरक वातावरण देणार

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.