ग्रहस्थिती : मंगळ हर्षल वृषभेत, प्लूटो मकरेत, राहू कुंभेत, शनि नेपच्युन मीनेत, रवि बुध मिथुनेत, गुरु कर्क राशीत, शुक्र केतु सिंह राशीत. दिनविशेष : २५ जुलै देवशयनी आषाढी एकादशी, २६ जुलै प्रदोष, २९ जुलै गुरुपौर्णिमा, व्यासपूजा.
मेष : जनसंपर्कातून कामे मार्गी लागतील. व्यवसायात यश मिळेल. नवी कामे हातात येतील. तरुणांना यश मिळेल. विवाहेछुकांसाठी चांगला काळ राहील. थकीत येणे वसूल होईल. कोर्टाची कामे पुढे सरकतील. नोकरीत संयम ठेवा. कामाचे ओझे डोक्यावर घेऊन पुढे जाऊ नका. आर्थिक नियोजनात खबरदारी घ्या. महागड्या वस्तू खरेदी करू नका. शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील. मोठा निर्णय घेताना सल्लामसलत करूनच पुढे जा. अनोळखी व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. व्यवसायात नव्या कल्पना सुचतील. मित्र, नातेवाईकांबरोबर असताना हिरमोड होईल. किरकोळ वादाकडे दुर्लक्ष करा. कुटुंबासोबत असताना अति उत्साह भोवेल.

वृषभ : कामाचा वेग वाढेल. सकारात्मक ऊर्जा कामाला येईल. तरुणांना नव्या नोकरीच्या संधी चालून येतील. शिक्षणक्षेत्रात, व्यवसायात तसेच बुद्धिजीवींना यश मिळेल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. लेखक, प्रकाशक, कलाकारांसाठी काळ उत्तम राहील. मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी योग्य व्यक्ती निवडा. अर्धे प्रश्न मार्गी लागतील. व्यवसायात यश मिळेल. आर्थिक नियोजन बिघडू देऊ नका. घरातले प्रश्न मार्गी लावताना त्यात सुसूत्रता ठेवा. घाई करणे टाळा. राग व्यक्त करू नका. अहंकार दूर ठेवा. धाडसी निर्णय घेताना जपून.
मिथुन : बँकेची कामे पुढे सरकतील. विवाहेछुकांसाठी चांगला काळ. तरुणांना यश मिळेल. एकादशीला चांगली बातमी कळेल. संशोधन क्षेत्रात यश मिळेल. नोकरीनिमित्ताने बाहेरगावी जाल. प्रवासात खिसापाकीट सांभाळा. जुने आजार डोकेदुखी वाढवतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. ज्येष्ठांच्या मतांचा आदर करा. शेअर, लॉटरी, सट्ट्यातून लाभ मिळेल. समाजकार्यात कौतुक होईल. लेखकांना सन्मान मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. उच्चशिक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. मनासारखी नोकरी मिळेल. येणे वसूल होईल.

कर्क : कलाकारांना नव्या संधी मिळतील. सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी घ्या. गैरसमजातून वाद घडतील. छंंदाचे रूपांतर व्यवसायात होईल. दाम्पत्यजीवनात आनंद मिळेल. सामाजिक क्षेत्रात गौरव होईल. तरुणांना खाचखळग्यांचा सामना करावा लागेल. आरोग्याच्या तक्रारी त्रासदायक ठरतील. नोकरीच्या ठिकाणी सहनशक्तीची परीक्षा होईल. शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधकांना यश देणारा काळ. आर्थिक व्यवहारात गडबड होईल. महिलांनी घाई टाळावी. दाम्पत्यजीवनात वाद होतील. उच्चशिक्षणासाठी विदेशात जाऊ शकाल.

सिंह : नोकरीत मनासारखी स्थिती राहील. व्यवसायात गणित बिघडेल. जागरण घडेल. कुटुंबासाठी वेळ खर्च होईल. प्रेमप्रकरणात वाद होईल. जनसंपर्क, जाहिरात माध्यमात नव्या संधी लाभतील. तरुणांच्या कामाचे गणित बिघडेल. अतिविश्वास दाखवणे टाळा. बँकेच्या कामांत गोंधळ होईल. कामानिमित्ताने प्रवास कराल. कुटुंबातील प्रश्न शांतपणे सोडवा. चित्रकार, कलाकारांना यश देणारा काळ. नातेवाईकांशी वाद होतील. महिलांनी हेकटपणा टाळावा. रागावर नियंत्रण ठेवा. सरकारी कामे मार्गी लागतील.

कन्या : तरुणांना यश मिळेल. चांगल्या बातम्या कळतील. नोकरीत कौतुक होईल. व्यवसायात नव्या योजना मार्गदर्शक ठरतील. विदेशात व्यवसाय विस्तार कराल. उच्चशिक्षणाचा प्रश्न लांबणीवर पडेल. महिला व्यावसायिकांना चांगली बातमी कळेल. ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. भावा-बहिणीला मदत करावी लागेल. स्वबळावर पुढे जा. निर्णय घेताना सौजन्य दाखवा. गोष्टी पटल्या नाहीत तर त्याकडे दुर्लक्ष करा. कोणाला सल्ले देऊ नका. ब्रोकर, एजंट, मेडिकल व कृषी क्षेत्रातील कर्मचार्यांसाठी मंडळींसाठी चांगला काळ.

तूळ : नोकरीत कामाचा ताण वाढेल. करियरचा आलेख उंचावेल. कलाकारांकडे कामाचा ओघ वाढेल. समाजकार्यातून समाधान मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या. संपादक, लेखकांसाठी चांगला काळ. नवीन गुंतवणूक करताना जपून. शिक्षणक्षेत्रात प्रगती होईल. क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. विदेशात शिक्षण घेण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. तरुणांना निर्णय घेताना कटकटी भेडसावतील. नोकरीत कंटाळा येईल. खर्चात वाढ होईल. घरात गैरसमजातून नाराजी निर्माण होईल. नातेवाईकांशी बोलताना काळजी घ्या. नात्यात दुरावा येईल. महिलांना यशदायी काळ. व्यवसायात आर्थिक बाजू भक्कम राहील. नव्या ऑर्डर मिळतील. दाम्पत्य जीवनात आनंदी राहाल.

वृश्चिक : महत्वाची कामे झटपट पुढे सरकतील. नोकरीत कौतुक होईल. वरिष्ठ शाबासकी देतील. तरुणांना चमकदार यश मिळेल. नव्या नोकरीची संधी लाभेल. शेअर, सट्टा, लॉटरीमधून लाभ मिळेल. सरकारी कामे पुढे सरकतील. व्यवसायाचे गणित चुकवू नका. मनातल्या गोष्टी जगजाहीर करू नका. घरात गैरसमज टाळा. जुनी गुंतवणूक चांगले लाभ देईल. आर्थिक नियोजन करा. समाजकार्यात प्रतिष्ठा वाढेल. मालमत्तेचा प्रश्न मार्गी लागेल. नवीन वास्तू घेण्याबाबत सकारात्मक चर्चा होईल. थकीत येणे वसूल होईल.

धनु : नोकरीत कामाची चिंता राहील. घरात आनंद वाढवणारी बातमी कळेल. व्यवसायात लाभ मिळतील. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. खेळाडूंना यश मिळेल. जुने मित्र भेटतील. बँकेची कामे मार्गी लागतील. नवीन गुंतवणूक करताना विचार करूनच पुढे जा. संयम ठेवा. समाजकार्यात प्रतिमा उंचावेल. साहित्यक्षेत्रात गौरव होईल. नातेवाईकांना अचानक आर्थिक मदत करावी लागेल. अडकलेला जुना व्यवहार पूर्ण होईल. आत्मविश्वास आणि सहनशीलता यांची सांगड घाला. विदेशात शिक्षणाच्या संधी चालून येतील.

मकर : मोठ्या आर्थिक उलाढाली सहज पूर्ण कराल. तरुणांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. व्यवसायात आर्थिक आलेख चढता राहील. कोणाला आर्थिक मदत करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा. आर्थिक नियोजन चोख करा. अचानक खर्च वाढेल. बोलण्यातून गैरसमज टाळा. धार्मिक कार्यातून सकारात्मक ऊर्जा मिळेल. संसर्गजन्य आजारापासून काळजी घ्या. नोकरीत पगारवाढ, बढती मिळेल. वरिष्ठांच्या मतांचा आदर करा. कामानिमित्ताने प्रवास कराल. व्यवसायात नवा निर्णय घेताना जपून.

कुंभ : नोकरीत कौतुक होईल. मनासारखी स्थिती राहील. तरुणांना यश मिळेल. शिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. महिलांना आरोग्याचे प्रश्न त्रास देतील. कामाचे गणित वेळेमुळे बिघडेल. व्यवसायात अधिकचे श्रम करावे लागतील. नव्या ओळखी लाभदायक ठरतील. अडकून राहिलेले काम पूर्ण होईल. अति आत्मविश्वासाने कोणतेही काम करू नका. आर्थिक नुकसान टाळा. घरातील ज्येष्ठांचा सल्ला माना. खिशात किती पैसे आहेत, ते पाहून नियोजन करा. आठवड्याअखेर धावपळ करावी लागेल.

मीन : तरुणांची कामे पूर्ण होतील. नोकरीत यश देणारी स्थिती राहील. नवीन वास्तू खरेदी करण्याचा विषय पुढे सरकेल. महिलांना आरोग्याचे प्रश्न सतावतील. व्यवसायात सबुरी ठेवा. मनातल्या गोष्टी व्यक्त करणे टाळा. मुलांकडून चांगली बातमी कळेल. सरकारी कामे रेंगाळतील. व्यवसायात मनासारख्या घटना घडतील. बुद्धिमतेच्या जोरावर यश मिळेल. घरातले वातावरण उत्तम राखा. कर्ज प्रकरणात विलंब होईल. दाम्पत्यजीवनात आनंददायी काळ. मित्रमंडळींचा सल्ला कामी येईल. भावनिक होणे टाळा.

