• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

आंब्राई

श्रीकांत आंब्रे

marmik by marmik
June 30, 2026
in आंब्राई
0
आंब्राई

नरेंद्र मोदी
`नीट’ असो वा मोठे स्मगलिंग
सगळीकडे आपलीच माणसे
सापडले तर सोडवायाला
नाही कठीण आता फारसे

बँक घोटाळे करूनसुद्धा
देशाबाहेर किती पळाले
त्यांना बाहेर पडण्यासाठी
नाही अवसान कधी गळाले

म्हणून सत्ता हवी हाताशी
जिकडे तिकडे आम्हीच पोलीस
चोर सोडून संन्याशाला
नेहमीच धरता येते ओलीस

देवेंद्र फडणवीस
नाही कुणावर विश्वास माझा
सगळीच खाती माझ्याच हातात
गृहखाते तर अगदीच अव्वल
नाचवतो मी माझ्याच तालात

राज्यात चाललीय अंदाधुदी
सारे कळते पुरते मजला
गृहमंत्रीपदी अपयशी मी
सुव्यवस्थेच्या गातो गझला

महायुतीत तर एकेक नमुने
कुणा हाती मी सोपवू खाते
चढून बसतील डोक्यावरती
अमितजी म्हणतात तुम्हीच पाहा ते

छगन भुजबळ
त्यांचे पुत्र, त्यांच्या कन्या
त्यांचे पुतणे, त्यांच्या सुना
आम्हीच काय घोडे मारले
आम्हालाच का लावता चुना

एकेक घराणे राज्य लुटते
आम्हीसुद्धा मारली मजा
सगळेच खातात मलाही खाऊ द्या
आम्हीच का भोगावी सजा

खाओ, पिओ, ऐश करो
लुटण्यासाठीच आहोत आपण
तरीही पोट भरत नाही
राज्य आम्हाला दिलेय आंदण

एकनाथ शिंदे
अजूनसुद्धा वाटे मजला
करतील मला मुख्यमंत्री
फडणवीसांना माझा सल्ला
सोलत बसा नागपूर संत्री

माझ्यासारखा मुख्यमंत्री
या देशाने पाहिला नाही
गरज सरताच आणले खाली
पालखीचा मज केला भोई

आता करतो दिल्ली वार्‍या
तोंडावरती गोड गोड बोलतात
पाठ फिरल्यावरती माझी
दूषणे देत किंमत करतात

 

सूर्यदेव
उदंड पापे पृथ्वीवरती
म्हणून कोप झाला माझा
असेच सुरु राहिले तर मी
दाखवीन हिसका आणखी माझा

खून, अपघात, अत्याचारांची
सत्ताधीशांना नाही पर्वा
यांना धडा शिकवायाची
वेळ जवळ आलीय भावा

सामान्यांचे जगणे झाले
महागाईने मुश्किल आता
पाप कुणाचे, ताप कुणाला
जनतेला या नाही त्राता

Previous Post

चिरा आणि निष्ठा!

Next Post

भाजपच्या बारा वर्षांत शिक्षणाचे तीन तेरा!

Next Post
भाजपच्या बारा वर्षांत शिक्षणाचे तीन तेरा!

भाजपच्या बारा वर्षांत शिक्षणाचे तीन तेरा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.