• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

आंब्राई

श्रीकांत आंब्रे

marmik by marmik
April 25, 2026
in आंब्राई
0
आंब्राई

 

रुपाली चाकणकर
इतके पुरावे असूनसुद्धा
हात लावायची हिंमत नाही
का घाबरता इतके मला
अटक करणे गंमत नाही

ही तर खरातबाबांची कृपा
त्यांनीच बळ दिले मला
देखण्या माझ्या चेहर्‍याने ह्या
मुठीत ठेवले एकेकाला

खरातबाबांची हालत पाहून
अनेकदा तर धडकी भरते
समज देऊन सोडतील मला
आशेची वात मनात तेवते

 

अशोक खरात
आता माझे मरण मला
डोळ्यासमोर दिसते
भविष्य माझे मला पाहून
पोट धरून हसते

कुंडल्या पाहून कित्येकांच्या
अनेकांना दिले सल्ले
बुद्धीची या कमाल पाहून
थापेबाजीला कसे भुलले?

पराक्रमच आहे मोठा
गिनीज बुकात नाव जाईल
चरित्र माझे लिहिल रुपाली
नव्या पिढीला प्रेरणा देईल

पत्नी कल्पना खरात
कुठे लपवू तोेंड माझे
म्हणून गेले होते पळून
त्यांचे हाल पाहून आता
अवसान माझे गेले गळून

रोज घरी येती आमच्या
पैशाच्या त्या अमाप राशी
त्याच्यावरच लोळता लोळता
एक दिवस पडले फशी

हपापले मी पैशांसाठी
त्याच्यासाठी तोडली नाती
होते नव्हते सारे गेले
आता खावी लागेल माती

 

पुत्र हर्षवर्धन खरात
इतका पैसा येतो कुठून
रोज आमच्या घरामध्ये
बंडले मोजून डॅड दमती
शंका माझ्या मनामध्ये

एक दिवस मला म्हणाले
आता डोक्याला ताप नाही
रुपये मोज तू मशीनवर या
माझ्यासारखा बाप नाही

रोज हलक्या आवाजातच
आई-बाबा करती कुजबूज
कान टवकारुनही नाही
कळले मला त्यांचे हितगुज

महाराष्ट्र
श्रद्धा आणि अंधश्रद्धा
एकाच नाण्याच्या दोन बाजू
कुठले खरे, कुठले बथ्थड
कुठले लागते खणखण वाजू

भोंदू खरात प्रकरणाने
अनेक मुखवटे गळून पडले
मंत्री-आमदार नेत्यांचेही
खरे चेहरे समोर आले

आता करतील खोटे खुलासे
म्हणतील सुद्धा मी नाही त्यातला
खरे काय ते सांगतो आता
आधी कोयंडा लावा आतला

Previous Post

नेपोलियन आणि शिवराय, रामदास आणि तुकोबा

Next Post

गंध नकोसा… विवेकाने टाळावासा…

Next Post
गंध नकोसा… विवेकाने टाळावासा…

गंध नकोसा... विवेकाने टाळावासा...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.