• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नाय नो नेव्हर

संतोष पवार

marmik by marmik
April 18, 2026
in भाष्य, व्यंगावर बोट
0
नाय नो नेव्हर

संतोषराव, ईव्हला आई नव्हती, हेच तर अ‍ॅडमबरोबरच्या तिच्या सुखी संसाराचे रहस्य नसेल?– संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव, पुणे
या प्रश्नाचे उत्तर उद्या आमच्या ईव्हच्या आईने वाचलं तर?… तर मग नंतर आमच्या सुखी संसाराचं काय झालं याचं रहस्य लोक शोधत बसतील… (स्वतःच्या संसाराचं रहस्य सांगायला आम्ही तुमच्यासारखे ‘अ‍ॅडम’ नाही.)

जगात ज्यांचं ऐकल्याशिवाय कोणताही मोठा नेता त्याच्या देशात एकही निर्णय घेत नाही, इतके महान विश्वगुरू आपल्या देशात असताना इराण आणि अमेरिका यांनी युद्ध थांबवण्याच्या वाटाघाटींसाठी पाकिस्तानला मध्यस्थ नेमावं? काय म्हणावं त्यांच्या मूर्खपणाला?- रेवती देशपांडे, चर्‍होली
मूर्खाच्या नादाला लागू नये हे समर्थांचे वचन सगळ्या जगाला कळलं असेल… म्हणून… म्हणूनच इराण आणि अमेरिका यांच्या नादाला आपले विश्वगुरू लागत नसतील. काही कळलं कां ? याच्याहून जास्त विस्कटून नाही सांगू शकत. कारण मूर्खाच्या नादाला आम्ही लागत नाही… हे तरी कळलं का?

शाळेपासून कुटुंबापर्यंतच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रूपवर काही माणसं कधीच तोंड उचकटत नाहीत, काही माणसं फक्त स्वत:ची प्रसिद्धी करणारे मजकूर टाकतात आणि काही सकाळी दात घासल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सगळ्या चिरकुट गोष्टी टाकत बसतात, सगळं जग वाट बघत असल्यासारखी प्रत्येक विषयावर आपली मतं रेमटवत बसतात… तुम्ही अशा ग्रूपमध्ये काय करता?- राजेंद्र पाळंदे, वणी
देवाला प्रार्थना करतो की ग्रूपमध्ये चाललंय ते असंच चालू दे… इतका फुकटचा टाईमपास दुसरीकडे कुठे मिळणार?

मोठ्या कौतुकाने तुमच्याबरोबर सेल्फी काढायला आलेल्या एखाद्या चाहत्याने फोटो काढून घेतल्यानंतर आपल्याला भलत्याच नावाने हाक मारली, त्याने आपल्याला ओळखलंच नव्हतं, असा अनुभव अनेक नामांकित सेलिब्रिटी सांगतात. तुमचा अनुभव काय?- अमर सानप, ठाकुर्ली
मुळात आपल्याला ओळखण्याचा त्रास लोकांना का द्यायचा? या ‘मानवी दृष्टिकोनातून’ आम्ही स्वतःला सेलिब्रिटीच मानत नाही. उलट यदा कदाचित कुणी ओळखलंच… तर ‘तो मी नव्हेच’ म्हणतो आणि तो बिचारा डोकं खाजवत बसतो, त्याची मजा घेतो. हा अनुभव इतर सेलिब्रिटीबरोबर शेअर करावासा आम्हाला वाटतो. पण मला ओळखा… मला ओळखा… म्हणून धडपडणारे सेलिब्रिटी आम्हाला सेलिब्रिटी मानत नाहीत. त्यामुळे आमचा अनुभव कोणी ऐकत नाही. हाच आमचा अनुभव आहे.

अमेरिकेने इराणच्या सगळ्या पायाभूत सुविधांवर बाँब टाकून त्या नष्ट करण्याची धमकी दिली तेव्हा तिथल्या नागरिकांनी त्या त्या ठिकाणी मानवी साखळी करून त्या जागांचं रक्षण करण्याचा निर्धार जाहीर केला होता. भारतात असं काही होईल तशी वेळ आली तर? – प्रणव गायतोंडे, म्हापसा
आम्ही याचं उत्तर दिलं आणि आम्हाला ‘इराण चले जाव’ असं सांगितलं गेलं तर? तर या दिवसात आम्हाला इराणला सोडायला तुम्ही येणार आहात?

डोनाल्ड ट्रम्प यांना वेळात वेळ काढून भारतात बोलावून खरात बाबाशी त्यांची भेट करून दिली तर जगातले काही प्रॉब्लेम कमी होतील, असं नाही वाटत तुम्हाला?- विलास पंधारे, आष्टी
अहो ट्रम्प अमेरिकेचा अध्यक्ष आहे… त्याला उपाध्यक्ष किंवा उपमुख्यमंत्री बनवायच आहे का तुम्हाला? शेवटी खरातची धाव उपमुख्यमंत्र्यांपर्यंतच… असं आम्हाला आतापर्यंतच्या ‘जाहीर केलेल्या’ बातम्यांवरून तरी वाटतंय… लपवलेल्या बातम्या जाहीर झाल्यावर कदाचित आमचं वाटणं बदलेल…

एखाद्याच्या अंत्ययात्रेला सगळी भावकी, गावकी हजर राहते, पण जिवंतपणी त्याला कोणी भेटायला जात नाही. असा कसा समाज आहे हा? – पांडुरंग बनसोडे, कोरेगाव
आपल्यानंतर आपल्याला पोचवायला चार लोक तरी यायला हवेत… यासाठीच सगळी भावकी, गावकी, अंत्ययात्रेला हजर असते. खोटं वाटत असेल तर तुमचा हा प्रश्न विचारून बघा… नाही… नाही… स्वतःला नाही, इतरांना विचारा… तुमचा हा प्रश्न आम्ही स्वतःलाच विचारला तेव्हा आम्हाला हेच उत्तर सापडलं.

 

 

विचारून टाका प्रश्न

तुम्हालाही अभिनेते संतोष पवार यांना प्रश्न विचारायचाय…? मग वाट कसली बघताय…? उचला पेन आणि टाका विचारून प्रश्न… हा प्रश्न थेट ‘मार्मिक’च्या [email protected] या ईमेल आयडीवर पाठवून द्या… किंवा आमच्या पत्त्यावर पाठवा. मार्मिक प्रश्नाला संतोष पवार उत्तर देतील…

Previous Post

भोंदू खरातच्या गूढ भेटीगाठी !

Next Post

हनीट्रॅपचं मायाजाल

Next Post
हनीट्रॅपचं मायाजाल

हनीट्रॅपचं मायाजाल

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.