ग्रहस्थिती : हर्षल वृषभेत, गुरू मिथुनेत, मंगळ, बुध, राहू कुंभेत, केतू सिंहेत, रवि, शुक्र, शनि, नेपच्युन मीनेत, प्लूटो मकरेत. दिनविशेष : १२ एप्रिल वरुथिनी एकादशी, १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १५ एप्रिल प्रदोष आणि शिवरात्री, १६ एप्रिल अमावस्या आरंभ, रा. ८ वा. ११ मि., समाप्ती १७ एप्रिल सायं. ५ वा. २२ मि.
*****

मेष : आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवसायात धाडसी निर्णय घ्या. नव्या ओळखीचा फायदा होईल. आर्थिक नियोजन यशस्वी होईल. नोकरीत दोलायमान स्थिती राहील. मोठे निर्णय घेताना घाई टाळा. तरुणांना यशासाठी अधिक झटावे लागेल. बँकेची कामे पुढे सरकतील. उन्हाच्या झळा त्रासदायक ठरतील. त्वचाविकारांना निमंत्रण मिळेल. घरातल्या किरकोळ कुरबुरींकडे लक्ष देऊ नका. मुलांची शैक्षणिक प्रगती होईल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. घरी छोटेखानी समारंभ होईल. नातेवाईक भेटतील. धार्मिक ठिकाणांना भेटी द्याल. मित्रांना आर्थिक मदत करावी लागेल.

वृषभ : आर्थिक बाजू सक्षम होण्यासाठी वाट पाहा. नोकरी, व्यवसायात वाद टाळा. कुटुंबात आनंद राखा. सरकारी कामे पुढे सरकतील. तरुणांनी तडजोडीचे धोरण स्वीकारावे. उच्चशिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. पत्नीची मदत मिळेल. अतिउत्साहामुळे नुकसान होईल. घरात एखादी महागडी वस्तू खरेदी करण्याचा निर्णय पुढे जाईल. इस्टेट एजंट, पत्रकार, प्रकाशक, कवी, लेखक, यांना यश देणारा काळ. घरात ज्येष्ठांच्या मताचा आदर करा. आरोग्याच्या तक्रारी डोकेदुखी वाढवतील. पैशाचे नियोजन करा.

मिथुन : किरकोळ कारणामुळे घरात वाद घडतील. व्यवसायात हट्टीपणा अंगाशी येईल. नोकरीत तडजोड, समंजसपणा कामी येईल. आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. मोठे निर्णय घेताना सबूर. तरुणांना तणावाचा सामना करावा लागेल. अडकलेली सरकारी कामे झटपट मार्गी लागतील. नव्या व्यक्तीमुळे व्यवसायाची नवीन कल्पना आकाराला येईल. नातेवाईक, मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल. जनसंपर्काचा फायदा होईल. समाजकार्यातून प्रतिष्ठा वाढेल. वाणीवर नियंत्रण ठेवा. चेष्टामस्करी टाळा.

कर्क : नोकरी, व्यवसायात प्रवास कराल. आरोग्याचे गणित बिघडेल. प्रतिष्ठित व्यक्तींचा सहवास लाभेल. विचारांना गती मिळेल. संयमाने आत्मविश्वास वाढेल. तरुणांना करियरच्या संधी येतील. सरकारी कामे पुढे ढकला. येणे जमा होईल. नातेवाईकांना मदत करा. भावाशी जमवून घ्या. आठवड्याअखेरीस नोकरीत सबुरीने घ्या. मतभेदामुळे वाद होतील. घरात जपून बोला. नवीन गुंतवणुकीला गती मिळेल. व्यवसायात नव्या ऑर्डर मिळतील. आर्थिक आवक वाढेल. कामात भावनेच्या आहारी जाऊ नका.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी वाढतील. मनासारखे घडणार नाही. घरातील वातावरण शांत ठेवा. गुरुकृपा राहील. काही कामे हलकी होतील. तरुणांच्या डोक्यात गोंधळ राहील. धार्मिक कार्यातून आनंद मिळेल. मामा-मावशीची मदत मिळेल. व्यवसायात यशोशिखर गाठण्यासाठी युक्तीचे तंत्र कामी येईल. नोकरीत दूरचे प्रवास कराल. वाहन हळू चालवा. मुलांकडून उत्साहवर्धक कामगिरी होईल. घरात आनंद वाढेल. जुने मित्र भेटतील. अनपेक्षित बातमी कळेल. शिक्षक, प्राध्यापक यांना यशदायी काळ.

कन्या : जुने आजार डोके वर काढतील. महिलांना अपेक्षित यश मिळेल. घरात किरकोळ वाद होतील. व्यवसायात समंजसपणा कामाला येईल. नोकरीत चुका होतील. वरिष्ठ नाराज होतील. तरुणांना घाईने घेतलेला निर्णय त्रासदायक ठरेल. गुरुकृपा राहील. आर्थिक व्यवहारात उतावळेपणा नको. महिलांनी प्रकृतीकडे अधिक लक्ष द्यावे. चुकीच्या मार्गाने पैसे कमावण्याचे धाडस अंगाशी येऊ शकते. नोकरीत बदली होईल. भावंडांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. खेळाडूंना यश मिळेल.

तूळ : व्यवसायात आर्थिक व कामाचे आणि वेळेचे गणित बिनसेल. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. लहान मुलांचे आरोग्य बिघडेल. येणे वसूल करण्यासाठी अधिक प्रयत्न करा. तरुणांना थोडी ख़ुशी थोडा गम देणारे अनुभव येतील. कुटुंबासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील. घरातील नियोजित कामे लांबणीवर पडतील. अट्टहास टाळा. नव्या व्यवसायाच्या संकल्पना पुढे ढकला. धर्मग्रंथ वाचाल. योगा, प्राणायामातून लाभ मिळेल. प्रेमात वाद होतील. मित्रांना मनातल्या गोष्टी सांगू नका. घरात ज्येष्ठांचा सल्ला ऐका. बहिणीची मदत मिळेल. शेजार्यांशी वाद होतील.

वृश्चिक : मुलांशी जपून वागा. रागावू नका. कलाकारांना यशदायी काळ. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. गुंतवणूक चांगला लाभ देईल. शेअर, लॉटरी, सट्टा यांच्या प्रेमात पडू नका. कोर्ट-कचेरीची कामे पुढे ढकला. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात आर्थिक बाजू विस्कळीत होईल. आर्थिक नियोजनात काळजी घ्या. सरकारी कामे मार्गी लावताना वाढीव कष्ट घ्यावे लागतील. नोकरी, व्यवसायात वाद होतील. बोलण्यातून गैरसमज होईल. नवीन वास्तू घेण्याच्या विचाराला गती मिळेल.

धनु : नोकरी-व्यवसायांत प्रश्न सामोपचाराने सोडवा. मुलांकडून आनंद वाढवणारी बातमी समजेल. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. तरुणांना कामाच्या नव्या संधी येतील. सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होणे टाळा. मित्र, नातेवाईकांच्या हो ला हो करा. अति आत्मविश्वास टाळा. शिक्ष्ाक, संशोधकांच्या कानावर चांगली बातमी पडेल. कुटुंबात चढ-उताराचा सामना कराल. आर्थिक नियोजन करा. व्यवसायाच्या विदेशात विस्ताराचे प्रयत्न पुढे सरकतील. आर्थिक देवाणघेवाणीआधी कागदपत्रांची तपासणी करा.

मकर : आर्थिक प्रश्न मार्गी लावताना बुद्धीकौशल्य कामी येईल. मित्रांचा सल्ला उपयोगी ठरेल. नोकरीत किरकोळ वादातून तणाव होतील. वरिष्ठ नाराज होतील. कुटुंबासाठी वेळ खर्च होईल. छोट्या यशामुळे हुरळून जाऊ नका. पैशाचे नियोजन करा. माहिती-तंत्रज्ञानात उत्कर्षाचा काळ अनुभवाल. अचानक धनलाभ होईल. तरुणांना यशदायी काळ. खेळाडूंना मनासारखे यश मिळेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित येणी वसूल होतील. नवे वाहन घेण्याचा विचार पुढे जाईल. सामाजिक क्षेत्रात नव्या संधी येतील.

कुंभ : आर्थिक स्थिती उत्तम राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. नवीन मित्रांवर विश्वास टाकून आर्थिक व्यवहार करू नका. तरुणांना बेचैन करणारी घटना घडेल. गुरुकृपा राहील. राग व्यक्त करू नका. मित्रांशी वाद नको. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. कवी, लेखक, खेळाडू, राजकारणी यांच्यासाठी चांगला काळ. एखादी शुभ घटना कानावर पडेल. घरातले वातावरण उत्तम राहील. पती-पत्नी दोघांनी सामंजस्य दाखवावे. नवीन गुंतवणूक करताना लेखाजोखा तपासा. खेळाडू, ब्रोकर, रियल इस्टेट एजंटांना यशदायी काळ.

मीन : घरात मान-अपमानाकडे दुर्लक्ष करा. मुलांमुळे डोकेदुखी वाढेल. शिक्षक, प्राध्यापकांचा गौरव होईल. नोकरीत काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा. व्यवसायात नव्या कल्पना यश देतील. कामानिमित्ताने दूरचे प्रवास घडतील. संशोधन क्षेत्रात विदेशात जाण्याची संधी मिळेल. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. कलाकारांना येणारा काळ उत्तम यश देईल. देवदर्शनासाठी जाल. दानधर्म होईल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. सार्वजनिक जीवनात गोडी गुलाबी दाखवा. मित्र-मंडळींना मदत करावी लागेल.

