• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राशीभविष्य (१४ ते २० मार्च २०२६)

Nitin Phanse by Nitin Phanse
March 17, 2026
in भविष्यवाणी
0

ग्रहस्थिती : हर्षल वृषभेत, मंगळ, प्लूटो मकरेत, गुरू मिथुनेत, केतू सिंहेत, रवि, बुध, शुक्र, राहू-कुंभेत, शनि, नेपच्युन मीनेत दिनविशेष : १५ मार्च पापमोचनी एकादशी, १६ मार्च सोमप्रदोष, १७ मार्च शिवरात्री, १८ मार्च दर्श अमावस्या आरंभ, स. ८ वा. २५ मि., १९ मार्च अमावस्या समाप्ती, सकाळी ६ वा. ५३ मि. आणि गुढीपाडवा, २० मार्च रोजी श्री अक्कलकोट महाराज प्रकटदिन.

मेष : नोकरीत मर्यादा ओळखून काम करा. आत्मविश्वास वाढेल. शिक्षणक्षेत्रात यश मिळेल. तरुणांना वाढीव श्रम करावे लागतील. रागामुळे कामे बिघडतील. घरात वाद होतील. मनावर ताबा ठेवा. अहंकार दूर ठेवा. व्यवसायात आर्थिक बाजू भक्कम राहील. घरात मौजमजेवर पैसे खर्च होतील. मित्रांशी चेष्टामस्करी टाळा, सकारात्मकता ठेवा. नातेवाईकांबरोबर शांत आणि संयमी भूमिका घ्या. ज्येष्ठांचा सल्ला घ्या. नवीन गुंतवणुकीत दामदुपटीच्या मोहात पडू नका. भावंडांशी जपून बोला. तीर्थस्थळांच्या भेटीतून समाधान मिळेल. धार्मिक कार्य कराल. आरोग्याकडे लक्ष द्या. खेळाडूंना यश मिळेल.

वृषभ : नोकरीत यश मिळेल. वरिष्ठ नवी जबाबदारी देतील. व्यवसायात आर्थिक गणित चुकेल. घरात खर्च वाढेल. तरुणांवर कामाचा ताण येईल. मित्रांच्या गाठीभेटी होतील. आनंद वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल. घरासाठी महागडी वस्तू खरेदी कराल. अडकलेले काम अचानक मार्गी लागेल. नवीन ओळखीमुळे कामे पुढे जातील. कमी बोला अधिक काम करा. घरात सहलीचे आयोजन कराल. सार्वजनिक ठिकाणी वाद होतील. मुलाकडून शुभवार्ता कळेल. आठवड्याच्या शेवटी उत्साह वाढेल.

मिथुन : नोकरीनिमित्ताने प्रवासात वेळेचे गणित बिघडेल. व्यवसायात स्पर्धा निर्माण होईल. नवीन कल्पना प्रत्यक्षात येतील. थकीत येणे वसूल होईल. भागीदारीत वाद घडतील. राग टाळा. तरुणांनी अधिक कष्ट करावे. आपले म्हणणे लादू नका. घरात जमवून घ्या. बदल स्वीकारा. कलाकार, संगीतकार, गायकांना नव्या संधी येतील. ज्येष्ठांचे आरोग्याचे प्रश्न डोके वर काढतील. युवा वर्गाला संधी मिळतील. आठवड्याअखेरीस घरात वेळ खर्च होईल. नवीन नोकरीची संधी मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळेल.

कर्क : तरुण काम पुढे नेतील. मनातल्या गोष्टी सांगू नका. निर्णय घेताना भावनिक होणे टाळा. नोकरीत चुका होतील. विचार करून निर्णय घ्या. व्यवसायात दूरचा प्रवास कराल. सामाजिक क्षेत्रात सन्मान होईल. घरात कामाचे वेळापत्रक कोलमडेल. लॉटरी, सट्टा, शेअरमधून लाभ मिळेल. व्यवसायात कामगार त्रास देतील. गुंतवणुकीतून लाभ होतील. मुले डोकेदुखी वाढवतील. मालमत्तेसंदर्भातील विषय रेंगाळतील. बँकेत कागदपत्रे नीट तपासा. उच्चशिक्षणासाठी विदेशात जाऊ शकाल.

सिंह : स्पर्धेत यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. तरुणांना यश मिळेल. प्रेमप्रकरणात वाद होतील. नोकरीत प्रमोशन, पगारवाढ होईल. आर्थिक उन्नतीची संधी चालून येईल. व्यवसायानिमित्ताने प्रवास होईल. जुना आजार डोके वर काढेल. घरात खर्च वाढेल. कुटुंबाला वेळ द्याल. जपून बोला. कसोटीचा प्रसंग येऊ शकतो. संयम ठेवा. प्रश्न सुटतील. व्यवसायात जबाबदारी वाढेल. शेअर ब्रोकर, रियल इस्टेट क्षेत्रात आर्थिक लाभ मिळतील. सार्वजनिक ठिकाणी वाद नको. काही गोष्टीकडे दुर्लक्ष करा.

कन्या : शब्द धरून बसू नका. समंजसपणा कामी येईल. भावंडांशी जमवून घ्या. आत्मविश्वास वाढेल. महिलांना यश मिळेल. नोकरीत हेकटपणा टाळा. बँकेचे व्यवहार जपून करा. आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. व्यवसायात नव्या कल्पना सुचतील. सकारात्मकता वाढवा. रोष ओढवून घेणे टाळा. संसारात लहान कारणामुळे मिठाचा खडा पडू शकतो. धार्मिक कार्य होईल. नवी नोकरी मिळेल. व्यवसायात चांगले लाभ मिळतील. निर्णय बिनचूकपणे घ्या.

तूळ : नोकरीत लक्षपूर्वक काम करा. संधीचे सोने करा. व्यवसायात यश मिळेल. येणे वसूल होईल. तरुणांना यश मिळेल. वेळ आणि कामाचे नियोजन करताना कसरत होईल. पित्त, पोटाचे विकार त्रास देतील. यशासाठी अथक प्रयत्न करा. मुले बुद्धीकौशल्याच्या जोरावर यश मिळवतील. घरात स्पष्टपणे मत मांडणे टाळा. अचानक खर्च होतील. गुरुकृपेमुळे प्रश्न सुटतील. कुटुंबासाठी वेळ द्याल. मित्रांचे मन दुखावू नका. काम करताना मन स्थिर ठेवा. ध्यानधारणा, योगा यातून मन सतेज ठेवा. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. खेळाडूंना मनासारखे यश मिळणार नाही.

वृश्चिक : अचानक कामाचे गणित बिघडेल. नोकरीत संयम कामी येईल. लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करा. राग व्यक्त करू नका. भागीदारीच्या व्यवसायात काळजीपूर्वक पुढे जा. बँकेचे व्यवहार करताना पारदर्शकता ठेवा. नोकरीत वरिष्ठांचा रोष ओढवून घेऊ नका. वागताना बोलताना सकारात्मकता आणि आत्मविश्वास ठेवा. तरुणांनी सल्ले देणे टाळावे. प्रवासात खिसा पाकीट सांभाळा. नव्या व्यवसायाची संधी निसटून जाईल. काळजीपूर्वक निर्णय घ्या. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा.

धनु : कोर्टकचेरीची कामे पुढे जातील. समंजसपणा ठेवा. नवी खरेदी होईल. मुलांना यश मिळेल. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. बँकेची कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. मतभेदांकडे दुर्लक्ष करा. नोकरीच्या निमित्ताने विदेशात जाल. कामाच्या ठिकाणी संयम ठेवा. व्यवसायात कामे रेंगाळतील. युवा वर्गाला समाधान देणारे अनुभव येतील. पालकांच्या प्रकृतीची काळजी घ्या. आठवड्याअखेरीस कामाचा कंटाळा येईल. मौज-मजेवर खर्च होईल. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. ध्यानधारणा समाधान देईल.

मकर : जवळच्या व्यक्तीलाही मनातली गोष्ट सांगू नका. तरुणांच्या हातात आलेली संधी जाऊ शकते. व्यवसायात यश मिळेल. आर्थिक बाजू चांगली राहील. नवीन घर घेण्याचा विषय पुढे जाईल. आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. विदेशात कामासाठीचे प्रयत्न यशस्वी होतील. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. नोकरीत सबुरीने घ्या. अडकून राहिलेली कामे मार्गी लागतील. ज्येष्ठांशी जपून बोला. मुलांकडे लक्ष ठेवा. एखादा त्रासदायक प्रसंग डोकेदुखी ठरू शकतो. समाजसेवेत चांगला अनुभव येईल. सामाजिक कामात भरपूर वेळ खर्च होईल. मित्रांशी बोलताना काळजी घ्या.

कुंभ : मानापमानाच्या घटना घडतील. मनात काही ठेवू नका. नोकरीत चांगले वर्तन ठेवा. हेकटपणा त्रास वाढवेल. तरुणांना कष्ट करावे लागतील. कलाकारांना यश मिळेल. लेखक, साहित्यिकांचा गौरव होईल. मौजमजेवर खर्च होईल. घरातील वातावरण उत्साह वाढवेल. मित्र भेटतील. बोलताना खबरदारी घ्या, शब्दाने शब्द वाढवू नका. मालमत्तेचे प्रश्न मागे पडतील. नोकरदारांचा उत्कर्ष होईल. वरिष्ठ कामावर खूष होतील. रियल इस्टेट, शेती, मेडिकल व्यावसायिकांना चांगला काळ.

मीन : ज्येष्ठांचा सल्ला माना. गुंतवणुकीच्या आकर्षक योजनांपासून दूर राहा. नोकरदार-व्यावसायिकांना प्रवास करावा लागेल. सकारात्मक ऊर्जा वाढेल. नोकरदारांना चांगला अनुभव देणारा काळ. आर्थिक बाजू भक्कम राहील. वाहनखरेदी होईल. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. आर्थिक व्यवहार तपासा. मौजमजेवर खर्च कराल. दाम्पत्यजीवनात आनंदाचे दिवस अनुभवाल. व्यवसायातील प्रश्न कौशल्याने सोडवा. देवदर्शन घडेल.

Previous Post

नाय नो नेव्हर

Next Post

नाय नो नेव्हर

Next Post
नाय नो नेव्हर

नाय नो नेव्हर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.