ग्रहस्थिती : हर्षल वृषभ राशीत, मंगळ, प्लूटो मकरेत, गुरु मिथुनेत, केतू सिंहेत, रवि, बुध, शुक्र, राहू कुंभेत, शनि, नेपच्युन मीन राशीत. दिनविशेष : ८ मार्च रंगपंचमी,९ मार्च श्री एकनाथ षष्ठी, ११ मार्च कालाष्टमी.

मेष : नोकरीत संधीचे सोने कराल. करियरला आकार मिळेल. घरात वाद होतील. नातेवाईकांशी जमवून घ्या. व्यवसायात स्थिती उत्तम राहील, पण वाढीव कष्ट पडतील. थकीत येणे वसूल होईल. आर्थिक नियोजन करा. तरुणांना नव्या संधी मिळतील. कामात लक्ष ठेवा. सार्वजनिक ठिकाणी, खासकरून महिलांशी जपून बोला. लॉटरी, सट्टा यापासून दूर राहा. विज्ञानाशी संबंधित व्यवसायात चांगले लाभ होतील. मुलांच्या वागण्याकडे लक्ष द्या. गोड बोलून कामे करून घ्या. पर्यटनातून आनंद मिळेल. खेळाडूंना नियोजनातून व कष्टातून यश मिळेल.

वृषभ : वाढीव कष्ट घ्या. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. मित्रांचा सल्ला कामी येईल. नोकरीत प्रमोशनयोग जुळून येईल. व्यवसायविस्ताराच्या योजनेला यश मिळेल. सामाजिक कार्यात महिलांचा गौरव होईल. नवीन वास्तू घेण्याचा प्रश्न मार्गी लागेल. धार्मिक ठिकाणांना भेटी द्याल. तरुणांना अचानक प्रवास करावा लागेल. त्यात काळजी घ्या. काही ठिकाणी जुळवून घ्या. कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करा. मुलांकडे लक्ष द्या. नातेवाईकांना आर्थिक मदत करावी लागेल. वाणीवर नियंत्रण ठेवा.

मिथुन: आळस झटकून काम करा. धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. तरुणांचा कल मौजमजा आणि चैनीकडे राहील. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात लहान चूक त्रासदायक ठरेल. अचानक मोठा खर्च येईल. कामानिमित्त प्रवासाचा आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका. मित्रांचा सल्ला घात करेल. गुंतवणूक काळजी घेऊनच करा. तरुणांना शुभफळे मिळतील. व्यवसायात नव्या कल्पना प्रत्यक्षात येतील. नवीन ओळखी कामाला येतील. छंदातून यश मिळेल. सरकारी काम नियमात राहूनच करा.

कर्क : घरात वाणी गोड ठेवा. कामात सुसंवाद ठेवा. उधार-उसनवारी टाळा. नोकरीत अधिकचे काम पडेल तरी सांभाळून घ्या. भविष्यात फायदा होईल. व्यवसायात आहे त्यात समाधान माना. स्पर्धापरीक्षेत यश मिळवण्यासाठी झटावे लागेल. आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्य क्षेत्रात चांगला काळ. व्यवसायात नव्या ऑर्डर आणि आर्थिक बाजू यांचा ताळमेळ साधा. विवाहेच्छुंसाठी उत्तम काळ. मालमत्तेचे प्रश्न वाटाघाटीतून सुटतील. खर्च बेतानेच करा.

सिंह: कंटाळवाणा काळ आहे. नोकरीत जबाबदारी वाढेल. वरिष्ठ कौतुक करतील. व्यवसायात यशासाठी वाढीव कष्ट करावे लागतील. कोणताही राग कुठेही काढू नका. आमदनी आणि खर्चाचा मेळ घाला. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. तरुणांच्या कामाचे कौतुक होईल. हाती घेतलेले काम सहज पूर्ण कराल. महिलांना यश मिळेल. जवळच्या व्यक्तीबाबत एखादी बातमी कळेल. जुनी गुंतवणूक चांगला लाभ देईल. आर्थिक नियोजन करा.

कन्या : व्यवसायात स्पर्धेचा सामना करावा लागेल. नव्या योजना पुढे जातील. सरकारी कामे मार्गी लागतील. घरात मतभेद होतील. मित्रांच्या गाठीभेटी होतील. नोकरीत तुमच्या शब्दाला मान राहील. वरिष्ठ एखादे महत्वाचे काम तुमच्याकडे देतील. त्यातून तुमचे महत्व वाढेल. तरुणांनी संयमी धोरण ठेवावे. अति आत्मविश्वासातून गणित चुकेल. सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक शब्दाला उत्तर देऊ नका. माध्यमकर्मींच्या कानावर चांगली बातमी येईल. सकारात्मकता वाढेल. घरात एखादा छोटेखानी कार्यक्रम होईल, त्यात नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. कुठेही जपून व्यक्त व्हा.

तूळ : कुटुंबाबरोबर भरपूर वेळ खर्च कराल. नवीन मालमत्ता घेण्याचा विचार मार्गी लागेल. तरुणांना नोकरीची संधी चालून येईल. बँकेची अडकलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायात आर्थिक गणित बिघडेल. जुने आजार डोके वर काढतील. मुलांच्या वर्तनाकडे लक्ष द्या. नोकरीत कामाचा ताण वाढेल. मनशांती जपा. अहंकारी वृत्ती बाजूला ठेवा. नवीन व्यक्तीवर विसंबून निर्णय घेऊ नका. सकारात्मक वृत्ती वाढेल. जुने मित्र अचानक भेटतील, त्यांच्याबरोबर मौजमजा कराल. पण, मित्रांच्या जास्त प्रेमात पडू नका. वादाला तोंड फुटेल. संस्मरणीय घटना घडतील.

वृश्चिक : मोठा निर्णय घेण्याआधी सल्ला घ्या. भागीदारीत कुरबुरीच्या घटना घडतील. खेळाडूंना यश मिळेल. नोकरदारांकडून कामात चुका होतील. व्यवसायात घाई टाळा. लाखाचे बारा हजार होतील. थकीत येणे हातात पडेल. तरुणांनी यशाने हुरळून न जाता, आत्मविश्वास वाढवून काम करावे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी चालून येतील. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. बोलताना शब्दावर नियंत्रण ठेवा. अचानक धावपळ होईल. मित्र-मंडळींशी चेष्टामस्करी टाळा. त्यातून वाद होतील.

धनु : शिक्षणक्षेत्रात चांगले अनुभव येतील. कुटुंबासाठी भरपूर खर्च होईल. धार्मिक ठिकाणांना भेटी द्याल. नव्या नोकरीच्या संधी चालून येतील. नव्या व्यक्तीशी संभाषण करताना काळजी घ्या. नवीन वाहन घेण्याची इच्छा पूर्ण होईल. व्यवसायात कायदा तोडून पुढे जाऊ नका. व्यवसायात यश मिळेल. महिलांनी ताण घेऊन काम करू नये, आरोग्याचे गणित बिघडेल. नोकरीत काळजी घ्या. महिलांच्या मनासारख्या घटना घडतील. बँकेच्या व्यवहारात कागदपत्रांची तपासणी करा. शांतपणे विचार करून निर्णय घ्या.

मकर: नोकरीत आपणच बरोबर हे दाखवू नका. वाद होतील. हातात घेतलेले काम पूर्ण करताना तारेवरची कसरत करावी लागेल. व्यवसायात योग्य नियोजन करा. अर्धवट गोष्टींवर विश्वासून निर्णय घेऊ नका. तरुणांना शुभवार्ता कळाल्याने आनंद वाढेल. मौज-मजा कराल. व्यवसायात जपून पावले टाका, एकाग्रता ठेवा. अति आत्मविश्वास टाळा. धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. संगीतकार, कलाकारांना नव्या संधी चालून येतील, आर्थिक बाजू भक्कम होतील.

कुंभ : नोकरीत तडजोडीचे धोरण ठेवा. व्यवसायात यश मिळेल. घरात खर्चाचे गणित बिघडेल. पैसे उधळू नका. मित्रांबरोबरचे जुने वाद डोकेदुखी वाढवतील. उन्हाळ्यात आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. सामाजिक क्षेत्रात मान सन्मानाचे योग आहेत. व्यवसायाचे नियोजन काळजीपूर्वक करा. त्याचा चांगला फायदा होईल. व्यवहारात पारदर्शीपणा ठेवा. आठवड्याच्या उत्तरार्धात चांगले अनुभव येतील. सहलीचे प्लॅन यशस्वी होतील. किरकोळ मनस्तापांंकडे दुर्लक्ष करा. तरुणांना सुखाचा काळ अनुभवायास मिळेल.

मीन : आर्थिक बाजू भक्कम राहील. सामाजिक कार्यात सन्मान होईल. व्यवसायात कामाचे गणित बिघडेल. नोकरीत अधिकचे कष्ट पडतील. धार्मिक ठिकाणी चांगला अनुभव येईल. घरासाठी महागडी वस्तू खरेदी करताना विचार करूनच निर्णय घ्या. बोलताना नियंत्रण ठेवा. अडकलेले काम पुढे सरकेल. तरुणांसाठी यशदायी काळ. मन प्रसन्न राहील. घरात आनंदाच्या बातम्या कानी पडतील. कलाकार, संगीत सर्जक, ब्रोकर यांच्यासाठी चांगला काळ आहे. व्यवसायात बुद्धी लढवा.
