ग्रहस्थिती- हर्षल वृषभ राशीत, मंगळ, प्लूटो मकरेत, गुरू मिथुनेत, केतू सिंहेत, रवि, बुध, शुक्र, राहू कुंभेत, शनि, नेपच्युन मीनेत. दिनविशेष : १ मार्च प्रदोष, २ मार्च होळी, ३ मार्च धुलिवंदन आणि खग्रास चंद्रग्रहण, ५ मार्च श्री संत तुकाराम बीज, ६ मार्च संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय रात्री ९ वा. १४ मी.
मेष : कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कामातून नव्या ओळखी होतील, त्यातून नवी कामे पुढे जातील. व्यवसायात खर्च वाढेल. नोकरीत मनासारखी स्थिती राहील, पण कामाचा ताण वाढेल. तरुणांकडून नवे काम सुरू होईल. घरात वाढीव खर्च होईल. आर्थिक नियोजनात चुकू नका. मनाची चंचलता सांभाळा, अन्यथा आरोग्य व कामावर परिणाम होईल. निर्णय विचारपूर्वक घ्या. गोड बोलून कामे पुढे सरकतील. नवीन काही करण्याआधी विचार करा. डोळ्याची काळजी घ्या. ज्येष्ठांचे म्हणणे ऐका. कलाकार, खेळाडू, लेखक, संगीतसर्जकांना चांगला काळ.

वृषभ : व्यवसायात कामाचा ओघ वाढेल. नफ्याबरोबरच खर्च देखील वाढेल. आर्थिक बाजू सांभाळताना काळजी घ्या. मोठे काम पुढे नेताना सल्लागारांपासून सावध राहा. नोकरदारांना कामानिमित्ताने प्रवास करावा लागेल. तरुणांची वाढीव कामामुळे ओढाताण होईल. महत्वाकांक्षी बनाल, आत्मविश्वास वाढेल. कामात दूरचा विचार करून निर्णय घ्या. सार्वजनिक जीवनात मत जपून व्यक्त करा. आपणच बरोबर हा हेका टाळा. तरुणांना यशप्राप्तीसाठी वाढीव कष्ट पडतील. पत्नीसाठी महागडी खरेदी होईल.

मिथुन : वाढलेल्या कामामुळे आर्थिक बाजू भक्कम होईल, पण, खर्चही वाढतील. आर्थिक गणित कोलमडेल. नोकरीत मनासारखी स्थिती नसल्याने मन विचलित होईल. मन:स्वास्थ्य जपा. आश्वासन देणे टाळा. ध्येयपूर्तीसाठी वाढीव कष्ट घ्या. बोलण्यातून कामे पुढे न्या. संयम ठेवा, नशिबाची साथ मिळेल. सार्वजनिक ठिकाणी वागताना-बोलताना काळजी घ्या. घरात भावंडांबरोबर जमवून घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. नवीन ओळखीवर आर्थिक व्यवहार करू नका.

कर्क : आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील, काळजी घ्या. व्यवसायात शब्द देणे टाळा. नोकरीत वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार काम करा. बदली होण्याची शक्यता आहे. तरुणांच्या बाबतीत कठीण प्रसंग निर्माण होईल. जपून निर्णय घ्या. नव्या काही संकल्पना राबवण्याआधी विचार करा. बँकेच्या व्यवहारात काळजी घ्या. तरुणांची प्रगती होईल. खेळाडूंना यश मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्तम राहील. ध्यान-धारणा, मन:शांती यात मन रमवा. मित्रांची चांगली मदत मिळेल. आर्थिक नियोजन आवश्यक आहे.
सिंह : कामात अपेक्षाभंग होतील. घरात छोट्या कारणामुळे वातावरण गढूळेल. खर्चावर आवर घाला, आर्थिक गणित बिघडेल. ज्येष्ठांच्या सल्ल्याचा फायदा होईल. आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळतील. डोळ्यासमोरचे उद्दिष्ट साध्य होईल. वेळेचे नियोजन करूनच कामे करा. एखादे काम न झाल्यास किंवा रेंगाळल्यास त्रास करून घेऊ नका. मित्रांशी बोलताना अति उत्साह टाळा. धार्मिक कार्यात वेळ खर्च होईल. शिक्षण, नोकरीनिमित्ताने विदेशात जाल.

कन्या : कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. आर्थिक प्राप्ती चांगली राहील, नियोजन करा. सरकारी कामात घाई टाळा. कोणाला फुकटचे सल्ले देऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. मुलांच्या बोलण्यावागण्याकडे अधिक लक्ष द्या. कोणत्याही कामात कौतुकाची अपेक्षा ठेवू नका. घरात बोलणे सौम्य ठेवा, छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. व्यवसायात आर्थिक बाजू भक्कम करणारे मार्ग खुले होतील. मित्रांमध्ये कौतुक होईल. वाणी गोड ठेवा. लग्नाची बोलणी मार्गी लागतील. संशोधकांच्या हातून मोठे काम होईल.

तूळ : घरात जुळवून घ्या. ज्येष्ठांशी वाद टाळा. भावंडांना मदत करा. मुलांमुळे डोकेदुखी वाढेल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. नातेवाईकांना मदत करा. आरोग्याकडे अधिक लक्ष द्या. व्यवसायात चांगला लाभ मिळेल. अडकून राहिलेले काम पूर्ण होईल. धार्मिक कार्यासाठी वेळ खर्च होईल. प्रवासात काळजी घ्या. नव्या ओळखीवर विश्वासून निर्णय घेऊ नका. तरुणांना यशदायी काळ. सकारात्मकता वाढवा. नोकरीत किरकोळ कुरबुरी होतील. बदलीही होऊ शकते. घरात पती-पत्नीत वादांमुळे नाराज होऊ नका. सरकारी कामे नियमात राहून करा.

वृश्चिक : मालमत्तेसंदर्भातील चर्चा थांबून विचार करून पुढे न्या. नोकरीत कोणताही निर्णय घाईने घेऊ नका. प्रवासात गोंधळल्यामुळे खर्च वाढेल. कुठेही राग काढू नका. बोलताना नियंत्रण ठेवा. मित्रांकडून चांगली मदत मिळेल. मतावर ठाम राहताना योग्य निर्णय घेऊनच पुढे चला. जुने वाद उकरून काढू नका. तरुणांना बुद्धिचातुर्याच्या जोरावर यश मिळेल. कोण योग्य आणि कोण अयोग्य हे ठरवत बसू नका. आपले काम पूर्ण करा. कुटुंब आणि घरासाठी वेळ व पैसा खर्च होईल. आर्थिक नियोजन करा.

धनु : व्यवसायात नवीन प्रयोग यशस्वी ठरतील. जुन्या मित्रांशी भेट होईल. तरुणांनी खर्चावर नियंत्रण ठेवावे. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. तरुणांना अपेक्षित यश मिळेल. घरात आनंद वाढेल. महिलांना यश मिळेल. काम करताना कोण काय बोलते आहे, याकडे लक्ष देऊ नका. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा. व्यवसायात आर्थिक घडी विस्कटणार नाही याची काळजी घ्या. आपल्या बोलण्याचा इतरांना त्रास होऊ देऊ नका. राग बाजूला ठेवा. व्यवसायात मोठी उडी घेण्याआधी विचार करा.

मकर : कामात हट्टी वृत्ती ठेवल्यास कामे रद्द होतील. व्यवसायात तडजोड स्वीकारल्याने आर्थिक नुकसान होईल. वरिष्ठांच्या सहकार्यामुळे कामाचा बोजा हलका होईल. नोकरीत हलगर्जी नको. तरुणांनी नवी नोकरी विचारपूर्वक स्वीकारावी. कलाकार व अभियंत्यांना चांगले अनुभव येतील. सरकारी कामे लांबणीवर पडतील. मित्रांबरोबर खूप वेळ खर्च होईल. व्यवसायात आर्थिक लेखाजोखा तपासावा. नवीन संधी विचारपूर्वक साधा. पैसे जपून वापरा. कुटुंबासाठी भरपूर वेळ द्याल.

कुंभ : विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. उगाच कुणाला प्रतिक्रिया देऊ नका. आपलेच खरे करू नका. गुरुकृपेमुळे कामे हलकी होतील. सामाजिक क्षेत्रात काम चांगला काळ राहील. एखादे उल्लेखनीय काम पूर्ण होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. मनातल्या सगळ्या गोष्टी सांगून टाकू नका. प्रवासात फसवणूक होईल. मित्रांशी वाद होतील. यशप्राप्तीसाठी अधिकचे श्रम करावे लागतील. ज्येष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष दया. धरसोड वृत्ती बाजूला ठेवा. गुंतवणुकीतून चांगले लाभ मिळतील.

मीन : काही गोष्टींमध्ये अचानक बदल होतील. कामाचे गणित बिघडेल. व्यवसायात पुढे जाण्यासाठी वाढीव काम करावे लागेल. संयम आणि आत्मविश्वासाने अनेक गोष्टी सहजशक्य होतील. आर्थिक नियोजन चुकू देऊ नका. सल्ला देऊ नका. नोकरी-व्यवसायात सबुरीने घ्या. व्यवसायात तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागेल. नवीन गुंतवणूक करताना सल्ला घ्या. मनासारखी कामे पूर्ण होतील. नोकरीत कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ कामावर खूष होतील. शिक्षक, प्राध्यापकांसाठी उत्तम काळ.

