• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राशीभविष्य (७ ते १३ फेब्रुवारी २०२६)

भास्कर आचार्य

marmik by marmik
February 7, 2026
in भविष्यवाणी
0
राशीभविष्य

ग्रहस्थिती- हर्षल वृषभेत, गुरु मिथुनेत, केतू सिंहेत, बुध वृश्चिक राशीत, रवि-मंगळ-शुक्र-बुध-प्लुटो मकरेत, राहू कुंभेत, शनि, नेपच्युन मीन राशीत. दिनविशेष : ८ फेब्रु. रोजी भानुसप्तमी, श्री गजानन महाराज प्रकट दिन, ९ फेब्रु. कालाष्टमी, ११ फेब्रु. श्री रामदास नवमी, १३ फेब्रु. विजया एकादशी.

****

 

मेष : व्यवसायात आर्थिक उलाढालीत काळजी घ्या.नोकरीत सबुरीने घ्या. नव्या ओळखींमधून लाभ होतील. आठवड्याच्या मध्यास आर्थिक गणित बिघडेल. घरात अधिक वेळ द्या. अडकलेली कामे मार्गी लागतील. तरुणांना, युवा संशोधकांना नव्या संधी मिळतील. घरातील वातावरण आनंदी राहील. निर्णय घेताना अति विश्वास दाखवणे महागात पडेल. मित्र, नातेवाईकांबरोबर अति करू नका, वाद होतील. कलाकारांसाठी उत्तम काळ. संततीकडून चांगली बातमी मिळेल. ज्येष्ठांंचा आदर करा, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. विवाहेच्छुकांसाठी शुभ काळ.

वृषभ : घरात वागताना बोलताना काळजी घ्या. वरिष्ठांना विरोध करू नका. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. सामाजिक कार्यातून सकारात्मक ऊर्जा वाढेल. सरकारी कामे झटपट पूर्ण होतील. तरुणांचा उत्साह वाढेल. करियरला चांगला आकार मिळेल. तीर्थस्थानाच्या भेटीतून मनस्वास्थ्य सुधारेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. पैसे मौजमजेवर खर्च करू नका. बँकेची कामे मार्गी लागतील. व्यवसायात महत्त्वाचा निर्णय घेताना तज्ज्ञांचे म्हणणे टाळू नका. अचानक धनलाभ होईल.

मिथुन : आर्थिक बाजू मनासारखी राहणार असली तरी अचानक खर्च वाढेल. आरोग्याचे प्रश्न डोके वर काढतील. मनस्थिती खराब होईल. शिक्षण क्षेत्रात यश मिळेल. कामानिमित्ताने विदेशात जाल. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. ज्येष्ठांच्या आरोग्य प्रश्नाकडे लक्ष द्या. नोकरीत वाढीव कष्ट पडतील. वेळेचे गणित चुकवू नका. वरिष्ठ कामाचे कौतुक करतील. क्रीडापटूंचा गौरव होईल. कलाकारांना संधी मिळतील. कुटुंबाशी बोलताना भान ठेवा. भागीदारीत अकारण संघर्ष टाळा. पर्यटनासाठी विदेशात जाल. तरुणांच्या कष्टाचे चीज होईल.

कर्क : मनस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटनांचा मनावर ताण येईल. कोणताही राग कुठेही काढू नका. नोकरीत हुशारी दाखवणे अंगाशी येऊ शकते. कोणाला सल्ले देणे, मार्ग दाखवणे या भानगडीत न पडलेले बरे. घरासाठी अचानक प्रवास कराल. वाहन चालवताना काळजी घ्या. तरुणांचे भाग्य उजळेल. कामातला उत्साह वाढेल. मुलांना स्पर्धेत यश मिळेल. लॉटरी, सट्टा, शेअरमधून लाभ मिळेल. त्याच्या आहारी जाऊ नका. नवीन गुंतवणुकीच्या विचाराला गती मिळेल. कुटुंबात उत्साही वातावरण राहणार असले तरी वाद होतील.

सिंह : नव्या कामांना गती मिळेल. आर्थिक चलती होईल. घरात भांड्याला भांडे लागेल. मात्र, रागावर नियंत्रण ठेवा. मनस्वास्थ्य जपा. तरुणांनी घाईने घेतलेला निर्णय डोकेदुखी वाढवेल. सावकाशीने काम करा. व्यावसायिकांना नशिबाची साथ मिळेल. व्यवसायवृद्धी करण्यासाठी अधिकचे कष्ट पडतील. आर्थिक बाजू चांगली राहील. व्यावसायिक विदेशात विस्ताराची चर्चा पुढे जाईल. कला, संगीत क्षेत्रात गौरव होईल. नवीन संधीही चालून येईल. कामाचे नियोजन योग्य प्रकारे करा. संशोधन क्षेत्रात चांगले यश मिळेल. दाम्पत्यजीवनात आनंद वाढेल.

कन्या : आर्थिक गणित बिघडल्यामुळे वेळापत्रक विस्कळीत होईल. नोकरीत सहकार्‍यांची मने सांभाळा. घरासाठी भरपूर वेळ खर्च होईल. मौज-मजेकडे अधिक कल राहील. तरुणांच्या मनासारखी कामे न झाल्याने नाराजी राहील. नवी वास्तू घेण्याचे नियोजन पुढे सरकेल. व्यवहारात खबरदारी घ्या. व्यवसायात सबुरीने घ्या. कागदपत्रावर सही करताना काळजी घ्या. आर्थिक बाजू भक्कम होईल. थकीत पैसे येतील. विद्यार्थीवर्गाला शैक्षणिक यश मिळेल. घरासाठी महागडी वस्तू खरेदी कराल. महिलांनी आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये.

तूळ : देवदर्शनातून समाधान मिळेल. व्यवसायात कामाचा ताण वाढेल. वेळेचे गणित साधा. किरकोळ कारणावरून वाद टाळा. आर्थिक बाजू चांगली राहील. येणे वसूल होईल. खिशात पैसे आहेत, म्हणून कसेही खर्च करू नका. वास्तूच्या व्यवहारात यश मिळेल. नवी नोकरी मिळेल. अहंकार दूर ठेवा, कामे सुलभ होतील. कलाकारांचा उत्साह वाढवणारी बातमी कळेल. अडकलेले काम ओळखीतून पूर्ण होईल. कायदेशीर प्रश्न सुटतील. गुंतवणूक लाभदायक ठरेल. नोकरीत वरिष्ठ सांगतील तसे काम करा. पुस्तकाच्या वाचनातून शांती मिळेल. मित्र-मंडळींना आर्थिक मदत करताना काळजी घ्या.

वृश्चिक : कामातलं लक्ष विचलित करणार्‍या घटना घडतील. अचानक मोठा खर्च येईल. नीट आर्थिक नियोजन करा. अति महत्त्वाकांक्षी राहू नका. प्रवासात घाई करू नका. महिलांना यश मिळवून देणारा काळ. तरुणांना नव्या कामाच्या संधी चालून येतील. नोकरीत आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात स्पर्धेचा सामना करावा लागेल. कामात सकारात्मकता ठेवा. नव्या संकल्पना सुचतील, त्या पुढे नेताना अधिकचे श्रम घ्यावे लागतील. विदेशात व्यवसाय वाढवण्याच्या प्रयत्नांना गती मिळेल. सरकारी कामे सहज पूर्ण होतील. मुलांचे वागणे डोकेदुखी वाढवेल.

धनु : मालमत्तेचा व्यवहार सहज पूर्ण होईल. घरातील अवघड प्रश्न सहज सुटेल. घरात धार्मिक कार्याच्या निमित्ताने आप्तेष्टमित्रांशी गाठीभेटी होतील. व्यवसायात आर्थिक प्रगती होईल. काम पूर्ण करण्यासाठी अधिकचा वेळ खर्च होईल. मित्रांशी वाद टाळा. आर्थिक नियोजनात काळजी घ्या. ज्येष्ठांच्या शब्दाला मान द्या. अन्यथा वाद होतील. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. शांतपणे विचार करून निर्णय घ्या. मनस्वास्थ्य चांगले ठेवा. व्यवसायात चढ उताराचा काळ अनुभवाल. योग्य आर्थिक नियोजन करा. कामात काळजी घ्या.

मकर : आरोग्याकडे लक्ष द्या. जुने आजार डोके वर काढतील. व्यवहारात चुका होतील. तीर्थयात्रेतून समाधान मिळेल. आठवड्याच्या मध्यास आर्थिक बाजू चांगली राहणार असली तरी आठवड्याअखेर खर्च वाढू शकतो. तरुणांना यश देणारा काळ. खेळाडूंसाठी उत्तम काळ. बांधकाम क्षेत्रात उत्तम अनुभव येतील. अनेक दिवसांपासून प्रलंबित येणी वसूल होतील. समाजसेवेसाठी भरपूर वेळ खर्च होईल. जुने येणे वसूल होईल. कामात त्रुटी ठेवू नका. मुलांनी अभ्यासात अधिक लक्ष द्यावे. नोकरी, व्यवसायात कामाचा आढावा घ्या.

कुंभ : घरात आजारपणे येतील. काही ठिकाणी पत्नीची मदत होईल. तरुणांमध्ये चैनीची वृत्ती वाढेल. आर्थिक गणित बिघडेल. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. लेखक, पत्रकारांचा सन्मान होईल. व्यवसायात कल्पनाशक्तीच्या जोरावर यश मिळवाल. घरातील कौटुंबिक वातावरण बिघडू देऊ नका. प्राध्यापकांना नवीन कामाची संधी मिळेल. संगीतकार, कलाकारांसाठी उत्तम यशदायी काळ. देवदर्शनासाठी बाहेरगावी जाणे होईल. सामाजिक क्षेत्रात चांगले अनुभव येतील. मित्र-मंडळींना खूष ठेवा. चेष्टामस्करी टाळा.

मीन : समाजात कार्याचा गौरव होईल. त्यामधून कामाच्या नव्या कल्पना सुचतील. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. वरिष्ठ कामावर खूष होतील. काही नवीन जबाबदार्‍या मिळतील. उच्चशिक्षणाचे पुढे सरकतील. घरात आपलीच बाजू लावून धरू नका. महत्त्वाची कामे पुढे जातील. महिलांशी जपून बोला. कोणतीही गुंतवणूक करताना जपून. झटपट पैसे मिळवण्याच्या नादात फसगत होऊ शकते. धार्मिक कार्याला वेळ द्याल. तरुणांसाठी चांगला काळ. ध्यानधारणा, योगा यांसाठी वेळ द्या. शुभ घटना कानावर पडेल.

 

Previous Post

नाय नो नेव्हर!

Next Post

गंध समाधानाचा… गरमागरम पोळीचा…

Next Post
गंध समाधानाचा… गरमागरम पोळीचा…

गंध समाधानाचा... गरमागरम पोळीचा...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.