• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

सातापार जपला गेलाय ‘स्नेहबंध’

स्वप्निल राणे (विशेष लेख)

marmik by marmik
January 27, 2026
in विशेष लेख
0
सातापार जपला गेलाय ‘स्नेहबंध’

मराठी साहित्य विश्वात दिवाळी अंकांची मोठीr परंपरा आहे. आजही डिजीटल काळातही दिवाळी अंक वाचणारा मोठा वाचकवर्ग आहे. दिवाळी, फटाके,फराळ आणि दिवाळी अंक असे हे समीकरण मराठी माणसाच्या मनात पक्के आहे. नोकरीधंद्याच्या निमित्ताने मायभूमी सोडून सातासमुद्रापार वसलेल्या मराठीजनांना देखील आपली मराठी संस्कृती, सणवार, रितीभाती यांबद्दल ओढ असते. शरीराने जरी ते परदेशात वास्तव्य करत असले तरी त्यांच्या मनात आपल्या संस्कृतीबद्दल प्रेम, अभिमान असतो. त्यामुळेच परदेशात राहणारे मराठी माणसे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यातून काही सर्जनशील गोष्टींची निर्मिती होते असते. असाच प्रयत्न लंडनमध्ये राहणार्‍या मराठी जनांनी केला आहे. हा प्रयत्न म्हणजे स्नेहबंध हा दिवाळी अंक.

लंडनमध्ये राहणार्‍या मराठीजनांसाठी ही त्यांची कर्म भूमी जरी असली तरी त्यांच्या मनात आपल्या देशासाठी असलेले प्रेम आणि आपली मराठी संस्कृती जपण्याची ओढ होती. असे समविचारी एकत्र आले आणि त्यांनी एका ध्येय्याने हा दिवाळी अंक काढण्याचे ठरवले. लंडनमध्ये राहणार्‍या मराठीजनांना एकत्र आणणे, परदेशात जन्मलेल्या पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे जेणे करून आपल्या मायभूमीपासून दूर राहूनही त्यांच्या मनात आपलेपणाची भावना रुजावी या उद्देशाने हा अंक काढण्यात आला. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा दिवाळी अंक काढण्याचे ठरले त्याचवेळी या अंकाच्या विक्रीतून जमा झालेल्या निधीचा सदुपयोग कसा केला जाईल, याबद्दल चर्चा झाली. त्यावेळी हा निधी संत परंपरेचा समृद्ध वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करणार्‍या युएसओ वारकरी संस्थेला देण्याचे ठरले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज, ह. भ. प. अनिकेत महाराज मोरे, हे या संस्थेचे मार्गदर्शक आहेत.


साहित्य, कला आणि ज्ञानाचा संगम स्नेहबंध दिवाळी अंकात महाराष्ट्र आणि युकेतील अनेक मान्यवरांचे मार्गदर्शक विचारप्रवर्तक लेख आहेत. तसेच बालसाहित्य, शब्दकोडी, कॉमिक्स आणि वार्षिक राशिभविष्य यांचा समावेश करून सर्व वयोगटातील वाचकांसाठीr हा अंक परिपूर्ण आणि वाचनीय झाला आहे. ५ ते १५ वयोगटातील मुलांसाठी चित्रकला, निबंध आणि रंगभरण्याची स्पर्धा तसेच प्रौढांसाठी छायाचित्रण स्पर्धा आयोजित करून त्यांच्यातल्या सुप्त गुणांना उत्तम व्यासपीठ देण्याचे कामही या अंकाने केले आहे.
मिल्टन कीन्सच्या मातीमध्ये २०२२ साली कलासंस्कृती युके या संस्थेची स्थापना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची उंची आणि माणुसकीचा विशालपणा हे या संस्थेचे आदर्श आहेत. आपला एकच धर्म – माणुसकी आणि महाराष्ट्र धर्म! हे या संस्थेचे बोधवाक्य. लंडनमधल्या मराठी माणसांनी या संस्थेच्या माध्यमातून मराठीr मातीची, मराठी संस्कृतीची नाळ घट्ट जुळवून ठेवली आहे. मराठीrपणाशी असलेले नाते जुळवून ठेवण्यासाठी या संस्थेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात संस्थेचे सांस्कृतिक पथक, ध्वज पथक, लेझीम पथक आणि वारकरी टाळ पथक आहे. याशिवाय शिवजयंतीचा उत्सव मोठ्या दिमाखदारपणे संस्था साजरा करते. याशिवाय वारकरी दिंडी, भोंडला-मंगळागौरीचे पारंपरिक खेळ, दहीहंडी-नागपंचमी-नारळी पौर्णिमेचा उत्सव, दिवाळीत तयार करण्यात येणारा किल्ला अशा विविध माध्यमातून मराठीr संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला जातो.
केवळ सांस्कृतिकच नाही तर सामाजिक भावबंध जपण्यावर संस्थेचा भर आहे. संस्थेने स्नेहवन या सामाजिक संस्थेसह भटक्या-वंचित मुलांसाठी चालवले जाणारे पुनरुत्थान या गुरुकुलाला, मराठी भाषा केंद्र तसंच १८८ शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी किशोर मासिकाची वर्षभराची वर्गणी संस्थेने भरली.
‘कलासंस्कृती युके’ आणि ‘स्नेहबंध’ या दोन्हींचे एकच ध्येय— जिथे माणूस तिथे महाराष्ट्र! भूगोल कितीही बदलला तरी भाषेच्या आणि संस्कृतीची पाळेमुळे मनाशी घट्ट जोडलेली असतात. हा दिवाळी अंक ही भावना अधिक दृढ करतो.
युकेतील मराठी मनांना एकत्र आणणारा हा स्नेहबंध असाच वृद्धींगत होवो या सदिच्छा!

Previous Post

कुटुंब विहरतंय आकाशात

Next Post

भाताचे प्राचीन मांसाहारी पदार्थ!

Next Post
भाताचे प्राचीन मांसाहारी पदार्थ!

भाताचे प्राचीन मांसाहारी पदार्थ!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.