ग्रहस्थिती : शुक्र मेष राशीत, हर्षल वृषभ राशीत, मंगळ, केतू सिंह राशीत, प्लूटो मकर राशीत, राहू कुंभ राशीत, शनि, नेपच्युन मीन राशीत, रवि, गुरु मिथुन राशीत, बुध कर्क राशीत. दिनविशेष : १४ जुलै संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय रात्री ९.५९ वा., १७ जुलै कालाष्टमी.
– – –
मेष : तरुणांचा आनंद आणि उत्साह वाढेल. व्यवसायात नव्या योजनांना गती मिळेल. मोठे निर्णय घेताना भावनिक होऊ नका. मुलांना तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागेल. मालमत्तांच्या व्यवहारात ज्येष्ठांचा सल्ला घ्या. नोकरीत चुकीची शिक्षा भोगावी लागेल, काळजी घ्या. प्रवासात अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. धार्मिक, सामाजिक कार्यातून आनंद मिळेल. मानाचा पुरस्कारही मिळू शकतो. साहित्यक्षेत्रात सुवार्ता कळेल. विवाहेच्छुकांसाठी काळ उत्तम. पावसाळी सहलीत मौजमजा कराल. जुने आजार डोकेदुखी ठरतील.बँकेचे व्यवहार जपून करा.
वृषभ : व्यवसायात नव्या ऑर्डरमधून पैसे मिळतील. कोणालाही सल्ले देऊ नका. नवीन घराचा विचार मार्गी लागेल. प्रेमप्रकरणात सबुरीने घ्या. संशोधक, कलाकार, संगीत सर्जकांचा भाग्योदय होईल. मनासारखी नोकरी मिळेल. तरुणांना, महिलांना तसेच आयटी, जनसंपर्क क्षेत्रात काम करणार्यांना यश मिळेल. सार्वजनिक ठिकाणी जपून. धार्मिक कार्य घडेल. चांगली बातमी कळेल. घरात समारंभ होईल. नातेवाईक, मित्र भेटतील. उधार उसनवारी टाळा. लॉटरी, सट्टा, शेअरचा मोह टाळा.
मिथुन : कर्तृत्व नावारूपाला येईल. अहंकार दूर ठेवा. व्यवसायात अधिक श्रम घ्या. मुलांच्या वर्तनातून वाद टाळा. नोकरीत वरिष्ठांशी वाद झाल्यास दूरगामी परिणाम होतील. चांगले उत्पन्न मिळेल. काळजीपूर्वक गुंतवणूक करा. मित्रमंडळी मदतीला धावून येतील. धार्मिक, सामाजिक कार्य कराल. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. भागीदारीत संयमाने घ्या. नातेवाईकांशी वाद टाळा. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. नोकरीत कामाशी काम ठेवा, उगाच शब्द वाढवू नका. विदेशात नोकरीची संधी येऊ शकते.
कर्क : नोकरीत कामाचा ताण येईल. व्यवसायात तारेवरची कसरत होईल. गुंतवणुकीचा विचार दूर ठेवा. तरुणांना स्पर्धापरीक्षेत यश मिळेल. येणे वसूल करताना त्रास सहन करावा लागेल. घरातील कामे लांबणीवर पडतील. सरकारी कामे नियमानुसार करा. कुटुंबासाठी वेळ खर्च होईल. महागडी वस्तू खरेदी कराल. मित्रांशी जपून बोला. त्यांच्याशी जपून व्यवहार करा. चेष्टा टाळा. मामा-मावशींची मदत होईल. व्यवसाय विस्ताराचा निर्णय विचारपूर्वक घ्या. दांपत्य जीवनात किरकोळ कुरबुरींकडे दुर्लक्ष करा.
सिंह : संशोधक, शिक्षकांना चांगल्या संधी मिळतील. नोकरीत मनाविरुद्ध घटना घडतील. नवीन जबाबदारी, प्रमोशन, पगारवाढ होईल. घरात नाराजी ओढवून घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक गणित बिघडू देऊ नका. ज्येष्ठांशी जपून बोला. समाजकार्यात कौतुक होईल. व्यवसायात प्रगती होईल. युवावर्गाला यश मिळेल. व्यवसायात नवीन प्रयोगांचे नियोजन काळजीपूर्वक करा. नोकरीनिमित्ताने प्रवास कराल. थकीत येणे वसूल होईल. सरकारी कामे मार्गी लागतील. संततीकडे लक्ष ठेवा. मिष्टान्न भोजन कराल.
कन्या : महिलांना यश मिळेल. नव्या व्यवसायाच्या कल्पना पुढे नेताना काळजी घ्या. सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. व्यवसायात डोकेदुखी वाढेल. तरुणांना अधिक कष्ट पडतील. नोकरीत रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. मालमत्ता घेण्याचा विचार पुढे ढकला. तरुणांना करियरचे नवे दालन खुले होईल. पैशाचा वापर जपून करा. कुठेही अतिविश्वास दाखवू नका. शेअर, लॉटरीतून लाभ होईल. आयटी अभियंते यश मिळवतील. अडकलेले काम जवळच्या ओळखीने पूर्ण होईल. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ : सामाजिक कार्यात महत्वाचे पद मिळेल. घरासाठी खर्च होईल. आईवडिलांना दुखावू नका. व्यवसायात यश मिळेल. मित्रांशी जुने वाद उकरून काढू नका. नोकरीत नवीन काम स्वीकारावे लागेल. तरुणांना नवी नोकरी मिळेल. नोकरीत आत्मविश्वास दुणावेल. नोकरीनिमित्ताने विदेशात असणार्यांना लॉटरी लागेल. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. व्यवसायात भावनेच्या भरात निर्णय नको. घरात खर्च वाढेल. मोहापासून दूर राहा. कलाकारांना नव्या संकल्पना सुचतील. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. मार्वेâटिंग, ब्रोकर, एजंट यांच्यासाठी यशदायी काळ आहे. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक : मनस्वास्थ्य जपा. नोकरी-व्यवसायात लहान चूकही त्रास देईल. आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. तीर्थयात्रा कराल. मित्र, नातेवाईक मदतीला धावतील. गुंतवणूक करताना जपून. तरुणाच्या कर्तृत्त्वाला योग्य दिशा देणार्या संधी लाभतील. घरात छोटेखानी समारंभ घडेल. व्यवसायविस्ताराची योजना पुढे ढकला. उधार-उसनवारी नको. संततीकडून सुवार्ता कळेल. क्रीडापटूंना यश मिळेल. मालमत्तेचा विषय मार्गी लागेल. मार्वेâटिंग, रियल इस्टेटमध्ये यशदायी काळ. अचानक धनलाभाचा योग.
धनु : कामाच्या जबाबदार्या वाढतील. चिडचिड होईल. बँकेच्या व्यवहारात चुका टाळा. नोकरीत त्रास वाढेल. तरुणांच्या मनासारखी घटना घडणार नाही. खर्चावर नियंत्रण ठेवा. आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. रागामुळे नुकसान होऊ शकते. सार्वजनिक ठिकाणी टीकाटिपणी टाळा. समाजसेवेतून समाधान मिळेल. कोणताही निर्णय घेताना घाई टाळा. सरकारी कामात अडथळे येतील. छोट्या कारणामुळे घरात वाद होईल. उच्च शिक्षण घेण्यासाठी विदेशात जाल. विज्ञान, कृषी क्षेत्रात उत्तम काळ.
मकर : भागीदारीत सामोपचाराने काम पुढे न्या. दांपत्यजीवनात वादांकडे दुर्लक्ष करा. खेळाडूंना यश मिळेल. व्यवहारात खबरदारी घ्या. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. सार्वजनिक जीवनात अरे ला कारे करू नका. तरुणांना करियरच्या संधी चालून येतील. आजचे काम उद्यावर टाकू नका. मित्रांशी जपून बोला. कलाकार, संगीतकार, चित्रकारांना नव्या संधी मिळतील. जमीन जुमल्याच्या बाबतीत विचार करून पुढे जा. नवे घर घेण्याचा विचार पुढे जाईल. कुटुंबासाठी वेळ द्या. नोकरीत वेळापत्रक पाळा.
कुंभ : सबुरीने घ्या. वाद, गैरसमज टाळा. वाहन चालवताना वेग टाळा. नोकरीत मत व्यक्त करू नका. वरिष्ठ म्हणतील तसे करा. व्यवसायात यश मिळेल. मात्र काम संयमाने पूर्ण करा. कोणत्याही कामात अतिउत्साह दाखवू नका. सकारात्मक विचार करा, प्रसन्न राहा. आर्थिक बाजू गडबडेल. नियोजन करूनच निर्णय घ्या. मुलांच्या वागण्याकडे लक्ष द्या. व्यवसायात बुद्धीच्या जोरावर यश मिळेल. तरुणांसाठी चांगला काळ. विद्यार्थीवर्गासाठी यशदायी काळ. उच्च शिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील.
मीन : मनासारखी कामे होणार नाहीत, चुकीचे निर्णय घेऊ नका. शांततेने घ्या. घरात आपले म्हणणे पुढे रेटू नका. मुलांकडे लक्ष द्या. नोकरीत नवीन बदल स्वीकारताना त्रास होईल. व्यवसायात यश मिळेल. घरात आर्थिक नियोजन करा. अति आत्मविश्वास टाळा. कोर्ट-कचेरीची कामे मार्गी लागतील. तरुणांना यश मिळेल. पोटाचे विकार होतील. नवीन वास्तू घेण्याच्या योजनेला गती मिळेल. कुटुंबासोबत प्रवासात बेरंग होऊ शकतो. नोकरदारांनी डोक्यावर बर्फ ठेवावा. नातेवाईकांशी चेष्टा नकोच.