ग्रहस्थिती : शुक्र मेष राशीत, हर्षल वृषभ राशीत, मंगळ, केतू सिंह राशीत, प्लूटो मकर राशीत, राहू कुंभ राशीत, शनि, नेपच्युन, मीन राशीत, रवि, गुरु मिथुन राशीत, बुध कर्क राशीत. दिनविशेष : २८ जून विनायक चतुर्थी, ३० जून कुमारषष्ठी, २ जुलै बुधाष्टमी, ३ जुलै दुर्गाष्टमी.
– – –
मेष : चांगुलपणाचा कोणाला गैरफायदा घेऊ देऊ नका. प्रेमात सावध राहा. तरुणांनी चंगळ सोडावी. योगसाधनेमुळे तंदुरुस्ती टिकेल. नोकरी व्यवसायात गोड संवाद ठेवा. कामातला विश्वास ढळू देऊ नका. संशोधकांना नवीन संकल्पना यश देतील. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. घाई टाळा. युवकांना, महिलांना यश मिळेल. विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ. पावसाळी सहलीत काळजी घ्या. व्यवसायात नुकसान टाळा. ज्येष्ठांच्या मताचा आदर करा. वाहन जपून चालवा. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष नको.
वृषभ : नव्या कल्पना कामातून आनंद व पैसे मिळतील. नोकरीत कामाचा भार वाढेल. व्यवसायात समन्वय ठेवा. व्यवहारात काळजी घ्या. भावना, संवेदना बाजूला ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. काही कामांना विलंब झाल्याचा राग इतरांवर काढू नका. घरातील वातावरण शांत ठेवा. तरुणांना परिस्थितीचा सामना करताना प्रेरणादायी अनुभव मिळतील. सकारात्मक विचारांना चालना मिळेल, प्रगतीचा वेग वाढेल. जवळच्या व्यक्तीचा भाग्योदय होईल. नवी नोकरी मिळेल. सार्वजनिक ठिकाणी वाद टाळा. घरात छोटेखानी कार्यक्रमात नातेवाईक, मित्रांच्या गाठीभेटी घडतील.
मिथुन : आत्मविश्वास व समाधान वाढेल. मनासारख्या घटना घडतील. घाई टाळा. व्यवसायात निर्णय घेताना ताणाताणी नको. नोकरीत प्रगती होईल. कामासाठी बाहेरगावी जाताना आरोग्याला जपा. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. आयटी क्षेत्रात विदेशात नोकरी मिळू शकते. धार्मिक कार्य घडेल. सामाजिक कार्यात चांगला अनुभव येईल. भागीदारीत संयमाने घ्या. वाद टाळा. जादाचा परतावा मिळवण्याच्या प्रयत्नात फसाल. विद्यार्थ्यांना, खेळाडूंना यश मिळेल. संततीच्या वागण्याकडे लक्ष ठेवा.
कर्क : भावनिक गुंतवणूक टाळा. आर्थिक व्यवहारात फसाल. नोकरीत जपून व्यक्त व्हा. व्यवसायात नव्या ऑर्डर मिळतील. येणे वसूल होईल. शेजार्यांना मदत करा. कुटुंबासाठी वेळ खर्च होईल. महागडी वस्तू घ्याल. अचानक धनलाभ होईल. शेअर, सट्टा, जुगारापासून दूर राहा. भाऊ-बहिणीची मदत होईल. दांपत्यजीवनात किरकोळ कुरबुरींकडे लक्ष देऊ नका. नोकरीत वरिष्ठ खूष राहतील. विदेशातील कामाचा निर्णय विचार करूनच घ्या. मित्रांशी चेष्टामस्करी टाळा.
सिंह : नव्या व्यक्तीवर विश्वास टाकू नका. नोकरी-व्यवसायात अचानक बदल होतील. दडपण वाढून चुका होतील. आर्थिक व्यवहारात शॉर्टकट टाळा. तरुणांनी आपले म्हणणे रेटू नये. कोणाबद्दलही मते बनवू नका. नोकरदारांचा आत्मविश्वास व कामाचा वेग वाढेल. नोकरीत प्रवास घडेल. कुटुंबासोबत भटकंती होईल. बँकेची कामे पुढे सरकतील. व्यवसायात नवे प्रयोग कराल. नियोजनात गडबड करू नका. महिलांचा भाग्योदय होईल. घरात आनंद वाढेल. निर्णय घेताना घाई नको. थकीत येणे वसूल होईल.
कन्या : आर्थिक बाजू पाहूनच निर्णय घ्या. सल्ले देऊ नका. सगळ्या गोष्टी व्यक्त करू नका. तरुणांना, व्यावसायिकांना यश मिळेल. व्यवहारात खबरदारी घ्या. भावा-बहिणीबाबत मोठा खर्च उद्भवेल. शेअर, लॉटरीतून लाभ होईल. आध्यात्मिक कार्यातून आत्मविश्वास वाढेल. महिलांनी आरोग्य सांभाळावे, नियोजन व वेळेला सर्वाधिक महत्व द्यावे. आयटी क्षेत्रात यश मिळेल. जवळच्या व्यक्तीच्या मदतीने अडकलेले काम पूर्ण होईल. अति विश्वास दाखवणे टाळा. पावसाळी हवेत पर्यटनाला जाल.
तूळ : नोकरीत आपल्या मतावर अडू नका. कुटुंबाला वेळ द्याल. जुने प्रश्न मार्गी लागतील. तरुणांना यश मिळेल. खेळाडूंचा गौरव होईल. मोठ्या व्यक्तींच्या भेटीतून चांगला अनुभव व प्रेरणा मिळून एखादी संकल्पना पुढे जाईल. महिलांना यश मिळेल. नव्या योजनांना गती मिळेल. विदेशात नोकरी करणार्यांना लॉटरी लागेल. धारदार वस्तूंपासून जपा. व्यवसायात भावनेच्या भरात निर्णय घेऊ नये. घरात खर्च वाढेल. योगा, ध्यानातून समाधान मिळेल. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक : प्रत्येक कामात सावध राहा. वाद, किरकोळ कुरबुरी, गैरसमज, टाळा. नोकरीत कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधीचा फायदा घ्या. व्यवसायात हिशेब सांभाळा. तरुणांना यश मिळेल. घरात ज्येष्ठांशी अरेरावी टाळा. मुलांची शैक्षणिक प्रगती होईल. तीर्थाटन घडेल. क्रीडापटूंना यश मिळेल. मालमत्तेचा प्रलंबित विषय पुढे सरकेल. मार्वेâटिंग, रियल इस्टेटमध्ये यश लाभेल. अचानक धनलाभ होईल. आनंद वाढवणारी बातमी कळेल. व्यवसायविस्ताराचा निर्णय विचारपूर्वक घ्या. उधार-उसनवारी टाळा.
धनु : तरुणांनी जुन्या गोष्टी डोक्यात ठेवून काम करू नये. नोकरीत कष्ट घ्या. व्यवसायात ध्येय साध्य होईल. वाक्चातुर्याच्या जोरावर मने जिंकाल. सामाजिक कार्याचे कौतुक होईल. घरातील कामांसाठी धावपळ होईल. निर्णयात घाई टाळा. सरकारी कामात अडथळे येतील. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. बंधूवर्गाची तब्येतीची तक्रार होईल. उच्चशिक्षणाच्या प्रयत्नांना यश मिळेल. मोहात पडू नका. विज्ञान, कृषी क्षेत्रात उत्तम काळ. जुने दुखणे डोके वर काढेल. मुलांकडे लक्ष द्या. घरासाठी वेळ खर्च होईल.
मकर : नातेवाईक, मित्रांशी जपून बोला. वादात शांत राहा. कामानिमित्त प्रवास कराल. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात घाई नको. नोकरीत ताण वाढेल. जमीनजुमल्याच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. नवे घर घेण्याचा विचार पुढे जाईल. महिलांशी आदरभाव ठेवा. तरुणांना करियरच्या, उच्चशिक्षणाच्या नव्या संधी लाभतील. कमी बोला. सरकारी कामात शॉर्टकट टाळा. व्यवसायात येणे वसूल होईल. तरुणांचा हिरमोड होईल. कलाकार, संगीतकार, चित्रकारांना नव्या संधी मिळतील.
कुंभ : व्यवहारात काळजी घ्या. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी जपून मते व्यक्त करा. आपले म्हणणे लादू नका. व्यवसायात यश मिळेल. महिलांनी विचार व्यक्त करताना काळजी घ्यावी. घरातील वातावरण बिघडू देऊ नका. ज्येष्ठांशी नीट बोला. व्यवसायात अच्छे दिन अनुभवाल. अचानक धनलाभ होतील. ज्येष्ठांना हाडाच्या दुखण्याचा त्रास होईल. मधुमेह, उच्च रक्तदाब असणार्यांनी काळजी घ्यावी. तरुणांना नोकरी मिळेल. कला क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. मोठे सामाजिक काम होईल. भाग्योदयकारक घटना घडतील.
मीन : कामात तडजोड करू नका. कोणाबद्दल बोलताना काळजी घ्या. मध्यस्थी करण्याच्या भानगडीत पडू नका. सामाजिक कार्यात गौरव होईल. व्यावसायिकांना घवघवीत यश मिळेल. नोकरदारांनी आर्थिक नियोजन करावे. अति आत्मविश्वास टाळा. कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. पोटाचे विकार वाढतील. नवीन वास्तू घेण्याच्या योजनेला गती मिळेल. कुटुंबासोबत प्रवास कराल, पण त्यात बेरंग होईल. नोकरदारांनी डोक्यावर बर्फ ठेवून काम करावे. नातेवाईकांशी चेष्टामस्करी नको. तरुणांना यश मिळेल, शिक्षण क्षेत्रात काम करणार्यांना यश मिळेल.