ग्रहस्थिती : रवि मेष राशीत, हर्षल वृषभ राशीत, बुध, शुक्र, शनि, राहू, नेपच्युन मीन राशीत, प्लूटो मकर राशीत, मंगळ कर्क राशीत, केतू कन्या राशीत. दिनविशेष : ११ मे नृसिंह जयंती, १२ मे बुद्धपौर्णिमा, १६ मे संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय रात्री १०.२३ वा.
मेष : विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. व्यावसायिकांना चांगली प्राप्ती होईल. नोकरीत वरिष्ठांशी वाद होईल. तरुणांनो, अधिक प्रयत्न करा. कुटुंबासाठी वेळ खर्च होईल. अचानक प्रवास घडेल. आमदनी पाहून खर्च करा. कामाच्या ठिकाणी मोजकेच बोला. राग आवरा. घरात वातावरण आनंदी राहील. संततीकडून चांगली बातमी कळेल. आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. व्यायामाला वेळ द्या. मित्रांबरोबरचे जुने वाद संपतील.व्यवसायात बदल स्वीकारा. बँकेचे व्यवहार करताना काळजी घ्या.
वृषभ : व्यवसायात स्थिती बिघडल्याने आर्थिक गणित गडबडेल. हातातली कामे पूर्ण करा. नोकरीत घाम गाळा. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. आमदनी व खर्चाचा मेळ साधा. कामात सकारात्मक राहा. डोळे झाकून सही करू नका. सामाजिक कार्यात मानसन्मान होईल. मुलांकडे लक्ष द्या. कामासाठी प्रवास कराल. धार्मिक कार्य कराल. छोट्या कारणाने नाराज होऊ नका. घरासाठी वेळ खर्च होईल. घरात मंगलकार्य घडेल. व्यवसायवृद्धीसाठी नव्या कल्पना सुचतील.
मिथुन : नोकरीत कामे पुढे सरकतील. व्यवसायात कामे पुढे जातील. आर्थिक बाजू ढासळेल. घरात वाद वाढतील. कोर्टकचेरीची कामे लांबणीवर पडतील. मित्रांसोबत पार्टी करताना आरोग्याची काळजी घ्या. वेळ आणि कामाचे गणित बसवा. विदेशात व्यवसायविस्तार पुढे सरकेल. महत्वाचे निर्णय घेताना सल्ला घ्या. प्रलोभनांपासून दूर राहा. भागीदारीत वाद होतील. सरकारी काम पूर्ण होईल. मित्रांशी चेष्टामस्करी नको. अनपेक्षित धनलाभ होईल. नातेवाईकांना मदत कराल. माध्यमक्षेत्रात चांगला काळ.
कर्क : शिक्षणक्षेत्रात आनंद वाढेल. नोकरीत प्रमोशन, पगारवाढ होईल. घरात आनंदसोहळ्यात आप्तेष्टांची भेट होईल. नव्या गुंतवणुकीतून फायदे मिळतील. नियोजन करून पुढे जा. कलाकार, खेळाडू, संगीतकारांसाठी चांगला काळ. घरात आणि बाहेर बोलताना काळजी घ्या. मानापमानात अडकू नका. सामाजिक कार्यात कौतुक होईल. मित्रांशी वाद होतील. मनाची अस्वस्थता वाढेल. ध्येयपूर्तीसाठी कष्ट घ्या. मध्यस्थी करणे टाळा. पैशाचे नियोजन करा. निर्णयात घाई नको. व्यवसायात लाभ मिळू शकतो.
सिंह : घरात निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला घ्या. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक नियोजन करा. सामाजिक कार्यातून समाधान मिळेल. मन प्रसन्न ठेवा. मित्रांना मदत करताना काळजी घ्या. व्यवसायात स्पर्धेचा सामना करावा लागेल. प्रवासाचे नियोजन फिसकटून नुकसान होईल. नोकरीत अधिक कष्ट करा. घरासाठी महागडी वस्तू खरेदी कराल. धार्मिक कार्यातून आनंद मिळेल. भागीदारीत काळजी घ्या. योगा, ध्यानधारणेमुळे समाधान मिळेल. मालमत्तेचा प्रश्न मार्गी लागेल. व्यवसायासाठी प्रवास कराल. सकारात्मक विचार करा. अति आत्मविश्वास टाळा.
कन्या : घराला वेळ द्याल, समाधान मिळेल. आरोग्याचे प्रश्न डोकेदुखी वाढवतील. नोकरीत कठीण प्रश्नांना सामोरे जाल. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. तरुणांची बेचैनी वाढेल. जनसंपर्क क्षेत्रात नव्या संधी मिळतील. नवीन मित्र होतील. आप्तेष्टांची गाठभेट होईल. उधार-उसनवारी नकोच. आईवडिलांची प्रकृती सांभाळा. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीत कमी बोला, काम करा. व्यवसायात कामे पुढे नेताना बुद्धिकौशल्याचा उपयोग होईल. भागीदारी नको. जुने प्रश्न मार्गी लागतील. सरकारी कामांत सबुरी ठेवा.
तूळ : व्यवसायात अपयश मिळेल. तरुणांना अपयशाचा सामना करावा लागेल. हातातली कामे जोमाने पूर्ण करा. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. पण, वाद होतील. मालमत्तेचे प्रश्न सामोपचाराने सोडवा. ज्येष्ठांची काळजी घ्या. आध्यात्मिक कार्यातून समाधान मिळेल. मुलांशी जमवून घ्या. कामाचे दडपण घेऊ नका. संयम ठेवा. मित्रांमध्ये गैरसमज होतील. दांपत्यजीवनात कुरबुरी घडतील. प्रवासात काळजी घ्या. आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. लौकिकात भर पडेल. व्यावसायिकांना धावपळ करावी लागेल.
वृश्चिक : नातेवाईकांशी जमवून घ्या. आर्थिक मदत करताना काळजी घ्या. नोकरीत मनमानी टाळा. वरिष्ठांचे ऐका. व्यवसायात भरभराट होईल, खिसा भरलेला राहील. मनासारखे पर्यटन घडेल. खेळाडूंना, तरुणांना यश मिळेल. मुलांकडे लक्ष द्या. मधुमेह, हृदयविकारग्रस्तांनी काळजी घ्यावी. धार्मिक कार्यांकडे ओढा राहील. शिक्षणक्षेत्रात चांगला काळ. व्यवसायात काम सरळमार्गी करा. नातेवाईकांची मदत मिळेल. निर्णय घेताना सर्व बाजू तपासा. ब्रोकरना लाभ मिळेल. आर्थिक बाजू बळकट होईल.
धनु : व्यवसायात वाढ होईल. नोकरीत ताण वाढेल. घरात अधिक कष्ट पडतील. मालमत्तेच्या व्यवहारांत फसवणूक होईल. आर्थिक व्यवहारांत खबरदारी घ्या. कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. नवीन वास्तू घेण्याच्या विचारांना गती मिळेल. कामानिमित्त बाहेरगावी जाल. समाजसेवेसाठी वेळ खर्च होईल. त्यातून समाधान मिळेल. मन स्थिर ठेवा. उच्चशिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. विदेशात जाण्याची संधी मिळेल. तरुणांनी मोहाच्या गोष्टींपासून दूर राहावे. मेडिकल, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम काळ. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. मामा-मावशींची मदत होईल.
मकर : उन्हाळ्यात मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. घरात मत व्यक्त करताना जपून. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. तरुणांचा आत्मविश्वास वाढेल. गुंतवणुकीतून चांगले रिटर्न मिळतील. महिलांना यश मिळेल. सरकारी कामे सुटतील. नोकरीत अहंकार टाळा. सामाजिक कार्यात चांगला अनुभव येईल. व्यवसायात ऑर्डर वाढेल. उसनवारी टाळा. सकारात्मक विचार करा. मालमत्तेच्या व्यवहारांत काळजी घ्या. बँकेचे कर्ज मंजूर होईल. अडलेले काम ओळखींमधून मार्गी लागेल. शुभवार्ता कानावर पडेल.
कुंभ : तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. नव्या नोकरीची संधी मिळेल. आजारांकडे लक्ष द्या. आपले म्हणणे रेटू नका. व्यवसायात त्रास होईल. बोलताना गैरसमज टाळा. आध्यात्मिक कार्यातून समाधान मिळेल. मौजमजेवर खर्च होईल. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत टोकाची भूमिका नको. अचानक दूरचा प्रवास होईल. संशोधकांसाठी, प्रेमी युगुलांसाठी, खेळाडूंसाठी चांगला काळ. पती-पत्नीत वाद घडतील. नाराज होऊ नका. सामाजिक कार्यात मोठ्या व्यक्तीचा सहवास लाभेल.
मीन : व्यवसायात खूप काम करावे लागेल. तरुणांना यश मिळेल. घरात वाद टाळा. नवीन गुंतवणूक करताना जपून. मुलांकडून चांगली बातमी कळेल. खेळाडूंना अपेक्षित यश मिळणार नाही. नवीन नोकरीची संधी घेताना जपून पावले उचला. अहंकार दूर ठेवा. सार्वजनिक ठिकाणी टिंगल टवाळी नको. शुभघटनांमुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. यात्रेमुळे समाधान मिळेल. नोकरीत वाढीव काम पडेल. बोलताना काळजी घ्या. अडकलेली कामे मार्गी लागतील. आत्मविश्वास वाढवा.