ग्रहस्थिती : रवि मेष राशीत, हर्षल वृषभ राशीत, बुध, शुक्र, शनि, राहू, नेपच्युन मीन राशीत, प्लूटो मकर राशीत, मंगळ कर्क राशीत, केतू कन्या राशीत. दिनविशेष : ४ मे भानुसप्तमी, ५ मे श्री शंकर महाराज पुण्यतिथी आणि दुर्गाष्टमी, ८ मे मोहिनी एकादशी, ९ मे प्रदोष.
मेष : तरुणांना अपेक्षित यश मिळेल, वाढीव कष्ट कामी येतील. आर्थिक व्यवहारांत खबरदारी घ्या. चुकीची संगत टाळा. घरात वादविवाद टाळा. खेळाडूंना अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळेल, मुलांच्या वर्तनाकडे लक्ष द्या. सार्वजनिक ठिकाणी कायदा मोडू नका. शेअर, जुनी गुंतवणूक यामधून आर्थिक लाभ मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. नोकरी-व्यवसायात धांदरटपणा करू नका. आश्वासन देताना विचार करा. लेखक, कलाकारांसाठी यशदायी काळ आहे. घरातील ज्येष्ठांचा आदर करा.
वृषभ : आर्थिक बाजू भक्कम होईल. मनमानी खर्च टाळा. घरासाठी खर्च होतील. थकीत येणे मिळेल. कलाकार, गायक, लेखकांना यश मिळेल. व्यवसायात विस्तार होईल, नव्या ऑर्डर मिळतील. वेळेचे गणित पाळा. वाहन जपून चालवा. तरुण कर्तृत्वाच्या जोरावर यश मिळवतील. मित्रांच्या गाठीभेटी होतील. घरातल्यांसोबत देवदर्शन होईल. घरातल्या गोष्टी बाहेर बोलू नका. सामाजिक कार्य कराल. नोकरीनिमित्ताने प्रवासात काळजी घ्या. अचानक धनलाभातून मौजमजा कराल. मुले चांगली कामगिरी करतील.
मिथुन : व्यवसायात त्रास होईल. तरुणांना नोकरी मिळेल. सरकारी कामांत घाई नको. कला, छंदांतून नवीन व्यवसायाची कल्पना सुचेल. उन्हाळी आजार होऊ शकतो. तरुण बुद्धीच्या जोरावर यश मिळवतील. महिलांना अपेक्षित यश मिळेल. नोकरीत वाहवा होईल. वरिष्ठ खूष होतील. कामात उतावळेपणा नको. अडकलेले काम मार्गी लागेल. भागीदारीत वाद होतील. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात अचानक विदेशवारी घडेल. तरुणांना खेळात यश मिळेल. व्यवसायाची नवी कल्पना सुचू शकते, मात्र घाईत निर्णय नको.
कर्क : उत्तम धनलाभ व धार्मिक कार्यामुळे घरात आनंद वाढेल. नोकरीत आनंददायी बातमी कळेल. व्यवसायात योजना पुढे जातील. व्यवहारात काळजी घ्या. माध्यमक्षेत्रात चांगली बातमी मिळेल. तरुणांना नोकरी मिळेल. नातेवाईकांना आर्थिक मदत करावी लागेल. बंधुवर्गाबरोबर जमवून घ्या. उच्चशिक्षणात यश मिळेल. शिक्षणक्षेत्रात यशदायी काळ. आवडीच्या कामाला वेळ द्याल. मनमानी, उधार उसनवारी टाळा. कामाच्या धावपळीचा आरोग्यावर परिणाम होईल. शुभकार्यात नातेवाईक, मित्रमंडळी भेटतील.
सिंह : मोठ्या नोकरीची संधी चालून येईल. नव्या ओळखी कामी येतील. आरोग्याकडे लक्ष द्या. नमते घ्या. व्यवसायात लाभ मिळतील, गुंतवणूक करा. संशोधकांना नवीन कामाची संधी मिळेल. कलाकार, लेखक, गायक यांना उत्तम काळ. सरकारी कामे पुढे नेण्यासाठी आमिषे दाखवू नका. सार्वजनिक जीवनात काळजी घ्या. वास्तवाचे भान ठेवा. भावनांवर नियंत्रण ठेवा. मित्रमंडळींशी बोलताना मोठेपणा टाळा. खर्चात अचानक वाढ होईल. कुटुंबासोबत सहलीला जाल. पती-पत्नीमध्ये किरकोळ कुरबुरी होतील.
कन्या : नोकरीत मनासारख्या घटना घडतील. वरिष्ठ खूष होऊन अधिकची जबाबदारी देतील. तरुणांना यशासाठी धडपड करावी लागेल. व्यक्त होताना संयम ठेवा. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. व्यवसायात अनपेक्षित यश मिळेल. कुटुंबाला वेळ द्याल. स्पष्ट बोलण्याची सवय अंगलट येईल. लॉटरी, सट्टा टाळा. मित्रमंडळींची मदत होईल. बँकेची अडलेली कामे मार्गी लागतील. अनोळखी व्यक्तीवर विश्वासून व्यवहार करू नका. महत्वाचे निर्णय घेताना घरातील ज्येष्ठांचा विचार घ्या. सामाजिक कामातून उत्साह वाढेल. महिलांना शुभ घटनांचा अनुभव येईल.
तूळ : चुका घडू शकतात, कामात लक्ष द्या. उलटे-सुलटे आर्थिक व्यवहार करू नका. मित्रांची भेट होईल, मौजमजा कराल. येणे वसूल करताना कष्ट पडतील. वाद घडतील. कोर्टकचेरीची कामे लांबणीवर पडतील. व्यवसायात निर्णय चुकू शकतो. तरुणांची कामे पूर्ण होतील. बहिणीची मदत मिळेल. नातेवाईकांशी जपून बोला. पत्नीसाठी मोठी खरेदी कराल. नवे घर घ्याल. घाई टाळा, सल्ला घ्या. नोकरीत उत्तम स्थिती राहील. समतोल साधून काम करा. मुलांकडे लक्ष ठेवा. आयटी, डिझायनिंग, मेडिकल यात चांगले लाभ मिळतील.
वृश्चिक : प्रेमप्रकरणात वाद होतील. नोकरीत तुमच्या मताला किंमत राहणार नाही. महिलांना आरोग्याचे प्रश्न त्रास देतील. व्यवसायात घाईने निर्णय घेऊ नका. कामाचे फळ मिळणार नाही. खेळाडूंना उत्तम यश मिळेल. घरातील वादात अडकू नका. घरात मोठा निर्णय घेताना गोंधळाल. सावधपणे पावले टाका. मनाची अस्वस्थता वाढवू नका. ध्यानधारणा करा. मुलांकडे लक्ष द्या. लेखक, प्रकाशक, मुद्रकांसाठी चांगला काळ. कलाकार, क्रीडापटू यांचा सन्मान होईल. वाहनदुरुस्तीचा खर्च येईल. मित्रांशी वाद टाळा. नोकरीत अचानक प्रवास घडेल. त्यात सावध राहा.
धनु : चांगले लाभ मिळतील, आनंदी राहाल. ज्येष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवसायात नवीन करार करताना, सहलीचे नियोजन करताना काळजी घ्या. शेजार्यांशी वाद टाळा. मित्रांशी जपून व्यवहार करा. व्यवसायात आर्थिक बाजू भक्कम करा. कलाकारांना मनासारखे काम मिळेल, खिसा भरलेला राहील. लेखकांना सन्मान मिळेल्ा. हृदयविकार, मधुमेह असणार्यांनी काळजी घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी वाद टाळा. नोकरीत घाई केल्यास वरिष्ठ नाराज होतील. नोकरी मिळेल. उत्साह वाढेल.
मकर : नोकरीत पुरस्कार मिळेल. गायक, कलाकारांना विदेशात काम मिळेल. पालकांच्या प्रकृतीची काळजी घ्या. कुुटुंबियांबरोबर सहलीला जाल. मनातल्या गोष्टी सांगू नका. व्यवसायात भावनांमध्ये गुंतू नका. व्यवहार बारकाईने तपासा. तरुणांनी भक्कमपणे निर्णय घ्यावा. शिक्षणाच्या वाटा खुल्या होतील. समाजकार्यात नवा प्रोजेक्ट कौतुकाचा ठरेल. अपूर्ण काम डोकेदुखी वाढवेल. नातेवाईकांना वेळ द्या. पती-पत्नीत वाद होतील. बोलताना जपून बोला. प्रवासात अनोळखी व्यक्तीपासून सावधान.
कुंभ : तरुणांना अपेक्षित यश मिळेल. शिक्षण क्षेत्रात नवीन संधी येतील. नव्या ओळखीमुळे कामे पुढे सरकतील. आर्थिक बाजू चांगली राहील. घरात शुभकार्ये घडतील. नोकरीत कामाशी काम ठेवा. चुका टाळा. विदेशात व्यवसाय वाढवताना थांबून निर्णय घ्या. बँक कर्जाची प्रकरणे अडकतील. व्यवसायात कर्तृत्वाच्या जोरावर यश मिळवाल. अचानक धनलाभ होईल. लॉटरी, शेअरमधून चांगला लाभ होऊ शकतो. कुटुंबाला भरपूर वेळ द्याल. उधार उसनवारी टाळा. वाहन चालवताना काळजी घ्या.
मीन : नोकरीत दूरचे प्रवास कराल. नव्या व्यवसायाची कल्पना चांगला प्रतिसाद मिळवेल. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. नोकरीत वरिष्ठांचे मन सांभाळा. साहित्यिक, लेखकांसाठी चांगला काळ. क्षमता तपासूनच पुढचे पाऊल उचला, यश मिळेल. मुलांसाठी उत्तम काळ. उच्चशिक्षणासाठी विदेशात जाऊ शकाल. नोकरीत बदली होईल. मित्रांशी चेष्टामस्करी टाळा. तरुणांचे मनोबल वाढेल. घरात मालमत्तेच्या प्रश्नावरून वाद होतील. डोके शांत ठेवून चर्चा करा. प्रवासात खिसा पाकीट सांभाळा.