ग्रहस्थिती : गुरु, हर्षल वृषभ राशीत, रवि, बुध, शुक्र, शनि, राहू, नेपच्युन मीन राशीत, केतू कन्या राशीत, मंगळ मिथुन राशीत, प्लूटो मकर राशीत. दिनविशेष : २० एप्रिल भानुसप्तमी आणि इस्टर संडे, २१ एप्रिल कालाष्टमी, २४ एप्रिल वरुथिनी एकादशी, २५ एप्रिल प्रदोष.
– – –
मेष : आरोग्याचे प्रश्न दुर्लक्षू नका. कामात सल्ला घ्या. नोकरी-व्यवसायात उत्साहवर्धक घटना घडतील. मित्र, नातेवाईक मदतीला येतील. आर्थिक बाजू तगडी होईल. कुटुंबाशी जपून वागा. धार्मिक कार्यात वेळ खर्च होईल. अचानक मोठा खर्च होईल. आर्थिक आवक चांगली राहील, नियोजन करा. घरात कामाचा ओघ वाढेल. दूरच्या प्रवासात खानपान सांभाळा. नोकरीत मानसन्मान मिळेल. अहंकार दूर ठेवा. मनोकामना पूर्ण होईल. तरुणांसाठी उत्तम काळ. लेखक, कवी, नाटककार, पत्रकारांचा सन्मान होईल.
वृषभ : नोकरी-व्यवसायात कामाचा ओघ वाढेल. आरोग्यावर परिणाम होईल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कलावंत, लेखकांना पुरस्कार मिळेल. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. घरात आनंदी वातावरण राहील. कामानिमित्त प्रवास कराल. धार्मिक कार्यातून आनंद मिळेल. नवीन ओळखीतून फायदा होईल. लॉटरी, शेअर, जुगारात फटका बसू शकतो. ज्येष्ठांची काळजी घ्या. भावंडांचा भाग्योदय होईल. शेती क्षेत्राशी निगडित व्यावसायिकांना चांगले दिवस. ब्रोकर, रियल इस्टेट क्षेत्रात यशदायी काळ.
मिथुन : कामे मागे पडून चिडचिड होईल. आर्थिक बाजूचा मेळ घालताना काळजी घ्या. नोकरीत अधिक कष्ट घ्या. वेळ, कामाचे गणित जमवा. व्यवसायात दगदग होईल. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. घरात बाहेर उतावळेपणा नको. कुणाला शब्द देऊ नका. नवा व्यवसाय करताना शांतपणे निर्णय घ्या. खर्च करताना नियोजन करा. उधार उसनवारी टाळा. आरोग्याच्या किरकोळ प्रश्नाकडे लक्ष द्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबाला वेळ द्याल. पत्नीचे सहकार्य मिळेल. खेळाडूंना यश मिळेल.
कर्क : कामाचा कंटाळा येईल. तरुणांना नोकरी मिळेल. नोकरदारांना प्रवास घडेल. धर्मस्थळांना भेटी द्याल. व्यावसायिकांचा खिसा भरलेला राहील. नव्या कामाच्या ऑर्डर मिळतील. तरुणांच्या उच्च शिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक बाजू भक्कम राहील. सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. मन आनंदी राहील. आर्थिक आवक वाढेल. कुटुंबासोबत सहल होईल. ऊर्जा वाढेल. प्रेमात वाद विकोपाला जातील. सावधानी बाळगा. युवकांना यश मिळवून देणारा काळ.
सिंह : अस्वस्थतेचा परिणाम कामावर होईल. आवडीच्या कामात मन रमवा. लेखन, वाचन, फिरणे यातून मनाचा ताजेपणा टिकवा. प्रेमप्रकरणात वाद होतील. ज्येष्ठांसमोर मीपणा दाखवू नका. कामाच्या ठिकाणी सामंजस्य ठेवा. लेखक, कलाकारांचा सहवास मिळेल. वैचारिक देवाणघेवाण होईल. पत्नीशी कुरबुर होईल. तुटेपर्यंत ताणू नका. मनशांती ठेवा. उन्हाळ्यात आरोग्याकडे लक्ष द्या. तरुणांना यशासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतील. अनपेक्षित शुभघटना कानी पडेल. घरात वातावरण आनंदी राहील. खरेदी-विक्री एजंट, वैद्यकीय कर्मचारी, अभियंते यांच्यासाठी उत्तम काळ.
कन्या : नोकरीत वादळ उठू शकते. चुकांकडे दुर्लक्ष नको. वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्याल. व्यवसायात कामे पुढे न्या. शांत राहा. नवीन गुंतवणुकीत काळजी घ्या. आईवडिलांच्या शब्दाला मान द्या. सार्वजनिक जीवनात वाद टाळा. सरकारी कर्मचार्यांना अच्छे दिनचा अनुभव येईल. करमणुकीवर खर्च कराल. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्या. खेळाडूंना यशासाठी झटावे लागेल. तरुणांच्या कर्तृत्वात भर पडेल. मनासारख्या घटना घडतील. भागीदारीत वाद होऊ शकतो. उधार देऊ नका.
तूळ : कामानिमित्त दगदग होईल. वेळापत्रक विस्कळीत होईल. मानसिक फिटनेस वाढवा. ध्यान, योगामधून समाधान मिळेल. कामानिमित्त विदेशात जाल. व्यवसायात द्विधा मन:स्थितीचा सामना करावा लागेल. मोठे निर्णय विचारपूर्वक घ्या. सार्वजनिक ठिकाणी अरे ला कारे करू नका. सामाजिक, राजकीय क्षेत्रात भावनांवर नियंत्रण ठेवा. घरात आनंदी वातावरण राहील. मुलांकडून चांगली बातमी समजेल. प्रेमप्रकरण वेगळ्या वळणावर जाईल. वाहन चालवताना व सोशल मीडियावर काळजी घ्या.
वृश्चिक : नोकरीत प्रमोशन, पगारवाढ होऊ शकते. आमदनी आणि खर्च यांचा मेळ घाला. मौजमजेवर पैसे खर्च होतील. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या, धार्मिक कार्यामधून समाधान मिळेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. व्यवसायात आळस जाणवेल. कामात मन रमणार नाही. सप्ताहाअखेरीस आनंददायी बातमी कळेल. घरात सबुरीने घ्या. आर्थिक बाजू चांगली राहील. मित्रांना आर्थिक मदत कराल. भावनांना आवर घाला. आत्मविश्वास वाढणारा काळ आहे. लॉटरी, सट्टा खेळू नका.
धनु : आर्थिक बाजू उत्तम राहील. खर्च सांभाळताना गडबड होईल. भागीदारीत स्वत:चे खरे करू नका. आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष नको. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरीत कामाची तारीफ होईल, मन शांत ठेवा. योगा, ध्यानाकडे लक्ष द्या. व्यवसायात निर्णय घेताना घाई करू नका. नोकरदारांच्या कामाकडे लक्ष ठेवा. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षेत यश मिळेल. महागडी वस्तू घेण्याचा मोह होईल. पत्नीची मदत िमळेल. नवीन वास्तू घेण्याच्या प्रयत्नात यश मिळेल.
मकर : रेंगाळलेली कामे पुढे जातील. धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. काही गोष्टी मनात ठेवा. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. तरुणांना नोकरी मिळेल. निर्णयात घाई नको. गायक, कलाकारांना नव्या संधी मिळतील. कुटुंबासाठी वेळ द्याल. धार्मिक यात्रा होईल. दानधर्म, ध्यानधारणा होईल. मुलांच्या वागण्याबोलण्याकडे अधिक लक्ष द्या. व्यवसायवृद्धीसाठी कष्ट घ्यावे लागतील. घरातील आर्थिक नियोजन विस्कटू देऊ नका. वायफळ खर्च नकोच. नोकरीत सांभाळून राहा.
कुंभ : घरात वेळ खर्च होईल, आर्थिक नियोजन करा. मनासारख्या घटना न घडल्याने नाराज होऊ नका. घाई गडबड टाळा. कृती विचारपूर्वक करा. सामाजिक कार्याला भरपूर वेळ द्याल. नव्या लोकांची ओळख भविष्यात उपयोगी ठरेल. आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष नको. जुना आजार डोके वर काढेल. आपले मत इतरांवर लादू नका. अडचणीचा प्रसंग चातुर्याने सोडवा. व्यवसायात अधिक कष्ट घ्या. मुलांचे शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील. शिक्षक, संशोधक, शास्त्रज्ञांना चांगली बातमी कळेल.
मीन : अपेक्षित कामे मार्गी लागतील. चेष्टा मस्करी टाळा. तरुणांचे मानसिक आरोग्य बिघडवणारे प्रसंग घडू शकतात. ज्येष्ठांच्या मतानुसार निर्णय घ्या. अवघड काम सोपे होईल. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. नवीन व्यवसाय भागीदारीत सुरू करताना विचार करा. घरात शुभकार्ये घडतील. नवीन घर, जमीन घ्याल. कलाकारांसाठी उत्तम काळ. कोणावरही आंधळा विश्वास ठेवून माहिती देऊ नका. लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी सकारात्मक राहणे हिताचे. किरकोळ कुरबुरींकडे दुर्लक्ष करा. मनाची स्थिरता टिकवून ठेवा. काम पुढे नेताना घाई करू नका.