• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

- दासू भगत (चंदेरी सोनेरी)

Nitin Phanse by Nitin Phanse
April 4, 2025
in मनोरंजन
0

दक्षिणेतल्या प्रेक्षकांना मेलोड्रामा भयंकर आवडतो. त्या मानाने आपल्याकडे तो कमी बघायला मिळतो… त्या परंपरेत वाढलेल्या या बहुपेडी अभिनेत्याची कारकीर्द वयाच्या सातव्या वर्षापासून सुरू झाली आणि खूपच प्रदीर्घ काळपर्यंत टिकून राहिली.
– – –

मी असेन तेव्हा ९व्या वर्गात. आमच्याकडे मामाचा मुलगा शिकायला होता. त्याने एकदा जत्रेला जायची टूम काढली आणि आम्ही दोघे नांदेडपासून जवळ असलेल्या बासर या गावी जत्रेला गेलो. जत्रेत बरीच मौजमस्ती करून परत निघायची वेळ झाली तसा तो मामेभाऊ म्हणाला, ‘आपण आदिलाबादला जाऊया. तिथे मस्त पिक्चर बघू मग परत जाऊ.’ चित्रपट म्हणताच मी तात्काळ हो म्हणालो.
आम्ही जेव्हा आदिलाबादला पोहचलो, तेव्हा संध्याकाळ उलटून गेलेली. मग जवळच्या कुठल्यातरी टॉकीजमध्ये गेलो आणि घाईघाईने तिकीट काढले. आत गेलो तर तिथे सर्व लोक जमिनीवर बसलेले. सिनेमा सुरू झाला होता. मी पहिल्यांदाच जमिनीवर बसून सिनेमा बघत होतो. थोड्या वेळाने लक्षात आले की चित्रपट तेलुगू आहे. मग काय… समोर काय बोलताहेत ते कळेना… सगळे हसले की आम्ही पण हसायचो… सगळ्यांनी टाळ्या वाजविल्या की आम्ही पण वाजवायचो. चित्रपट कथा तशी समजणारी होती. फक्त संवाद कळत नव्हते. नांदेडला जाणारी ट्रेन दुसर्‍या दिवशी सकाळी असल्यामुळे रात्री पुन्हा दुसरा शो ‘मेहरबान’ नावाचा चित्रपट बघितला आणि दुसर्‍या दिवशी परत आलो. त्या तेलुगू सिनेमातले एक गाणे नंतर मी बरेच दिवस गुणगुणत होतो. अर्थात फक्त चाल… दक्षिण भाषिक चित्रपटाची झालेली ही पहिली ओळख…
नंतर सर्वाधिक कानावर पडलेली दक्षिण भारतीय चित्रपटांतील तीन नावे म्हणजे अभिनेता शिवाजी गणेसन, अभिनेत्री बी. सरोजा देवी आणि जमुना. या दोन्ही अभिनेत्री जेमिनी वा प्रसाद प्रॉडक्शन संस्थेच्या हिंदी चित्रपटात असत. अभिनेते मात्र जवळपास नव्हतेच. मात्र १०वी पास होईपर्यंत शिवाजी गणेसन हे नाव चांगलेच परिचयाचे झाले. १९७० मध्ये राजेंद्रकुमार-वहिदा रेहमान यांचा ‘धरती’ नावाचा चित्रपट आला होता. त्यात शिवाजी गणेशन अतिथी कलावंत होते.
दक्षिण भारतात प्रसाद प्रॉडक्शन, एव्हीएम आणि जेमिनी पिक्चर्स या अत्यंत नावाजलेल्या चित्रपट संस्था तेव्हा होत्या. त्या काळी अभिनेत्यांपेक्षा या संस्था अधिक प्रसिद्ध होत्या. त्या संस्थेचा ट्रेडमार्क बघून लोक चित्रपट बघत असत. कृष्णन-पंजू, एल. व्ही. प्रसाद, टी. प्रकाशराव, ए. भिमसिंग, श्रीधर हे दिग्दर्शक खूप प्रसिद्ध होते. यातील ए. भिमसिंग यांनी तमीळ, तेलुगू, कन्नडा व हिंदीमध्ये अनेक चित्रपट तयार केले. संजीवकुमारचा ‘नया दिन नयी रात’ हा मूळ शिवाजी गणेशनच्या ‘नवरात्री’ या तमीळ चित्रपटाचा रिमेक होता आणि शिवाजी गणेशन यातील भूमिका अत्यंत प्रभावीपणे केल्या असे स्वत: संजीवकुमारही म्हणत असे. शिवाजी गणेशन यांचा चित्रपट प्रवास मात्र खरोखरच अद्भुत असाच आहे. मी जे काही अत्यंत कमी त्यांच्यावर वाचले, त्यावरून या माणसाचा आवाका प्रचंड होता यात वादच नाही.
विल्लुपूरम चिनय्या मनरयार गणेशन हे त्यांचे मूळ नाव. दक्षिणेत ‘श’ऐवजी ‘स’चा वापर होतो म्हणजे स्पेलिंगी सिवाजी गणेसन. मध्यमवर्गीय तमीळ कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पूर्वी नाटकाच्या फिरत्या टुरिंग टॉकिज असत. त्यातच सामील व्हायचे असे त्यांनी लहानपणीच पक्के ठरवले होते. त्यामुळे सात वर्षांचे असतानाच ते त्यात सामील झाले. वयाच्या दहाव्या वर्षी ते त्रिचुरापल्लीजवळच्या संगिलियान्दापुरम येथील एका नाटक मंडळीत ते सामील झाले आणि रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. याच ठिकाणी त्यांनी अभिनय व नृत्याचे पहिले धडे गिरवले. नंतर भरतनाट्यम, कथ्थक आणि मणिपुरी या तीनही नृत्यांत ते पारंगत झाले. त्यांच्यातला सर्वात मोठा गुण म्हणजे नाटकातले मोठमोठे व लांबलचक संवाद ते सहज पाठ करत आणि पक्के लक्षात ठेवत. या वैशिष्ट्याचा फायदा चित्रपटात खूप झाला. कारण अनेकदा कलावंतांना संवाद तोंडपाठ नसले की खूपदा रिटेक होत. त्यांच्या जबरदस्त पाठातंरामुळे नाटकात त्यांना लवकर मुख्य भूमिका मिळत गेल्या.
एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतलेल्या एका नाटकात त्यांना मुख्य भूमिका मिळाली. नाटकाचे नाव होते ‘शिवाजी कंदा हिंदू राज्यम’ यातील शिवाजी महाराजांची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. एका सार्वजनिक सभेत त्यावेळचे प्रसिद्ध समाजसेवक ई. व्ही. रामास्वामी म्हणजे द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार यांनी त्यांचा ‘शिवाजी’ असा उल्लेख केला आणि नंतर आयुष्यभर त्यांचे हेच नाव रूढ झाले. काय गंमत आहे बघा, तमीळ ‘विल्लुपूरम चिन्नय्या’चा शिवाजी गणेशन झाला, तर मराठी ‘शिवाजी गायकवाड’चा तमीळ रजनीकांत झाला. आणि दोघेही आपापल्या काळातले श्रेष्ठ अभिनेते ठरले.
१९४०-५० दरम्यान तामीळ सिनेमातले बहुतेक अभिनेते हे तेलुगू होते. त्यामुळे तमीळ संवाद म्हणताना त्यांच्या लिप मूव्हमेंन्ट मॅच होत नसत. त्यामुळे शिवाजी गणेशन यांचा चित्रपट प्रवेश सुकर झाला. सुरुवातीला त्यांनी तेलुगू अभिनेत्यांना आपला आवाज दिला. त्याच काळात द्रविड चळवळ जोरात सुरू होती. सी. एन. अण्णादुराई व एम. करुणानिधी हे त्यांचे अग्रणी नेते होते. तमीळ भाषेतील पटकथांमध्ये या दोघांचाही मोठा सहभाग होता. नंतर ते सक्रीय राजकारणात आले. १९५२मध्ये आलेल्या ‘पराशक्ती’ (देवता) या चित्रपटाने शिवाजी गणेशन यांना ब्रेक मिळाला. कृष्णन पंजू हे त्याचे दिग्दर्शक होते (आर. कृष्णन आणि एस. पंजू अशी जोडी होती). या चित्रपटातील भूमिकेसाठी पेरियार यांनीच निर्मात्याकडे आग्रह धरला होता. या चित्रपटाची पटकथा नंतर तमीळनाडूचे मुख्यमंत्री बनलेल्या एम. करुणानिधी यांनी लिहिली होती.
शिवाजी गणेशन नृत्यात पारंगत असल्यामुळे चेहर्‍यावर नवरसाचे आविर्भाव ते सहज उमटवू शकत. त्यात नाटकाच्या प्रभावामुळे त्यांच्या आवाजातही एक वेगळेपण होतेच. या सर्वाचा मेळ त्यांनी चित्रपटांतील भूमिका साकारताना योग्य पद्धतीने बसवला. विशेष म्हणजे नंतर दोन वर्षांनी प्रदर्शित झालेल्या ‘अंधा नाल’ या चित्रपटातून त्यांनी मुख्य व्हिलनही साकारला. प्रसिद्ध नायक साकारत असताना खलनायक साकारणे हे एक धाडसच होते.
१९६०मध्ये आलेल्या ‘विरप्पनदिया कटाबोम्मन’ या चित्रपटातल्या भूमिकेने त्यांना कैरो येथील अ‍ॅफ्रो एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार मिळवून दिला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले तामीळ अभिनेते होते. इतकेच नाही तर देशाबाहेर पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय अभिनेतेही ठरले. त्या काळच्या दक्षिणेतील सर्वच अभिनेत्री आणि अभिनेत्यासोबत त्यांनी भूमिका केल्या. १९६४मध्ये ‘नवरात्री’ या नवरसांवर आधारलेल्या चित्रपटात नऊ वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर १९६५मध्ये आलेल्या ‘थिरूविलयादल’ या पौराणिक चित्रपटातील त्यांची महादेवाची भूमिका अत्यंत गाजली. शिवाजी गणेशन यांची ही एक विशेषता होती. त्यांनी एकाचवेळी पौराणिक, व्यावसायिक व समांतर आर्ट चित्रपटातील भूमिका करताना समतोल साधला होता. हिंदी चित्रपटात असे क्वचितच बघायला मिळते.
त्यांनी अत्यंत विविध प्रकारच्या भूमिका साकार केल्या. ‘कप्पालोत्तिया तमिळहन’ या चित्रपटात त्यांनी ‘चिदंबरम पिल्लाई’ ही व्यक्तिरेखा साकार केली. चिदंबरम पिल्लाई हे पहिले भारतीय होते, ज्यांनी पहिली स्वदेशी शिपिंग कंपनी स्थापन केली. या भूमिकेने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. यात त्यांच्यासोबत तमीळनाडूचे आणखी एक महान कलावंत जेमिनी गणेशन यांनीही भूमिका केली होती. रहस्यमय, विनोदी, थ्रीलर, रोमँटिक यातल्या प्रत्येक चित्रपटात त्यांनी आपल्या भूमिकेचा ठसा उमटविला.
१९६९मध्ये त्यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘सिवंधामन्न’ या चित्रपटाचा १९७०मध्ये ‘धरती’ या नावाने रिमेक करण्यात आला होता. राजेंद्र कुमारने यात मुख्य भूमिका केली होती. यात शिवाजी गणेशन अतिथी कलाकार होते. १९७० ते १९७९ या कालावधीत जसा हिंदीत राजेश खन्ना सुपरस्टार होता, त्यावेळी दक्षिणेत शिवाजी गणेशन सुपरस्टार होते. या काळातले त्यांचे अनेक चित्रपट श्रीलंकेतील सिंहली भाषेत रिमेक करण्यात आले. स्वत: त्यांनी यात श्रीलकंन कलावंतांसोबत भूमिका केल्या. १९७९मधील ‘थिरीसुलम’ हा त्यांचा ऑलटाइम ब्लॉकबस्टर चित्रपट होय. शिवाजी गणेशन यांना ‘द्रविड मुनेत्र कळघम’ या पक्षाबद्दल सहानुभूती होती. हा पक्ष निरीश्वरवादाला मानणारा असल्यामुळे जेव्हा शिवाजी गणेशन तिरुपती मंदिरात दर्शनला गेले, तेव्हा त्यांच्यावर पक्षातल्या अनेकांनी कठोर टीका केली. यामुळे ते खूप व्यथित झाले आणि १९६१नंतर त्यांनी काँग्रेस पक्षाला जवळ केले. कामराज यांचा ते आदर करीत असत. त्यामुळे लवकरच त्यांना पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राज्यसभेचे सदस्य केले. १९८७नंतर त्यांनी स्वत:चाच पक्ष काढला. मात्र चित्रपटाइतके यश त्यांना राजकारणात मिळू शकले नाही.
१९५२मध्ये त्यांनी कमला यांच्याशी विवाह केला. त्यांच्या दोन मुलांपैकी रामकुमार हा दक्षिणेतील प्रसिद्ध निर्माता व अभिनेता आहे, तर दुसरा प्रभू हा तमीळ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता आहे. शांती व थेनमोळी या दोन मुली आहेत.
१९६०मध्ये नायगारा फॉल्स या शहराचे एक दिवस महापौर बनण्याचा सन्मानही त्यांना मिळाला. इजिप्तचे राष्ट्रपती जमाल अब्दुल नासेर एकदा भारतात आले होते. त्यावेळी शिवाजी गणेशन हे एकमेव व्यक्ती होते, ज्यांना त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी नासेर यांना दिलेल्या भोजपार्टीत खास आमंत्रण दिले होते. १९६२मध्ये अमेरिकेला अधिकृत भेट देणारे ते पहिले भारतीय अभिनेते होते. येथील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी १९६४मध्ये अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्रपती जॉन एफ. केनेडी यांनी त्यांना विशेष आमंत्रित केले होते. १९९५मध्ये ते जेव्हा दुसर्‍यांदा अमेरिकेतील कोलंबस, ओहियो येथे गेले तेव्हा तेथील मेयर ग्रेग लशुत्का यांनी त्यांना विशेष डिनर पार्टी दिली. शिवाय ऑनररी सिटिझनशिप प्रदान केली.
त्यांच्या प्रसिद्धीच्या काळात ते अफाट लोकप्रिय होते. त्यांच्या नावाचे जवळपास ३० हजार नोंदणीकृत फॅन क्लब्स होते. पाँडेचरी शहरात त्यांच्या सन्मानार्थ सर्वप्रथम त्यांचा पुतळा उभारला गेला व नंतर चेन्नईमध्येही उभारला गेला.
१९९२मध्ये कमल हासननिर्मित ‘थेवर मगन’ या तमीळ चित्रपटाने शिवाजी गणेशन यांना स्पेशल राष्ट्रीय ज्युरी पुरस्कार मिळवून दिला. या चित्रपटाला पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. नंतर हिंदीत ‘विरासत’ नावाने प्रियदर्शन यांनी याचा रिमेक केला. शिवाजी गणेशन यांना १२वेळा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८४मध्ये पद्मभूषण, तर १९९५ मध्ये फ्रान्सने त्यांना ‘नॅशनल ऑर्डर ऑफ दी लीजन ऑफ ऑनर ऑफ फ्रान्स’ या पुरस्काराने गौरविले. महाराष्ट्र शासनाचा दरवर्षी देण्यात येणारा उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार त्यांच्या नावाने देण्यात येतो. लॉस एंजिल्स येथून प्रकाशित होणार्‍या एका दैनिकात ‘भारताचा मार्लन ब्रँडो’ म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात आला होता. भारतातील चित्रपटक्षेत्रातील सर्वात मोठा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना १९९६मध्ये प्रदान करण्यात आला.
आज आपल्या देशातील सर्व राज्ये भाषिकदृष्ट्या विभाजित झालेली आहेत. दक्षिण भारतात गेल्यावर आम्ही आमच्याच देशात परके असल्यासारखे वाटतो. तमीळ, तेलुगू, कन्नड वा मल्याळमचे एक अक्षरही समजत नाही आणि आम्ही अनेक कलाकृतींचा आस्वाद घेऊ शकत नाही. मला व्यक्तिश: दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनय अधिक लाऊड वाटतो. विशेषत: ६०च्या दशकातील. दक्षिणेत तंबूतील नाटकांची परंपरा खूप जुनी आहे. मी स्वत: हैद्राबादजवळच्या एका खेड्यात हे नाटक १९८५च्या काळात बघितलेले आहे. प्रेक्षकांपर्यंत आपला आवाज आणि अभिनय पोहचावा म्हणून शारीरिक हालचाली व आवाज यातून एक अभिनयशैली निर्माण झाली व त्याचा पगडा चित्रपटसृष्टीतही पडला. मेलोड्रामा दक्षिणेतल्या प्रेक्षकांना भयंकर आवडतो. त्या मानाने आपल्याकडे तो कमी प्रमाणातच बघायला मिळतो… त्या परंपरेत वाढलेल्या या बहुपेडी अभिनेत्याची कारकीर्द वयाच्या सातव्या वर्षापासून सुरू झाली आणि खूप खूपच प्रदीर्घ काळ टिकून राहिली. चित्रपटरसिकांच्या हृदयावर कायम राज्य करीत आलेल्या या अभिनेत्याला शेवटच्या १० वर्षांत हृदयाच्या आजाराने त्रास दिला. श्वसनाच्या अडथळ्यांमुळे त्यांना २१ जुलै २००१ रोजी चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. याच ठिकाणी त्यांनी वयाच्या ७२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Previous Post

मनावर गारुड करणारा “फँटम ऑफ द ऑपेरा”

Next Post

मुळ्येकाकांचा माझा पुरस्कार!

Related Posts

मनोरंजन

दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

May 15, 2025
पडद्यावरचा खरा नायक
मनोरंजन

पडद्यावरचा खरा नायक

May 15, 2025
मनोरंजन

सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

May 5, 2025
मनोरंजन

पहिली ‘विनोदवीरांगना’!

April 18, 2025
Next Post

मुळ्येकाकांचा माझा पुरस्कार!

खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.