ग्रहस्थिती : गुरु, हर्षल वृषभ राशीत, रवि, बुध, शुक्र, शनि, राहू, नेपच्युन मीन राशीत, केतू कन्या राशीत, मंगळ मिथुन राशीत, प्लूटो मकर राशीत. दिनविशेष : २९ मार्च अमावस्या समाप्ती सायं. ४.२८ वा., १ एप्रिल श्री विनायक चतुर्थी (अंगारक योग), २ एप्रिल श्री पंचमी, ५ एप्रिल दुर्गाष्टमी.
मेष : नववर्षाची सुरुवात चांगली होईल. मित्रमंडळींना मदत कराल. सामाजिक कार्यात सन्मान मिळेल. घरात वाद टाळा. व्यवसायात ध्येय साध्य करण्यासाठी अधिक कष्ट घ्या. सबुरीने घ्या. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. ज्येष्ठांची काळजी घ्या. कायद्याची चौकट पाळा. तरुणांना यशदायी काळ. नोकरीत कामाचा ताण येईल, बाहेरगावी जावे लागेल. आरोग्याची काळजी घ्या. पथ्ये पाळा. आर्थिक बाजू भक्कम राहील, पैसे जपून वापरा.
वृषभ : बोलणे चांगले ठेवा. नोकरी-व्यवसायात अधिक काम पडेल. नवीन आव्हाने पेलताना काळजी घ्या. अहंकार दूर ठेवा. तरुणांना कामाच्या नव्या संधी मिळतील. आमदनी आणि खर्च यांचा मेळ साधा. कोणाला सल्ले देऊ नका. प्रेमप्रकरणात सांभाळून राहा. नोकरीत अधिक श्रम करा. नव्या वर्षाच्या मुहूर्तावर चांगली बातमी कळेल. नवीन वास्तू घेण्याचा विचार गती घेईल. जुन्या ओळखींमधून लाभ होईल. गुंतवणूक लाभदायी ठरेल. मुलांकडे विशेष लक्ष द्या. नव्या कल्पना आर्थिक बाजू भक्कम करतील.
मिथुन : विचार पटले नाही तरी गप्प राहा. शेजारच्यांशी जमवून घ्या. नोकरदार-व्यावसायिकांनी रागावर नियंत्रण ठेवावे. टोकाचा निर्णय घेऊ नका, चर्चेने प्रश्न सोडवा. तरुणांना जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळेल. काम होणार असेल तरच शब्द द्या. मनातल्या विचारांना वाट करून देताना सावधान. सामाजिक क्षेत्रात योग्य सन्मान मिळेल. घाईचा निर्णय चुकू शकतो. नोकरीत सकारात्मक विचार करत पुढे चला. दांपत्यजीवनात किरकोळ वाद वाढवू नका. भावाचे सहकार्य मिळेल.
कर्क : परिस्थिती पाहून निर्णय घ्या. घाई करू नका. नोकरीनिमित्ताने प्रवासात आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. लहान चूक महागात पडेल. व्यवसायात लक्ष द्या. श्रद्धा आणि सबुरी ठेवा. तरुणांना आनंददायी घटना घडतील. मित्रमंडळींसोबत मौजमजा कराल. रिअल इस्टेट क्षेत्रात चांगले यश मिळेल. मित्रांशी वाद टाळा. ध्यानधारणेने मन प्रसन्न राहील. नवीन वर्षाची सुरुवात चांगली होईल. कामाचे कौतुक होईल. कलाकारांसाठी चांगला काळ. शिक्षणात चांगले यश मिळेल. घरात शब्द जपूनच वापरा.
सिंह : नोकरीत आपणच बरोबर, हे दाखवू नका. घरात सबुरी ठेवा. तोंडात साखर ठेवा. कठीण कामे हलकी होतील. व्यवसायात अधिक कष्ट घ्या. आरोग्याची काळजी घ्या. महिलांना यश मिळेल. तरुणांचा आनंद वाढेल. काम पुढे नेताना चंचलता नको. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. घरात आनंदाचे वातावरण राहील. शुभकार्य होईल. नातेवाईक, जुने मित्र यांच्या गाठीभेटी होतील. सामाजिक जीवनात चांगले अनुभव येतील. रस्त्यावर वाद उद्भवतील, त्यात पडू नका. खेळाडू, कलाकार, वकील यांच्यासाठी चांगला काळ. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आश्वासन देऊ नका.
कन्या : कोणताही व्यापार, व्यवहार करताना विशेष काळजी घ्या. महत्त्वाचा निर्णय पुढे ढकला. नोकरीत कोणाकडे व्यक्त होऊ नका. तरुणांना नव्या कल्पना सुचतील, पण, घाई करू नका. अहंकार आणि अति आत्मविश्वास यापासून दूर राहा. घरात जुळवून घ्या. महिलांना चांगली बातमी कळेल. नोकरीत खूप काम पडेल. कुटुंबासमवेत सहलीला जाण्याचे नियोजन मार्गी लागेल. व्यवसायात मन:स्ताप टाळा. पत्रकार, खेळाडू, लेखक यांना यशदायक काळ. तरुणांना नोकरीची संधी मिळेल. कुटुंबासाठी वेळ खर्च कराल. महागड्या वस्तूची खरेदी होईल. जुने येणे वसूल होईल.
तूळ : ध्यान, योगा, प्राणायामातून मनस्वास्थ्य सांभाळा. कामात अधिक कष्ट घ्या, चुका टाळा. तरुणांनी मार्गदर्शन घ्यावे. नोकरीत काम वाढेल. वेळेचे गणित साधण्याची कसरत करावी लागेल. जुने येणे हातात पडेल. नवीन गुंतवणूक कराल. व्यवसायात चांगला काळ. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. घरात कटकटी होतील. प्रेमप्रकरणात जपूनच राहा. चित्रकार, लेखकांना नव्या संधी मिळतील. लग्नाची बोलणी मार्गी लागतील. कोर्टकचेरीची कामे अडकतील. जुन्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. सामाजिक क्षेत्रात कौतुक होईल.
वृश्चिक : प्राणायाम, वाचन, भ्रमंती यातून डोक्याचा ताण कमी करा. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. तीर्थयात्रा घडेल. वाहन चालवताना काळजी घ्या. नोकरीत कामाचा ताण वाढवू नका. सार्वजनिक ठिकाणी जपून बोला. मित्रांचे विचार पटले नाहीत तर शांत बसा. व्यावसायिकांना चांगला लाभ मिळेल. भागीदारीत कटकटी होतील. ज्येष्ठांची काळजी घ्या. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून काही करू नका. संसारात वाद होतील.
धनु : मित्र, नातेवाईकांची मदत मिळेल. धार्मिक कार्यामधून समाधान मिळेल. नोकरीत बेताचे बोला, वाद टाळा. काम आणि वेळेचे गणित साधा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मनोबल कायम राखा. सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका. तरुणांना व्यवसायाची नवी संकल्पना सुचेल. व्यावसायिकांना आत्मपरीक्षणाचा काळ. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. वैवाहिक जीवन उत्तम राहील. सरकारी कामे नियमात राहूनच पूर्ण करा. अनपेक्षित लाभ होतील. नवीन वास्तू घेण्याचा विचार पुढे जाईल. लेखक, प्रकाशक यांच्यासाठी चांगला काळ राहील.
मकर : प्रवासात आरोग्याची काळजी घ्या. गोड बातमी कळेल. मित्रांशी जमवून घ्या. व्यावसायिकांना अधिकचे कष्ट पडतील. बँकेच्या कामांत चुका टाळा. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. वेगावर नियंत्रण ठेवा, तरुणांना उच्चशिक्षणाच्या संधी चालून येतील. नवीन वाहन घ्याल. नोकरीच्या प्रयत्नात यश मिळेल. भावांना मदत करावी लागेल. नातेवाईकांशी वाद टाळा. शेअर, सट्टा लॉटरीतून लाभ मिळेल. कागदपत्रे वाचूनच सही करा.
कुंभ : घरात इतरांचे ऐका, वातावरण खूष राहील. मनासारख्या घटना घडतील. जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षित लाभ मिळेल. जमाखर्चाचा मेळ नेमकेपणाने घाला. मुलांकडून आनंद वाढेल. व्यवसायात नवी दिशा मिळेल. वेगळ्या कामातून स्वप्नपूर्तीचा आनंद मिळेल. कलाकार, अभियंते यांना चांगले अनुभव येतील. कोर्ट-कचेरीची कामे लांबणीवर पडतील. खेळाडू चमकदार कामगिरी करतील. उन्हाळ्यात काळजी घ्या. नोकरीत यश देणारा काळ आहे. चुकीच्या कामांना थारा देऊ नका. कुणी उधारीने पैसे मागितले तर ते टाळा. कर्ज प्रकरणे मार्गी लागतील.
मीन : कष्टाला अपेक्षित यश मिळेल. मित्रांना मदत करावी लागेल. धर्मकार्यातून, दानातून समाधान मिळेल. संयमाने घ्या. व्यवसायात योग्य पद्धतीने नियोजन केले तर त्रास होणार नाही. मिष्टान्नभोजनाचा योग आहे. कामाच्या निमित्ताने अचानक बाहेरगावी जावे लागू शकते. प्रवासात प्रकृतीची काळजी घ्या. मामा-मावशीसाठी वेळ खर्च होणार आहे. विदेशात नोकरीच्या निमित्ताने जाण्याचे प्रयत्न सुरू असतील तर त्यात यश मिळेल. निर्णय घेताना उतावळेपणा नको. सामाजिक क्षेत्रात एखादे उल्लेखनीय काम पूर्ण होऊ शकते. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे.