ग्रहस्थिती : हर्षल मेषेत, रवि धनु राशीत, प्लुटो मकरेत, शुक्र, शनि कुंभेत, गुरु वृषभेत, राहू, नेपच्युन मीनेत, मंगळ कर्केत. दिनविशेष : २५ जानेवारी षटतिला एकादशी, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन, २७ जानेवारी सोम प्रदोष, शिवरात्री, २८ जानेवारी अमावस्या आरंभ, रात्री ७.३६ वा., २९ जानेवारी अमावस्या समाप्ती, सायंकाळी ६.०५ वा.
– – –
मेष : मनासारख्या घटना घडतील, रेंगाळलेली कामे पुढे सरकतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको. आर्थिक बाजू भक्कम राहील. वायफळ खर्च नकोच. नोकरी-व्यवसायात अतिविश्वास टाकू नका. वेळेचे नियोजन चुकवू नका. मित्र नातेवाईकांशी वाद होतील. कलाकारांसाठी उत्तम काळ. व्यवसायात नव्या गाठीभेटी फायद्याच्या ठरतील. घरातील वातावरण आनंददायी राहील. मुलांकडून चांगली बातमी कळेल. घरातला उत्साह वाढेल.
वृषभ : कामातला उत्साह वाढेल. चांगली साथ मिळेल. जुने काम सहज पूर्ण होईल. व्यवसायात नवीन संधी येतील. मनस्वास्थ्य चांगले राखा. काही ठिकाणी दुर्लक्ष करून पुढे चला. नोकरीत अति केले आणि पाण्यात गेले, असे होऊ शकते. काळजी घ्या. घाई करू नका. देवदर्शनासाठी बाहेरगावी जाल, त्यातून समाधान मिळेल. घरात महत्वाचा निर्णय ज्येष्ठांच्या सल्ल्याने घ्या. अचानक धनलाभाची शक्यता आहे. आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष नको. जुने येणे वसूल होईल. उगाचच वाद टाळा.
मिथुन : कमी बोलून काम पुढे नेणे फायद्याचे ठरेल. व्यवसायात वाद टाळा. धनलाभाची शक्यता आहे. धार्मिक कार्यातून आनंद मिळेल. मित्र व नातेवाईक यांच्याशी वितुष्ट टाळा. मध्यस्थी करणे टाळा. गैरसमज होतील. कुटुंबात बोलताना भान ठेवा. नोकरीत अकारण संघर्ष टाळा. उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. संशोधन, शिक्षण क्षेत्रात यशदायक काळ. क्रीडापटूंचा गौरव होईल. कलाकारांना नव्या संधी मिळतील. युवकांच्या मनासारख्या घटना होतील. नोकरीच्या संधी येतील. वाद टाळा.
कर्क : चांगली साथ मिळून कामाचा ताण हलका होईल. नोकरीत कौतुक होईल. वरिष्ठ खूष होतील, काहींचे प्रमोशन होईल. नवी जबाबदारी मिळेल. व्यवसायात शब्दाने शब्द वाढवू नका. घरासाठी व सामाजिक कार्यात वेळ खर्च होईल. सरकारी कामे पूर्ण न झाल्याने चिडचिड होईल. कुटुंबात उत्साही वातावरण राहील. पण, वाद टाळा. खाण्याचा अतिरेक करू नका. नवीन गुंतवणुकीच्या विचारांना गती मिळेल. कोणताही निर्णय आरामात घ्या. आर्थिक आवक चांगली राहील. काहींना कामानिमित्ताने विदेशात जाण्याचे योग येतील.
सिंह : कामाची दगदग वाढून आरोग्याचे गणित बिघडेल. घरासाठी अचानक खर्च करावा लागेल. आर्थिक नियोजन चोखपणे करा. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. तरुण वर्गासाठी यशदायी काळ. नियोजनपूर्वक काम करा. युवावर्गाचा उत्साह वाढेल. प्रेमप्रकरणात भावना व्यक्त करताना काळजी घ्या. मुलाकडून उल्लेखनीय कामगिरी झाल्याने वातावरण आनंदी राहील. छोटेखानी कार्यक्रम होईल. व्यवसायवृद्धी होईल, अधिक कष्ट पडतील. सहलीत खवय्येगिरामुळे पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. जुने मित्र भेटतील. अनपेक्षित बातमी कानी पडेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. प्रवासात जपून.
कन्या : आवश्यक असले तरच प्रवास करा. किरकोळ आजार डोके वर काढतील. वाढत्या खर्चाकडे लक्ष ठेवा. नवीन ओळखींमुळे कामे पुढे सरकतील. आर्थिक बाजू भक्कम करणार्या घटना घडतील. थकीत पैसे येतील. काम पूर्ण न झाल्याने नकारात्मक विचार करू नका. सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होणे टाळा. विद्यार्थ्यांना यश मिळेल. महागडी वस्तू काळजीपूर्वक खरेदी करा. वाणीवर नियंत्रण ठेवा. भावंडांकडून चांगले सहकार्य मिळेल. महिलांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. सरकारी नोकरदारांसाठी चांगला काळ. बदलीसाठीच्या प्रयत्नांना यश मिळेल. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
तूळ : नोकरीत अधिक कष्ट करा. वरिष्ठ बक्षीस देतील. काही ठिकाणी बोलण्याकडे दुर्लक्ष करा. मनस्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी ध्यानधारणा, योगाचा फायदा होईल. मित्रांना आर्थिक मदत करताना काळजी घ्या. व्यवसायात नव्या ओळखीच्या व्यक्तींशी व्यवहारात डोळेझाक नको. थोडी खुशी थोडा गम मिळेल. एखादे काम जबरदस्तीने पुरे करण्याचा हट्ट करू नका. व्यवसायात प्रगती होईल. धार्मिक पुस्तकाच्या वाचनातून मन:शांती मिळेल. घरातील कामासाठी धावपळ करावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या. तरुणांना यश मिळेल.
वृश्चिक : सरकारी कामे झटपट पुढे सरकतील. कुटुंबाबरोबर वेळ खर्च होईल. समाधान मिळेल. घरात ज्येष्ठांचा सल्ला माना. नोकरीत चांगला फायदा होईल. व्यवसायात काळजी घ्या, बोलण्यामधून गैरसमज व वाद होतील. नातेवाईकांकडून भ्रमनिरास होईल. नव्या वास्तूचा विषय मार्गी लागेल. बँकेची कामे व नवीन कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. नवीन गुंतवणूक करण्याचा विचार पुढे ढकला. घाई त्रासदायक ठरेल. विदेशात व्यवसायवृद्धीच्या प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या कामाला गती मिळेल. नवीन वाहन घ्याल.
धनु : कुटुंबात वाद टाळा. आरोग्य चांगले राखा.व्यवसायात वाढ होईल. आर्थिक बाजू उत्तम राहील. खर्च आटोक्यात ठेवा. कामात एखादी चूक महागात पडेल. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. शांतपणे विचार करून कृती करा. मन:स्वास्थ्य चांगले ठेवा, ध्यानधारणा, योगा यांना प्राधान्य द्या. व्यवसायात चढउतार अनुभवाल. योग्य आर्थिक नियोजन करा. व्यवसायात कल्पकतेला वाव मिळेल. विदेशात विस्तार होईल. मोठा निर्णय घेताना कागदपत्रांची तपासणी करा. सोशल मीडियावर काळजी घ्या. प्रवास घडतील.
मकर : यशदायक काळ अनुभवाल. चालू कामे सहज पूर्ण होतील. आरोग्याचे प्रश्न डोके वर काढतील, त्याकडे वेळीच लक्ष द्या. नोकरी, व्यवसायात कामाचा आढावा घ्या. त्रुटी असतील तर त्या वेळीच दुरुस्त करा. अचानक धनलाभाचे योग येतील. मौजमजेवर लक्ष देऊ नका. व्यवसायात उत्कर्षाचा काळ अनुभवाल. तरुणांसाठी, खेळाडूंसाठी उत्तम काळ. ज्येष्ठांची काळजी घ्या. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको. दानधर्म कराल. बांधकाम क्षेत्रात उत्तम अनुभव येतील. थकीत येणी वसूल होतील. समाजसेवेसाठी वेळ द्याल.
कुंभ : कुठेही वादाचे प्रसंग टाळा. कामे झाली नाहीत म्हणून चिडचिड टाळा. हेकेखोर स्वभाव दूर ठेवा. नोकरी व्यवसायात चांगले सहकार्य मिळेल. पत्रकार, कवी, लेखक, खेळाडू, राजकारणी यांच्यासाठी चांगला काळ. एखादी शुभ घटना कानी पडेल. घरातले वातावरण छान राहील. पती-पत्नींनी सामंजस्य दाखवणे आवश्यक आहे. विचारपूर्वक गुंतवणूक करा. झटपट पैसे कमावण्याच्या नादात फसगत होऊ शकते. धार्मिक कार्याला वेळ द्याल. तरुणांसाठी चांगला काळ. घाई करणे टाळा. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा, पोटाच्या विकाराला निमंत्रण मिळू शकते.
मीन : धार्मिक ठिकाणांना भेट देऊन आनंद मिळेल. प्रवासात काळजी घ्या. अनोळखी व्यक्तीकडून फसवणूक होऊ शकते. कल्पनांच्या जोरावर यश मिळवाल. सामाजिक क्षेत्रात चांगले अनुभव येतील. मित्रमंडळींना नाराज करू नका. चेष्टामस्करी टाळा. कौटुंबिक वातावरण बिघडू देऊ नका. प्राध्यापकांना नवीन संधी मिळू शकते. काहीजणांना मिष्टान्नभोजनाचा योग आहे. या खेरीज नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. कलाकारांसाठी येणारा काळ उत्तम यश मिळवून देणारा आहे. देवदर्शनासाठी बाहेरगावी जाणे होईल.