ग्रहस्थिती : हर्षल मेष राशीत, रवि धनु राशीत, प्लूटो मकर राशीत, शुक्र, शनि कुंभ राशीत, गुरु वृषभ राशीमध्ये, राहू, नेपच्युन मीन राशीमध्ये, मंगळ कर्क राशीत. दिनविशेष : ११ जानेवारी शनिप्रदोष, १३ जानेवारी शाकंभरी पौर्णिमा, १४ जानेवारी मकर संक्रांती, १७ जानेवारी संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय, रात्री ९.२८ वा.
मेष : कामात यश मिळवण्यासाठी भरपूर घाम गाळावा लागेल. कष्टात हयगय नको. देवधर्मातून समाधान मिळेल. संयम ठेवा. समाजकार्यातून आनंद मिळेल. कामाचे कौतुक होईल. नोकरीत तत्त्वाला धरून पुढे चला. नातेवाईक, मित्रांवर खर्च होईल. मौजमजेत वेळ चांगला जाईल. व्यवसायात आर्थिक बाजू भक्कम राहील, वायफळ खर्च टाळा. बाहेरच्या व्यक्तीवर विश्वास टाकू नका. तरुणांनी मरगळ झटकून काम करावे. घरात वाद नकोत.
वृषभ : उत्साह वाढेल, पण पाय जमिनीवरच ठेवा. घरातील वातावरण आनंदी ठेवा. व्यवसायात तीव्र स्पर्धेसाठी मनोधैर्य उंच ठेवावे. नव्या संधी खुणावतील, पुढे जाताना काळजी घ्या. संततीकडे लक्ष द्या. नोकरीत काम सहजपणे पूर्ण करा. तणावापासून दूर राहा. मित्रमंडळींकडून मदत मिळेल, काम हलके होईल. मन:स्ताप टाळा. आपली भूमिका पटवून देताना उतावळेपणा टाळा. कोणाला सल्ला देऊ नका. व्यवसायात आर्थिक बाजू सांभाळताना काळजी घ्या. आर्थिक बाजू चांगली राहील. खर्च करताना नियोजन करा.
मिथुन : कामाचे कौतुक होईल, प्रसिद्धी मिळेल. कुटुंबासाठी वेळ खर्च होईल. ज्येष्ठांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. मित्रांचा आदर मिळेल, बोलताना काळजी घ्या. व्यवसायात कामाचे गणित बिघडेल. आर्थिक बाजूची काळजी घ्या. धार्मिक कार्यामधून मन प्रसन्न राहील. नोकरीनिमित्ताने दूरचा प्रवास घडेल. खाण्यापिण्याचा अतिरेक टाळा. सामाजिक क्षेत्रात काम नव्या संधी मिळतील. तरुणांना यशदायक काळ. कर्तृत्वाच्या जोरावर यश मिळेल. योग्य प्रयत्न करा. ज्येष्ठ व महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. संमिश्र घटना अनुभवाल.
कर्क : सकारात्मक ऊर्जा वाढवणार्या घटना घडतील. कामाला उशीर होऊन चिडचिड वाढेल. तरुणांना नव्या कामाची संधी मिळेल. स्पर्धात्मक यश मिळेल. खेळाडूंना, व्यावसायिकांना यश मिळेल. व्यवसायविस्ताराच्या योजना पुढे सरकतील. नोकरीत चुका टाळा, चित्त थार्यावर ठेवा. छोट्या कारणामुळे मनाची अस्वस्थता वाढेल, काळजी घ्या. आठवड्याचा उत्तरार्ध उत्साहवर्धक राहील. नव्याने सुरू असणारे काम आर्थिक बाजू भक्कम करणारे ठरेल. आर्थिक बाजू आणि खर्चाचा मेळ घालणे जिकीरीचे बनेल. प्रेमात वादाचे प्रसंग टाळा. मुलांची शैक्षणिक प्रगती होईल. शिक्षण क्षेत्रात नवी संधी मिळेल.
सिंह : नोकरीत अस्वस्थता वाढेल. प्रतिक्रिया देण्याच्या भानगडीत पडू नका. व्यवसायात यश मिळेल. मनासारख्या घटना घडतील. संततीकडून शुभवार्ता कानी पडेल. नातेवाईकांबरोबरचे जुने वाद संपुष्टात येतील. अहंकारी वृत्ती बाजूला ठेवा. आर्थिक व्यवहारात योग्य काळजी घ्या. मोठे निर्णय लगेच घेऊ नका, मालमत्तेसंदर्भातील विषय लांबणीवर टाका. घरात सबुरीने घ्या. उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. खेळाडूंकडून उल्लेखनीय कामगिरी होईल. आर्थिक निर्णय घेताना बारकाईने विचार करा. नोकरांच्या हालचालीवर लक्ष ठेवा. घरात आनंदाचे वातावरण राहील.
कन्या : उत्कर्ष घडवणारा काळ. मनासारखे काम न झाल्याने नाराज होऊ नका. नोकरीत अपमानजनक घटना घडतील. त्यागाची भावना ठेवा. ब्रोकरना चांगले दिवस. तरुणांना पत्रकार, संपादक, जनसंपर्क क्षेत्रात नव्या संधी येतील. व्यवसायात मनासारख्या घटना घडतील, भागीदारीत सबुरीने घ्या. टोकाचा निर्णय घेऊ नका. कोर्टकचेरीत यश मिळेल. मौजमजा, करमणुकीवर खर्च होईल. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. जुने आजार डोके वर काढतील. आरोग्य सांभाळा. धार्मिक कार्यातून आत्मिक शांती मिळेल.
तूळ : चढउताराचा सामना करावा लागेल. संमिश्र अनुभव येतील. घरात आनंददायी वातावरण ठेवा. छोटे वाद जागेवरच सोडून द्या. आजचे काम उद्यावर ढकलू नका. व्यवसायात गडबड करू नका. आरोग्याच्या तक्रारी डोकेदुखी वाढवतील, काळजी घ्या. तरुण जिची वाट पाहात होते ती गोष्ट मार्गी लागेल. नोकरीनिमित्ताने विदेशात जाण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. मित्रांशी वाद होऊ शकतो. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. सामाजिक, राजकीय क्षेत्रात सावध राहा. कलाकारांचे कौतुक होईल, नवे काम मिळेल. मेडिकल क्षेत्रात चांगला काळ.
वृश्चिक : कामात वेळेचे नियोजन करा. उत्साह वाढेल. व्यवसाय पुढे नेण्यासाठी नव्या योजना राबवा. घरात कामासाठी धावपळ होईल. सरकारी कामे पुढे सरकतील. सार्वजनिक ठिकाणी जपून व्यक्त व्हा. रागावर नियंत्रण ठेवा. जेष्ठांचा मान ठेवा. कामाला विलंब होऊ शकतो. खर्च वाढेल. अवास्तव खर्च नकोच. सामाजिक कामाला वेळ द्याल. प्रवासात अनोळखी व्यक्तींशी संवाद टाळा. नोकरीत कामाशी काम ठेवा, सल्ले देऊ नका. हेका चालवू नका. घरात थोडे सबुरीने घ्या. फायदेशीर ठरेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
धनु : मनाची समजूत घाला, वाद टाळा. आपण कसे योग्य आहोत, हे दाखवू नका. आर्थिक बाजू नीट तपासा. बँकांचे व्यवहार काळजीपूर्वक करा. नोकरी व्यवसायात वेळेचे गणित जमवताना त्रास होईल. नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. मनासारख्या घटना न झाल्यामुळे राग अनावर होऊ शकतो. पण मनस्वास्थ्य सांभाळा. योगा, ध्यान करा. संततीकडे लक्ष द्या, कुटुंबीय, नातेवाईक, मित्रांशी सल्लामसलत करा, भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका.
मकर : कामाचे कौतुक होईल, ते पुढे नेताना दगदग होईल. व्यवसायात भरपूर काम पडेल. आर्थिक व्यवहार सांभाळा. कामानिमित्ताने प्रवास होईल. चित्रकार, शिल्पकारांना कामाच्या संधी येतील. आर्थिक बाजू भक्कम राहील, थकीत येणे वसूल होईल. मीच कसा बरोबर आहे, हे सांगू नका. व्यवसायात नव्या कल्पना पुढे नेताना योग्य आर्थिक नियोजन करा. कुटुंबाबाबत कोणताही निर्णय घाईने करू नका. तरुण बुद्धिमत्तेच्या जोरावर यश मिळवतील. नवीन वास्तूचा प्रश्न मार्गी लागेल. गायक, संगीतकारांना नव्या संधी मिळतील. कुटुंबासाठी वेळ खर्च होणार आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळा.
कुंभ : कामात दडपण घेऊ नका. आर्थिक बाजू उत्तम राहील. नोकरी व्यवसायात चांगली स्थिती राहील. नव्या व्यवसायाच्या कल्पना पुढे सरकतील. नियोजनपूर्वक काम करा. नोकरीत अधिकारात वाढ होईल. कुटुंबात विचारपूर्वक कृती करा. व्यवसायात बुद्धीचातुर्याच्या जोरावर यश मिळेल. सामाजिक कार्यात वेळ खर्च होईल. समाधान मिळेल. नव्या ओळखींमधून जुने काम मार्गी लागेल. कलाकारांना यशदायक काळ. मुलांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. मित्रमंडळींशी मोजकेच बोला. गैरसमज टाळा.
मीन : भागीदारीत किरकोळ वाद घडतील. आईवडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. नोकरीत पगारवाढ, प्रमोशनचे योग आहेत. मित्रांशी वागताना काळजी घ्या. वाद उकरून काढू नका. प्रत्येक टप्प्यावर सकारात्मक विचार करा. शुभ घटना कानावर पडतील. जुने मित्र भेटतील. गेटटूगेदर होईल. घरासाठी वेळ खर्च कराल. मार्केटिंग क्षेत्रात उत्तम काळ. अचानक धनलाभ होईल. सामाजिक क्षेत्रात नावलौकिक वाढेल. अडकून पडलेल्या कामांना आता गती मिळेल. मनासारखी नोकरी मिळेल. कुटुंबातील मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागण्यास विलंब होईल. मित्र मदतीला धावतील. घरातील मंडळींबरोबर प्रवासाला जाल.