ग्रहस्थिती : मंगळ कर्क राशीत, गुरु, हर्षल वृषभ राशीत, रवि, बुध वृश्चिक राशीत, शुक्र धनु राशीत, प्लूटो-मकर राशीत, राहू, नेपच्युन मीन राशीत, शनि कुंभ राशीत, केतू कन्या राशीत. दिनविशेष : २८ डिसेंबर शनिप्रदोष, २९ डिसेंबर शिवरात्री आणि अमावस्या आरंभ, उत्तररात्री ४.०१ वा., ३० डिसेंबर सोमवती अमावस्या समाप्ती, उत्तररात्री ३.५६ वा., ३ जानेवारी २०२५ विनायकी चतुर्थी.
मेष : जुने विषय मार्गी लागतील. नवीन वर्षात राग, लोभ विसरून पुढे जा. शुभवार्ता कळेल. कामाचा उत्साह वाढेल. काही गोष्टी मनासारख्या न झाल्यास राग करू नका. घाई करू नका. तत्त्वाशी एकनिष्ठ राहा. तरुणांचे मनोबल उंचावेल. मनासारखी नोकरी मिळेल. मनासारख्या घटना घडून घरातील वातावरण आनंददायी राहील. प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल. विद्यार्थी कर्तबगारी दाखवतील. वागताना बोलताना काळजी घ्या. शिष्यवृत्तीची कामे मार्गी लागतील.
वृषभ : कामात संयम ठेवा. नवीन वर्षात चांगल्या उपक्रमात संधी मिळेल, पण तिथे मोठेपणा गाजवू नका. गैरसमज निर्माण होतील. वाणीवर नियंत्रण ठेवा. विदेशात एखादे व्यवसायासंदर्भातील काम रखडेल. नोकरीत बोलणे कमी आणि कृती अधिक असे धोरण ठेवा. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. घरात मालमत्तेचे काम पुढे ढकला. प्रेमप्रकरणात निराशा वाढेल. लॉटरी, सट्टा यापासून दूरच राहा. खेळाडूंना यश मिळेल. काहीजणांना समाधानकारक फळे मिळतील. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा. ध्यानधारणा मन:शांतीसाठी वेळ द्या.
मिथुन : घरासाठी भरपूर वेळ खर्च होईल, त्यातून समाधान मिळेल. बोलताना चेष्टामस्करी टाळा. मित्रमंडळींशी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. नववर्षाची सुरुवात आध्यात्मिक कार्यातून होईल, त्यातून कामाचा हुरूप वाढेल. व्यवसायात काम पुढे नेण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतील. आर्थिक उलाढाल वाढेल. नोकरीत अधिकचे काम करावे लागेल. वरिष्ठ कामावर खूष होतील. कुटुंबात आपणच बरोबर आहोत, हे दाखवून देण्यातून वाद होतील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. ज्येष्ठांचे सहकार्य मिळेल. तरुणांना तसेच शेअर ब्रोकर, रियल इस्टेट एजंट, मेडिकल व्यावसायिकांना लाभदायक काळ.
कर्क : आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळेल. अतिउत्साह व अहंकार बाजूला ठेवा. झेपेल तेवढेच काम करा. व्यवसायात स्पर्धेचा सामना करावा लागेल. नववर्षाच्या निमित्ताने भरपूर फिराल. नव्या कल्पनेचे व्यवसायात रूपांतर होईल. बुद्धीकौशल्याच्या जोरावर चांगले यश मिळेल. महागडी वस्तू खरेदी कराल. कौटुंबिक सहलीला जाल. वाहन चालवताना काळजी घ्या. भागीदारीत जमवून घ्या. नोकरीत पगारवाढ, बढतीचे योग जुळून आल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील. लेखक, पत्रकार, संपादकांचा मानसन्मान होईल. सार्वजनिक ठिकाणी जपून बोला. थकीत येणे वसूल होईल.
सिंह : नव्या वर्षात तरुणांना चांगली बातमी कळेल. नोकरी व्यवसायात कौशल्याच्या जोरावर यश मिळवाल. कामे वेळ देऊन पूर्ण करा. यश मिळाले नाही म्हणून प्रयत्न थांबवू नका, शिस्तीने काम करा, यश मिळेल. घरात उत्साहाचे वातावरण राहील. व्यावसायिकांचा उत्कर्ष होईल. बँकेची कामे घाईत करू नका. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत भाग्योदय होईल, नवी जबाबदारी मिळेल. धावपळ होईल. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या, चैनीवर खर्च टाळा. आर्थिक लाभ वाढतील. जुना आजार त्रासदायक डोके वर काढेल.
कन्या : नव्या वर्षाच्या सुरुवातीला यश लाभल्याने घरातले वातावरण आनंदी राहील. कोणताही मोठा निर्णय ज्येष्ठ, नातेवाईकांच्या सल्ल्याने घ्या. नवीन कामाची संधी स्वीकारताना काळजी घ्या. वाढीव कामामुळे दगदग होईल. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. अनेक दिवसांपासून प्रलंबित सरकारी कामे झटपट पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील, खर्चाचे प्रमाण वाढेल. चिडचड होईल. नोकरीत अरे ला का रे करू नका. मनासारख्या घटना घडतील. ताण वाढेल असे काही करू नका. सावधगिरी बाळगा.
तूळ : नव्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळवण्याच्या आमिषांना बळी पडू नका. कोणावर आंधळा विश्वास ठेवू नका. रागावर नियंत्रण ठेवा. धार्मिक ठिकाणांना भेट द्याल. तरुणांना चांगले सहकार्य मिळेल. संशोधक, शिक्षकांकडून चांगले काम घडेल. कोणाला सल्ले देऊ नका. प्रेरणादायी घटना घडतील. कलाकारांना उत्कर्ष करणारा काळ. नोकरीत सन्मान होईल. मित्र, नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. आध्यात्मिक कार्यासाठी वेळ द्याल. दानधर्म होईल.
वृश्चिक : प्रेमप्रकरणात वादाची ठिणगी पडेल. नववर्षाचे स्वागत जोरात कराल. नोकरीत प्रमोशन, पगारवाढ होईल. संततीकडे लक्ष द्या. व्यवसायात खबरदारी घ्या. नवीन ऑर्डरी मिळतील. सोशल मीडिया हाताळताना काळजी घ्या. पत्नीशी कुरबूर होईल. नातेवाईक, मित्रमंडळींशी बोलताना काळजी घ्या. पैशांचे नियोजन करा. कलाकार, गायक, संगीतकारांना नव्या संधी मिळतील. मार्वेâटिंग, इंजिनीरिंग क्षेत्रात चांगला काळ. नोकरीत कामाशी काम ठेवा, कोणाच्या सल्ल्याने वागू नका. कागदपत्रे तपासूनच पुढे जा. आरोग्य सांभाळा.
धनु : नव्या वस्तूच्या खरेदीचा मोह पुढे ढकला. मुलांकडून आनंदवर्धक बातमी कळेल. नोकरीत टायमिंग चुकू देऊ नका. नववर्षाची सुरुवात उत्तम होईल, मनासारखे यश मिळेल. तरुणांना स्पर्धात्मक यश मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील. व्यवसायात यशाचा मार्ग सापडेल. घरात धार्मिक कार्य होईल. नोकरी, व्यवसायात वाढीव काम पडेल. घरात डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून काम करा. आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आध्यात्मातून आत्मिक समाधान मिळेल. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल.
मकर : जुने वाद उकरून काढू नका. मित्रमंडळींशी जमवून घ्या. नोकरीचा प्रश्न मार्गी लागेल, योग्य प्रकारे प्रयत्न करा. कल्पनाविश्वात रमू नका. परिस्थिती मान्य करा म्हणजे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. तरुणांना यशदायक काळ आहे. नवीन व्यवसायाच्या कल्पना आकाराला येतील. कामात एकाग्रता ठेवा, अति आत्मविश्वास दाखवू नका. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मित्रांशी वाद टाळा. ज्येष्ठांचा सल्ला माना. संगीतकार, कलाकार यांना नव्या संधी चालून येतील. खेळाडूंना यश मिळेल.
कुंभ : नववर्षाच्या सुरुवातीलाच मनासारखे यश मिळेल. नोकरदार व व्यावसायिकांच्या इच्छा पूर्ण होतील. सरकारी कामे पुढे जातील. सरळ मार्ग सोडू नका. विदेशातील प्रोजेक्टबाबत चांगली बातमी कानावर पडेल. मुलाला अपेक्षित यश मिळेल. मामा, मावशीकडून अनपेक्षित मदत मिळेल. आरोग्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका. तरुणांना नवी नोकरी मिळेल. मित्र, नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. नोकरीत वरिष्ठांची साथ लाभेल. कामानिमित्ताने प्रवास कराल. व्यवहार पारदर्शी ठेवा. आठवड्याच्या उत्तरार्धात चांगले अनुभव येतील. सहलीचे प्लॅन यशस्वी होतील. मौजमजेवर खर्च होईल.
मीन : नेतृत्वगुणांना संधी मिळेल. नववर्षाची सुरुवात आनंददायी राहील.सामाजिक क्षेत्रात मान मिळेल. व्यवसायात काळजी घ्या. घरात वाद टाळा. सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होताना काळजी घ्या. कलाकार, संगीतकारांना चांगला काळ. नोकरीत बुद्धीचातुर्याच्या जोरावर वरिष्ठांचे मन जिंकाल. गर्दीच्या ठिकाणी वाद टाळा. मुलांकडून सुवार्ता कानावर पडेल. विदेशात शिक्षण घेण्याचा विषय मार्गी लागेल. नवीन घर घेण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो, त्यासाठी अधिकची मेहनत घ्यावी लागेल. बँकेची रेंगाळलेली कामे पुढे सरकताना दिसतील.