• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

नाय, नो, नेव्हर…

- संतोष पवार

Nitin Phanse by Nitin Phanse
July 12, 2024
in भाष्य
0

सरकारने नुकतंच सर्वधर्मीय वृद्धांना तीर्थयात्रा घडवून आणण्याचं आश्वासन दिलं आहे. मी एक भाविक, सश्रद्ध वृद्ध माणूस आहे. पण, मलाही प्रश्न पडतो की सरकारचं हे काम आहे का? ज्यासाठी नेमलंय ती कामं हे कधी करणार?
– मनोहर शेंडे, बदलापूर
मग तुमचं काय म्हणणं आहे… देवाचे दर्शन घडवू म्हणून खुर्चीवर बसलेल्या सरकारने वृद्धांना आश्वासन देण्याऐवजी तरुणांच्या परीक्षा घ्याव्यात? तुम्हाला सरकारची परीक्षा घ्यायची असेल तर ‘नीट परीक्षा’ घ्या.. जे सरकारला जमतं तेच करणार ना सरकार?… तुमचं असं आहे की सरकार वृद्धांना भाव देतंय तर तुम्ही शेतमालाला भाव द्यायला सांगताय… तुम्हाला नसेल जायचं तीर्थयात्रेला तर नका जाऊ… जाणारे खूप भक्त आहेत… (अर्थात देवाचे भक्त आहेत… उगाच त्यातही इतर कोणाचे भक्त म्हणून भक्तांवर संशय घेऊ नका.)

तुमचे पाय कोणी धुवायला लागले तर तुम्ही काय कराल?
– संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव
आमचे पाय जो कोणी धुवेल त्यालाच ते पुसायला सांगेन (ओल्या पायाने चप्पल किंवा शूज घातल्यावर कसंसच वाटतं). शिवाय पाय धुणार्‍याला आमचे पाय धुऊ नको म्हणून कितीही सांगितलं, तरी तो दुसर्‍या कोणाचे तरी पाय धुणारच. असे पाय धुऊन घेणारे आपले हात धुऊन घेणार. मग आपणच आपले पाय का धुऊन घेऊ नये? पण आम्ही त्याचा व्हिडिओ बनवून, तो सोशल मीडियावर टाकून, दुसर्‍याचे गोडवे गात, स्वतःची टिमकी वाजवणार नाही. कारण आम्ही कलाकार असलो तरी सुगम की निगम म्हणतात तसले संगीत गायक नाही.

सामाजिक प्रतिष्ठा कशी वाढवावी?
– सतीश नेने, बदलापूर
दुसर्‍यांची सामाजिक प्रतिष्ठा खराब करावी की आपली सामाजिक प्रतिष्ठा आपोआप वाढते… सध्याचा ट्रेंड तोच आहे. पुरावे नसताना जे दुसर्‍यावर आरोप करतात अशा प्रतिष्ठितांचा अभ्यास करा. म्हणजे मी काय बोलतोय ते कळेल.

सून आणि मान्सून यांच्यात फरक आणि साम्य काय सांगाल?
– सुगंधा भोसले, महाड
सून आणि मान्सून या दोघांमध्ये फरक म्हणाल तर सून सायबा सून हे गाणं सून असेल तरच चालीमध्ये गाऊ शकतो. मान्सून मीटर मध्ये बसत नाही. आणि साम्य म्हणाल तर सून येवो की मान्सून, लेकाचा मूड बनतोच.. फक्त मूड मूडमध्ये फरक असतो.. आता तो फरक तरी विचारू नका (सुनेशी जुळवून घ्या म्हणजे असे प्रचंड प्रगल्भ प्रश्न पडणार नाहीत).

नशीब खराब असेल तर ते कुठे दुरुस्त करून मिळेल?
– विनायक महामुनी, नाशिक
मला जे ठिकाण माहिती आहे ते बंद झालंय. तुमच्या नशिबात नाही. पण बिघडलेलं नशीब कुठे दुरुस्त करून मिळतं, हे नाशिकच्या विद्यमान खासदारांना विचारा… आणि तो पत्ता माजी खासदारांना द्या. त्यांचंही नशीब बिघडलंय म्हणे; ते दुरुस्त करून मिळालं तर मिळालं!

बायको आणि सूर्य यांच्यात काय साम्य आहे?
– रमण गायतोंडे, दादर
सूर्यावर थुंकता येत नाही… तसं बायको वर… बोलता येत नाही… खोटं वाटतं तर थुंकून बघा… सूर्यावर ओ! आणि साम्य बघायचं असेल तर सूर्याप्रमाणे बायकोवर… बोलून बघा. (कुठेही थुंकू नका… वाईट सवय आहे ही बायकोशी कोणाचंही साम्य शोधायची… सोडा ही सवय, कधीतरी बायकोकडूनच तोंड फोडून घ्यावं लागेल गायतोंडे जी.

अविवाहित आणि विवाहित पुरुषांमध्ये फरक कसा ओळखावा?
– नझीर मुल्ला, गोवंडी
दोघांनाही हॉटेलमध्ये घेऊन जा… काय खाणार विचारा. काहीही चालेल असं म्हणेल तो अविवाहित आहे समजा… जो दुसर्‍यांच्या डिशकडे बघून हे खाऊ की ते खाऊ असा विचार करत असेल तो शंभर टक्के विवाहित आहे समजा, (पण विवाहित असो की अविवाहीत, पुरुषांमध्ये तुम्हाला का इंटरेस्ट नझीर मियां?)

एखाद्यावर अँजिओप्लास्टी झाली तर त्याचे हृदयपरिवर्तन होऊ शकते का?
– अरुणा ढमढेरे, सातारा
असं झालं तर नवरा बायको एकमेकांची जबरदस्ती अँजिओप्लास्टी करतील. (आज अँजिओप्लास्टीबद्दल बोललात, उद्या म्हणाल, मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं तर दृष्टिकोन बदलेल का? परवा म्हणाल मूत्रपिंड बदललं तर… मेलचा फिमेल होईल का? (बदल स्वत: स्वत:त घडवायचा असतो… हृदयाचा… मेल-फिमेलचा नाही हां ताई!)

Previous Post

मिशा सांभाळा!

Next Post

हम नहीं सुधरेंगे…

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025
भाष्य

टिंग टिंग भास्कर

May 22, 2025
भाष्य

चायवाला का डरला?

May 22, 2025
भाष्य

महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

May 22, 2025
Next Post

हम नहीं सुधरेंगे...

अस्वस्थ इतिहासाचे `वर्तमान'

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025

राशीभविष्य

May 22, 2025

तोमार बाबा

May 22, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.