• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

अजून लढाई बाकी आहे!

- योगेंद्र ठाकूर (बेधडक)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 21, 2024
in गर्जा महाराष्ट्र
0

भारतीय जनता पक्षाला कोणी हरवू शकत नाही हा गैरसमज महाराष्ट्रातील व देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीत मोडून काढला. देशात भाजपला २३९ (एनडीएला २९३) तर इंडिया आघाडीला २३३ लोकसभेच्या जागा मिळाल्या. भाजपाचे ४००पारचे स्वप्न धुळीस मिळाले. एनडीए ३०० पार देखील करू शकला नाही. तर महाराष्ट्रात भाजपाला ४८पैकी अवघ्या ९ जागांवर विजय मिळवता आला. १९ जागांवर ते आपटले. मतदारांनी नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या गर्व, अहंकार आणि बेलगाम वृत्तीला लगाम घातला. गेल्या दहा वर्षांत भाजपाच्या उधळलेल्या वळूला महाराष्ट्रात महाविकास आघाडीने रोखले. महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणानंतरची ही पहिली लोकसभा निवडणूक होती. आघाडीने महायुतीला धूळ चारली. लढाईला खरी सुरुवात आता झाली आहे. ही पहिली लढाई होती. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लवकरच होणार आहेत तेव्हा अजून लढाई बाकी आहे.
कारण महाराष्ट्रातील पक्ष फोडीचा, पक्षाचे नाव व चिन्ह पळविण्याचा आणि गद्दार विरुद्ध खुद्दार असा अंतिम पैâसला व्हायचा आहे. त्याचा अंतिम निकाल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लागेल. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ३० जागा तर महायुतीला १७ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस १३, शिवसेना (उबाठा) ९, राष्ट्रवादी (शरद गट) ८ हे मविआचे बलाबल तर भाजपा ९, शिंदेसेना ७, राष्ट्रवादी (अजित गट) १ जागा ही एनडीएची कमाई आहे. या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघापैकी १५० जागांवर आघाडी मिळवली आहे, तर महायुतीने १२५ जागांवर आघाडी घेतल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. त्यांच्या समवेत २१०च्या आसपास आमदार आहेत. असे असताना लोकसभा निवडणुकीत फक्त १२५ विधानसभा जागांवरच त्यांच्या उमेदवारांना महाविकास आघाडीच्या उमेदवारापेक्षा जास्त मते मिळाली आहेत. हा सत्ताधारी महायुतीचा पराभवच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचाराचा झंझावात, शासकीय यंत्रणेची अप्रत्यक्ष मदत, पैशाचा पाऊस पाडून देखील भाजपा आणि शिंदे गटाला दोन अंकी आकडा गाठता आला नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची हालत तर ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली. मोठ्या ईर्ष्येने व जिद्दीने बारामती आणि शिरूर लोकसभा राष्ट्रवादीने लढवली. दमदाटी, ‘बघून घेऊ’ची भाषा अजित पवारांनी केली. महाराष्ट्राचे सुसंस्कृत नेते यशवंतराव चव्हाणांना आदर्श मानणार्‍या अजितदादांच्या तोंडी अशी असंस्कृत भाषा शोभत नव्हती. परंतु थोरल्या पवारांना हरवण्याच्या नादात त्यांनी स्वतःचे हसे करून घेतले. शरद पवारांनी ‘बाप आखिर बाप होता है’ हे दाखवत १०पैकी ८ जागा जिंकल्या. महाराष्ट्रात महायुती ४५ जागा जिंकेल, अशा निवडणूक प्रचारादरम्यान राणा भीमदेवी थाटाच्या वल्गना करणार्‍या शिंदे-फडणवीस-पवार त्रिकुटाचा महाराष्ट्रातील जनतेने त्रिफळा उडवला. त्यांची जागा त्यांना दाखवून दिली.
शिंदे सेनेला ज्या ७ जागांवर विजय मिळाला त्यात भाजपाचा ५ जागांवर चांगलीच रसद मिळाली होती. शिंदेपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या विजयात भाजपाचे मंत्री रवींद्र चव्हाण, मनसेचे आमदार राजू पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. डोंबिवली व कल्याणमधील आकडेवारी तेच अधोरेखित करते. ठाण्यातही तेच घडले. ठाण्याचे भाजपाचे आमदार संजय केळकर, मीरा-भाईंदरमधून गीता जैन, नरेंद्र मेहता यांच्यामुळे नरेश म्हस्केंना दीड लाखांच्या मतांची आघाडी मिळाली. हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने हे १३ हजार मतांनी विजयी झाले. त्यांच्या विजयात भाजपाच्या बालेकिल्ल्यात इचलकरंजीमध्ये ४५ हजारांचे मताधिक्य मिळाले. तर बुलढाण्यातील प्रतापराव जाधवांच्या विजयात संजय कुटे आणि आकाश फुंडकर या भाजपा आमदारांनी आपापल्या मतदारसंघातून प्रतापरावांना आघाडी मिळवून दिली.
मावळमधील श्रीरंग बारणेंच्या विजयाला पनवेल आणि चिंचवड मतदारसंघातील भाजपाच्या आमदारांनी चांगला हात दिला. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर हे अवघ्या ४८ मतांनी विजयी झाले. ते स्वतः त्यांच्या पारंपारिक जोगेश्वरी मतदारसंघात जवळ-जवळ १२ हजार मतांनी पिछाडीवर गेले. पण अंधेरी पूर्व व अंधेरी पश्चिमच्या मुरजी पटेल व अमित साटम या भाजपा नेत्यांनी त्यांना आघाडी मिळवून दिल्यामुळे ते जेमतेम ४८ मतांनी विजयी झाले. शिवाय ती निवडणूक संशयाच्या भोवर्‍यात आहे. शिवसेना उबाठापेक्षा आमची कामगिरी चांगली झाली अशी फुशारकी मारणार्‍या शिंदे सेनेच्या नेत्यांनी वास्तव बघावे. खोट्या व अवास्तव बातम्या पेरू नयेत. ठाणे व कोकण मतदार संघातील ६पैकी ५ जागांवर महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला याचा खोल अभ्यास करणे मात्र निश्चितच गरजेचे आहे. कारण अजूून लढाई बाकी आहे.
मुंबईतील लोकसभेच्या ६ जागांपैकी ४ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. यामधील ३६ विधानसभा जागांपैकी २१ जागांवर महाविकास आघाडीला मताधिक्य आहे, तर १५ जागांवर महायुतीला जास्त मते मिळाली आहेत. मुंबईत शिवसेनेने वर्चस्व कायम राखल्यामुळे महाविकास आघाडीला चांगली कामगिरी करता आली आहे. पण ठाणे-पालघर, रायगड, सिंधुदुर्ग-रत्नागिरीमधील सहा जागांपैकी फक्त एक भिवंडीची जागा महाविकास आघाडीच्या पदरी पडली आहे. यातील ३६ विधानसभा मतदारसंघापैकी फक्त १३ मतदारसंघांत महाविकास आघाडीला मताधिक्य आहे. ठाणे, कोकणमधील पराभव शिवसेनेला दुर्लक्षित करून चालणार नाही. या बालेकिल्ल्यात झालेली हार शिवसैनिकांच्या जिव्हारी लागली आहे. ठाणे-कोकणचा ढासळलेला गड पुन्हा मजबूत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. लढाईसाठी नवीन रणनीती आखावी लागेल. कारण समोर तिथे राजकीय शत्रू नसून गद्दार आहेत. तेव्हा अजून लढाई बाकी आहे.
नरेंद्र मोदी देशाचे पुन्हा पंतप्रधान झाले आहेत. यावेळेस ते भाजपाचे नव्हे तर एनडीएचे पंतप्रधान आहेत हे भान भाजपाला ठेवावे लागेल. गेल्या दहा वर्षांत ‘हम करे सो कायदा’ या हुकुमशाहा वृत्तीने ते वागले. गेल्या दहा वर्षांत ना त्यांना शेतकर्‍यांची चिंता होती ना बेरोजगारांची. मणिपूरमधील महिला अत्याचार असो अथवा दिल्लीत कुस्तीगीर महिलांनी अत्त्याचार-भ्रष्टाचारविरुद्ध केलेले आंदोलन असो. दिल्लीच्या सीमेवर न्याय मागणीसाठी बसलेल्या पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकर्‍यांचे ठिय्या आंदोलन असो. अशा अनेक गोष्टींकडे त्यांनी दुर्लक्ष केले. कारण विरोधकांचे भय त्यांना वाटत नव्हते. नरेंद्र मोदी फक्त त्यांच्या जवळच्या २२ लोकांसाठी काम करतात असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी केला, तो खराच आहे. गौतम अदानी, मुकेश अंबानी यांना जे हवे ते काम २४ तासांत पूर्ण करण्याचे चमत्कार ते करतात. उद्योगपतींची कोटींची कर्जे माफ केली, पण शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली नाही. मोदींनी प्रत्येक वेळी एक कथानक तयार केले. कथानकाभोवती देशातील जनतेला फिरवले. अंधभक्तांनी टाळ्या वाजवल्या तर भाट पत्रकारांनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली. लोकसभा निवडणुकी दरम्यान काही वृत्तवाहिन्यांनी मोदींच्या मुलाखतीचा सपाटाच लावला होता. मोदी असंबद्ध बोलत होते आणि त्यांचे चमचे ‘वाह वाह’ करत होते.
४ जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शेअर बाजार मोठी उसळी घेईल असा विश्वास मोदी यांनी १९ मेच्या एका मुलाखतीत दिला. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी १३ मे रोजी दिलेल्या एका मुलाखतीत भाजपा आणि एनडीए ४०० पार होतील आणि शेअर बाजार अभूतपूर्व उंचावेल, असा दावा करून ४ जूनपूर्वी शेअर्स घेऊन नफा कमावा असा सल्लाही दिला. झाले उलटेच. निकाल जसजसा जाहीर होत होता तसा बाजार कोसळला. गुंतवणूकदारांचे ३० लाख कोटी बुडाले. अशा सटोडिया राज्यकर्त्यांच्या विरुद्ध अजून लढाई बाकी आहे.
आज महाराष्ट्र दुष्काळाने होरपळतोय. मराठवाड्यातील बर्‍याच जिल्ह्यात टँकरने पाणी पुरवले जात आहे. मुंबईचे अनेक कारखाने गुजरातमध्ये स्थलांतरित झाले आहे. कारखाने-नवे प्रकल्प परराज्यात पळवले जात आहेत. गेल्या दहा वर्षांत हिंजवडी (पुणे) येथील ३७ कारखाने कर्नाटक, गुजरातला गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली आहे. कांद्याच्या निर्यातीला बंदी घातल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाले. महाराष्ट्रात श्रीमंतांच्या मुला-मुलींचे ‘कारनामे’ वाढले आहेत. हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणामुळे निष्पापांचा बळी जात आहे. आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली नाही. कायदा व सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या आहेत. तरी महाराष्ट्रात सर्व काही आलबेल आहे असा टेंभा शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून मिरवला जात आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची कामगिरी चांगली झाली आहे. ४८पैकी ३० जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना सुखावणारा हा विजय असला तरी ‘विजयाचा उन्माद नको, विजयाचा वैâफ ना चढो’ असा सल्ला द्यावासा वाटतो. कारण महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच शेतकरी, तरुण, गरीब, वंचित अल्पसंख्यांक यांना न्याय मिळवून देण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपासह महायुतीचा संपूर्ण पाडाव करायचा आहे. तेव्हा अजून लढाई बाकी आहे.

Previous Post

संघाचा आवाज वाढतोय का?

Next Post

मला मोकळं करा, अध्यक्ष महोदय!

Related Posts

गर्जा महाराष्ट्र

महायुतीत कुणाचा जोर, कोण शिरजोर?

May 8, 2025
गर्जा महाराष्ट्र

महाराष्ट्रदिनाचा वज्रसंकल्प!

May 5, 2025
गर्जा महाराष्ट्र

भाजपाची कोटी-कोटीची उड्डाणे!

April 25, 2025
गर्जा महाराष्ट्र

‘फुले’ आणि काटे!

April 17, 2025
Next Post

मला मोकळं करा, अध्यक्ष महोदय!

टपल्या आणि टिचक्या

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.