• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

नाय, नो, नेव्हर…

- संतोष पवार

Nitin Phanse by Nitin Phanse
June 3, 2024
in भाष्य
0

संतोषराव निवडणूक निकालावर पैज लावायची झाली तर तुम्ही कशावर पैज लावाल?
– रमेश सोनावणे, चेंबूर
मुजरा करायला लावणार्‍यांना मुजरा करणारे मुजरा करायला लागतील… यावर पैज लावू शकतो.. पण कोणी पैज लावणार नाही, यावर सुद्धा पैज लावू शकतो… हे तुम्हाला कळलं असेल तरी तुम्ही बोलणार नाही.. लावता पैज? (पैज दोन्ही बाजूंनी लावावी लागते मिस्टर सोनावणे!)

तुम्हाला कधी कोणत्या अपराधासाठी निबंध लिहायला सांगितला होता का शाळेत?
– मारिया डिकोस्टा, नायगाव
तुम्हाला निबंध लिहिता येत नाही याची भीती वाटते का? एकच निबंध पाठ करून ठेवा. ‘माझे बाबा.’ माझे बाबा बिल्डर आहेत. ही एकच ओळ लिहा आणि पुढची गंमत पाहा…. (माझ्याबद्दल बोलाल तर माझी शाळा आणि ड्रायव्हिंग स्कूल मुंबईमधलेच आहे, एवढं उत्तर पुरेसं आहे. अजून स्पष्ट हवं असेल तर तुम्हाला पुण्यातच जावं लागेल… शिकण्यासाठी.)

सगळे पुरुष बायकांवर इतके विनोद करतात, बायकोमुळे आपण किती गांजलो आहोत, असं एकमेकांना सांगतात; इतका बायकांचा जाच आहे मग सगळे घर सोडून संन्यासी बनून हिमालयात का जात नाहीत?
– रेश्मा आंदेकर, जुन्नर
सगळे पुरुष हिमालयात गेले तर पुरुषांबरोबर बायकांचाही वांदा होईल ना… जेवणाचा… पुरुष काय जेवणार? आणि बायका कोणाला जेवायला घालणार? बरं… तरी पुरुष हिमालयात गेले, तर काही पुरुष भीक मागून खातील… ते हिमालयातून परत येतील आणि बायकांच मंगळसूत्र काढून घेऊन बायकांना सोडून देतील… आता बोला, सगळे पुरुष हिमालयात गेलेले चालतील?

या निवडणुकीत तुमच्या मनासारखा निकाल लागला नाही, तर तुम्ही काय करणार?
– बाळ पाटील, परभणी
निवडणुकीचा निकाल मनासारखा नाही लागला तरी निकाल आमच्या मनासारखाच लागलाय म्हणून बोंब मारणार. रात्रीच्या गाठीभेटी करून नंतर पक्ष बदलणार्‍यांमधले नाही आम्ही… आणि आम्हाला खात्री आहे… आम्ही कोणाला मत दिलं हे कुणी किती सर्च केलं तरी कळणार नाही. कारण निवडणूक आयोग त्यांचा डाटा xx कोणाला दाखवणार नाही. ता.की. ‘डाटा xx’ हा शब्द डाटा बीटा असा वाचावा.

सोशल मीडियावर सगळे लोक इतके शहाणे कसे असतात? त्यांना सगळ्यातलं सगळं कसं कळत असतं? तेही त्या त्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करत असलेल्या माणसांपेक्षा जास्त!
– दिलावर शेख, रहिमतपूर
फार कठीण असतं ते. उचललं बोट आणि केलं टाईप एवढं सोपं नसतं ते. डोकं बाजूला ठेवून करावं लागतं ते. तुम्ही करून बघा डोकं किती त्रास देत ते… (अर्थात असेल तर)

पुरुष पाच मिनिटांत ढीगभर खरेदी करतात, बायका तीन तास दुकानात बसून, सगळ्या सेल्समनना कामाला लावून एकही वस्तू न घेता बाहेर कशा पडू शकतात?
– दिवाकर पांगे, भाईंदर
तुम्ही नवीनच सेल्समन म्हणून रुजू झालेले दिसता. पांगे, अशा बायकांशी नका घेऊ पंगे. अशा बायकांबरोबर आलेल्या त्यांच्या नवर्‍याची अवस्था बघा… (बायका अशा नवर्‍यांना डेमो म्हणूनच खरेदीला नेतात ) तेव्हा शहाणे व्हा… त्यांच्या वाटेला न जाता, त्यांच्या वाटेने त्यांना जाऊ द्या… वाटल्यास अनुभवी सेल्समनचा सल्ला घ्या.

माणसांना लहानपणापासून बोलायला शिकवलं जातं, त्यांना ऐकायला मात्र कधीच का शिकवलं जात नाही?
– रवींद्र तिडके, नाशिक
तिडके साहेब, तुमचा गोंधळ होतोय. आपण बायकोपासून आपल्या इन्शुरन्स एजंटपर्यंत सगळ्यांच ऐकतो. कारण आपण माणसं आहोत. जे ऐकत नाहीत ते बायोलॉजिकल नसतात. ते काही विशिष्ट कामासाठी परमात्म्याकडून पृथ्वीवर पाठवलेले असतात. अशा बायोलॉजिकल नसणार्‍या अवतारी पुरुषांना ओळखा (ते ओळखणे सोप्प असतं. आपण बॉयलॉजिकल नाही असं ते स्वतः सांगतात). तेव्हा त्यांचा अवतार मान्य करा आणि त्यांना काही ऐकवायला जाऊ नका. त्यांच्या भक्तांकडून तुम्हालाच ऐकावं लागेल.

आपल्याला राजकारणात रस नाही, असं कौतुकाने कसं सांगतात लोक! राजकारणाचा स्पर्श नाही, असं एक तरी क्षेत्र आहे का?
– सुनील नाईक, पुणे
आपल्याला राजकारणातच रस नाही असं तोच सांगतो ज्याला राजकारण करून चोथाही मिळत नाही… राजकारणाचा स्पर्श नाही असं क्षेत्र कोणतं विचाराल तर ते क्षेत्र राजकारण हेच आहे… कुठल्याही राजकारण्याला विचारा तो हेच सांगेल की ‘ मी कधीच राजकारण करत नाही’. हे विरोधकचं राजकारणाला बदनाम करतात.

Previous Post

अंदाज अपना अपना

Next Post

सरसंघचालकांचा कृतक कोप!

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025
भाष्य

सोमीताईचा सल्ला

May 15, 2025
भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025
भाष्य

‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

May 8, 2025
Next Post

सरसंघचालकांचा कृतक कोप!

पुन्हा कोदण्डाचा टणत्कार

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.