देशात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिल्ली राज्यात गेल्या सहा दिवसांत 628 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकार हे संकट टाळण्यासाठी युद्धस्तरावर काम करत आहेत. गेल्या 11 महिन्यांपासून आपण कोरोनाशी लढत आहोत अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे.
देशात बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण
संपूर्ण जगात कोरोनाची स्थिती भयंकर आहे, पण देशात कोरोना आटोक्यात आहे अशी माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. देशात कोरोना नियमांचे कडक पालन होते त्यामुळे ही परिस्थिती आटोक्यात आली आहे, देशात आतापर्यंत 90 लाखहून अधिक नागरिकांना कोरोनाचे लागण झाली होती, त्यापैकी 85 लाखहून अधिक रुग्ण बरे झले असून जगात हिंदुस्थात बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही हर्षवर्धन यांनी नमूद केले.
सर्वात पहिल्यांदा लस कोणाला देणार?
लस बाजारात येताच देशातील आरोग्य कर्मचाऱ्य़ांना ही लस दिली जाईल अशी माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. त्यानंतर सुरक्षा दल म्हणजेच पोलीस सैन्य आणि निमलष्करी कर्मचाऱ्य़ांना ही लस दिली जाईल. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि त्यानंतर 50 वर्षाहून अधिक नागरिकांना ही लस देण्यात येईल असेही हर्षवर्धन यांनी सांगितले.
कधी येणार लस?
केंद्रीय मंत्री हर्षवर्धन म्हणाले की, संपूर्ण जगात 250 लशीच्या कंपनी आहेत. त्यापैकी 30 कंपन्यांची हिंदुस्थानवर आशा आहे. देशात पाच कोरोना लशीवर काम सुरू आहे. 2021 च्या तीन महिन्यांत आपल्याला पहिली लस मिळेल अशी माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. तसेच सप्टेंबरपर्यंत 25 ते 30 कोटी हिंदुस्थान नागरिकांना ही लस दिली जाईल.
सौजन्य : दैनिक सामना