यंदाचे 2020 हे वर्ष लोकांसाठी कुठल्याच दृष्टीने चांगले नव्हते असेच म्हणावे लागेल. अख्खे जग अजूनही कोरोना संकटाच्या भीतीत वावरतेय. त्यातच या वर्षाचे अखेरचे चंद्रग्रहण भारतात 30 नोव्हेंबरला दिसणार आहे. या दिवशी सोमवार असून कार्तिक पौर्णिमाही आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण आहे. ते जास्त प्रभावी नाही. तरीही त्या काळातही लोकांनी काही अंशी सावधगिरी बाळगायलाच हवी. खासकरून गर्भवती महिलांनी सावध राहायलाच हवे. या चंद्रग्रहणाचा प्रभाव प्रामुख्याने सौरमंडळावर होणार आहे. तरीही या चंद्रग्रहणाचा सूतक काळ, त्याबाबत धार्मिक मान्यता, ते कुठे दिसेल आणि कुणावर प्रभाव पडेल ते जाणून घेऊया…
परिणाम कशावर…
या वर्षाचे हे अखेरचे चंद्रग्रहण वृषभ राशी आणि रोहिणी नक्षत्रावर होणार आहे. तरीही त्याचा परिणाम जवळपास सर्वच राशींवर पडू शकतो. त्यामुळे वाचकांनी आपापल्या राशीवर या चंद्रग्रहणाचा काय परिणाम संभवेल ते आपल्या ज्योतिषांकडून दाणून घ्यावे. यामुळेच या चंद्रग्रहणाचा निश्चित सूतक काळ सांगता येणेही कठीण आहे.
खंडग्रास चंद्रग्रहण म्हणजे?
30 नोव्हेंबरला या वर्षाचे होणारे हे अखेरचे चंद्रग्रहण खंडग्रास प्रकारचे आहे. म्हणजेच ते चंद्राला पूर्णपणे ग्रासणार नाही. ग्रहणापूर्वी चंद्र पृथ्वीच्या सावलीखाली येईल. या चंद्रग्रहणामुळे चंद्राच्या आकारावर काहीच परिणाम होणार नाही. आपल्याला चंद्रावर एक अंधुकशी सावली पडल्यासारखे दिसेल.
ग्रहणाला प्रारंभ
30 नोव्हेंबर, दुपारी 1 वाजून 4 मिनीटे.
ग्रहणाचा मध्य काळ
30 नोव्हेंबर, दुपारी 3 वाजून 13 मिनीटे.
ग्रहणाची समाप्ती
30 नोव्हेंबर, सायंकाळी 5 वाजून 22 मिनीटे.
2020 मधील चंद्रग्रहणे
पहिले चंद्रग्रहण – 10 जानेवारी
दुसरे चंद्रग्रहण – 5 जून
तिसरे चंद्रग्रहण – 5 जुलै
चौथे चंद्रग्रहण – 30 नोव्हेंबर