निसर्ग नियमानुसार प्रत्येक प्राण्याला शौचाला जावेच लागते. प्रातर्विधी उरकला नाही की अनेकांना दिवसभर गॅसचा त्रास होतो, हा निसर्ग निमयच आहे. मात्र या नियमाला फाटा देणारी घटना मध्य प्रदेशमधील मुनैर जिल्ह्यात घडला आहे. येथील एक तरुण गेल्या 18 महिन्यांपासून शौचाला गेलेला नाही. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.
वृत्तानुसार, मुनैर जिल्ह्यातील 16 वर्षीय रहिवासी आशिष चांदिल याला एक दुर्मिळ आजार जडला आहे. त्यामुळे तो गेल्या 18 महिन्यापासून एकदाही शौचाला गेलेला नाही. मात्र दररोज 18 ते 20 चपात्या खात आहे. या प्रकारामुळे डॉक्टरही हैराण झाले आहेत.
मुलगा आशिष याच्या या आगळ्यावेगळ्या आजाराची माहिती कळताच वडील मनोज आणि कुटुंबीयांनी त्याला घरून रुग्णालय गाठले. आजाराचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. मात्र अद्यापही त्याला नक्की कोणता आजार झालाय हे काही कळलेले नाही.
जेवणही बेसुमार
आशिष रोज 18 ते 20 चपात्या खातो, मात्र एकदाही शौचाला जात नाही. तसेच यामुळे त्याला पोट आणि शरीराच्या अन्य व्याधीही झालेल्या नाहीत. हा मुलगा इतर मुलांप्रमाणे सामान्य जीवन जगत आहे. तूर्तास त्याला कोणताही त्रास होत नाहीय, मात्र त्याच्या भविष्याची चिंता कुटुंबियांना सतावत आहे.
डॉक्टरही अचंबित
दरम्यान, आशिषच्या या आजारामुळे डॉक्टरही अचंबित झाले आहेत. हा नक्की कोणता आजार आहे याबाबत त्यांनाही माहिती नाही. अधिक तपासण्या केल्यानंतर याबाबत कळू शकेल असे डॉक्टरांनी सांगितले.