• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

मुंढेबाईंचा बहुगुणी बटवा

- संदेश कामेरकर (धंदा म्हणजे काय रे भाऊ!)

Nitin Phanse by Nitin Phanse
October 5, 2023
in धंदा म्हणजे काय रे भाऊ!
0

‘सामाजिक कार्य करतानाही वस्तूच्या गुणवत्तेत तडजोड होता कामा नये, हा आमचा अट्टहास आहे. म्हणूनच चुका झाल्या तरी आम्ही त्या स्त्रियांना समजावून सांगतो आणि चुका कशा टाळाव्यात याचं प्रशिक्षण देतो. आमच्या प्रॉडक्टना असलेली मागणी पाहता आम्हाला हे काम करणार्‍या आणखी गरजू स्त्रिया हव्या आहेत.’ सुचेता मुंढे सांगत होत्या.
– – –

रविवार दुपार म्हणजे एरवी वामकुक्षीचा आनंद देणारा दिवस, पण सणासुदीच्या काळात रविवार म्हणजे खरेदीचा दिवस बनतो. पूर्वी लालबाग-दादर अशा दुकानांची रेलचेल असलेल्या भागात खरेदीला जाणे हा एकमेव पर्याय असायचा. पण हल्ली मराठी उद्योजकांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या व्यापारी पेठा, प्रदर्शन यामुळे खिशाला परवडणार्‍या, नावीन्यपूर्ण आणि ट्रेडिंग असणार्‍या वस्तू आणि साधने खरेदी करता येतात. अशाच एका व्यापारी प्रदर्शनात दुपारच्या वेळी तुरळक गर्दी असताना एका स्टॉलवर मात्र ग्राहकांची झुंबड उडालेली दिसत होती. इतकी गर्दी होती की त्या स्टॉलवर काय वस्तू विकायला ठेवली आहे हेच कळत नव्हतं. थोडं पुढे जाऊन पाहिलं तर त्या स्टॉलवर ‘दोन ज्येष्ठ नागरिक’ पर्स विकत होते. स्टॉलवर गर्दी करणारे ग्राहक नुसती विंडो शॉपिंग करत नसून, तीन-चार पर्सेस विकत घेऊन जात होते. हे दृश्य पाहून, ‘पर्सविक्रेते रिकाम्या पर्समध्ये पैसे भरून तर देत नाहीत ना’ अशी मजेशीर कल्पना मनात आली, कारण अशी अलोट गर्दी इतर कोणत्याही स्टॉलवर नव्हती. ‘धाग्यादोर्‍यांनी शिवलेली वेगवेगळ्या आकारातील कापडी फॅन्सी पिशवी म्हणजे पर्स’ इतकंच माहिती असल्याने या व्यवसायातील यशाचं गमक शोधायला मी मुंढे दांपत्यांची मुलाखत घेतली.
सुचेता मुंढे म्हणाल्या, ‘माझं बालपण दादरमध्ये गेलं. वडील पेशाने सिव्हील इंजिनियर होते. त्यांनी काही वर्ष सरकारी नोकरी केली आणि नंतर स्वतंत्र कन्सल्टन्सी सुरू केली. इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंगच्या उभारणीत त्यांचा सहभाग होता. आई हाऊसवाइफ असली तरी व्यावसायिक गुण तिच्या अंगात होते. ती सतत काही ना काही वस्तू बनवत राहायची. मी अभ्यासात हुशार होते. माझी चित्रकलाही चांगली होती. चारकोल पेंटिंग हा माझ्या आवडीचा प्रकार. दहावीनंतर रुईया कॉलेजला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला, पण आईच्या सांगण्यावरून रचना संसदमध्ये टेक्स्टाइल डिझायनिंगचा कोर्स केला. बारावीनंतर सर्व मैत्रिणी बीएससी करण्यासाठी गेल्या आणि त्यांच्यासोबत मीही गेले. आज मागे वळून पाहताना वाटतं की तो निर्णय तितकासा बरोबर नव्हता, कारण माझ्यात कलेचे गुण उपजत होते. त्यामुळे त्या क्षेत्रात काहीतरी मोठी कामगिरी मी केली असती. पदवी मिळाल्यावर २१व्या वर्षी नितीन मुंढे यांच्यासोबत लग्न झालं. तेही दादर भागात राहत होते. उत्पादनक्षेत्रातील महाकाय पोलादी वस्तूंना गंज लागू नये म्हणून त्यावर जी प्रक्रिया केली जाते, त्या क्षेत्रात नितीन यांचा व्यवसाय होता. या कामाच्या निमित्ताने ते देशात आणि विदेशात फिरतीवर असायचे. बरीच वर्ष नितीन फक्त शनिवार-रविवारी घरी असायचे, म्हणून मी त्यांना गमतीने ‘वीकेंड फादर अँड हजबंड’ अस म्हणायचे. सुरुवातीच्या काळात मी नितीन यांना टेंडर भरणे, कागदपत्रांची जुळवाजवळ अशी मदत करायचे. त्या काळात ऑनलाइन टेंडरिंग नव्हतं, त्यामुळे सर्व कागदपत्रं टायपिंग मशीनवर टाइप करावी लागायची. कॉलेजच्या दिवसांत वेळ वाया जाऊ नये म्हणून आईने मला अनेक कोर्स करायला पाठवलं होतं. त्यात टायपिंग होतं. त्या काळात मी मेकअपचाही कोर्स केला होता. तरुणपणी शिकलेल्या अनेक गोष्टींचा नंतर खूप फायदा झाला.
लग्नानंतर स्वत:चं काहीतरी सुरू करायचं आहे ही इच्छा सतत मनात यायची, पण मुलं लहान असल्यामुळे ती पूर्ण करता येत नव्हती. याच काळात कॅम्लीन कंपनीने फॅब्रिक पेंटिंगचे नवीन रंग बाजारात आणले होते आणि त्यांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी त्यांनी काही ड्रॉइंग टीचर्सची नेमणूक सुरू केली होती. या कामाची नोंदणी करून मी घरीच फॅब्रिक पेंटिंग शिकवण्याच्या बॅचेस सुरू केल्या. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसाला मी तीन बॅचेस शिकवत असे. नितीन यांच्या व्यवसायात मिळणार्‍या पैशाच्या तुलनेत पैसे फारच कमी मिळत होते पण आवडीचे काम करायला मिळण्याचा आनंद अधिक होता. हे क्लासेस सुरू असताना कॅम्लीनच्या डायरेक्टर रजनी दांडेकर दोन तीन वेळा माझ्या घरी येऊन गेल्या. इतक्या मोठ्या कंपनीची मालकीण असतानाही त्यांची साधी राहणी, आपलं काम अजून कसं चांगलं करता येईल यासाठीची धडपड पाहून मला काही गोष्टी शिकता आल्या.
संसारात स्थिरस्थावर झाल्यावर मला काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा निर्माण झाली आणि मी इंटीरियर डेकोरेटरचा पार्टटाइम कोर्स केला. त्यानंतर नेहमीचे इंटीरियर डेकोरेटर जे काम करतात त्यापेक्षा काहीतरी वेगळं करावंसं वाटत होतं. लोखंडी फर्निचर (रॉट आयर्न फर्निचर) या क्षेत्रात काही नवीन डिझाईन्स करायला सुरुवात केली. एकदा घरी आलेल्या एका मैत्रिणीने माझं डिझाईन पाहून हा सोफा मला करून दे, अशी ऑर्डर दिली. एका कारागीराचा पत्ता मिळवून मी ते बनवून घेतलं. हे काम पाहून मला पुढे लोखंडी फर्निचरची अनेक कामं मिळत गेली. काहीतरी वेगळं करण्याचाr आवड या कामात उपयोगी ठरू लागली.
मी एका हॉस्पिटलच्या सांगण्यानुसार आर्टिस्टिक सेटी बनवली होती. दिवसा तिच्यावर पेशंट्स बसू शकतील आणि रात्री उशा काढल्यावर झोपू शकतील, असं ते डिझाईन नंतर पॉप्युलर झालं आणि तशा पद्धतीच्या अनेक सेटी वेगवेगळ्या घरांमधे दिसायला लागल्या. हॉस्पिटल्स, फार्म हाऊस आणि घरातील वेगवेगळ्या शोभिवंत वस्तूंच्या अनेक ऑर्डर्स येऊ लागल्या.
तिथून पर्सेसकडे कशा वळलात, या प्रश्नावर सुचेता म्हणाल्या, लहानपणापासूनच मला पर्सेसची खूप आवड होती. वेगवेगळ्या डिझाईन्सच्या पर्सेस विकत घेण्याचा छंद होता. लोखंडी फर्निचरचे काम करत असतानाही मी फावल्या वेळात पर्सेसची डिझाइन्स तयार करायचे. पण, पर्सला कोणकोणतं मटेरियल लागतं, ते कुठे उपलब्ध होतं, त्या कशा बनवतात, याची मला काहीच कल्पना नव्हती. एके दिवशी एका परिचिताच्या ओळखीने एक कारागीर मला भेटला आणि २००६ सालापासून माझा पर्सेसचाही प्रवास सुरू झाला. या व्यवसायाला नाव काय द्यावं असा प्रश्न आल्यावर माझ्या आधीच्या व्यवसायाच्या ‘सुचेता मुंढे डेकोरेटिव्ह’ या नावाचा शॉर्टफॉर्म करून ‘एसएमडी’ हे नाव घेतलं. टेक्स्टाईल डिझाईनमध्ये सिल्कवर कॉटनवर कोणती डिझाईन छापता येतील किंवा ब्लॉक बनवता येतील हे शिकवलं गेलं होतं, परंतु त्याचा कोणताही प्रॅक्टिकल अनुभव मला नव्हता. पर्स बनवणार्‍या कारागिरीला एकाच पद्धतीच्या पर्सेस बनवण्याचा अनुभव होता आणि मला तोही नव्हता. त्यामुळे सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. कागदावर छान दिसणार्‍या डिझाईन्सची नंतर प्रत्यक्ष पर्स बनवताना कोणत्या तांत्रिक अडचणी येऊ शकतात, याचा अंदाज हळूहळू येत गेला. आपण निवडलेले मटेरियल पर्ससाठी योग्य नसणे किंवा एखादी डिझाईन खूप सुंदर आहे, पण पर्स बनून आल्यावर प्रॅक्टिकली वापरायला अवघड जाणे, असे अनुभव खूप आले. पण यातून शिकत शिकत बॅग्स आणि पर्स बनवण्यासाठी कोणत्या बेसिक गोष्टी गरजेच्या आहेत हे कळत गेलं. सुरुवातीच्या काळात प्रत्येक डिझाईनचे दोन तीन पिसेस बनवून घेत गेले.
आम्ही माहीमच्या लायन्स क्लबचे मेंबर आहोत. त्या मीटिंगला जाताना मी दरवेळी एक नवीन पर्स घेऊन जात असे. नेहमी दुकानात मिळणार्‍या पर्सपेक्षा माझ्या वापरातल्या पर्सचं फिनिशिंग आणि डिझाईन वेगळं दिसायचं, त्यामुळे लायन्स क्लबमधील मैत्रिणी विचारायच्या, ही पर्स तू कुठून विकत घेतलीस? मी सांगायचे, ही पर्स मी स्वत: बनवली आहे. त्या म्हणायच्या, आम्हालाही एक पर्स बनवून दे. अशा रीतीने माझ्याकडे ऑर्डर्स जमा होऊ लागल्या. याच क्लृप्तीचा वापर मी दैनंदिन जीवनात करू लागले.
ऑफिसच्या कामासाठी किंवा बँकेत जाताना देखील मी वेगवेगळ्या पर्सेस घेऊन जायचे आणि तेथील कर्मचार्‍यांच्या मनात जेव्हा त्या पर्सेसबद्दल उत्सुकता निर्माण व्हायची, तेव्हा मी बनवलेल्या पर्सेस एका मोठ्या बॅगेत भरून त्यांना दाखवायला घेऊन जायचे. बँक कर्मचार्‍यांसोबतच तेथे आलेले ग्राहक देखील त्या पर्सेस विकत घ्यायचे. बाजारात न मिळणार्‍या डिझाइन्स, आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या दर्जाची फिनिशिंग आणि पर्सेसची गुणवत्ता या जोरावर माझा माल खपत होता.’
विक्री करताना आपल्या लोकांना लाज वाटते, कोणीतरी काही बोलेल अशी एक भीती असते; पण सुखवस्तू घरात वाढलेल्या असताना आणि नवर्‍याचा चांगला व्यवसाय सुरू असताना पर्ससारखी छोटी वस्तू विकताना अनुभव काय होता, या प्रश्नावर सुचेताताई म्हणाल्या, ‘मला हा व्यवसाय करताना कधीही लाज वाटली नाही. दुसर्‍याच्या व्यवसायात नोकरी करण्यापेक्षा स्वत:च्या व्यवसायाच्या सामानाच्या पिशव्या उचलताना अभिमान वाटायला हवा. मी माझं प्रॉडक्ट विकते आहे, ते ग्राहकांना आवडतंय, ते त्याच्याबद्दल चर्चा करतात, पुन्हा पुन्हा विकत घ्यायला येतात याचा व्यावसायिकाला अभिमान वाटायला हवा आणि तो मला आहे. नवीन व्यवसायात तुम्हालाच तुमच्या व्यवसायाची जाहिरात करता यायला हवी. विक्री करायची असेल तर कुणाला सांगणार नाही असा पवित्रा घेऊन कसं चालेल? तुमच्या प्रॉडक्टबद्दल चार लोकांना कळलं तर ते अजून दहा लोकांना सांगतील.
माझ्या एक्झिबिशन प्रवासाची सुरुवात दादरच्या वनिता समाजमधून झाली. दिवाळीच्या आधी आणि संक्रांतीआधी या संस्थेचा एक दिवसाचा महिलांनी महिलांसाठी केलेल्या वस्तूंचा विक्री दिन असतो. २००८ साली मी तिथे स्टॉल लावल्यावर आमच्या पर्सेसचे मार्वेâट अधिक विस्तारले. एक्जीबिशन्समध्ये नवनवीन ग्राहक जोडले जातात आणि वेगवेगळ्या पर्सेसना लोकांचा प्रतिसाद कसा आहे याचा अंदाज आम्हाला येतो. आमचा मुख्य व्यवसाय रिटर्न्स गिफ्टमधून येतो. लग्न समारंभात वाटण्यासाठी पण आमच्या पर्सेस जास्त विकल्या जातात. पूर्वीच्या काळात नवीन नवरी घरात आली की तिची ब्लाऊज पीस देऊन ओटी भरली जायची. पण त्याऐवजी गिफ्ट देण्यासाठी आता आमच्या पर्सेस बल्कमध्ये घेऊन जातात. माझा शाळेचा ग्रूप आहे, त्यातील अनेक मैत्रिणी वेगवेगळ्या देशांत राहतात. त्या जेव्हा मुंबईत येतात तेव्हा माझ्याकडून पर्सेस विकत घेऊन जाणारच, असा त्यांचा हट्ट असतो. अमेरिकेतील नीलिमा संत या मैत्रिणीने मी बनवलेला बटवा एका रेस्टॉरंटमध्ये नेला होता. तिथे आलेल्या एका मॉडेलला तो खूप आवडला आणि तिने त्याच्याबरोबर फोटो काढला. तो फोटो एके दिवशी तिकडच्या एका प्रसिद्ध मॅगझिनच्या कव्हर पेजवर आला होता. डॉ. शिल्पा राजन गुप्ते यांनी त्यांच्या दोन्ही मुलींच्या अमेरिकेत पार पडलेल्या लग्नात रिटर्न गिफ्ट देण्यासाठी माझ्याकडून पर्सेस बनवून घेतल्या होत्या. मराठी उद्योजकाला प्रोत्साहन द्यायला मराठी माणसं नेहमीच तयार असतात, हे या उदाहरणावरून लक्षात येईल.
एक दिवस मोबाईलवर एक आंतरराष्ट्रीय अनोळखी नंबरवरून फोन आला. मला असे फोन घ्यावे लागतात, कारण माझा बिझनेस आहे आणि कोण कुठून ऑर्डर देईल हे माहीत नसतं. तो फोन साऊथ आफ्रिकेतील एका मुस्लीम स्त्रीने केला होता. तिला एका लग्नात रिटर्न गिफ्ट म्हणून मी बनवलेला बटवा मिळाला होता आणि तिला तिच्या मुलीच्या लग्नात तेच सेम बटवे द्यायचे होते. हा किस्सा सांगायचं कारण म्हणजे तुमचं प्रॉडक्ट चांगलं असेल तर जात, धर्म आणि देश याच्या पलीकडे जाऊन ते विकलं जाऊ शकतं. २०११ साली आम्ही दुबईला गेलो असताना तेथील एका महिलेला माझी पर्स पसंत पडली आणि मी हा व्यवसाय करते हे तिला समजलं. सहा महिन्यांनी मला तिचा ईमेल आला. तिला दुबईला विकण्यासाठी माझ्या पर्सेस होलसेल दरात हव्या होत्या. तिकडच्या ग्राहकांना चकचकीत दिसणार्‍या आणि लक्ष वेधून घेणार्‍या डिझाईन आवडतात. वेगवेगळ्या स्तरातील आणि प्रांतातील लोकांसाठी प्रॉडक्ट बनवताना तुम्हाला त्या त्या पद्धतीने विचार करावा लागतो. अशा पद्धतीने माझ्यासाठी गल्फचं एक नवीन मार्केट ओपन झालं. कोणताही ग्राहक खरेदीला येतो, तेव्हा विविध प्रकारचे बटवे, पर्सेस, बॅगा दाखवता यायला हव्यात, व्हरायटी असली तरच ग्राहकाला त्याच्या चॉईसची वस्तू विकत घेता येईल. माझ्याकडे आज ९५ रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत रेंजमध्ये पर्सेस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ४० ते ५० पॅटर्नच्या पर्सेस एका वेळेला उपलब्ध असतात आणि त्यात नवनवीन प्रकारांची भर पडत असते. शक्यतो एकदा झालेली डिझाईन मी पुन्हा करत नाही. दरवेळेला नवीन डिझाईन शोधण्याचा आणि ग्राहकांना देण्याचा माझा प्रयत्न असतो.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं आहे, पण व्यवसाय करताना यांच्यामागे नितीनजी खंबीरपणे उभे आहेत, असं दिसतं. तुमचा या व्यवसायात काय वाटा आहे असं विचारल्यावर नितीनजी म्हणाले, ‘गमतीने म्हणायचं तर मी या व्यवसायात ‘म-म’ म्हणायचं काम करतो. या संपूर्ण व्यवसायात सुचेताची मेहनत आहे, मी माझा व्यवसाय सांभाळून जमेल तशी मदत करतो. एक गोष्ट ती कधीही सांगणार नाही. २००० ते २००९ हा काळ माझ्या व्यवसायासाठी कठीण होता. मी आधी केलेल्या कामाचे पैसे अडकले होते. त्यामुळे नवीन काम करता येत नव्हतं. या नऊ वर्षांच्या काळात सुचेताने संपूर्ण कुटुंबाची आर्थिक जबाबदारी पेलली. यथावकाश माझ्या व्यवसायातील अडचणी पार पडल्या, अडकलेले पैसे परत मिळाले आणि माझा व्यवसाय पुन्हा स्थिरस्थावर झाला, पण त्या मधल्या वर्षांत तिने संसारात फ्रंट सीट घेतली होती. एखाद्या स्त्रीची कोणताही व्यवसाय करण्याची इच्छा असेल, तर नवर्‍याने तिला संपूर्ण पाठिंबा द्यायला हवा असं मी मानतो.’ नितीनजींना हसून अनुमोदन देत सुचेता म्हणाल्या, ‘हल्ली प्रत्येक इव्हेंटला वेगवेगळ्या पर्सेस लागतात. पूर्वीसारखी एकच पर्स हातात घेतली आणि निघालो असं होत नाही. लग्नासाठी बटवे हवेत, कॅज्युअल गेटटुगेदरसाठी वेगळ्या, प्रवासासाठी वेगळ्या, इव्हिनिंग पर्सेस, क्लच, मेटॅलिक लुक दिलेले क्लचेस, स्लिंग, टॉट बॅग, फॅनी पॅक, कॉइन बॅग, क्रॉस बॉडी बॅग, केली बॅग, होबो बॅग, शोल्डर बॅग स्मॉल, मीडियम, लार्ज अशा स्टँडर्ड पर्स. ऑफिसला जाणार्‍या महिलांसाठी लॅपटॉप बॅग, असे कितीतरी प्रकार आहेत. पण सर्व महिलांची मागणी एकच असते की डिझाईन कुठलंही असो, पर्स वजनाने हलक्या हव्यात आणि पर्सची शिवण पक्की हवी. माझा व्यवसाय हा वर्ड ऑफ माऊथने मोठा झालाय, मला कोणत्याही जाहिरातीची गरज पडली नाही. दिवसरात्र पर्सेस हाच विषय माझ्या डोक्यात असतो. सकाळची घरची काम आटपली की मी फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन आणि माझा व्हाट्सअप ग्रूप याच्यावर रोज एका नवीन पर्सचे फोटो पोस्ट करणे, काही इन्क्वायरी किंवा ऑर्डर्स असतील तर त्यांना उत्तरे देणे हे काम करते. मी वन मॅन आर्मी अशा पद्धतीने काम करते, म्हणजे एखादी कल्पना सुचली की तिचं डिझाईन बनवणे, नंतर मटेरियल सप्लायरकडून मटेरियल घेऊन, ते कारागीराला देऊन माझ्या डिझाईननुसार पर्सेस बनवून घेणे, हे करताना सर्व कंट्रोल माझ्याकडे असतो.
माझ्या नवर्‍याचा व्यवसाय चांगला चालला आहे, तरीही मी माझा व्यवसाय करताना छंद जोपासते आहे. चलता है अशी वृत्ती माझ्यात नाही. आपण देत असलेला वेळ आणि त्यातून निर्माण होत असलेल्या प्रॉडक्टची गुणवत्ता चांगली असावी, हा माझा आग्रह असतो. पर्स बनवताना वापरलं जाणारं मटेरियल इकोफ्रेंडली असेल याची काटाक्षाने मी काळजी घेते. कोणत्याही जनावराचं चामडं आणि प्लास्टिक मटेरियल मी वापरत नाही. त्याऐवजी मी ऑरगॅनिक ‘पी यू’ लेदर आणि क्रोकोडाइलसारखा दिसणार क्रॉकोलेदर वापरते. ज्यूट, कॅनव्हास, वूड, सिल्क अशी वेगवेगळी मटेरियल वापरून आम्ही पर्सेस आणि बॅग्स तयार करतो. दुसर्‍या डिझायनरची कॉपी करायची नाही हेही मी कसोशीने पाळते. डोक्यात चोवीस तास वेगवेगळ्या डिझाइन्स आकार घेत असतात. वेगळ्या गोष्टींचं फ्युजन करायला मला आवडतं. मला फिरायला खूप आवडतं मग वेगळी मार्केट धुंडाळताना एखाद्या ड्रेसमधून किंवा ज्वेलरीतूनही मला प्रेरणा मिळते आणि मग त्यातून एका नवीन बॅगच्या निर्मितीचा प्रवास सुरू होतो. कोणत्याही एक्जीबिशनमध्ये गेल्यावर तेथील बॅगच्या स्टॉलवर ग्राहकांचा कोणत्या स्टाईलकडे ओढा आहे, सध्या कोणती डिझाईन ट्रेंडमध्ये आहे, याकडे लक्ष देते.
आमच्या व्यवसायात आपल्याला हवं असलेलं मटेरियल वेळेत आणि योग्य क्वांटिटीमध्ये मिळेल याची खात्री देता येत नाही. काही वेळेला चांगला कारागीर उपलब्ध नसतो. पण या सर्व गोष्टींमधून मार्ग काढून वस्तूंच्या दर्जात तडजोड होणार नाही याची काळजी घेते. व्यापारी पेठांमधे काही स्टॉलचालक मोबाईलमध्ये डोकं खूपसून बसलेले असतात, ग्राहक स्टॉलवर आल्यावर ते खुर्चीवरून उठून उभं राहायची तसदी देखील घेत नाही. काय हवं आहे, असं विचारून समोर आहे तो माल त्यांना विकतात. मी मात्र कुणी पाचशे रुपयांच्या रेंजमधील पर्स मागितली तरी त्यांना त्यांच्या बजेटसोबतच आठशे-हजार या रेंजमधील देखील पर्स दाखवते. माझ्याकडे जे जे प्रॉडक्ट्स आहेत ते त्यांना दाखवणं हे माझं विक्रेता म्हणून कर्तव्य आहे असं मी मानते. यातूनच ग्राहकांना जास्त किमतीची पर्स आवडली तर ते त्यांचं बजेट थोडं वाढवून जास्त किमतीची पर्स विकत घेतात हा माझा अनुभव आहे.’
ज्येष्ठ नागरिकांना नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यात अडचणी येतात असं म्हटलं जातं. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विक्री करताना फेसबुक, इंस्टाग्राम अशा समाजमाध्यमांवर मालाची जाहिरात करणे आवश्यक आहे. आकर्षक स्वरूपातील फोटो, रील्स बनवावे लागतात. या सर्व गोष्टी तुम्ही कशा करता या प्रश्नावर सुचेता मॅडम म्हणाल्या, ‘मल्टीटास्किंग हा तर आम्हा स्त्रियांचा स्थायीभाव. व्यवसायात या गुणाचा खूप उपयोग होतो. बँका, ऑफिसेसमधे स्वत: पिशव्या घेऊन पर्सेस विकण्यापासून सुरू झालेला व्यवसाय नंतर वर्ड ऑफ माऊथ पब्लिसिटीने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत गेला, पण काळाची पावलं ओळखून मी तांत्रिक गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायला लागले. मोबाईलवर व्हिडिओ कसे काढायचे, त्याचे रील कसे बनवायचे, फोटोंना लक्षवेधी कॅप्शन्स कशा द्यायच्या या गोष्टी मी शिकत गेले. यालाच डिजिटल मार्केटिंग म्हणतात हे मला नंतर कळलं.
हल्ली कपड्यांचे आणि अ‍ॅक्सेसरीजचे ट्रेंड्स लवकर बदलत जातात. एखादी सिरीयल प्रसिद्ध झाली किंवा एखादा सिनेमा आला तर अभिनेत्रीने परिधान केलेल्या, वापरलेल्या गोष्टीचे ट्रेंड्स विक्रीसाठी पटकन बाजारात येतात आणि त्याच वेगाने अंतर्धान पावतात. विकल्या न गेलेल्या वस्तू मोठ्या कंपन्या ५० टक्के सेल देऊन विकतात. असं तुमच्या बाबतीतही होतं का या प्रश्नावर सुचेता म्हणाल्या, ‘उत्तम क्वालिटी, युनिक डिझाइन्स आणि रिझनेबल रेट हे माझे यूएसपी आहेत. त्यामुळे आम्ही बनवलेल्या सर्व पर्सेस विकल्या जातात. एखादी डिझाईन बनवताना खूप वेळा त्यात बदल होतात. सतत ती डिझाईन समोर असते त्यामुळे काही वेळा यात काहीतरी कमी आहे, कदाचित हे प्रॉडक्ट लोकांना आवडणार नाही, अशी शंका मनात डोकावते; पण खूपदा अशा पर्स चटकन विकल्या जातात. म्हणूनच माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा डेड स्टॉक नाही. नवनवीन डिझाईन बनवण्यासाठी माझा रोज रिसर्च सुरू असतो. गुगलवरून जगभरात कोणते फॅशन ट्रेंड्स सुरू आहेत याची माहिती घेते. वेगवेगळ्या पद्धतीचे कापड किंवा मटेरियल यांचा शोध सुरू असतो. पाच सहा वेगवेगळ्या गोष्टी घेऊन त्याचं फ्यूजन कसं करता येईल याचाही विचार डोक्यात सुरू असतो. महाराष्ट्रभर प्रवास करत असताना तेथील मार्केटमध्ये सध्या कोणते ट्रेंड्स सुरू आहेत यावरही मी लक्ष ठेवते. किंवा पंचतारांकित हॉटेल्समध्ये होणार्‍या एक्झिबिशनला भेट देते. पण आजवर मी कोणत्याही पर्सेसची डायरेक्ट कॉपी केलेली नाही. मला बहुतेक वेळा इतर गोष्टींवरून प्रेरणा मिळालेली आहे.
‘एसएमडी’ आणि ‘अनन्या’ असे आमचे दोन ब्रँड आहेत. अनन्या ब्रँडच्या पर्सेस आणि बॅग्स आम्ही समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांकडून बनवून घेतो. पर्सेस कशा शिवायच्या, कशा बनवायच्या, याचं पूर्ण प्रशिक्षण मी त्या स्त्रियांना देते आणि आज त्यातील बर्‍याचशा स्त्रिया महिन्याला वीस ते पंचवीस हजार रुपये कमावत आहेत. कपडे शिवणे आणि पर्स शिवणे यात फरक आहे. त्यामुळे सुरुवातीला आम्हाला त्यांच्याकडून काम करून घेताना खूप अडचणी येतात. सामाजिक कार्य करतानाही वस्तूच्या गुणवत्तेत तडजोड होता कामा नये, हा आमचा अट्टहास आहे. म्हणूनच चुका झाल्या तरी आम्ही त्या स्त्रियांना समजावून सांगतो आणि चुका कशा टाळाव्यात याचं प्रशिक्षण देतो. आमच्या प्रॉडक्टना असलेली मागणी पाहता आम्हाला हे काम करणार्‍या आणखी गरजू स्त्रिया हव्या आहेत. यासाठी काही सामाजिक संस्था देखील आमच्या संपर्कात आहेत.”
गेल्या काही वर्षात नोकरीच्या मागे न धावता व्यवसाय करून पाहावा हा संदेश अनेक मराठी माणसांमध्ये रुजत आहे. व्यवसायाची शिवण पक्की बसण्यासाठी केवळ वस्तूच्या धाग्यादोर्‍यांची शिवण मजबूत करून चालत नाही, तर व्यवसाय अपडेट करणं, व्यवसाय मूल्यपालन आवश्यक असतं. वस्तूंचे आकर्षक पॅकिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, सेलिब्रिटी ब्रँड अँबेसिडर असे गिमिक करून थोड्या काळासाठी ग्राहक मिळतीलही. पण तुमचा ब्रँड लोकप्रिय करून ग्राहकांचा ओघ निरंतर ठेवण्यासाठी एसएमडी पर्स ब्रँडच्या सुचेता यांच्या बटव्यातील चिकाटी, मेहनत, वस्तूंची गुणवत्ता आणि वाजवी किंमत हे गुण आत्मसात करायला हवेत.

Previous Post

पाटबंधारे प्रकल्प की पांढरे हत्ती?

Next Post

टपल्या आणि टिचक्या

Related Posts

धंदा म्हणजे काय रे भाऊ!

स्वच्छ ताजे मासे, साफ करून घरपोच!!

September 21, 2023
धंदा म्हणजे काय रे भाऊ!

जुनाट लाँड्री व्यवसायावर नावीन्याची कडक इस्त्री!

August 24, 2023
धंदा म्हणजे काय रे भाऊ!

करिअरची गवसली वाट

July 27, 2023
जगात भारी, चप्पल कोल्हापुरी!
धंदा म्हणजे काय रे भाऊ!

जगात भारी, चप्पल कोल्हापुरी!

July 13, 2023
Next Post

टपल्या आणि टिचक्या

बाळासाहेबांचे फटकारे...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.