शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते मातोश्री येथे शिवसेना जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांच्या विविध लेखाचा संग्रह असलेल्या ‘मुद्देसूद’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. या प्रसंगी पुस्तकाचे प्रकाशक अरविंद शाह, सकाळ वृतपत्र समूह संपादक राहुल गडपाले, ज्येष्ठ पत्रकार विजय सामंत, शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर, रवी म्हात्रे, बहादूर राजपूत, शिवसैनिक गौरव सागवेकर, संतोष वैद्य आदी उपस्थित होते. हर्षल प्रधान यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी हर्षल प्रधान यांची बाळासाहेबांच्या भाषणावर आधारीत ‘विचारांचे सोने’, शिवसेनेच्या इतिहासावरील ‘सुवर्णमहोत्सवी शिवसेना ५० वर्षांची घोडदौड’ आदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘मुद्देसूद’ हे पुस्तक प्रभावी असून राज्यभरातील कार्यकर्त्यांपर्यंत ते पोहचायला हवे त्यांना त्याचा उपयोग होईल अशा भावना या प्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी व्यक्त केल्या.