ग्रहस्थिती : मंगळ मिथुनेत, प्लूटो मकर राशीत, केतू तुळेत, रवि, बुध, हर्षल राहू मेष राशीत, शुक्र वृषभेत, गुरु आणि नेपच्युन मीन राशीत, शनि कुंभेत. विशेष दिवस : १५ मे रोजी अपरा एकादशी, १८ मे, रात्री ९.४२ रोजी अमावस्या सुरु. १९ मे अमावस्या समाप्ती रात्री ९. ४२ वाजता आणि शनेश्वर जयंती.
मेष – वाणीवर नियंत्रण ठेवा. नोकरी, व्यवसायात वादाचे प्रसंग घडू शकतात. धाडसाने निर्णय घेऊ नका. त्रास होईल. काहींना कामानिमित्ताने परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. व्यावसायिकांना चांगला आर्थिक लाभ मिळेल. अचानक खर्च होईल. घरासाठी वेळ द्याल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कलाकारांसाठी उत्तम काळ. समाजसेवेसाठी वेळ द्याल. नवीन नोकरीची संधी मिळेल. पर्यटन घडेल.
वृषभ – शुभ घटना कानावर पडतील. नवे घर घेण्याचा प्रयत्न मार्गी लागेल. जुनी मित्रमंडळी भेटतील. संततीकडून काही समस्या निर्माण होतील, लक्ष ठेवा. तरुणांना नव्या संधी चालून येतील. कामाचे योग्य प्रकारे नियोजन केल्यास चांगला फायदा होईल. लेखक, कलाकार, पत्रकार, संपादकांसाठी उत्तम काळ आहे. पती-पत्नी यांच्यामध्ये कुरबुरी चालतील, पण दोघांनीही वाद ताणू नका. आयटी क्षेत्रात नवीन संधी मिळू शकते. पण विचारपूर्वक स्वीकारा.
मिथुन – नव्या ओळखींचा नोकरी-व्यवसायात फायदा होईल. शत्रूच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवा. व्यवसायात चांगला आर्थिक लाभ होईल. नव्या ऑर्डर मिळतील. भागीदारीत वादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळण्याचे योग आहेत. अचानक एखादा पेचप्रसंग निर्माण होईल. कुशलतेने निर्णय घ्या. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. शेअर, सट्टा, लॉटरीच्या भानगडीत पडू नका.
कर्क – दाम्पत्यजीवनात कटकटीचे प्रसंग निर्माण होतील. विदेशातील व्यवसायांतून चांगला लाभ मिळेल. तरुणांचा भाग्योदय होईल. विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ आहे. कुटुंबामध्ये संपत्तीसाठी भांडणे असली तरी मालमत्तेचे प्रश्न वाटाघाटीतून सोडवा. नोकरीत कामाचे कौतुक होईल. एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार मार्गी लागेल. प्रेम प्रकरणात सांभाळून राहा. आर्थिक आवक बेताची राहील.
सिंह – खर्च वाढेल, आर्थिक आवक बेताची राहील. मानसिक स्वास्थ्य बिघडेल. सुरुवातीचे दोन दिवस कामात मन लागणार नाही. काहीजणांना शुभघटना कानावर पडतील. नवीन नोकरी-व्यवसायाच्या बोलण्यात फायदा होईल. नोकरीत वरिष्ठ मंडळी खूष राहतील. प्रमोशन, पगारवाढीतून त्याचे बक्षीस मिळेल. औषध व्यवसाय, रत्नविक्रेते यांना चांगला लाभ मिळेल. इंजिनीअरना कामात नवीन संधी मिळेल. ध्यानधारणेचा फायदा होईल.
कन्या – सुटीच्या निमित्ताने केलेल्या प्रवासात चोरी किंवा तत्सम मनस्तापाचा प्रसंग घडू शकतो. सावध राहा. नोकरीत झालेल्या किरकोळ वादांकडे लक्ष देऊ नका. नोकरीत बदलीच्या प्रयत्नांत अपयश मिळेल. आर्थिक व्यवहारात एखादी चूक घडून अडचण निर्माण होईल. अचानक धनलाभाची शक्यता आहे, त्यासाठी नवीन गुंतवणूक करताना सावध राहा. अनावश्यक खर्च टाळा.
तूळ – संस्मरणीय घटनांमुळे आठवडा चांगला जाईल. कोर्टातले दावे मार्गी लागतील. सामाजिक मान-सन्मान मिळेल. कलाकारांसाठी उत्तम काळ आहे. सरकारी नोकरदारांसाठी उत्तम काळ आहे. नवीन गुंतवणुकीचा विचार पुढे ढकला, अन्यथा तोटा होईल. प्रेम प्रकरणात जपून राहा. जुना आजार पुन्हा डोके वर काढेल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. घरात एखादे शुभकार्य घडू शकते.
वृश्चिक – जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. व्यवसायवृद्धीच्या प्रयत्नांत यश मिळेल. आर्थिक बाजू काळजीपूर्वक सांभाळा. विचार न करता निर्णय घेऊ नका. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी चालून येतील. परदेशात शिक्षण घेण्याची संधी सोडू नका. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यात हयगय करू नका. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. कितीही खावेसे वाटले तरी बाहेरचे खानपान या दिवसांत जरा नकोच. वाणीवर नियंत्रण ठेवा, गैरसमज टाळा.
धनू – नव्या गाठीभेटी होतील, त्यातून व्यवसायाला चांगली चालना मिळेल. नोकरीत महत्त्वाची जबाबदारी मिळेल. त्याचा भविष्यात चांगला फायदा मिळेल. कलाकारांचा मान-सन्मान होईल. संशोधकांच्या नव्या संशोधनाचे सगळीकडे कौतुक होईल. अडचणीच्या प्रसंगातून सहजपणे मार्ग निघेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. मनासारख्या घटना घडतील, मन आनंदी राहील. व्यवसायासाठी उत्तम काळ आहे.
मकर – आश्वासनांना बळी पडू नका, फसवणूक होईल. शेअर, सट्टा, जुगार, लॉटरीच्या भानगडीत पडू नका. नव्या व्यवसायाची संधी चालून येईल. भागीदारीबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्या. थकलेले पैसे हातात पडतील. आर्थिक नियोजनात चूक करू नका. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. नोकरीत उत्तम स्थिती राहील. काळजी करू नका. पर्यटनासाठी बाहेरगावी गेल्यामुळे घरात वातावरण आनंदी राहील.
कुंभ – मनासारखी कामे झाल्याने मन आनंदी राहील. धार्मिक कार्याला वेळ द्याल. नोकरी-व्यवसायात मनस्तापाचे प्रसंग टाळा. समाजसेवेसाठी भरपूर वेळ द्याल. सहकारी आणि हाताखालच्या नोकर मंडळींची चांगली साथ मिळेल. शिक्षण क्षेत्रात चांगला अनुभव येईल. विदेशात व्यवसायाचे प्रयत्न यशस्वी ठरतील. उधार देणे टाळा. शत्रूंवर बारीक लक्ष ठेवा. आर्थिक लाभ वाढला तरी खर्चही वाढू शकतो.
मीन – घरात शुभकार्ये घडतील. नवीन घर, जमीन घेण्याच्या प्रयत्नाला यश मिळेल. कलाकारांसाठी उत्तम काळ आहे. आंधळा विश्वास ठेवून कोणालाही माहिती देऊ नका. उन्हाळा वाढतो आहे, लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत बदलीचे योग आहेत. अमावस्येच्या दिवशी सन्मान होईल. आर्थिक व्यवहार जपून करा. खेळाडूंसाठी चांगला काळ आहे, एखादे पदक मिळू शकते.