मुंबईतील सेंट रीगस हॉटेलमध्ये ‘दी इंडियन मास्टर्स टी-१०’ या प्रतियोगितेची घोषणा करण्यात आली. दहा षटकांचे हे सामने फक्त ९० मिनिटे चालणार असल्यामुळे प्रत्येक बॉलला षटकार चौकार बरसतील अशी क्रिकेट रसिकांची अपेक्षा असेल. जलद गतीने धावा काढण्याचा नादात फलंदाजांनी झटपट विकेट्स गमावल्याचे ही या सामन्यांमध्ये पाहायला मिळू शकतं.
१४ जून २०२३ ते २८ जून २०२३ या कालावधीत दहा षटकांच्या फॉर्मेटमध्ये सामने खेळले जातील. या १२ दिवसात १९ सामने असतील. या स्पर्धेत सहा फ्रँचायझी असतील आणि प्रत्येक संघाची मालकी एका मोठ्या कॉर्पोरेट हाऊससह ए-लिस्ट बॉलीवूड सेलिब्रिटींच्या सह-मालकीची असेल. मनोरंजन आणि क्रीडा उद्योगातील तारे एकत्र येण्याने लीगची चमक आणि ग्लॅमर वाढली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे एकूण ९० माजी दिग्गज खेळाडू या सामन्यात लढणार आहेत. यात सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, मुरली विजय, हरभजन सिंग, युसूफ पठाण, इरफान पठाण, प्रग्यान ओझा, मोहम्मद कैफ आणि किरॉन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो, जॅक कॅलिस, इयॉन मॉर्गन, ख्रिस गेल, यांसारखे माजी भारतीय क्रिकेट स्टार्सचा समावेश आहे.
मुंबईतील लोअर परेल येथील सेंट रेजिस हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत, टी-१० स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे अध्यक्ष शाजी-उल-मुल्क म्हणाले, ‘दिग्गज मास्टर्सना गुंतवून ठेवणारा क्रिकेटचा टी-१० ब्रँड भारतात आणताना आम्हाला आनंद होत आहे. खेळाचा. १० षटकांच्या प्रति इनिंग फॉरमॅटचे वेगवान स्वरूप आणि मास्टर्सच्या कौशल्यासह आणि सेलिब्रिटींनी दिलेला आनंद यामुळे चाहत्यांना मनोरंजन मिळेल.’
भारतीय कसोटीपटू मोहम्मद कैफ म्हणाला, ‘हा एक रोमांचक आणि वेगवान फॉरमॅट आहे, जो आमच्यासारख्या माजी क्रिकेटपटूंना अनुकूल आहे. इथे खेळणार्या प्रत्येक खेळाडूचा दृष्टीकोन पहिल्या चेंडूपासूनच सिक्सर मारायचा प्रयत्न असतो त्यामुळे संपूर्ण स्पर्धेत भरपूर षटकार, विकेट्स आणि आश्चर्यकारक झेल चाहत्यांना पहायला मिळतील.’
याच प्रसंगी भारतीय खेळाडू रॉबिन उथप्पा म्हणाला, ‘मला वाटतं जेव्हा खेळातील दिग्गज एकत्र येतात आणि खेळतात तेव्हा खूप आठवणींना उजाळा दिला जातो आणि तुम्हाला नॉस्टॅल्जिक बनवतो. या इंडियन मास्टर्स टी-१० लीगचा एक भाग बनताना मला खूप आनंद होत आहे.’ टी-१० स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर राजीव खन्ना म्हणाले, ‘हे क्रिकेटचे सर्वात वेगवान स्वरूप आहे. हा खेळ फक्त ९० मिनिटे खेळला जातो, त्यामुळे या प्रकारच्या खेळाला पुढे जाऊन ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळू शकेल.’