वेगाने वाढणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या वॉचो या ओटीटीने ‘एक्सप्लोसिव्ह’ या मूळ क्राइम थ्रिलर मालिकेच्या प्रीमियरची घोषणा नुकताच केली. मालिकेचे मनोरंजक कथानक आणि आकर्षक पात्रे यामुळे यात गूढता, रहस्य, नाट्यमयता यांची भरमार असून हा जॉनर प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. ही कथा किरण नावाच्या मुलीभोवती फिरते, जी एका स्फोटकांनी भरलेल्या गाडीत चुकून प्रवेश करते. ती गाडी नीरव नावाचा दहशतवादी चालवत असतो. किरण व पोलीस शहरात साखळी बॉम्बस्फोट रोखण्याचा प्रयत्न कसा करतात ते या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. यात दोन दहशतवाद्यांना पकडण्यात पोलिसांना यश येते पण तरी तिसरा कोण ते कुणालाच ठाऊक नसते.
किरणला शहर आणि लाखो लोकांचे प्राण वाचविता येतील का, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना वॉचो एक्सक्लुझिव्ह पाहता येईल. तनिष्क राज आणि जागृती राजपूत यांच्या रुद्राक्षनमम् फिल्म्सने या वेबमालिकेची निर्मिती केली आहे, तर शौर्य सिंग यांनी या सीरिजला दिग्दर्शन दिले आहे. निबेदिता पॉल (किरण), मनमोहन तिवारी (नीरव) आणि सचिन वर्मा (इन्स्पेक्टर तेजस) यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.
– संदेश कामेरकर