• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

वात्रटायन

- श्रीकांत आंब्रे

Nitin Phanse by Nitin Phanse
March 2, 2023
in वात्रटायन
0

 

एकनाथ शिंदे

एकच होतं मनात माझ्या
सूड, सूड आणि सूड
म्हणूनच केली गद्दारी मी
भरल्या घराला लावली चूड

त्यांनी आमिष दावता
बनलो अलिबाबा
चाळीस चोरांसंगे
गाठला भाजप धाबा

त्यांनी केली कमाल
सीएम करून बसले
देवेंद्रांसह सारे
पोट धरून हसले

—– —– —–

देवेंद्र फडणवीस

शिवसेना फोडण्याचं
घेतलं होतं कंत्राट
आयोग होता सोबत
काम केलं भन्नाट

असली कामे करण्यात
पहिला माझा नंबर
दाढीवाल्यांना पटवून
टाकला मी बम्पर

चढलीय बघा आता
गालावर लाली
जनतेने फेकू नये
उंचावरून खाली

—– —– —–

नरेंद्र मोदी

बीएमसी जिंकली मी
राज्य जिंकतो आम्ही
सोन्याची कोंबडी ती
अंडी उबवू नामी

कोंबडी पकडताना
शिवसेना हाच फांदा
तिच्यामुळेच आहे
भाजपचा वांदा

म्हणून तिची करतोय
सगळीकडून कोंडी
मुंबईकरांना काय कळणार
आमची लबाडी

—– —– —–

अमित शहा

गरज असेपर्यंत
त्यांना वापरून घेऊ
कळणार नाही नंतर
कुठे फेकून देऊ

तोपर्यंत आमचे
चाटू दे तळवे
त्यांची नाटकं पाहून
नाही होणार हळवे

पत्थर का दिल मेरा
नाही फुटणार पाझर
घर का ना घाट का
रहेगा बेघर

—– —– —–

निवडणूक आयोग

पहिल्यापासून आम्ही
सरकारचे नोकर
मोदी-शहांचे तर
निष्ठावान चाकर

ते सांगतील ती ऑर्डर
प्रमाण आम्हाला
मर्यादा ओलांडून
लागलो कामाला

शिवसेना संपवणे
हेच होते काम
त्यासाठी मिळालाय
हवा तेवढा दाम

Previous Post

मराठीत शिकून जिंकली जर्मनी!

Next Post

वॉचो ओटीटीवर ‘एक्सप्लोसिव्ह’

Next Post

वॉचो ओटीटीवर ‘एक्सप्लोसिव्ह’

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.