• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

पत्रकारितेच्या प्रबोधनाची पार्श्वभूमी

- सचिन परब (प्रबोधन १००)

Nitin Phanse by Nitin Phanse
January 13, 2023
in प्रबोधन १००
0

प्रबोधनकारांच्या ‘प्रबोधन’ नियतकालिकाचा प्रभाव समजून घेण्यासाठी आपल्याला तोपर्यंतच्या पत्रकारितेचा प्रवाह समजून घ्यावा लागतो. विशेषतः त्यातला सत्यशोधक पत्रकारितेचा प्रवाह.
– – –

डॉ. जयसिंगराव पाटील आणि डॉ. रमेश जाधव यांनी `निवडक विजयी मराठा` या पुस्तकाच्या प्रस्तावनेत या काळातल्या मराठी वर्तमानपत्रांना पाच प्रवाहांमध्ये विभागलं आहे. `एक– केवळ लोकशिक्षण आणि मनोरंजनाचा वसा घेऊन सुरू झालेल्या बाळशास्त्री जांभेकरांच्या `दर्पण`पासून पहिला प्रवाह सुरू होतो. दोन– ब्राह्मणेतरांची दुःखे अधिक प्रभावीपणे वेशीवर टांगण्याची सामाजिक बांधिलकी मानून अवतरलेला कृष्णराव भालेकरांचा `दीनबंधु` आणि त्या परंपरेतली पत्रं. तीन– त्याआधीचा ख्रिश्चन धर्माचा प्रसार आणि प्रचार हेच उद्दिष्ट समोर ठेवून अस्तित्वात आलेला `ज्ञानोदय` आणि इतर ख्रिश्चन पत्रं. चार– केवळ राजकीय स्वातंत्र्य हाच ध्यास घेऊन जन्माला आलेला लोकमान्य टिळकांचा `केसरी` आणि त्या गटातली पत्रं. पाच– पाचवा प्रवाह म्हणून भाऊ महाजन यांचा `प्रभाकर` आणि गोपाळ गणेश आगरकरांचा `सुधारक` यांचा उल्लेख करता येईल.`
यात `प्रबोधन` कोणत्या प्रवाहातलं नियतकालिक आहे?
त्याला निर्विवादपणे यातल्या दुसर्‍या म्हणजे सत्यशोधकी प्रवाहातलं नियतकालिक मानायला हवं. पण त्याचबरोबर ‘प्रभाकर’ आणि `सुधारक` यांच्या समाजप्रबोधन करणार्‍या पत्रांच्या पाचव्या प्रवाहाशीही ते जोडलेले होते. प्रबोधनकारांवर सर्वाधिक प्रभाव असलेल्या लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची गाजलेली शतपत्रे ही `प्रभाकर`मध्येच प्रकाशित झाली होती आणि प्रबोधनकार आगरकरांचे कट्टर समर्थकही होते. त्याचबरोबर विदेशी ज्ञान देशबांधवांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आग्रही असणार्‍या दर्पणकारांच्या प्रवाहाचंही त्यांना वावडं नव्हतं. तसे लेख `प्रबोधन`मध्ये प्रकाशित झालेले आढळतात. मात्र `प्रबोधन` ख्रिश्चन पत्रांपासून फटकून राहतो आणि `केसरी` गटाच्या प्रवाहाच्या विरुद्ध दोन हात करताना दिसतो.
महात्मा जोतीराव फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्माच्या तत्त्वज्ञानाची प्रेरणा घेऊन सत्यशोधकी नियतकालिकांचा जोमदार प्रवाह सुरू झाला. आजही या विचारांची नियतकालिके प्रकाशित होतात. या प्रवाहाविषयी `सत्यशोधकीय नियतकालिके` या ग्रंथात डॉ. अरूण शिंदे लिहितात, `सत्यशोधक विचारांचा व चळवळीचा प्रचार, प्रसार करण्यासाठी १८७७ ते १९३० या काळात सुमारे साठहून अधिक नियतकालिके निघाली. या नियतकालिकांनी सत्यशोधकांचा लढा वैचारिक पातळीवर लढविला. तत्कालीन पांढरपेशांच्या नियतकालिकांपेक्षा सत्यशोधक चळवळीच्या नियतकालिकांची उद्दिष्टे, त्यांमधील लेखन, वाङ्मय व बातमीपत्रे पूर्णतः भिन्न होती. या नियतकालिकांमुळे बहुजन समाजाच्या पत्रकारितेची एक अत्यंत सकस व लोकनिष्ठ परंपरा मराठीत पहिल्यांदाच निर्माण झाली.`
या परंपरेची सुरुवात महात्मा फुलेंच्या हयातीतच झाली. त्यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी १ जानेवारी १८७७ला `दीनबंधु` हे सत्यशोधकी विचारांचं पहिलं नियतकालिक सुरू केलं. काही वर्षांचा खंड वगळता ते १९३३पर्यंत सुरू राहिलं. १९०८ ते १९३३ या काळात तानुबाई बिर्जे या विदुषींनी त्याचं संपादकपद भूषवलं. खुद्द जोतीरावांनी `सत्सार` नावाच्या अनियतकालिकाचे दोन अंक प्रसिद्ध केले. त्यानंतर भालेकरांचे भाचे गणपतराव पाटील यांच्या `दीनमित्र`ने ही लढाई पुढे नेली. पण गणपतराव यांचं अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी निधन झालं. कृष्णराव भालेकरांनी त्यांचा मुलगा गणपतरावांच्या पत्नीला दत्तक दिला. तेच दीनमित्रकार मुकुंदराव पाटील. भालेकरांनी गणपतरावांच्या मृत्यूमुळे बंद पडलेला `दीनमित्र` सुरू राहावा म्हणून १९१०ला अहमदनगर जिल्ह्यातल्या सोमठाणे इथे छापखाना थाटला. पण त्या धावपळीतच त्यांचं निधन झालं. तेव्हा त्यांनी तरूण मुकुंदरावांकडून वचन घेतलं की किमान बारा वर्षं तरी हे नियतकालिक सुरू ठेवशील. त्यानंतर अनेक संकटांना तोंड देत अत्यंत ध्येयनिष्ठेने त्यांनी १९६८पर्यंत सलग ५७ वर्षं `दीनमित्र` चालवलं. ज्या गावात एसटीही जात नव्हती, त्या तरवडी या गावातून सर्वस्व पणाला लावून `दीनमित्र` चालवताना विचारांवरची निष्ठा अढळ ठेवली. मृत्यूशय्येवर असताना वृत्तपत्र सुरू ठेवण्याचं वचन घेणार्‍या आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी एकहाती संघर्ष करणार्‍या या बापलेकांचं मराठी पत्रकारितेतलं महत्त्व सर्वोच्च मानावं लागेल.
`दीनबंधु`, `सत्सार`, `दीनमित्र` यांच्यापाठोपाठ आलेल्या सत्यशोधक चळवळीतल्या नियतकालिकांचा आढावा अरूण शिंदे यांच्या ग्रंथात आहे. त्यातली १९२१पर्यंत म्हणजे `प्रबोधन`च्या पहिल्या अंकापर्यंतची नियतकालिकं अशी- गुलाबसिंह कौशल यांचं `राघव भूषण` (स्थापना वर्ष १९८८), कृष्णराव भालेकरांचं `अंबालहरी` (१८८९), दामोदर सावळाराम यंदे आणि संतुजी आवटे यांचं `शेतकर्‍याचा वैâवारी` (१८९२), भास्करराव जाधव यांचं `मराठा दीनबंधु` (१९०२), बळवंत पिसाळ यांचं `विश्वबंधु` (१९११), कृष्णाजी चौधरी यांचं `सत्योदय` (१९१५), वा. रा. कोठारी यांचं `जागरूक` (१९१७), भगवंतराव पाळेकर यांचं `जागृति` (१९१७), अण्णासाहेब लठ्ठे यांचं `डेक्कन रयत` (१९१६), नारायण विभुते यांचं `सत्यप्रकाश` (१९१९), श्रीपतराव शिंदे यांचं `विजयी मराठा` (१९२५), बाबूराव कैवारी यांचं गरिबांचा `कैवारी` (१९२०), दत्तोजीराव कुरणे यांचं `भगवा झेंडा` (१९२०), सखाराम सावंत आणि दिनकरराव जवळकर यांचं `तरूण मराठा` (१९२०), शामराव भोसले आणि सहकार्‍यांचं `राष्ट्रवीर` (मे १९२१). याचा अर्थ `प्रबोधन`ची सुरवात होईपर्यंत सत्यशोधकी नियतकालिकांचा प्रवाह महाराष्ट्राच्या गावागावांत प्रभाव टाकू लागला होता. प्रामुख्याने छत्रपती शाहू महाराज आणि महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या राजाश्रयामुळे या नियतकालिकांची संख्या सतत वाढत होती. महात्मा फुलेंच्या शिकवणुकीला अनुसरून ही नियतकालिके समता, बंधुता आणि बुद्धिप्रामाण्य या तत्त्वांचा प्रसार करत होती. शेतकर्‍यांना सावकारांच्या, धर्माला पुरोहितशाहीच्या, देवाला पुजार्‍यांच्या आणि समाजाला अंधश्रद्धेच्या जोखडातून सोडवण्यासाठी त्यांचा लढा होता. अस्पृश्यता आणि जातिभेदाचं उच्चाटन, धर्मचिकित्सा, इतिहासाचं पुनर्लेखन, स्त्रीपुरुष समानता असे अनेक महत्त्वाचे विचार ती मांडत होती. वैचारिक दृष्टीने पाहता प्रबोधनकार याच प्रवाहातले होते. पण तरीही त्यांनी सत्यशोधकी विचारांपेक्षा वेगळी मतंही `प्रबोधन`मध्ये मांडली. त्याचा संदर्भ घेऊन अरूण शिंदे सत्यशोधकी नियतकालिकांच्या प्रवाहामधलं `प्रबोधन`चं स्थान निश्चित करताना सांगतात, `हाडाचा पत्रकार असणार्‍या के. सी. ठाकरे यांनी `प्रबोधन`मधून सत्यशोधक चळवळीस पूरक भूमिका घेतली. सत्यशोधक समाजाच्या विचारानुरूप लेखन केले. सत्यशोधक–ब्राह्मणेत्तर चळवळीतील दोषांवर कडक टीका करून चळवळ निकोप होण्यासाठी प्रयत्न केले. के. सी. ठाकरे व `प्रबोधन` पूर्णतः सत्यशोधकी मतांचे नसले तरी त्यांची भूमिका व कार्य सत्यशोधक चळवळीला प्रेरक, प्रोत्साहक व दिशादर्शक ठरले, हे निर्विवाद!`
`प्रबोधन`चा पहिला अंक १६ ऑक्टोबर १९२१ला प्रसिद्ध झाला. त्या पहिल्या अंकाचं वर्णन करायचं झालं तर ती साधारणपणे ए फोर म्हटलं जातं अशा आकाराची आठ पानं होती. पहिल्या पानावर `प्रबोधन` असं लिहिलेला ठसठशीत लोगो आहे. त्या अक्षरांच्या मागे सूर्य उगवताना दिसतोय. सूर्याच्या बरोबरच एका बाजूला शाईची दौत आणि कलम, तर दुसर्‍या बाजूला तलवार दाखवलीय. लोगोच्या खाली अगदी बारीक अक्षरात वैद्य अशी इंग्रजी सही आहे. वार्षिक वर्गणी अडीच रुपये आणि किरकोळ अंकाची किंमत दोन आणे आहे. लोगोच्या खाली इंग्रजीत `प्रबोधन`च्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. PRABODHAN – A Fortnightly Journal Devoted to the Social, Religious and Moral Regeneration of the Hindu Society. त्याखाली स्वामी विवेकानंदांनी प्रसिद्ध केलेलं उपनिषदांमधलं सूत्र आहे, उत्तिष्ठितजाग्रत प्राप्य वरान्निबोधत. त्याखाली व्हॉल्यूम १. वर्ष १ले. नं.१. अंक १ला अशी नोंद आहे. छापण्याचं ठिकाण दादर– मुंबई असं लिहिलंय. तारीख अशी लिहिलीय. १६ ऑक्टोबर १९२१. श्रीशिवराज शक २४८. त्या काळात प्रचलित असणारा शालिवाहन शक आणि त्याची तिथी लिहिलेली नाही.
पहिलं सगळं पान त्या वेळच्या पद्धतीनुसार जाहिरातींनी भरलेलं आहे. त्यात विशेष म्हणजे कोलकात्याच्या इंडियन
रॅशनलिस्टिक सोसायटीची जाहिरात आहे. त्या जाहिरातीत संघटनेचं सदस्य बनण्याचं तसंच प्रकाशनं विकत घेण्याचं आवाहन आहे. त्याशिवाय परळच्या स्टार फार्मसीचं स्टार एग्युमिक्श्चर, दादरच्या मनोहर कंपनीचा निलगिरी चहा, त्याच कंपनीचा हनुमान बार सोप, राजाराम लिखिते यांनी छापलेली पुस्तकं यांच्या जाहिराती आहेत. तळाला प्रिंटलाईन आहे, Printed by C. S. Deole, at the Bombay Vaibhav Press, Servants of India Society’s Home, Sandhurst Road, Girgaon, Bombay. Published by Keshav Sitaram Thackeray, 20, Miranda’s Chawl, Lady Jamshetji Road, Dadar, Bombay.
दुसर्‍या पानापासून दोन उभ्या कॉलमातला मजकूर सुरू होतो. त्यात `प्रबोधनाचे ध्येय` हा पहिला लेख एका पानापेक्षा थोडा मोठा आहे. लागूनच गो. म. चिपळूणकर यांचा `विसाव्या शतकांतील सामाजिक व धार्मिक सुधारकांची कर्तव्ये` हा लेख आहे. त्याचा आकारही पहिल्या लेखाइतकाच आहे. त्यानंतर येणारा अग्रलेख `उत्तिष्ठितजाग्रत प्राप्य वरान्निबोधत` या ब्रीदवाक्यालाच मथळा करणारा आहे. तो साधारण अडीच पानांचा आहे. त्यानंतर कोणाचंही नाव नसलेले एकेका पानाचे दोन लेख आहेत. पहिल्या लेखात पार्वतीबाई आठवले यांच्या अमेरिका दौर्‍याचा गौरव आहे. त्या महर्षी कर्वेंच्या महिला शिक्षण संस्थेसाठी निधी गोळा करण्यासाठी अमेरिकेला गेलेल्या आहेत. पाठोपाठ विविधज्ञानविस्तारावर दमदार टीका केलीय. त्या काळाच्या पद्धतीनुसार लेखकाचं नाव नसलेले लेख संपादकाने लिहिलेले मानले जात.
अंकाच्या शेवटी वर्गणीदारांना वर्गणी आणि पोस्टाच्या व्यवहाराविषयी एक छोटं विनंतीवजा आवाहन केलेलं आहे. पहिल्याच अंकात प्रबोधनकारांनी अंक काढण्यामागची भूमिका स्पष्ट केलीय. शिवाय महिला सक्षणीकरणासारखा विषय हाताळून आपले अग्रक्रम सांगितलेत. तसंच ब्राह्मणी वर्तमानपत्रांना उत्तर देण्याची तयारीही दाखवून दिलीय. साधारणपणे पुढची दोन वर्षं `प्रबोधन`चं स्वरूप अशाच प्रकारचं आहे.

Previous Post

यंदा संक्रांतीचे वाहन : बुजगावणे

Next Post

गरिबांनो, शिकू नका, गुलाम बना!

Related Posts

प्रबोधन १००

सुंदराबाईंचा पर्दाफाश

May 22, 2025
प्रबोधन १००

`प्रबोधन’मधील श्रीधरपंत टिळक

May 8, 2025
प्रबोधन १००

खरा लोकमान्य

May 5, 2025
प्रबोधन १००

सहभोजनाची क्रांती

April 25, 2025
Next Post
गरिबांनो, शिकू नका, गुलाम बना!

गरिबांनो, शिकू नका, गुलाम बना!

आला थंडीचा महिना

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025

राशीभविष्य

May 22, 2025

तोमार बाबा

May 22, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.