• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

वात्रटायन

- श्रीकांत आंब्रे

Nitin Phanse by Nitin Phanse
November 24, 2022
in वात्रटायन
0

 

एकनाथ शिंदे

पोलीस महिलांच्या काळ्या ओढण्या
जेव्हा मला खटकल्या
क्षणार्धात मी हुकूम दिला
आणि ओढण्या सटकल्या

माझी दाढी असली काळी
तो तर असतो हेअर डाय
आतून पांढरी शुभ्र असते
कोणालाच कळत नाय

मुलेही म्हणतात पांढरे कपडे
किती तुम्हाला खुलून दिसतात
काळी कट-कारस्थाने बघता
नंतर लोक कसे फसतात

——- —– —–

देवेंद्र फडणवीस

कधी कधी मला वाटतं
आपणही वाढवावी दाढी
त्यांच्यापेक्षा चिकना दिसेन
आणखी सुसाट धावेल गाडी

अमोल कोल्हेपेक्षा करीन
महाराजांची भूमिका चांगली
तलवारबाजी शिकून घेईन
पिक्चर करीन सिल्व्हर ज्युबिली

मुख्यमंत्री होण्यासाठी
एक तरी पिक्चर गाठी हवा
इमेज किती विशाल होते
पडला डोक्यात प्रकाश नवा

—– —– —–

किरीट सोमय्या

ईडी पुरी पडत नाय
दुसरा कायतरी काडला पायजे
दिल्लीत जाऊन घेतो सल्ला
अ‍ॅटम एकदम पेशल पायजे

एवढे पुरावे गोळा करून
माझे आरोपी सुटतात कसे?
लोक मलाच वेडा म्हणतात
माझेच कसे होते हसे?

खोटे आरोप करणेसुद्धा
साधेसुधे काम नाय
अनुभवाने सांगतो पुन्हा
डोक्यात होतो भेजा फ्राय

—– —– —–

अमृता फडणवीस

मी तर पक्की ब्राह्मणवादी
सांगायला डरत नाही
सर्व कलांत आमचा हात
राजकारणही अपवाद नाही

मी तर त्यांच्या मागे ठाम
त्यांना सगळी मदत करीन
ते सीएम होईपर्यंत
त्यांना फुग्यासारखे धरीन

शेवटी मी तर आहे अ‍ॅक्ट्रेस
गाणेसुद्धा सुंदर गाते
जे जे बहिरे चाहते माझे
त्यांना सुद्धा ऐकू येते

—– —– —–

आशिष शेलार

मी नेहमी शोधत असतो
भाजपसाठी नवा अजेंडा
दर दिवशी काढतो हुडकून
मिळतो मला नवा फंडा

शिवसेनेला संपवणे तर
आता माझे उरले काम
त्याच्यासाठी रोज बडबड
रोज शोधतो नवा बॉम्ब

पालिकेची जबाबदारी
पक्षाने सोपवली हाती
त्याच्यासाठी गरळ ओकून
पडेल पुण्य माझ्या माथी

Previous Post

स्वप्नांची ओझी लादू नका…

Next Post

नारद मुनींची चौफेर नजर

Next Post

नारद मुनींची चौफेर नजर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.