• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    पप्पू पास, चाणक्य फेल!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    मोदींच्या अहंकाराचे स्मारक

    मोदींच्या अहंकाराचे स्मारक

    शिवासिद्धाची भक्कम जोडी

    शिवासिद्धाची भक्कम जोडी

    कमळासुराच्या नि:पाताची सुरुवात कर्नाटकातून!

    लोकशाहीचे मृत्यूपत्र फाडा!

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर

    नवीन पुस्तके, नवीन वर्ष…

    प्री-पेड टास्क फ्रॉड

    बघा नीट, येईल झीट

    डीपफेक : सत्य-असत्याच्या रेषा धूसर

    बॉक्स कार्टून : मूर्ती लहान पण…

    Trending Tags

  • मनोरंजन

    नृत्यनाट्याचा शैलीप्रधान आविष्कार!

    इतिहास व कल्पना यांचा रंजक मेळ

    मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो

    मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो

    सार्वकालिक ‘मेरे अपने’…

    सार्वकालिक ‘मेरे अपने’…

    ‘स्पायडर-मॅन : अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ १ जूनला

    ‘स्पायडर-मॅन : अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ १ जूनला

    बोक्याने बाजी मारली!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    पप्पू पास, चाणक्य फेल!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    मोदींच्या अहंकाराचे स्मारक

    मोदींच्या अहंकाराचे स्मारक

    शिवासिद्धाची भक्कम जोडी

    शिवासिद्धाची भक्कम जोडी

    कमळासुराच्या नि:पाताची सुरुवात कर्नाटकातून!

    लोकशाहीचे मृत्यूपत्र फाडा!

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर

    नवीन पुस्तके, नवीन वर्ष…

    प्री-पेड टास्क फ्रॉड

    बघा नीट, येईल झीट

    डीपफेक : सत्य-असत्याच्या रेषा धूसर

    बॉक्स कार्टून : मूर्ती लहान पण…

    Trending Tags

  • मनोरंजन

    नृत्यनाट्याचा शैलीप्रधान आविष्कार!

    इतिहास व कल्पना यांचा रंजक मेळ

    मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो

    मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रावरंभा’चा विशेष शो

    सार्वकालिक ‘मेरे अपने’…

    सार्वकालिक ‘मेरे अपने’…

    ‘स्पायडर-मॅन : अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ १ जूनला

    ‘स्पायडर-मॅन : अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ १ जूनला

    बोक्याने बाजी मारली!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result
Home भाष्य

नारद मुनींची चौफेर नजर

- ज्ञानेश सोनार (इतिहास्य)

Nitin Phanse by Nitin Phanse
November 24, 2022
in भाष्य
0
Share on FacebookShare on Twitter

मागच्या आठवड्यात १७ नोव्हेंबरला आदरणीय शिवसेनाप्रमुख आणि थोर व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. त्यांच्या मुलाबाळांपासून आणि निष्ठावान शिवसैनिकांपासून त्यांना सध्या हिरावून घेण्यात आलं आहे. अर्थात हा आभास आहे, चंद्रग्रहणासारखा, काही काळ टिकणारा. उभ्या महाराष्ट्रात त्यांची आदरयुक्त जरब होती. कुठलंही जरबेचं राजकारण न करता केवळ ब्रशच्या फटकार्‍यांनी ते अनेकांना घाम फोडायचे. हे आठवल्यावर मला ‘आवाज’मधलं माझंच एक चित्र आठवलं. मराठेशाहीत संताजी धनाजी या मराठी मावळ्यांनी अनेक मोगलांत दहशत निर्माण केली होती. अक्षरश: त्यांनी धसका घेतला होता. वाटेतल्या ओहोळावर जर घोड्यांनी पाणी प्यायचं नाकारलं तर ते आपसात म्हणत, घोडी का बिथरलीत? त्यांना पाण्यामध्ये संताची धनाजी तर दिसत नाहीत ना! अशीच दहशत बाळासाहेबांबद्दल वाटे. ती मी त्या चित्रात चितारली होती.
अनेकदा वाचक विचारतात, ‘तुम्हाला चित्रं सुचतात कशी?’ लहरीने जगणारे कलावंत वेगळे. व्यावसायिक कलावंत वेगळे. व्यंगचित्रकार हा पेशा पत्करल्यामुळे दैनिकाची असोत, वा दिवाळी अंकाची, चित्रं वेळेवर द्यावीच लागतात. गावकरीत बॉक्स कार्टून द्यायचो, त्यावेळी त्यांचा शिपाई रोज नियमाने सहा वाजता हजर व्हायचा. जवळपास तीस वर्षं. नंतर ऑनलाइनची सोय झाली. मात्र कल्पना सुचण्यासाठी एकांत लागतो. वाचन, मनन, चिंतन याबरोबर नारद मुनींची चौफेर, तिन्ही लोकांत भ्रमण करणारी नजर हवी असते. भूत-भविष्याचा, वर्तमानाचा वेध घ्यावा लागतो. सर्व हौसमौजेला फाटा द्यावा लागतो. त्यामुळेच लाखाच्या वर व्यंगचित्रे मी काढू शकलो. मात्र आजूबाजूच्या आयाबायांमध्ये माझी ओळख वेगळीच होती. गेली तीसेक वर्षे माझ्या बंगल्यात झोपाळा टांगलेला आहे. सकाळ संध्याकाळ मी त्यावरच बसून मंदसा झोका घेत राही. तेथे बसूनच मला कल्पना सुचत. विशेषत: दिवाळी अंकाच्या खिडक्या, चित्रमाला, जाहिरातींची चित्रे. जाणार्‍या-येणार्‍यांना वाटे, हा कोणीतरी मंदबुद्धी माणूस वा रिकामटेकडा येडा असावा. आजूबाजूच्या बायका वा मिसेसच्या मैत्रिणीदबक्या आवाजात विचारत, काय हो, सोनार काका कुठे नोकरीला जात नाहीत का?
मिसेस सांगे, ते व्यंगचित्रकार आहेत. चित्रे काढतात. ते ठीक, पण पोटपाण्याचे काय? शिवाय, गाडी, बंगला सगळं काही जिथल्या तेथे दिसते? बरे तसे सज्जन वाटतात. बरेच उच्चभ्रू लोकही तुमच्याकडे येत असतात. हे कसे? चित्रे काढून सुखात जगता येते हे लोकांना ठाऊकच नव्हते.
आता चित्रमालेची प्रोसेस सांगतो. उदाहरणार्थ मत्स्यकन्या हा विषय घेऊ. खरे तर मत्स्यकन्या अस्तित्वात आहेत की नाही हेच अजून निश्चित व्हायचं आहे… हिममानव, परग्रहावरील तबकड्यांप्रमाणे. पण सगळ्या जगाला अजून कुतूहल आहेच. त्यावर अनेक अंगांनी विचार करीत राहायचे. आठ चित्रे सुचेपर्यंत. वेळोवेळी कशी चित्रे सुचलीत, त्याचे नमुने पहा. सध्या संपूर्ण उघडी पाठ दाखवणारे ब्लाऊज आले आहेत. लांबून पाहिले तर पाठ व काळे निळे डाग दिसतात. नीट पाहिलं, तर त्याला टॅटू म्हटलं जातं. शक्यतो ते दुरूनच पहावेत. कारण कधी विनयभंगाचा आरोप होईल याचा नेम नाही. अशीच उघडी पाठ १९७०च्या दरम्यान इंट्रोड्यूस झाली होती. त्यावर मी मुखपृष्ठ काढलं होतं, एक मंत्री फोटोग्राफरकडे पाहात उद्घाटनाची रिबन कापण्याऐवजी ब्लाऊजच्या गाठीकडे नकळत कात्री नेतोय.
चित्र छापून आल्यावर एका प्रमदेने मला पत्र लिहिले, तरुणींचा अपमान करणारी अशी चित्रे आपण काढताच कशी?
त्यावर मी लिहिले की, ‘अशा तरुणी पाहूनच. फॅशन आपण करता, मी फक्त चित्र काढलं, कपडे कसे नसावेत ही चूक दाखवली इतकेच.’
या फॅशनची उबळ पुन्हा आता या काळात नव्याने आली आहे. त्यावरच अलीकडचं एक चित्र.
गावकरीतील तीन कॉलमी चित्रं काही वेळेला खूप वाहवा मिळवून जायची. त्यातले एक आठवते. ते असे- १९६०-७०च्या दशकात रशिया आणि अमेरिका हे अत्यंत प्रभावी शत्रू मानले जायचे. ते व्हेटो वापरून एकमेकांना नामोहरम करण्याची संधी सोडायचे नाहीत. त्यांच्या या अरेरावीला कंटाळून युनोचे सरचिटणीस यू थांट यांनी राजीनामा दिला. थांट यांचा लौकिक फार प्रतिष्ठेचा होता. ते अत्यंत कार्यक्षम होते. जगाने त्यांच्या राजीनाम्याला विरोध केला. पण ते निर्णयावर ठाम होते. त्यावर मी चित्र काढलं, युनोमधून U (यू थांटचा यू) गेला की खाली काय उरणार फक्त NO वाचकांना चित्र खूप आवडलं. इतकं की काहींनी कॉमेंट्स केल्या की तुमचं चित्र पाहून थांट यांनी राजीनामा मागे घेतला आहे.
असेच एक चित्र. पुण्याच्या जोशी-अभ्यंकर खून खटल्याचं. खुनी तरुणांनी गळा आवळण्यासाठी नायलॉनच्या दोर्‍या वापरल्या होत्या. त्यांना फाशीची सजा झाली, तेव्हा फाशीच्या दोरखंडाला त्यांनी विरोध केला. (म्हणे गळ्याला त्याचा त्रास होईल.) कोर्टाला प्रश्न पडला. कारण आजपर्यंत फाशीचा दोरच प्रमाण मानला गेला आहे. पुन्हा तारीख पे तारीख. शेवटी खंडपीठाने दोरानेच फाशी देण्याचा निर्णय कायम केला. असो! मंगेश तेंडुलकर यांच्या चित्रमाला मला खूप आवडायच्या. एक चित्र आठवलं की हसू येतं. हातभट्टीचा सेटअप असलेला बाप नापास झालेल्या पोराच्या कानफटात देतो. त्याचे प्रगतीपत्रक पाहताना म्हणतो, इतर विषयांत नापास झालास हे समजू शकतो, पण निदान रसायनशास्त्रात तू नापास व्हायला नको होतंस!’
वीस-पंचवीस वर्षांपूर्वी दिवाळी अंक, दैनिके, मासिके निवांतपणे पाहता यायची. काळापांढरा टीव्ही अँटिनाच्या मर्जीवर खरखरत मन:स्ताप देत दिसायचा. एक पोरगं अँटिना अ‍ॅडजस्ट करण्याकरता सतत गच्चीवर लोंबकळत असायचं. दूरदर्शनवरचे माफक कार्यक्रम आनंद द्यायचे. हमलोग, बुनियाद, रामायण, महाभारत यांसारख्या सिरीयल्स घरदार पाहत बसायचं… हा हा म्हणता चॅनल्सची सुनामी आली आणि दाही दिशांनी कंठाळी, आक्रस्ताळी लाटांनी जगाचे मन:स्वास्थ पार बुडवून टाकलं. इत्यलम!

Previous Post

वात्रटायन

Next Post

बाळासाहेबांना मानवंदना!

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर

June 3, 2023
भाष्य

नवीन पुस्तके, नवीन वर्ष…

June 3, 2023
भाष्य

प्री-पेड टास्क फ्रॉड

June 3, 2023
भाष्य

बघा नीट, येईल झीट

June 3, 2023
Next Post

बाळासाहेबांना मानवंदना!

मी इथे आहे, मी तिथे कसा जाऊ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

December 11, 2020
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर

June 3, 2023

दोन हजारी अमर रहे!

June 3, 2023

राशीभविष्य

June 3, 2023

नवीन पुस्तके, नवीन वर्ष…

June 3, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर

June 3, 2023

दोन हजारी अमर रहे!

June 3, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.