तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनन या बॉलिवुडच्या तीन सुंदर लीडिंग लेडीज ‘दी क्रू’ या कॉमेडी सिनेमाच्या निमित्ताने पडद्यावर प्रथमच एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती ‘वीरे दी वेडिंग’च्या सुपरहिट निर्मात्या एकता कपूर आणि रिया कपूर यांनी केली आहे. यावेळी त्या प्रेक्षकांना ड्रामा आणि कॉमेडीचा डोस देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. संघर्ष करणाऱ्या एअरलाइन उद्योगाच्या पार्श्वभूमीवर आधारलेला हा सिनेमा एक मजेशीर कॉमेडी आहे. या चित्रपटात तीन महिला स्वतःला सिद्ध करण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसतील. परंतु त्यांच्या नशिबाने अनोखी परिस्थिती निर्माण होते आणि ते खोट्याच्या जाळ्यात अडकतात. यामुळेच हा सिनेमा विनोदाने भरपूर आहे. निर्माती एकता कपूर म्हणाली, ‘वीरे दी वेडिंग’च्या यशानंतर आम्ही बालाजी मोशन पिक्चर्स आता रिया कपूरसोबत आणखी एका चित्रपटासाठी काम करायला एकत्र आलो आहोत. तब्बू, कृती सेनॉन आणि करीना कपूर ‘दी क्रू’ या सिनेमासाठी योग्य असून, हा चित्रपट अतिशय मनोरंजक आहे याची मी खात्री देते.” दुसरीकडे निर्माती रिया कपूर म्हणाली, माझ्या पुढच्या चित्रपटासाठी या तीन सुंदर, प्रतिभावान कलाकारांना आणणे हे माझे स्वप्न होते. ते आता साकार होतेय. मी याबाबत उत्साहित आहे आणि चित्रीकरण सुरू होण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. ‘वीरे दी वेडिंग’नंतर मी एकतासोबत दुसऱ्यांदा काम करतेय, असेही तिने स्पष्ट केले.