काहीतरी धाडसी करामतींची दृश्यं जाहिरातीत दाखवायची आहेत? मग त्यात ते धाडस करणारा हमखास पुरुषच दाखवला जातो. मोटारगाड्यांची जाहिरात असेल तर गाडी तुफानी वेगानं चालवणारा पुरुषच दिसतो. जाहिरातीत स्त्रिया दिसतात पण त्या सहसा साबण किंवा शांपूची जाहिरात करताना आंघोळ करत असतात, लहान मुलांना दोन मिनिटात काहीतरी करुन खायला घालतात, त्यांचे कपडे वॉशिंग मशिनमध्ये टाकतात किंवा घरादाराच्या आरोग्यासाठी कुठलंसं आरोग्यकारक तेल वापरत असतात.
– – –
‘मां के हाथ का बनाया हुआ खाना…’ हा परमोच्च आनंद असं समीकरण जगभरात रुजवण्यामागे जाहिरातींचा मोठा हात आहे. घरच्यांच्या गरजा पुरवण्यासाठी सदैव सज्ज असणारी गृहिणी कायम आदर्श मानली जाते. तसंच ती स्वत: केलेले पदार्थ स्वत: खातानाही जाहिरातीत फारशी दिसत नाही. अर्थार्जन करणारे बर्याचवेळा पुरुष असतात. नवरे फक्त विशेष प्रसंगी आपलं पाककौशल्य दाखवतात. रोज स्वयंपाक करायची वेळ आली तर थातुरमातुर पदार्थ, जोक्स सांगून पुरुष वेळ निभावून नेतात. घरातला पुरुष, उदाहरणार्थ, वडिल काहीतरी खाद्यपदार्थ तयार करत आहेत असं दृश्य १००० पैकी एका जाहिरातीत दिसतं. काही जाहिरातींमध्ये वडिल मुलांची काळजी घेतानाही दाखवले जातात. पण त्यांचं प्रमाणही नगण्य दिसतं.
—
‘गोल्डन आय’ हा जेम्स बाँडचा १९९५ सालचा सतरावा चित्रपट आणि बाँडच्या चित्रपटातल्या नायिकेला प्रेक्षणीय दिसण्यापलीकडे ‘काहीतरी बुध्दिमान कामही करता येतं’ असं दाखवलं गेलेला पहिला चित्रपट. यातली नायिका कम्प्युटर प्रोग्रॅमर असते. (तरीही तिला पासवर्ड आठवायला अखेरीस बाँडची मदत लागतेच म्हणा..) १८९५ साली जगातला पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र जगभर गाजणार्या जेम्स बाँडसारख्या साहसपटांमध्ये नायिकेला बुध्दिमान दाखवायला १०० वर्षं जावी लागली हे भयावह वास्तव आहे. हे झालं चित्रपटांचं. जाहिरातीत पहायला गेलं तर ‘खेळताना, नृत्य करताना ती
कॉलेज तरुणी भासते. पण अचानक हाक ऐकू येते.. ‘मम्मी’.. आजूबाजूचे सगळे अचंबित.. असं तारुण्य टिकवणार्या साबणाच्या जाहिराती खूप लोकप्रिय आहेत. पण पुरुषांनी असं सदाबहार तारुण्य टिकवावं असं सांगणार्या जाहिराती सहज आठवतात का?
तरुण, आकर्षक दिसणं, घरकाम करणं, जमलं तर नवर्याच्या कामाला हातभार लावण्यासाठी गणवेश शिवण्याचं काम करणं, कपड्यांवरचे आणि टेबलक्लॉथवरचे डाग शोधणं, पाणी आणण्यासारखी कामं करणं, सगळ्यांना माफ करणं, सोशिक असणं, कर्तव्यदक्ष असणं, सासूशी किंवा सुनेशी भांडण करणं, मैत्रिणींचा हेवा करणं आणि कारस्थानं रचणं, मुलांची जबाबदारी घेणं.. ही सगळी कामं स्त्रियांनी करावीत असे चित्रपट, टीव्ही मालिका आणि जाहिराती यांचा आपल्यावर भडिमार होत असतो.
—
आई स्वयंपाकघरात चिकनचा खाद्यपदार्थ तयार करते आहे. मुलगा प्रेक्षकांसमोर येऊन म्हणतो, ‘आईच्या हातचा हा पदार्थ माझ्या वडिलांना फार आवडतो’. अशी दृश्यं जाहिरातींमध्ये कायम दिसतात. चॉकोलेटससारखे गोड पदार्थ, शाकाहारी पदार्थ, भाज्या, फळं, फळांचे रस अशा जाहिरातींमध्ये स्त्रिया ते पदार्थ खाता/पिताना दिसतात. पण मांसाहारी पदार्थांच्या जाहिरातीत स्त्रिया सहसा ते पदार्थ खाताना दिसत नाहीत. याचं महत्वाचं कारण म्हणजे पूर्वीपासून, मांस विशेषत: रेड मीट हे पुरुषप्रधान संस्कृतीशी जोडलेलं दिसतं.
मांस खाण्याचा संबंध लैंगिक उत्तेजन आणि आक्रमकता यांच्याशी आहे. भरपूर प्रमाणात मांसाहार करणं म्हणजे पुरुषासारखं– ‘मॅनली’ खाणं असं जवळपास सर्व संस्कृतींमध्ये मानलं जातं. पुरुष जेव्हा संपूर्ण शाकाहारी असतो तेव्हा त्याला बायल्या म्हणून हिणवलं जातं. शाकाहारी पुरुषांचं वागणं स्त्रियांसारखं म्हणजे संवेदनाशील, दुबळं आणि भावनाप्रधान असतं असंही मानलं जात होतं.
स्त्रियांनी उपास करणं, शाकाहार करणं, भाज्या आणि गोड पदार्थ खाणं यावरुन त्यांना पूर्वीपासून निरनिराळ्या संस्कृतींमध्ये संत ठरवलं जात होतं. शाकाहार करणारे शुद्ध, लैंगिक वासनांचं प्रमाण कमी असलेले आणि देवदूतासारखे (एंजल) मानले जात होते. आजही अशा प्रकारे ब्रँडिंग होत असतंच. आजही आफ्रिका, अमेरिका, आशिया, युरोप या खंडांमध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया मांसाहार कमी करतात. पाश्चात्य देशांमध्ये स्त्रियांनी शाकाहारी असण्याचं प्रमाण पुरुषांनी शाकाहारी असण्याच्या प्रमाणाच्या दुप्पट आहे. अल्कोहोलच्या जाहिरातीत मात्र जास्त प्रमाणात पुरुष दाखवले जातात. ते एकटे, स्वतंत्र असतात. त्यांना हवं असेल ते, हवं तेव्हा खाऊनपिऊन ते ऐश करताना दिसतात.
—
जाहिरातीतल्या स्त्रिया कायम टेबल सजवणं, किराणा खरेदी करणं, मुलांना आणि कुटुंबाला उत्तमोत्तम पदार्थ करुन खाऊ घालणं, काळजी घेणं, मुलांना परीक्षेत कमी मार्क पडले तर त्यांना काय खायला/प्यायला द्यावं याची चिंता करणं, मुलं जर क्रीडाप्रकारात/नृत्यात/संगीतात प्रवीण हवी व्हायला हवी असतील तर त्यांना योग्य तो पोषक आहार देणं ही कामं करत असतात. स्वयंपाकघरातलं किंवा वस्तू स्वच्छ करण्याचं दृश्य आलं तर तिथे पुरुष हमखास नसतात. घरातल्या इतरांची काळजी घेणं म्हणजे सगळ्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेणं हे सर्वात महत्वाचं आहे आणि ते काम स्त्रियांनीच करायला हवं असं आजही मानलं जातं. हेच त्या जाहिराती दाखवत असतात. आईनं मुलांना उत्तमोत्तम खाद्यपदार्थ करुन घालणं हे त्यांचं परमकर्तव्य मानलं जातं. नवरा आणि बायको दोघंही कामं करत असले तरी घरकाम हा स्त्रियांचा प्रांत मानला जातो. घरची दैनंदिन कामं आणि जबाबदारी कायम स्त्रियांकडे असते. घरी बनवलेलं अन्न म्हणजे आनंद. यातूनच घरी आईनं/बायकोनं केलेले खाद्यपदार्थ आणि आनंद, तृप्ती या भावना जाहिरातींमधून कायम जोडल्या जातात.
‘मां के हाथ का बनाया हुआ खाना..’ हा परमोच्च आनंद असं समीकरण जगभरात रुजवण्यामागे जाहिरातींचा मोठा हात आहे. घरच्यांच्या गरजा पुरवण्यासाठी सदैव सज्ज असणारी गृहिणी कायम आदर्श मानली जाते. तसंच ती स्वत: केलेले पदार्थ स्वत: खातानाही जाहिरातीत फारशी दिसत नाही. अर्थार्जन करणारे बर्याचवेळा पुरुष असतात. नवरे फक्त विशेष प्रसंगी आपलं पाककौशल्य दाखवतात. रोज स्वयंपाक करायची वेळ आली तर थातुरमातुर पदार्थ, जोक्स सांगून पुरुष वेळ निभावून नेतात.
घरातला पुरुष, उदाहरणार्थ, वडील काहीतरी खाद्यपदार्थ तयार करत आहेत असं दृश्य १०००पैकी एका जाहिरातीत दिसतं. काही जाहिरातींमध्ये वडील मुलांची काळजी घेतानाही दाखवले जातात. पण त्यांचं प्रमाणही नगण्य दिसतं.
—
जाहिरातीत स्त्रियांना दुय्यम भूमिकेत दाखवलं जातं. तिला जे जमत नाही ते कसं करावं या सूचना देणारा पुरुष अनेकदा दिसतो. पुरुष स्वतंत्र, बुध्दिमान, कष्टाळू, व्यावसायिक, निर्णयक्षम, ज्यांच्या मुलाखती घेतल्या जातात असे सेलिब्रिटीज या स्वरुपात दिसतात.
मोटारगाड्यांच्या जाहिरातीत गाडी चालवणारा अनेकदा पुरुष असतो. थोडक्यात गाडी चालवणं हे पुरुषांचं काम आहे असं दिसतं. भारतापुरतं पाहिलं तर दोनचाकी गाड्यांच्या जाहिरातीत मात्र स्त्रिया दिसतात. मोटारगाडी चालवणं हे पुरुषांचं आणि दोनचाकी चालवत मुलांना शाळेतून आणणं, बाजारहाट करणं ही स्त्रियांची कामं आहेत असं भारतीय जाहिरातींमधून सर्वसाधारपणे प्रतीत होत असतं.
दुसरं म्हणजे प्रत्येक जाहिरातीत स्त्री आकर्षक, मोहकच दिसते. स्वत:चं शरीर जपणं हे तिचं जणू आद्यकर्तव्य असतं. त्यामुळे स्वत:चं शरीर हा अनमोल ठेवा आहे असं समजून जाहिरातीतल्या स्त्रिया काळजीपूर्वक प्रेमानं त्वचेवर हात फिरवतात. खाद्यपदार्थ तयार करण्यापासून ताटात वाढेपर्यंत सर्व प्रसंगांमध्ये ती मोहकच दिसते. पुरुषांना रिझवणं ही तिची भूमिका तिथेही कायम असते. चॉकोलेटसपासून अल्कोहोलपर्यंत सर्व जाहिरातींमध्ये स्त्रिया या भोगवस्तूंप्रमाणे सजलेल्या दिसतात. सुसज्ज स्वयंपाकघरात चविष्ट खाद्यपदार्थ तयार करणारी स्त्री ही एक आदर्श असते असं ठसवलं जातं. म्हणजे, असं सुसज्ज स्वयंपाकघर असलेलं घर तिनं मिळवणं ही आयुष्याची इतिकर्तव्यता मानली जाते.
—
काहीतरी धाडसी करामतींची दृश्यं जाहिरातीत दाखवायची आहेत? मग त्यात ते धाडस करणारा हमखास पुरुषच दाखवला जातो. मोटारगाड्यांची जाहिरात असेल तर गाडी तुफानी वेगानं चालवणारा पुरुषच दिसतो. जाहिरातीत स्त्रिया दिसतात पण त्या सहसा साबण किंवा शांपूची जाहिरात करताना आंघोळ करत असतात, लहान मुलांना दोन मिनिटात काहीतरी करुन खायला घालतात, त्यांचे कपडे वॉशिंग मशिनमध्ये टाकतात किंवा घरादाराच्या आरोग्यासाठी कुठलंसं आरोग्यकारक तेल वापरत असतात. सहसा भारतीय प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर येणार्या जाहिरातींमध्ये प्रामुख्यानं स्त्री ही एक कर्तव्यदक्ष गृहिणी, प्रेमळ आई असते. ती शिकलेली, कर्तबगार किंवा व्यावसायिक अधिकारी दाखवणार्या जाहिराती अपवादानं आढळतात. पण हे केवळ भारतापुरतं मर्यादित नाही. स्त्रियांच्या शिक्षणाची जगभरात उपेक्षा होते.
जगभरात सुमारे १३ कोटी मुलींना आजही शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. गेल स्मिथ हिनं ‘वन वँâपेन’ या चळवळीद्वारा प्रसिध्द केलेल्या एका अहवालात हे मांडलं होतं. अल्पवयात लग्न होणं, किशोरवयातच गर्भ रहाणं, शाळेत लैंगिक अत्याचारांना तोंड द्यावं लागणं, पालकांकडे शिक्षणासाठी पैशांची तरतूद नसणं, लहानवयातच रोजंदारीवर कामं करायला लागणं, शाळेत येण्याजाण्याचा रोजचा रस्ता खडतर आणि धोक्यांनी भरलेला असणं, शाळेत स्वच्छतागृहं नसल्यामुळे मासिक पाळीच्या काळात कुंचबणा होणं, युध्दग्रस्त भागात असणं अशी अनेक कारणं यामागे आहेत. पण मुलींना शिक्षण न मिळण्यासाठी या सगळ्या कारणांपेक्षा एक कारण जगभर प्रामुख्यानं दिसून येतं. ते म्हणजे त्या ‘मुली असणं..!’ मुलीला शिक्षण देऊ नये असे रीतिरिवाज असतात, परंपरा असते, कायदेही असतात किंवा मुलींना अनेकदा धार्मिक कारणामुळेही शिक्षण दिलं जात नाही.
भारतातल्या एका जाहिरातीतही मुलगा शिकतो आहे आणि मुलगी मात्र पाणी भरते आहे असं दाखवलं होतं. यावरुन वादही झाले होते हे महत्वाचं..!
—
जाहिराती आणि लिंगभाव यावर संशोधन कायम चालू असतं. मॅकआर्थर आणि रेस्को यांनी १९७५ साली केलेल्या संशोधनानुसार जाहिरातींमध्ये नोकरी करणार्या स्त्रिया कमी दिसतात. आई, बायको, बहीण अशा भूमिका निभावताना दिसतात. त्या इतरांवर अवलंबून असतात. भोवती मुलं असतात.
‘जेंडर अॅडव्हर्टाईजमेंट्स’ हे एरव्हिंग जॉफमन या समाजशास्त्रज्ञाचं गाजलेलं पुस्तक. पुरुष आणि स्त्रिया माध्यमांमध्ये कशा प्रकारे सादर केल्या जातात त्यावर हे पुस्तक आधारित होतं. सुमारे ५०० जाहिरातींमधले फोटो पाहून त्यानं शरीराच्या पोझेस, कपडे, देहबोली इ. गोष्टींमध्ये पुरुष आणि स्त्रिया कशा वेगळ्या पद्धतीत दाखवल्या जातात याचं विश्लेषण केलं. त्या विश्लेषणानुसार, स्त्रिया दुय्यम भूमिकेत, सत्ता नसलेल्या, नियंत्रण नसलेल्या, शांत, स्वप्नाळू, लहान मुलांसारख्या आणि पुरुषी वर्चस्वाला होकार देणार्या, आज्ञाधारक दाखवल्या जातात. पुरुष मात्र आत्मविश्वासानं भरलेले, भोवतालच्या गोष्टींचं ज्ञान असणारे, त्यांना हवं तिथे नाक खुपसणारे, कोणत्याही संकटाचा सामना करायला तयार असणारे असेच दिसतात. या सगळ्या जाहिरातींचं प्रमाण प्रचंड असल्यामुळे सर्वसामान्य माणसांना हेच खरं वाटायला लागतं ही त्यातली सर्वात मोठी समस्या आहे. जॉफमननं हे विश्लेषण वेगवेगळ्या दृष्टिकोनांमधून केलं आहे. त्यातले महत्वाचे सहा मुद्दे आहेत.
पहिला मुद्दा म्हणजे फेमिनाईन टच. जाहिरातीतल्या स्त्रिया एखादी वस्तू कुरवाळताना किंवा त्यावर मुलायमपणे हात फिरवताना दिसतात. त्यांची बोटं स्वत:च्या चेहर्यावर, मानेवर, खांद्यावर वगैरे हळुवारपणे फिरतात. त्यांचं शरीर नितळ आणि महत्वाचं असायला हवं असा संदेश त्यातून जातो. याच स्पर्शाला काहीवेळा लैंगिक सूचक स्वरुप येतंच. त्या जाहिरातींमध्ये त्या स्वत:च्या लैंगिक अवयवांना स्पर्श करताना दिसतात. त्या सेक्ससाठी उपलब्ध आहेत असा मेसेज त्यातून जाऊ शकतो. मजरुह सुलतानपुरी यांच्या शब्दात सांगायचं झालं तर प्रत्येक स्त्रीला आत्ताच्या जगात ‘हम है मता-ए-कुचा-ओ बाजार की तरह, उठती है हर निगाह खरीदार की तरह..!’ असंच वाटत असतं.
दुसरा मुद्दा म्हणजे स्त्रिया जाहिरातीत जमिनीवर, गवतात, बेडवर पहुडलेल्या दिसतात. त्या सर्व दृश्यांमध्ये पुरुष शेजारी उभा असतो. स्त्रिया त्याच्या पायाशी दिसतात. यात स्त्रियांना खालच्या दर्जाचं आणि पुरुषांना वरच्या दर्जाचं मानलं जातं असा संदेश दिला जातो. यातही अर्थातच लैंगिकता डोकावते.
तिसरा मुद्दा म्हणजे स्त्रिया जाहिरातीत गुडघा वाकवलेल्या अवस्थेत दिसतात. उभ्या असताना सहसा त्यांच्या पायांचा क्रॉस केलेला असतो. यात ती स्वत:चा तोल कसाबसा सांभाळताना दिसते. जॉफमनच्या मते, स्त्रिया अस्थिर असतात, त्यांना निर्णय घ्यायला पुरुषांची गरज असते असा संदेश त्यातून समोर येतो.
चौथा मुद्दा म्हणजे, स्त्रियाचं डोकं एका बाजूला कललेलं जाहिरातीतल्या फोटोंमध्ये दिसतं. यातून तिला जाहिरातीतल्या पुरुषांकडे मान वर करुन पहावं लागतं. प्रेक्षकांसाठीही ती मान कललेल्या म्हणजे उंचीनं कमी असलेल्या अवस्थेत दिसते. खरं तर ६ जोडप्यांना रँडमली एकमेकांसोबत उभं केलं तर त्यातल्या एका जोडीतली स्त्री ही पुरुषापेक्षा उंच असते असं संशोधन सांगतं. पण तरीही सर्व जाहिरातींमध्ये स्त्री ही पुरुषांपेक्षा कमी उंचीची दाखवली जाते. पुरुष मात्र साधारणपणे मान वर करुन, छाती पुढे काढून, ताठ उभे असतात. त्यातून अर्थातच आपण वरच्या दर्जाचे आहोत असा संदेश जातो.
जॉफमनचा पाचवा मुद्दा लायसेन्स्ड विथड्रॉअल हा आहे. अनेकदा स्त्रिया अंतर्मुख, स्वप्नाळू, खाली पहाणार्या किंवा प्रेक्षकांच्या नजरेला नजर न भिडवणार्या अशा जाहिरातीत दिसतात.
भोवतालच्या वातावरणाबद्दल त्या अनभिज्ञ आहेत आणि जगात जगायला त्यांना पुरुषी आधाराची गरज आहे, त्यांनी पुरुषाचा हात किंवा खांदा धरला आहे असं यातून दाखवलं जातं. उलट पुरुष कशावर तरी पकड घेतो आहे, त्याचे हात खंबीरपणे खिशात आहेत असं दिसतं.
सहावा मुद्दा स्त्रिया आणि मुली यातला फरक जाहिराती मिटवतात असा आहे. लहान मुलींना मोठ्या वयाच्या बायकांसारखे उत्तेजक कपडे, दागिने घालून जाहिरातींमध्ये केवळ एक मादी अशा प्रकारे दाखवलं जातं. यातून लहान मुलींकडे बघायचा दृष्टिकोनही बदलून जातो.
—
पुरुषांनी वर्चस्व गाजवणं हा प्रकार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. स्त्री ही एक उपभोग्य वस्तू आहे असं समाजात कायमच बिंबवलं गेलंय. बर्याचशा जाहिराती याच कल्पनेला अनुमोदनच देत असतात. या दृष्टिकोनातून पाहिलं तर फॅशनेबल वस्तू, सौंदर्यप्रसाधनं आणि स्त्रियांच्या आरोग्यासाठीच्या वस्तू या खरं तर पुरुषांसाठी असतात. स्त्रियांना जर या समाजात रहायचं असेल तर त्या वस्तू वापरुन पुरुषांच्या उपभोगाचं एक साधन म्हणून त्यांनी स्वत:ला तयार करावं असा संदेश एकाप्रकारे यातून मिळत असतो. तुम्ही सगळी सौंदर्यप्रसाधनं वापरली तर पुरुषांना हव्याशा वाटाल (म्हणजेच ती वापरली नाहीत तर नकोशा व्हाल) असं अनेक जाहिराती ठसवत असतात. याउलट कोणतंही सौंदर्यप्रसाधन पुरुषाचं पौरुष सिध्द करण्यासाठी आहे असं जाहिरातदार कधीच सांगत नाहीत. एखादं उत्पादन पुरुषांमध्ये लोकप्रिय होण्यासाठी ते पुरुषांचं स्वातंत्र्य आणि स्वयंपूर्णता यावर भर देणारं असावं लागतं. याउलट स्त्रियांमध्ये ते प्रिय होण्यासाठी ते उत्पादन वापरुन ती पुरुषाला कसं खूश ठेवू शकेल यावर भर दिलेला असतो.
—
पण १९९० नंतरच्या जाहिरातींमध्ये याबाबतीत फरक पडलेला दिसतो. उदाहरणार्थ, आज इंग्लंडमध्ये जाहिरातींमध्ये जेंडर स्टिरिओटाईप्स असलेल्या जाहिरातींना बंदी घातलेली आहे. तसंच टीव्हीवरच्या जाहिराती वास्तवाशी नातं सांगणार्या असण्याचं प्रमाण वाढतं आहे असं रॉबिनसन-हंटर यांच्या संशोधनातून निष्पन्न झालं होतं.
नवीन पिढीतल्या जाहिरातींमध्ये आणि प्रत्यक्षातही पदार्थ तयार करताना झालेल्या आनंदाचं समाधान पुरुषांच्या चेहर्यावरही दिसतं. सचिन कुंडलकर यांचा गुलाबजामसारखा चित्रपट त्यातल्या नायकाला स्वयंपाक करण्यातला आनंद कसा मिळतो ते दाखवतो. काही जाहिरातींमध्ये कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणार्या बायकोला स्वयंपाक तयार ठेवून खाऊ घालणारा नवरा दिसतो. ‘लिटिल थिंग्ज’ या नेटफ्लिक्सच्या वेबसीरीजमध्येही पंचविशीतल्या एका जोडप्यामध्ये नायक अनेकदा स्वयंपाक करताना दिसतो. नायिकेला स्वयंपाकाची आवड नसणं, तिला तो न जमणं यात काही फारसं विशेष नाही असं आता माध्यमांमध्ये काहीवेळा तरी उमटतं. पण सर्वसामान्य स्त्रीसाठी मात्र स्वयंपाक चांगला येणं हेच महत्वाचं मानलं जातं.
नीलांबरी जोशी यांनी लिहिलेल्या ‘माध्यमकल्लोळ’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पुण्याच्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्समधील पदमजी हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यानंतर मुक्त संवादाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी डावीकडून अरविंद पारकर, गिरीश कुलकर्णी, समीरण वाळवेकर, लेखिका नीलांबरी जोशी, अतुल पेठे आणि रवी आमले दिसत आहेत.