• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

देवा हो देवा!

- सॅबी परेरा (कहीं पे निगाहें...)

Nitin Phanse by Nitin Phanse
August 25, 2022
in कहीं पे निगाहें...
0

पावसाचा भर ओसरू लागतो, श्रावण उगवतो. सगळीकडे ‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे’ असा मनाला आल्हादित करणारा माहोल बनतो. ‘वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे’ अशी आकाशातही पुढील दिवसांत येऊ घातलेल्या सणांची तयारी होऊ लागते. भारत हा एक उत्सवप्रिय देश आहे. इथे एक सण सरत नाही तोवर दुसर्‍या सणाची तयारी सुरु होते.
‘अमक्या ठिकाणी तमक्या थरांची दहीहंडी’, ‘फलाण्या नेत्याने लावले ढिमक्या रकमेचं बक्षीस’, ‘गोपाळकाल्यात या अभिनेत्रीचा हॉट अंदाज पाहिलात का?’ अशा गोकुळाष्टमीच्या बातम्या ऑनलाइन न्यूज पोर्टलवरून उतरत नाहीत तोवर ‘तुझी चिमणी उडाली भुर्र, माझा पोपट पिसाळला’ असं किंचाळत गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सवाचा डीजे कानात वाजू लागतो.
गणपतीबद्दल माझ्या हृदयात एक विशेष हळवा कोपरा आहे. गणपती बाप्पाच्या रूप, रंग आणि आकारात जितकी विविधता, मोहकता आहे, तितकी इतर कोणत्याच देवामधे नाहीये. इतर देवांचं रूप, रंग, वस्त्रं, अ‍ॅक्सेसरीज, उठणं-बसणं ह्याचे ठराविक ठोकताळे आहेत (ते ठोकताळे मोडल्यास देवांचा होवो न होवो पण भक्तांचा मात्र कोप होतो). या पार्श्वभूमीवर गणपती बाप्पाची फ्लेग्झिबिलिटी मला भावते. मागील वर्षी, गणेशोत्सवानिमित्त मी एका वक्तृत्व स्पर्धेचं परीक्षण करायला गेलो होतो. तिथे एक शाळकरी मुलगी म्हणाली की, सर्वात जास्त वेगात दुनियेला फेरी मारण्यात गणपती बाप्पाचा प्रथम क्रमांक असून आपले लाडके मोदीजी दुसर्‍या क्रमांकावर आहेत. असो.
आजकाल सगळ्याच धर्माच्या सरसकट सगळ्याच सण-उत्सवाचं बाजारीकरण झालेलं असलं तरीही देवाचं दर्शन अन् सणासुदीची रोषणाई डोळ्याला, धूप-अगरबत्तीचा सुगंध नाकाला, टाळ-चिपळ्यांच्या तालावरील पवित्र आरतीचे सूर कानाला, फरसाण-मिठाईची चव जिभेला आणि आपल्या इष्ट देवतेच्या चरणाला केलेला स्पर्श मनाला सुखावल्यावाचून राहत नाही.
स्वामी विवेकानंद म्हणतात की, ‘ज्याचं स्वतःवर प्रेम आहे, तो आस्तिक’ या नात्याने(च) मी आस्तिक आहे. मी फारसा देवधर्म न मानणारा असल्यामुळे, माझं हे स्वतःला आस्तिक ठरवणं मला ओळखणार्‍यांना कदाचित पटणार नाही. त्यांना मी इतकंच सांगू इच्छितो की माझी देवावर पूर्ण श्रद्धा आहे आणि देवानेच मला नास्तिक बनवलं आहे असा माझा विश्वास आहे.
नवस या प्रकारचा बुरखा फाडताना पु. ल. देशपांडे म्हणतात की, ‘देवाला नवस बोलून, मेणाचं अवयव देऊन आपल्या शरीरातील दुखरे अवयव बरे होतात यावर विश्वास ठेवणार्‍यानी जर मेणाचे मेंदू नेऊन वाहिले तर मात्र देवबाप्पाची पंचायत होईल. कारण एकदा मेंदू ताळ्यावर आला की देवळे, चर्च, मशिदी ह्यांचा धंदा बसेल.’
कुणी ह्याला अंधश्रद्धा म्हणो वा आणखी काही! पण नवस बोलणे आणि फेडणे हा आपल्या भारतीय समाजमनाच्या श्रद्धेचा भाग होता आणि आहे. काही वर्षापूर्वीपर्यंत आपल्या समाजाची आर्थिक कुवत, त्याला आपल्या गावचं कुलदैवत किंवा जवळपासचं जागृत देवस्थान, फार तर अष्टविनायक या पलीकडचा नवस बोलू देत नव्हती. पण आज तोच समाज बिनदिक्कत, नित्यनेमाने शिर्डी, तिरुपती, अमरनाथ, रोम, इस्रायल, मक्का, मदिना अशा तीर्थस्थानाच्या दैवतांचा नवस बोलू लागला आहे. सिद्धिविनायक आणि शिर्डीचा तर कित्येकांनी पासच काढला आहे. चिंतेची बाब ही की ह्या तीर्थक्षेत्री नित्यनेमाने जाणार्‍यात भाविक आणि तीर्थकर्‍यांपेक्षा, यात्रेकरूंची संख्या वाढलीय. आपल्या घराजवळील मंदिरात वर्षभरात एकदाही न डोकावणारे लोक शिर्डी, तिरुपती, अमरनाथ अशा तीर्थस्थानाची यात्रा मात्र चुकवत नाहीत. मला असा प्रश्न पडतो की, या तीर्थक्षेत्राच्या एका वारीला देवाच्या दरबारात लोकल देवळाच्या तुलनेत दसपट वेटेज मिळत असेल काय? किंवा देवाने देखील, तीर्थक्षेत्री भेटीचं, केवळ एकदाच प्रिमिअम भरा आणि आयुष्यभर संरक्षण मिळवा अशी एलआयसीसारखी सिंगल प्रीमियम पॉलिसी सुरु केली असेल काय? देवाने एवढी सवलत दिलीच असेल तर त्याला म्हणावं, बिल्डर लोकांसारखी २०:८० स्कीम देखील सुरु कर, म्हणजे २० टक्के देवधर्म आम्ही जिवंत असताना स्वर्गाचं बुकिंग करण्यासाठी करू आणि बाकीचा ८० टक्के देवधर्म मेल्यानंतर, स्वर्गाचं पझेशन मिळाल्यावर!
देव, धर्म हा ज्याच्या त्याच्या श्रद्धा-भावनेचा भाग आहे. आपल्या लोकांना श्रद्धा, अस्मिता आणि भावनाशी रोमान्स करायला आवडतो. हे मला ठाऊक असल्याने मी शक्यतो या तिघींच्या पदराला हात न घालता, देवाधर्माच्या नावाखाली समाजात बोकाळलेल्या बुवाबाजी, अंधश्रद्धा, सोहळेबाजी, दैवतांचे बाजारीकरण अशा गोष्टींवरच टीका-टिप्पणी करण्यात समाधान मानतो. माझं हे असं प्रवाहात न उतरता काठाकाठावर चालणं माझ्या विवेकवादी नास्तिक मित्रांना पसंत नाही. त्यांच्या मते, ईश्वर आणि धर्मावर टीका न करता केवळ धर्मात घुसलेल्या अपप्रवृत्तींवर आणि त्यांच्या परिणामांवर बोलणं हे म्हणजे, गळू ठसठसतंय, अंगात कसर भरुन आलीय म्हणून गळू न फोडता डोलो-६५० घेण्यासारखं आहे!
हल्ली एकीकडे धर्माच्या नावाने कट्टरता, रीतीभातीचं अवडंबर आणि द्वेषभावना वाढीस लागली आहे, तर दुसरीकडे, धर्म पाळण्यापेक्षा न पाळण्याचे आणि लोकांच्या श्रद्धास्थानांवर घाव घालण्याचे लिबरल कर्मकांड वाढत चाललंय. मला काही या टोकाच्या भूमिका पटत नाहीत. मी इतरांच्या भावनांचा आदर करणारा माणूस असल्याने कधीच न पाहिलेल्या देवांसाठी रोजच्या व्यवहारात भेटणारी माणसे तोडून टाकणे माझ्या प्रकृतीला मानवणारे नाही. श्रद्धेच्या बाबतीतही मी बर्‍यापैकी प्रॅक्टिकल आहे. एखाद्या देवळासमोरून जाताना मी नेहमी माझी बाईक थांबवून, डोक्यावरील हेल्मेट काढून देवाला नमस्कार करताच आपल्या अकाउंटमधून वजा झालेल्या रकमेचा एसएमएस येतो किंवा आपल्या बँक खात्यात पगाराचे पैसे जमा झाल्याचा आपल्याला एसएमएस येतो, त्याप्रमाणेच आपण रस्त्याने जाताजाता देवाला नमस्कार केल्यावर स्वर्गातील आपल्या खात्यावर पुण्य क्रेडिट झालं की नाही हे लगोलग पाहता आलं पाहिजे!
देव जर सर्वत्र आहे तर मग देवाला भेटायला मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा अशा ठिकाणी कशाला जायचे? असा विवेकी विचार करण्यापेक्षा अशा या धर्मस्थळांच्या वास्तूंचे सौंदर्य, त्या ठिकाणी लाभणारी शांती आणि तिथल्या वातावरणात सळसळणारी सकारात्मक ऊर्जा मला अधिक भावते. ही सकारात्मक ऊर्जा हृदयात भरून घेण्यासाठी (शक्यतो गर्दीच्या वेळा टाळून) मी देवालयात जातो. हे खरंय की मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे माझ्या या देवालयांच्या भेटीत काहीसा खंड पडला होता. लॉकडाऊन उठल्यानंतर जवळजवळ दोन वर्षानंतर मी देवळात गेलो. रीतसर गुढघे टेकून, मनोभावे हात जोडून, नम्रपणे मान झुकवून, देवाला नमन केलं. देव खुश झाला. म्हणाला, ‘वत्सा, दोन वर्षानंतर मास्क नसलेला तुझा चेहरा पाहून बरं वाटलं. पुढील वेळी येताना जमल्यास, हा सज्जनपणाचा मुखवटा देखील उतरवून ये!’
मध्यंतरी, तीर्थक्षेत्री जाऊन आलेला एक मित्र भेटला. त्याने आठवणीने माझ्यासाठी आणलेला प्रसाद माझ्या हाती ठेवला. प्रसाद म्हणून मिळणारे चुरमुरे, बत्ताशे किंवा शिरा खाऊन पुण्य लाभेल असे समजण्याइतका मी देवभोळा नसलो तरी, कुणाच्या भावना का दुखवा, ह्या उद्देशाने मी तो प्रसाद सेवन केला. त्या मित्राचा प्रवास, निवास कसा झाला याची चौकशी केली.
तो म्हणाला, ‘अरे मागच्या वर्षी तू म्हणाला होतास की यंदा तू तीर्थयात्रेला येणार आहेस म्हणून….’
मी म्हटलं, ‘हो रे, पण तेव्हा तूच बोलला होतास की आपण ठरवून काही होत नाही. ज्यांना माऊली बोलावते, तेच तीर्थक्षेत्री जाऊन माऊलीच्या पायाशी पोहोचू शकतात. मला असे वाटते की, यंदाही मला माऊलीने बोलावले नसावे. माझ्या उत्तरातील खोच लक्षात येऊन तो म्हणाला, ‘अस्सं काय साल्या! लय शाना झालास तू! तूच सांग मग, का बोलावलं नसेल तुला माऊलीने?’
मी म्हटलं, ‘कदाचित माझं पुण्य कमी पडलं असेल म्हणून!’
तो सात्विक संतापाने बोलला, ‘साल्या, तीर्थक्षेत्री न येण्यासाठी तुला काहीतरी निमित्त हवंय, म्हणून तू ‘मी पापी आहे’ असं बोलतोयेस. अरे, असं काही नसतं रे! हे बघ, आपल्या एरियातले कितीतरी नामचीन गुंड, काळाबाजारवाले दरवर्षी नेमाने येतात माऊलीच्या दर्शनाला… मी पाहिलंय… यंदाही आले होते… मी तर सांगतो जवळजवळ सगळेच पापी लोक हजेरी लावतात तिकडे…
मी म्हटलं, ‘च्यायला, असं आहे काय? माऊली, सगळ्या पापी लोकांना बोलावते आणि मला मात्र बोलवत नाही. म्हणजे नक्कीच माझी पापं कमी पडत असतील!’
तुम्हाला सांगतो, व्यक्ती, विषय आणि वस्तूंना शेंदूर फासून देव करणे मला पसंत नाही. माझा केवळ देवावरच विश्वास नाही अशातला भाग नाहीये. कोरोनामुळे जगभर लाखो लोक मेले, पण त्यातल्या एकाचंही भूत होऊन त्याने चीनच्या शी जिनपिंगचा गळा आवळून त्याला जाब विचारला नाही. त्यामुळे माझा भुतांवरील देखील विश्वासच उडालाय! मी पक्का विज्ञानवादी आहे. मी इतका विज्ञानवादी आहे की, शालेय वयात, न्यूटनच्या फोटोसमोर सफरचंदाचा प्रसाद ठेवल्याशिवाय मी भौतिक शास्त्राच्या परीक्षेला जात नसे.
तुम्ही म्हणाल, तुमची कशावरच श्रद्धाच नाही का?’ तर तसं नव्हे! माझी (अनेकदा अत्यंत विपरीत अनुभव येऊनही!) माणसाच्या चांगुलपणावर, माणसाच्या विवेकावर आणि या विश्वाच्या मला अनाकलनीय असलेल्या शिस्तबद्ध रचनेवर माझी श्रद्धा आहे. माझी अध्यात्मावर देखील श्रद्धा आहे. पण अध्यात्मामुळे फक्त मन:स्थिती बदलते; परिस्थिती बदलत नाही. परिस्थिती बदलण्याचे काम विज्ञान करते. ते विज्ञानच आजच्या युगाचा देव आहे आणि हा विज्ञानरूपी देव आपल्या सगळ्यांना सांगतोय ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे!’

[email protected]

Previous Post

अपरिवर्तनीय व परिवर्तनीय रोखे

Next Post

पोरांनो, निसर्गाकडे चला…

Related Posts

कहीं पे निगाहें...

निंदकाचे घर…

October 6, 2022
कहीं पे निगाहें...

रात्रीच्या गरबात असे…

September 22, 2022
कहीं पे निगाहें...

शिक्षकांच्या बैलाला…

September 8, 2022
कहीं पे निगाहें...

खड्ड्यांच्या देशा!

July 28, 2022
Next Post
पोरांनो, निसर्गाकडे चला…

पोरांनो, निसर्गाकडे चला...

बाप्पा मोरया, मस्त मोदक चापू या!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.