• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

खड्ड्यांच्या देशा!

- सॅबी परेरा (कहीं पे निगाहें...)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 28, 2022
in कहीं पे निगाहें...
0

कवी गोविंदाग्रज आज असते तर त्यांनी आपल्या ‘मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा’ या सुप्रसिद्ध कवितेत ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ नंतर कुठेतरी ‘खड्ड्यांच्या देशा’ला उद्देशून एखादी ओळ नक्कीच वाढवली असती. राष्ट्राच्या तिजोरीला पडलेल्या आर्थिक खड्ड्यांपासून तरुणीच्या गालावरील खळीपर्यंत अशी खड्ड्यांची खूप मोठी रेंज आहे. पण आपल्याला मात्र खड्डे म्हटल्यावर रस्त्यावरचेच खड्डे आठवतात. आज सगळीकडे खड्ड्यांचे साम्राज्य असले तरी ‘संपूर्ण देशच खड्ड्यात जात आहे’ असं म्हणून मला राष्ट्रद्रोहाचा आरोप ओढवून घ्यायचा नाहीये. माझ्या मते खड्डे या विषयावर दोनेक फूट खोल चिंतन होणे गरजेचे आहे.
रस्त्यातील खड्डे ही काही आजकालची बाब आहे असे नव्हे. खड्ड्यांची परंपरा फार फार पुरातन आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीत देखील रस्त्यांवर प्रचंड मोठे खड्डे असायचे, हे हडप्पा आणि मोहोंजोदरो येथील उत्खननात दिसून आले होते. पूर्वीच्या काळी हत्तीसारख्या शक्तिमान प्राण्यांना पकडण्यासाठी खड्डे खोदत. ती पद्धत आजही सुरु आहे… कधी त्या खड्ड्याला ईडी तर कधी सीबीआय म्हणतात इतकेच! पूर्वीपासूनच व्यवस्थेला मानवाला सर्वशक्तिमान होऊच द्यायचे नाहीये. त्याची गती मंदावली की तो हळूहळू दुबळा होत जातो हे व्यवस्थेला व्यवस्थित ठाऊक आहे. त्यामुळे तेव्हाचे व आताचे खड्डे वेगवेगळे दिसत असले तरी त्यामागचा कार्यकारणभाव एकच आहे हे आपल्या ध्यानात येईल.
गणितातील शून्याची आणि रस्त्यावरील खड्ड्याची संकल्पना अगदी सारखीच आहे. कुठल्याही संख्येस शून्याने गुणले तर गुणाकार शून्य येतो. तसेच कोणत्याही खड्ड्याचा रस्ता बनवला तरी तेथे खड्डाच पडतो. हे काँक्रीट वास्तव लक्षात न घेता रस्त्यावरील खड्ड्याबद्दल, जनता विनाकारण सत्ताधारी लोकांवर डांबरट टीका करीत असते. एकीकडे कित्येक वर्षांपासून रस्त्यावरील खड्ड्याच्या समस्येवर काहीही इलाज केला जात नाही अशी लोकांची तक्रार असते. तर दुसरीकडे पोक्त माणसं म्हणतात की आता पूर्वीसारखं काही राहिलं नाही, सगळं बदललंय! मला तर असं वाटून राहिलंय की, काहीही बदललेलं नाहीये, सगळं पूर्वी होतं तस्संच आहे हे दाखवून देण्यासाठीच सरकारने रस्त्यावरील खड्डे वर्षानुवर्षे कायम ठेवले असावेत!
मध्यंतरी लालूप्रसाद यादव यांनी हेमामालिनीच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते बनविण्याचं आश्वासन दिलं होतं. पण अद्याप तरी आमच्या नशिबी ओम पुरीच्या गालासारखेच रस्ते आहेत. रस्त्यात पूर्वी खड्डे होते, आता आहेत आणि भविष्यातही असणार ही काळ्या डांबरावरची रेघ असल्याने आपल्यासारखे सुज्ञ लोक, चालताना किंवा गाड्या चालविताना जपून चालवतात. (जात्यावर बसले की ओव्या आणि स्टिअरींगवर बसले की शिव्या आपोआप सुचतात, ही गोष्ट वेगळी!) त्यामुळे सरकारने रस्त्यातील खड्डे बुजवावीत अशी अवाजवी मागणी मी करणार नाही. पण चुकून कुठे एखाद्या ठिकाणी रस्त्यात खड्डे व्हायचे राहून गेले असतील तर त्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ‘सावधान पुढे चांगला रस्ता आहे’ अशी सावधगिरीची सूचना लावली जावी इतकीच माझी अपेक्षा आहे.
खड्ड्यांचा विषय निघालाय त्यावरून आठवलं. गुंतवणूक, व्यापाराची चालून आलेली संधी, धंदा असल्या गोष्टींचा मला सेन्सच नाही. मी हा असाच रोज दहा ते पाच नोकरी करत जगणार आणि खर्डेघाशी करत मरणार! झालं असं की, नव्या घराचा पाया घालताना काँक्रिटच्या पिलरसाठी जे मोठे चौकोनी खड्डे खोदतात त्याची मजुरी हल्ली प्रत्येक खड्डयासाठी सहा-सात हजार रूपये इतकी झालीय असं मला काल कुणीतरी सांगितलं. तीस वर्षापूर्वी आम्ही गावी घर बांधलं तेव्हा प्रत्येक खड्ड्यापाठी आम्हाला फक्त दीडशे रूपये खर्च आला होता. मनात विचार येतो, त्या वेळी दोन-चार हजार खड्डे खणून ठेवले असते तर आज चाळीस पट भावाने विकता आले असते! असो!
परवा एक मित्र सपत्नीक माझ्या घरी आला होता. बोलता बोलता चर्चेची गाडी फुटलेल्या आमदारांवरून घसरून फुटलेल्या रस्त्यांवर येऊन रुतली. मी म्हटले, आपले नगरसेवक, पालिकेचे अधिकारी, आमदार हे लोक युरोप, अमेरिका, सिंगापूर अशा देशांतील इन्फ्रास्ट्रक्चर पाहण्यासाठी अभ्यास दौरे करीत असतात तरी आपल्या देशातले रस्ते का सुधरत नाहीत हेच मला कळत नाही! यावर आपल्या पत्नीकडे तिरका कटाक्ष टाकत मित्र म्हणाला, ‘मलाही आजपर्यंत समजलेले नाही की टीव्हीवर दररोज नवनवीन रेसिपीचा कार्यक्रम बघूनसुद्धा घरी खिचडीच का बनते?’ मित्राकडे दुर्लक्ष केल्यासारखं दाखवत त्याची पत्नी मला म्हणाली, ‘भावोजी, आपण जसे डोळे फाडफाडून किंगफिशरचे कँलेडर बघतो आणि घरात भिंतीवर लावण्यासाठी मात्र कालनिर्णयच घेतो, अगदी तस्सेच आहे हे! हे सगळं अगदी नॉर्मल आहे हो!’
स्पीडब्रेकर बनविण्यासाठी जो कच्चा माल वापरला जातो त्याच कच्च्या मालापासून रस्ते बनविले तर ते नक्कीच टिकाऊ होतील अशी मला खात्री आहे. मी खूप ठिकाणी पाहिले आहे की, आजूबाजूचा संपूर्ण रस्ता फुटलेला असताना आणि खड्ड्यांनी व्यापलेला असताना देखील मध्येच एखादा स्पीडब्रेकर मात्र धडापासून शिर वेगळं झालेल्या दत्ताजी शिंदेसारखा एकट्याने खिंड लढवीत (लोकांना) अडवा आणि (त्यांची मस्ती) जिरवा हे आपले कर्तव्य निभावित असतो.
आपल्या रोजच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर एकूण खड्डे किती आणि ते पार करण्यासाठी मानेला, कमरेला आणि खिशाला किती फटका बसेल याचा विचार करतो तो सामान्य नागरिक; आणि आपल्या एरियात एकूण खड्डे किती, ते बुजवायला यंदा किती पैसे लागतील, त्यातले आपल्यापर्यंत किती येतील, इतरांच्या खिशात किती जातील याचा हिशेब करतो तो नेता, अशी नागरिकांची सरळसरळ विभागणी आहे. जो दुसर्‍यांसाठी खड्डा खोदतो, तोच एक दिवस त्यात फसतो अशी म्हण आपल्याला ठाऊक आहे. पण मग हे व्यवस्थेतले लोक त्या खड्ड्यात का फसत नाहीत? हे सारे सहीसलामत राहतात व खड्ड्यांमुळे मरतात मात्र सामान्य, हा अन्याय नाही का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात फेर धरू लागतात आणि त्या प्रश्नांमुळे आपल्या मनात व्यवस्थेविषयी कधीही बुजविता न येणारा एक खड्डा निर्माण होतो.
जिथे बघावं तिथे, अगदी महामार्गापासून गल्लीबोळांपर्यंत रस्त्यांवर खड्ड्यांचा असा सुळसुळाट झाला आहे की, ‘हर तरफ खुदा है’ हे हिंदीतील सुभाषित परमेश्वराइतकंच खोदलेल्या रस्त्यांनाही लागू पडतं. असं म्हणतात की माणूस जन्माला येत येतो तेव्हाच सोबत आपलं नशीब घेऊन येतो. मला अशी शंका आहे की, रस्त्याच्या नशिबात देखील जन्माच्या वेळीच सटवाईने त्याच्या कपाळी खड्डे लिहिले असतील काय? जन्मतःच त्याच्यात डांबर, खडी याच्या जोडीला खड्ड्यांचं बीज देखील पेरलं जात असेल काय? नेते मंडळीच्या हस्ते श्रीफळ वाढवून, पूजाविधी करून रस्त्याचं भूमिपूजन केलं जाते तेव्हा रस्त्याची जी कुणी देवता असेल ती त्या रस्त्याला ‘अखंड खड्डावती भव!’ असा आशीर्वाद देत असेल काय?
खड्ड्यांची सकारात्मक बाजू समजून घेण्यात आपण कमी पडतो असे मला वाटते. दरवर्षी रस्ते बनविण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी आणि खड्डे बुजविण्यासाठी लाखो लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळतो हे आपल्याला ठाऊक आहेच. पण खड्ड्यांमुळे वाहनाचे फुटलेले टायर्स, खराब झालेल्या गाड्या दुरुस्त करणार्‍यांना तसेच माणसांची कंबर, मान अशा अवयवांच्या डॉक्टरांना देखील अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. समाजातील सधन वाहनधारकांकडील धन, खड्ड्यांमुळे असे समाजाच्या विविध आर्थिक स्तरांत झिरपून अर्थशास्त्रातील ‘ट्रिकल डाऊन थिअरी’ प्रत्यक्षात येते. आयुष्यात कितीही प्रगती केली तरी आपण आपल्या मातीला विसरू नये आणि पाय सदैव जमिनीवर असावेत यासाठीही मायबाप सरकारने या खड्ड्यांची योजना केलेली असू शकते. खड्डेच नसतील तर आपण अक्षरशः रस्त्यावर येऊ हा धोका आपल्या लक्षातच येत नाही. खड्डेयुक्त रस्त्यातून चालताना आपल्याला बर्‍याचदा, इतस्तत: पसरलेल्या पेव्हर ब्लॉकच्या विटांवर उभे राहावे लागून साक्षात पांडुरंगाशी एकरूप होण्याची दिव्य अनुभूती केवळ खड्ड्यामुळे आपल्याला मिळते हेही विसरून चालणार नाही! खड्ड्यांच्या नावे बोटे मोडण्याआधी, रस्त्यावरील खड्ड्यांचे हे आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक पैलू आपण लक्षात घेणे गरजेचे आहे.
लोकांना भले खड्ड्यांचा त्रास होत असेल, मला मात्र खड्डे खूप आवडतात. पावसाळ्यात रस्त्यावरील गढूळ पाणी, चिखल, राळ यांनी भरलेले सुंदर रस्ते मी तासंतास बघत बसतो. त्यात दिसणारं आकाशाचं, आजूबाजूच्या झाडांचं, विजेच्या तारांवर बसलेल्या पक्ष्यांचं प्रतिबिंब बघायला मला खूप आवडतं. गाड्यांमुळे पादचार्‍यांच्या कपड्यांवर उडणारं पाणी, चिखल पाहायला, खड्ड्यात अडखळून पडणारे पादचारी, दुचाकीस्वार पाहायला मला खूप मज्जा येते. खड्ड्यांच्या विविध आकारांचे, मी विविध कोनांतून फोटो काढतो, खड्ड्यांसोबत सेल्फी काढतो. तुम्हाला सांगतो, साईज, कलर आणि पॅटर्न याबाबतीत खड्ड्यांमध्ये इतके वैविध्यपूर्ण प्रकार उपलब्ध आहेत की त्यांची तुलना फक्त स्त्रियांच्या साड्यांशी करता येईल, इतर कशाशीही नाही. मी खड्ड्यांकडे निरखून पाहतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की, खड्ड्यातला दगड पाण्यात फक्त भिजतो अन् माती मात्र निरागसपणे पाण्यात विरघळते. भिजणं आणि विरघळण्यातला फरक कळला की, सगळी नाती नितळ होतील हे मला तो खड्ड्याच शिकवतो!
पण सगळ्यांनाच ही माझ्यासारखी सौंदर्यदृष्टी नसते. मुळात, अन्न-वस्त्र-निवारा आणि रोज डीपी बदलण्यासाठी फोटो इतक्याच माणसाच्या घटनामान्य मूलभूत गरजा असताना, गुळगुळीत सडक हा देखील मूलभूत अधिकार असल्यासारखे तावातावाने लोक बोलत असतात. असे लोक मग वर्तमानपत्रापासून ट्विटरपर्यंत जमेल त्या माध्यमातून खड्ड्यांच्या तक्रारी करत सुटतात. खड्ड्यासारख्या अशा छोट्यामोठ्या समस्या ट्विटरसारख्या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर मांडल्याने भारत महासत्ता व्हायच्याऐवजी महाथट्टा होईल की काय अशी मला भीती वाटते.
आपण प्रत्यक्षात रस्त्यातल्या खड्ड्यांची तक्रार घेऊन गेलो की, नगरसेवक आमदाराकडे बोट दाखवतो, आमदार खासदाराकडे अंगुलीनिर्देश करतो, खासदार अधिकार्‍यांवर जबाबदारी ढकलतो आणि अधिकारी सगळा दोष कंत्राटदाराच्या माथी मारून मोकळा होतो. असा खापरफोडेपणा सर्वत्र भरून राहिलेला आहे. कंत्राटदारांनी राज्यकर्त्यांच्या किंवा राज्यकर्त्यांनी कंत्राटदारांच्या मदतीने परस्परहितासाठी चालवलेली यंत्रणा म्हणजे सरकार हा धडा नागरिकशास्त्राच्या पुस्तकात नसल्यामुळेच जनता अशी तक्रारखोर बनल्याचा माझा कयास आहे.
रस्त्यावरील खड्डे हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने हा विषय निघताच माझ्या समयमर्यादेचे डांबर विरघळते, विचारांची खडी सुटी होते आणि शब्दांची रेती वाहू लागते. तरीही स्वतःला आवर घालून, माझ्या ओळखीच्या एका खड्ड्याने मागील वर्षी वाहतूक आणि महामार्ग मंत्र्यांना लिहिलेलं पत्र तुमच्या माहितीसाठी सादर करतो आणि माझं हे खड्डा-पुराण संपवतो.
”आदरणीय मंत्री साहेब, नमस्कार, मी मुंबई अहमदाबाद हायवेवरील ससूनवघर येथील खड्डा क्रमांक एमएच-४८-२५५४. सोशल मीडियावर तुम्ही करीत असलेल्या कामाचे आणि नवनवीन आयडियांचे तुमच्याच तोंडून गुणगान करणारे व्हिडिओ रोज पाहायला मिळतात त्याबद्दल तुमचे आभार आणि अभिनंदन! महोदय, मी काँग्रेसच्या काळातील खड्डा असूनही तुम्ही मागील आठ वर्षे मला जीवदान दिलेत याबद्दल मी आपला प्रचंड ऋणी आहे. तुमच्याच कृपाशीर्वादाने आज माझे अनेक बांधव या रोडवर तीन तीन मजली खड्डे बांधून राहात आहेत. पूर्वी आम्हां खड्ड्या-खड्ड्यामध्ये वैर होतं. त्यामुळे आम्ही एकमेकांपासून दूर राहत असू. आज तुमच्या आशीर्वादाने आम्ही सर्व खड्डे एकत्र येऊन अधिक मोठे आणि अधिक मजबूत झालो आहोत. रोज व्हॉट्सअपवर आम्ही तुमचे फोटो आणि व्हिडिओ फिरवतो व तुमच्या कहाण्या ऐकवतो. तुमच्याकडे पैशाचा तोटा नाही असं तुम्ही कालपरवा म्हणालात. अमुक टेक्नॉलॉजी वापरली, तमुक इनोव्हेशन केलं, अमुक दिवसात हायवे केला अन तमुक दिवसात पूल बांधला असं तुम्ही म्हणत असता. पण पावसात वाहून जाणार नाहीत असे मजबूत रस्ते बांधायला अजून किती वर्षे लागणार आहेत ते काही तुम्ही सांगत नाहीत. महोदय, तुमच्यामुळे आम्ही आहोत आणि आमच्यामुळे इथले पंक्चरवाले, गॅरेजवाले आणि ऑर्थोपेडिक डॉक्टर्स पैसे कमवून शहरात महागडे फ्लॅट घेऊन राहात आहेत. उपनगरातील अत्यवस्थ रुग्ण शहरातील चांगल्या हॉस्पिटलमध्ये हलवायचा तर तो तासंतास येथील ट्रॅफिकमध्ये अडकून आम्हां खड्ड्यांच्या साक्षीने अँब्युलन्समधेच प्राण सोडतो. साहेब, मला सर्वात जास्त काय आवडले असेल, तर ती म्हणजे आम्हा खड्ड्यांना जिवंत ठेवणारी तुमची कार्यपद्धती. सुरूवातीला आम्ही बिगरीत-केजीत असतो, तेव्हा तुम्ही माती टाकता. नंतर आम्ही चौथीला अ‍ॅडमिशन घेतले की, जांभा दगड टाकता व दहावीला गेलो की बाजूला खडी आणून टाकता. नंतर, मे महिन्याच्या शेवटी रस्त्यावर डांबर पसरवायला सुरू करता आणि जूनच्या पहिल्या पंधरवड्यात येणारा पाऊस तुम्ही केलेले सर्व काही धुऊन काढतो. तुमची कार्यपद्धती नोबेल पारितोषिक देऊन गौरवावी अशीच आहे. तुम्ही रबराचे रस्ते, ट्यूब ट्रान्सपोर्ट, इथेनॉलवर चालणारी वाहने अशा नवनवीन प्रयोगावर बोलत रहा. आमच्या कानाला तेव्हढंच बरं वाटतं. आपलाच खड्डाभिलाषी.

[email protected]

Previous Post

सजग करणारे वैचारिक मंथन!

Next Post

थाय फूडचा नाद करायचा नाय!

Related Posts

कहीं पे निगाहें...

निंदकाचे घर…

October 6, 2022
कहीं पे निगाहें...

रात्रीच्या गरबात असे…

September 22, 2022
कहीं पे निगाहें...

शिक्षकांच्या बैलाला…

September 8, 2022
कहीं पे निगाहें...

देवा हो देवा!

August 25, 2022
Next Post

थाय फूडचा नाद करायचा नाय!

चार दिवस सासूचे...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.