• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

टपल्या आणि टिचक्या

- टिक्कोजीराव

Nitin Phanse by Nitin Phanse
July 14, 2022
in टपल्या आणि टिचक्या
0

□ फडणवीसांना मुख्यमंत्री केले नाही म्हणून भाजप नेते ढसाढसा रडतायत – अजितदादा पवार.
■ मगरीचे अश्रू आहेत ते, नंतर रडण्याची पाळी शिंदे आणि अन्य ईडीपीडितांवर येणार आहे.

□ शिंदे सरकार सहा महिन्यात कोसळू शकते; मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा – शरद पवार.
■ गुजरातबरोबर एका मांडवात हेही कार्य पार पडणार.

□ पुढील ३०-४० वर्षे राहणार भाजप युग – अमित शहा.
■ म्हणजे देश आणखी तीन चार हजार वर्षं मागे जाणार… एक राहिला तर.

□ मोदी सरकारला विरोधी पक्षमुक्त भारत हवा आहे – सिब्बल.
■ ते ज्यांना समजलं, त्या लढवय्यांनी कंबर कसली, पळपुट्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून मुक्तता मिळवली.

□ आरेत कारशेड उभारण्यामागे काही अदृश्य शक्तींचा हात – वनशक्ती संस्थेचा आरोप; हजारो मुंबईकरांचे ‘आरे’ला कारे!
■ सत्तेत येताक्षणी, मंत्रिमंडळ स्थापन होण्याच्या आत पहिला निर्णय हा होतो म्हणजे केवढे मोठे हितसंबंध गुंतले असतील, ते लक्षात येतं.

□ बंडखोर आमदार नजरेला नजर भिडवू शकत नाहीत – आदित्य ठाकरे.
■ भिडवतील लवकरच… तेवढीही लाजलज्जा आता शिल्लक राहणार नाही.

□ सोशल मीडिया लक्ष्मणरेषा ओलांडतोय हे धोकादायक! सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे मत.
■ आठ वर्षांपूर्वीच ती ओलांडली गेली होती… तुमच्या आत्ता लक्षात आलं?

□ भाजपची ‘स्नेहयात्रा’ : सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचवण्याचे मोदींचे आवाहन.
■ काय पोहोचवणार? सगळ्या आघाड्यांवरचं दारूण अपयश?

□ दहशतवादी कसाबलाही इतकी प्रचंड सुरक्षा नव्हती; आदित्य ठाकरे यांची बंडखोरांवर टीका.
■ हेही कैदीच आहेत त्याच्याप्रमाणेच… तेवढेच हतबल.

□ आदर्श राज्यपालांचे दर्शन घडवा; १२ आमदारांच्या निवडीवरून जयंत पाटील यांचा टोला.
■ आदर्श म्हटलं की घोटाळा आलाच… यांना पाहिलं की तोच आठवतो.

□ मोबाईल, टीव्हीमुळे पाचव्या वर्षीच चष्मा; राष्ट्रीय परिषदेत विचारमंथन.
■ डोळ्यांच्या खाचा झाल्या तरी चालतील, पण मोबाइल पाहणारच, असा चंग बांधलेला आहे आताच्या पिढ्यांनी.

□ राहुल गांधींना बदनाम करणार्‍या बनावट व्हिडिओवरुन काँग्रेस संतप्त. राज्यवर्धन राठोड, ‘झी न्यूज’च्या वृत्तनिवेदकाविरोधात गुन्हा दाखल.
■ कशावरून तरी हे कुंभकर्ण जागे होतात, हे बरे आहे- पण एवढीच जागरूकता जनतेच्या प्रश्नांवर दाखवा, विरोधी पक्षाचं कर्तव्य पार पाडा.

□ हिंमत असेल तर निवडणुका घ्या – उद्धव ठाकरे.
■ हिंमत असती तर इकडे तिकडे पळून जाऊन भ्याडासारखा पाठीत वार केला असता का उद्धवजी?

□ केंद्राकडून देशभरात राबवण्यात येणार्‍या नव्या शिक्षण धोरणातून मूलभूत अधिकारांवर घाला. शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली भीती.
■ यांच्यापेक्षा मेकॉले परवडला होता, तो निदान परकीय सत्ताधीश तरी होता…

□ मिस्टर मोदी, तुम्ही तर देश लुटत आहात, हैदराबादमधील ‘त्या’ पोस्टरने खळबळ.
■ ही हिंमत फक्त दक्षिणेतच उरली आहे आता.

□ ज्यांना ईडीची भीती दाखवलीत त्यांच्या घराखाली पहारे – भास्कर जाधव.
■ वॉशिंग पावडर भाजपा, कितीही काळे डाग घालवते, दुधासारखी सफेदी आणते.

□ शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पैशांशिवाय आणखीही काही देण्यात आले – ममता बॅनर्जी.
■ आता निवडणुका येतील तेव्हाही काही देईल… इथला मतदार.

□ मोदी त्यांच्या सावकार मित्रांकडील कोळसा खरेदीसाठी दबाव टाकतात – तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. आर.
■ मित्रांसाठी ते पाकिस्तानात बिर्याणी खायलाही जातात वाट वाकडी करून… दोस्त असावा तर असा!

□ राजकारणातून गुन्हेगारांची अभद्र युती मोडून काढा; अलाहाबाद हायकोर्टाचे संसद, निवडणूक आयोगाला निर्देश.
■ कुठून सुरुवात कराल आणि शिल्लक कोण राहील?

□ भाजपचा २५ वर्षांचा इतिहास पाहाता शिवसेना संपवणे हाच भाजपचा डाव आणि एककलमी कार्यक्रम – आ. भास्कर जाधव.
■ तो हाणून पाडणं हा आता आपला एककलमी कार्यक्रम भास्करराव!

□ शिवसेना फोडणारे निवडून आले नाहीत – अजित पवार.
■ यापुढेही येणार नाहीत.

□ लोकांनी मोबाईलशिवाय वास्तव जीवन जगावं. अमेरिकेतील पहिला मोबाईल बनवणार्‍या मार्टिन कूपर यांचा सल्ला.
■ वा वा, तुम्ही लोकांना धंद्याला लावलंत, अब्जाधीश बनलात, आता द्या फुकटचा सल्ला!

□ यात काहीतरी काळेबेरे आहे हे लक्षात ठेवा – अजित पवार.
■ त्यांना सगळं माहिती आहे, ते गाजराचीच पुंगी वाजवतायत.

Previous Post

वात्रटायन

Next Post

सव्यसाची : पद्मश्री वामन केंद्रे

Next Post

सव्यसाची : पद्मश्री वामन केंद्रे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.