देवेंद्र फडणवीस
केलं काय नि झालं काय
गेला शेवटी फाटक्यात पाय
उपमुख्यमंत्रीपद हवंय कुणाला
मेहनत वाया गेली हाय
अडीच वर्षे बोंबलत होतो
पुन्हा येईन, पुन्हा येईन
वाटले नव्हते पुन्हा एकदा
दुय्यम बनून माती खाईन
वरचे काहीच मिळत नाही
आशेवरती झुलवत ठेवतात
काम होताच लाथ मारतात
कमळेही कोमेजून मावतात
– – –
अमित शहा
एकेक राज्य संपवत आणा
जेव्हा देतो मी इशारा
हेतू माझा लक्षात घेऊन
आटपा सत्तेचा पसारा
वाटेल तेवढे आमिष दाखवा
मंत्रिपदांची स्वप्ने नाचवा
एकदा सत्ता हाती आली की
नंतर हळूहळू दात दाखवा
भाजपशिवाय सार्या देशात
एकही पार्टी दिसता नये
चोवीस साली आपलेच सगळे
विरोधी पक्ष राहता नये
– – –
अमृता फडणवीस
अडीच वर्षे पाहतेय मी
माझ्या रूममध्ये हे काय करतात
ड्रेसिंग रूम तर इतकी भरलीय
कपाटात नाटकी ड्रेसच भरतात
विचारले तर म्हणाले एकदा
फॅन्सी ड्रेसची आहे स्पर्धा
त्याचीच प्रॅक्टिस करतो रात्री
नक्कीच बक्षीस जिंकेन यंदा
वेष पालटून रात्री पळायचे
मलाच ओळखू यायचे नाहीत
आता समजले यांचे रहस्य
लपून छपून जायचे घाईत
– – –
चंद्रकांतदादा पाटील
वाटले होते आता तरी
माझा लागेल वरचा नंबर
अडीच वर्षे झोपा काढल्या
फक्त पक्षाचा होतो प्लंबर
कोणते पाईप तोडायचे अन्
जोडायचे ते मर्जीनुसार
तोंडदेखले बोलायचे ते
आम्ही बोंबलल्यावर व्हायचे पसार
कोल्हापूरचा नखरा माझा
आता झालोय मी पुणेरी
पुण्यात राहून शिकलोय बरेच
सांभाळावी नागपुरी
– – –
‘सच्चा’ शिवसैनिक
शिवसेनाप्रमुख होते तेव्हा
आदेश पाळणे एवढेच काम
आता अक्कलदाढ फुटल्या
हाती आला भरघोस दाम
कसली निष्ठा कसली शिस्त
ज्याला त्याला फुटली शिंगे
स्वार्थासाठी पडले बाहेर
बीजेपीने हेरली बिंगे
शिवसेनेच्या नावावरती
बेडूक झाले बैल मोठे
आज बाळासाहेब असते तर
पाठीवरती बसते सोटे