माझे दोन प्रश्न.
१. फादर्स डे, मदर्स डे साजरे केले जातात, तर मग वाइफ्स डे का नसतो?
२. हनीमूनला जाताना कपड्यांची गरज काय?
– अशोक परशुराम परब, ठाणे
१. तो रोजच असतो हो…
२. तुम्ही भोंगळेच गेला होतात का?? नसाल गेलात तर परत जा एकदा आणि अनुभव सांगा.
पाऊस आला की मला कविता व्हायला लागतात… त्या लोकांना ऐकवण्याची उबळ दाटून येते आणि मग कुटुंबीयांपासून मित्रांपर्यंत सगळे माझ्यापासून दूर पळू लागतात… यावर काय उपाय करू?
– मनोहर दादरकर, चेंबूर
व्हॉट्सअपवर, फेसबुकवर द्या टाकून… होऊ दे दंगा!
हौसेने केला वर, त्याला दिवसा खोकला, रात्री ज्वर… आता मी काय करू?
– मोनिका बागडे, पत्रा चाळ
संध्याकाळ साधा… थोडक्यात आटपा आणि…
कुटुंबियांच्या, मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रूपवर अनेक अशास्त्रीय, अवैज्ञानिक दावे करणार्या, धादांत खोटी माहिती देणार्या आणि द्वेष पसरवणार्या फॉरवर्ड्सचा मारा होतो. आपण बनवाबनवी लक्षात आणून दिली तर हे लोक आपल्यावरच उखडतात, दुरावतात. यांचं काय करायचं आणि कसं करायचं?
– छाया शिंदे, जालना
पाहात राहा… काळ खूप भीषण आहे… लोक काहीही समजुतीने घ्यायला तयार नाहीयेत…
देशाचे राष्ट्रपती निवडण्याचे सर्वाधिकार तुम्हाला दिले, तर तुम्ही कोणाची निवड कराल?
– गुलाम रसूल कादर, पणजी, गोवा
माझी
धादांत खोटं बोलताना आपल्या काही नेत्यांच्या चेहर्यावरची सुरकुतीही बदलत नाही, ते रेटून खोटं बोलतात… हे लोक अभिनयाच्या क्षेत्रात आले असते तर?
– विलास मिस्त्री, मालवण
आम्ही अभिनय करतो… खोटं नाही वागत… ते खोटं वागतात, बोलतात, करतात… फरक आहे.
पावसाळा आला की कुणाला मिलिंद इंगळे-सौमित्र यांचा गारवा आठवतो, कुणाला ‘प्यार हुवा इकरार हुवा है’ हे गाणं आठवतं, कुणाला ‘टिप टिप बरसा पानी’ आठवतं… तुम्हाला पावसात कोणतं गाणं सगळ्यात जास्त आठवतं?
– मेघना राजवाडे, सोलापूर
अब के सावन में जी डरे…
पावसाच्या अनेकांच्या आठवणी रोमँटिक असतात, काहींच्या बालपणी आलेल्या पुराच्या, चंद्रमौळी घरात पाणी गळत असल्याने सुक्या कोपर्यात रात्रभर बसून राहिल्याच्या करूणरम्य आठवणी असतात… पावसाची तुमची सगळ्यात संस्मरणीय आठवण कोणती?
– बाबू पळुस्कर, केडगाव
सुंदर आठवणी आहेत… खूप पावसाच्या… निवांत सांगेन कधीतरी…
हल्ली यकृताचं, मूत्रपिंडाचं, अगदी हृदयाचंसुद्धा प्रत्यारोपण होतं… माणुसकीचं प्रत्यारोपणही कधी होऊ शकेल का हो भविष्यात?
– सायमन डिसूझा, विरार
चांगला आहे आशावाद!
सर्व धर्म प्रेमच शिकवतात, असं त्या त्या धर्माचे धार्मिक म्हणतात… मग हे परधर्माच्या माणसांचा इतका द्वेष कसा करतात?
– रोहन कांबळे, नायगाव
धर्माचीच शिकवण
तुम्हाला दहावी बारावीला किती टक्के पडले होते हो! आपण आयुष्यात पुढे जे काही करतो, त्याच्याशी या गुणांचा काही संबंध असतो का हो?
– रोहिणी नामदेव, इंदूर
६५ टक्के… संबंध काहीही नसतो… सगळं शिक्षण झालंय का हे पाहावं लागतं… नुसतं पुस्तकी काही कामाचं नाही…
जाता नाही जात ती जात, असं म्हणतात… ती जात कधी जाईल हो आपल्या समाजातून?
– मेधा जोशी, सांगली
नाही… ती रक्तात आहे… आणि धर्मात.