सध्या अकरावी प्रवेशाची दुसरी विशेष फेरी सुरू असून या फेरीनुसार प्रवेश घेण्याची मुदत उद्या 8 जानेवारी रोजी संपणार आहे. त्यानंतर प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य फेरीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. अद्याप राज्यात अकरावीच्या 42 टक्के म्हणजेच तब्बल 2 लाख 36 हजार 791 जागा रिक्त आहेत.
प्रवेश न घेणारे मुंबईतील सर्वाधिक विद्यार्थी
ऑनलाइन अर्ज केलेल्या तसेच कॉलेज अलॉट झालेल्या मुंबई क्षेत्रातील 58 हजार 318 विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेतलेला नाही. अमरावती, संभाजीनगर, पुणे, नाशिक, नागपूर जिल्ह्यांतील प्रवेश न घेणार्या विद्यार्थ्यांपेक्षा मुंबईतील या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्याने किंवा इतर अभ्यासक्रमाकडे वळल्याने या विद्यार्थ्यांनी अकरावीत प्रवेश न घेतल्याचे कारण समोर येत आहे.
राज्यातील अकरावी प्रवेशाची स्थिती
विभाग इनटेक एकूण विद्यार्थी प्रवेश घेतलेले रिक्त जागा प्रवेश न घेतलेले
अमरावती 15,360 11,987 10,099 5261 1888
संभाजीनगर 31,470 19,013 15,514 15,956 3499
मुंबई 3,20,390 2,44,608 1,86,290 1,34,100 58,318
नागपूर 59,250 36,072 31,682 27,568 4390
नाशिक 25,270 24,147 17,014 8256 7133
पुणे 1,07,030 79,797 61,380 45,650 18,417