ग्रहस्थिती : रवि, बुध, हर्षल वृषभ राशीमध्ये, गुरु मिथुन राशीमध्ये, प्लुटो-मकर राशीत, शुक्र-शनि, राहू, नेपच्युन मीन राशीत, मंगळ कर्क राशीमध्ये, केतु कन्या राशीत. दिनविशेष : ७ जून भागवत एकादशी आणि बकरी ईद, ८ जून प्रदोष, १० जून वटपौर्णिमा, ११ जून ज्येष्ठ पौर्णिमा.
मेष : तरुणांना मनासारखी नोकरी मिळेल. विवाहाचे योग जुळून येतील. सरकारी कामे पूर्ण होतील. मुलांकडून आनंदाची बातमी कळेल. व्यवसायात यश मिळेल. योजना यशस्वी होतील. ज्येष्ठांचे आरोग्य सांभाळा. सामाजिक कार्यात सन्मान होईल. नोकरीत घाई आणि धांदरटपणा टाळा. वाणी चांगली ठेवा. सार्वजनिक जीवनात नियम तोडू नका. उच्च शिक्षणासाठीचे प्रयत्न यशस्वी होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. जनसंपर्क, प्रकाशक, पत्रकार, लेखक, कलाकार या क्षेत्रांत चांगले दिवस. महिलांना आनंद मिळेल.
वृषभ : निर्णय घेताना गोंधळ होईल. तरुणांना यश मिळेल. अहंकार दूर ठेवा. शिक्षण, नवी नोकरी हे विषय पुढे सरकतील. व्यवसायात काही निर्णय त्रास देतील. महिलांनी संयम पाळावा. जुने मित्र भेटतील, मौजमजा कराल. नोकरी-व्यवसायात आव्हाने येतील. कामाचे नियोजन करा. कलाकार, संगीतकार, गायकांसाठी उत्तम काळ. आरोग्याकडे लक्ष द्या. शेअर्समधून लाभ होईल. कौटुंबिक कामाला वेळ द्या. मुलांच्या वर्तनाकडे लक्ष ठेवा. आर्थिक नियोजनात धांदरटपणा नको. कामगारांशी जुळवून घ्या.
मिथुन : नवीन संधींचा लाभ घ्या. व्यवसायात यश मिळेल. नोकरीत सकारात्मक वातावरण राहील. आर्थिक नियोजन चुकू देऊ नका. मुलांची शैक्षणिक प्रगती होईल. ज्येष्ठांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको. मामा-मावशींची मदत होईल. नव्या व्यक्तीवर अतिविश्वास ठेवू नका. पर्यटनात घाई करू नका. शुभघटना कळल्याने आनंद होईल. छोटेखानी समारंभात मित्र भेटतील. चेष्टामस्करी जपून करा. छंदासाठी वेळ द्याल. कामाशी काम ठेवा. भागीदारीत वाद टाळा. खेळाडूंना यश मिळेल. प्रेमात सावध राहा.
कर्क : अतिआत्मविश्वास त्रासदायक ठरेल. भावनेत अडकू नका. सरकारी कामात नियम पाळा. कलाकार, संगीतकार, लेखक यांचा सन्मान होईल. समाजकार्यातून समाधान मिळेल. घरासाठी खर्च होईल. धार्मिक कार्य कराल. नोकरीत आत्मविश्वास वाढेल. पण, संयम ठेवा. वादात मध्यस्थी टाळा. व्यवसायात यश मिळेल. पैसे येतील, खर्चावर नियंत्रण ठेवा. विदेशात नोकरी मिळेल. वाणी गोड ठेवा. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. वास्तूसंदर्भात निर्णय घेताना कागदपत्रे नीट तपासा. सोशल मीडिया वापरताना काळजी घ्या.
सिंह : व्यवसायात यश व पैसा मिळेल. येणी वसूल होतील. नातेवाईक, मित्रांची मदत मिळेल. तरुणांना मनासारखं काम मिळेल. नोकरीत पारडे जड राहील. उच्चशिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. विदेशातून ऑफर येईल. घरात आपलेच खरे करू नका. व्यवसायात मनस्ताप वाढेल. कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. ज्येष्ठांचा सल्ला फायदेशीर ठरेल. मुले उच्च शिक्षणासाठी विदेशात जाऊ शकतील. आश्वासनांची पूर्तता करताना अडचण येईल. आर्थिक व्यवहार जपून करा. कौटुंबिक सहलीतून आनंद मिळेल.
कन्या : घरात आनंद वाढेल. नोकरी-व्यवसायात सन्मान होईल. भागीदारीत यश मिळेल. सामाजिक कार्यात वरचष्मा राहील. कायदेशीर चौकट पाळा. पित्ताचा त्रास वाढेल. तरुणांना नमते घ्यावे लागेल. सार्वजनिक ठिकाणी, मित्रांमध्ये जपून बोला. नव्या ओळखीने काम पूर्ण होईल. नोकरीत प्रवास होईल. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. संशोधकांच्या हातून मोठे काम होईल. कोर्टकचेरीची कामे लटकतील. पैशांचा विनियोग जपून करा. जुना आजार डोके वर काढेल. नोकरीमध्ये प्रमोशन आणि पगारवाढ मिळेल.
तूळ : नोकरी-व्यवसायात यश मिळेल. वेळेचे गणित जमवा. जुन्या ओळखीतून कामे पुढे सरकतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. धार्मिक कार्यातून ऊर्जा वाढेल. खेळाडूंना यश मिळेल. काही गोष्टी मनातच ठेवा. घरात बोलताना काळजी घ्या. कामात नि:स्वार्थी वृत्ती ठेवा. व्यवसायात लाभ मिळेल. भागीदारीत कटकटी होतील. ज्येष्ठांची काळजी घ्या. आजचे काम आज करा. मन प्रसन्न होईल. तरुणांना नव्या संधी मिळतील. आर्थिक बाबतीत कोणावरही विश्वास टाकू नका. पती-पत्नीत वाद घडतील. लेखकांचा सन्मान होईल.
वृश्चिक : नोकरी, व्यवसायात ताण वाढेल. घरात किरकोळ वाद होतील. ज्येष्ठांच्या आरोग्याचे प्रश्न त्रस्त करतील. संसर्गजन्य आजारापासून काळजी घ्या. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. तरुणांना यश मिळेल. शॉर्टकट वापरू नका. मोजकेच पण योग्य बोला. डोळे झाकून सही करू नका. नवीन वास्तूच्या विचाराला गती मिळेल. व्यवसायातून चांगली उलाढाल होईल. अनपेक्षित लाभ होतील. नोकरीत बदली संभवते. कौटुंबिक प्रश्नात वेळीच लक्ष द्या. नवीन गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे.
धनु : तरुणांच्या मनासारखे होईल. स्पर्धेत यश मिळेल. प्रेमप्रकरणात वाद होतील. विवाह जुळतील. लहान शस्त्रक्रिया होईल. गुरुकृपा राहील. नव्या ओळखींतून नवा प्रोजेक्ट आकार घेईल. नोकरीत मनाविरुद्ध घटना घडतील. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात आर्थिक लेखाजोखा सांभाळा. अनावश्यक खर्च टाळा. नोकरीत निर्णय घेताना त्यात भावना आणू नका. नातेवाईक, मित्रमंडळींना आर्थिक मदत्ा करावी लागेल. घरात वाद विकोपाला जातील. शेअर, सट्टा लॉटरी यांतून आर्थिक लाभ मिळेल.
मकर : घरात आनंदवर्धक घटना घडतील. कायद्याची चौकट मोडू नका. मित्रांना आर्थिक मदत करताना काळजी घ्या. वादात सल्ले, मध्यस्थी यापासून दूर राहा. आरोग्याचे गणित बिघडेल. तरुणांनी सकारात्मक विचार करावा. भागीदारीत आव्हानांचा सामना करावा लागेल. महिलांनी आरोग्य सांभाळावे. आर्थिक व्यवहारात घाई नको. मालमत्तेच्या चर्चेत ज्येष्ठांचे म्हणणे ऐका. कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. मेडिकल व्यावसायिक, कलाकार, अभियंते यांना चांगला काळ. कोर्टकचेरीची कामे अडकतील.
कुंभ : आठवड्याची सुरुवात दगदगीने होईल. काम व वेळेचे गणित बिघडेल. शिक्षणक्षेत्रात, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात चांगली बातमी मिळेल. मनासारखी नोकरी मिळेल. कलाकारांना यशदायी काळ. भावाबहिणींचे सहकार्य लाभेल. कष्टाचे चीज होईल. तरुण मौजमजेवर खर्च करतील. व्यवसायात आर्थिक बाजू कमकुवत होईल. नीट नियोजन करा. कामानिमित्त अचानक केलेल्या प्रवासात प्रकृती सांभाळा. वाहन जपून चालवा. नोकरी, व्यवसायात गोड शब्दात अडकू नका. घरातील वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक क्षेत्रात चांगला काळ आहे.
मीन : नोकरीत सकारात्मक बदल दिसतील. व्यवसायात खिसा भरलेला राहील. तरुणांचा कल जल्लोषाकडे राहील. स्पर्धेत यश मिळेल. सल्ले देऊ नका, घेऊही नका. सार्वजनिक ठिकाणी अरेरावी नको. घरासाठी खर्च होईल. मालमत्तेचे व्यवहार करताना खबरदारी घ्या. नियोजन करा. परिश्रमपूर्वक कामे पुढे न्याल, वरिष्ठ खूष होतील. तरुणांना नव्या नोकरीच्या संधी मिळतील. वास्तू थोड्या काळाने घ्या. नवीन गुंतवणूक करताना ती सल्ला घ्या. प्रवासात आणि एरवीही बोलताना काळजी घ्या.