ग्रहस्थिती : ग्रहस्थिती : गुरू-राहू हर्षल मेष राशीमध्ये, रवि-बुध सिंह राशीत, शुक्र कर्क राशीत, मंगळ बुध सिंहेत, प्लुटो मकर राशीमध्ये, केतू तूळ राशीत, शनि कुंभ राशीत, नेपच्युन मीन राशीमध्ये, मंगळ कन्या राशीत. विशेष दिवस : ६ ऑक्टोबर कालाष्टमी, १० ऑक्टोबर, इंदिरा एकादशी, १२ ऑक्टोबर शिवरात्री.
मेष : नोकरीच्या ठिकाणी नमते घ्या. सार्वजनिक जीवनात आपलेच म्हणणे पुढे रेटू नका, वाद टाळा. काहींना अचानक लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांनी हिशेब करताना काळजी घ्यावी, लाखाचे बारा हजार होऊ शकतात. घरातील वातावरण आनंदी राहील. मुलाकडून चांगली बातमी कळेल. आरोग्याचा तक्रारी डोके वर काढतील. व्यायामासाठी वेळ द्या. मन विचलित होऊ देऊ नका, काम करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. डोळे झाकून कोणत्याही कागदावर सही करू नका.
वृषभ : कुटुंब, व्यवसाय, नोकरीत परिस्थितीचा स्वीकार करून पुढे पाऊल टाका. किरकोळ वादाकडे लक्ष देऊ नका. सामाजिक कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळतील. काहीजणांच्या खांद्यावर वेगळी जबाबदारी पडल्याने कामातला उत्साह वाढणार आहे. मुलांकडे विशेष लक्ष द्या. काळजी घ्या. जनसंपर्क, पत्रकारिता, लेखन क्षेत्रात नव्या संधी मिळतील. विदेशात व्यवसाय विस्तारण्याची चर्चा पुढे सरकेल.
मिथुन : काही मंडळींना शुभघटनांचा अनुभव येईल. नोकरीत काही बदल स्वीकारा, फायदा होईल. काहींच्या बदलीचे योग आहेत. महत्वाचे निर्णय घेताना सल्ला घ्याच. अतिफायद्याच्या प्रलोभनांपासून दूरच राहा. भागीदारीत किरकोळ वाद घडतील. सरकारी काम पूर्ण होईल. कलाकार, संगीतकार, क्रीडापटूंना मानसन्मानाचे योग आहेत. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. अचानक धनलाभाचे योग आहेत. मित्रांशी बोलताना काळजी घ्या, वाद घडू शकतात.
कर्क : मनाविरुद्ध घटना घडतील, मन विचलित होऊ देऊ नका. ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करावे लागतील. व्यावसायिकांना धावपळ करावी लागेल. त्याचा आरोग्यावर परिणाम होईल. नोकरीत नवीन कामाची जबाबदारी येईल. भविष्यात त्याचा चांगला फायदा होईल. मध्यस्थी करणे, सल्ला देणे टाळा. अचानक मोठा खर्च उद्भवू शकतो, पैशाचे नियोजन करा. कोणालाही आश्वासने देणे टाळा. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. निर्णय घेताना घाई नको.
सिंह : आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. सोशल मीडियावर जपून पावले टाका, फसवणूक घडू शकते. मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. सकारात्मक विचार करा. नोकरीच्या ठिकाणी अति आत्मविश्वास दाखवणे टाळा. चित्रकार, कलाकारांना येणारा काळ यश मिळवून देणारा. घरातील ज्येष्ठांबरोबर वाद घडू शकतात. थकीत येणे वसूल होईल, आर्थिक बाजू बळकट होईल. संततीकडून चांगली बातमी कळेल. व्यावसायिकांना कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल.
कन्या : घरासाठी भरपूर वेळ खर्च कराल. नातेवाईक, मित्रमंडळींची गाठभेट होईल. उधार-उसनवारीचे व्यवहार नको. आई-वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. रागाचा पारा वाढू देऊ नका. नोकरीत कमी बोला आणि काम करा. युवा वर्गाला नव्या क्षेत्रात संधी मिळतील. नवीन वास्तू घेण्याच्या विचाराला गती मिळेल. व्यावसायिकांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. काहींना कसोटीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागू शकते. बुद्धिकौशल्य वापरा, यश मिळेल.
तूळ : मनासारखे काम होईल, कर्तृत्वामुळे लौकिकात भर पडेल. व्यवसायात धावपळ करावी लागू शकते. सामाजिक कार्याला वेळ द्याल. निर्णयक्षमता भक्कम करा. दानधर्म होईल. त्यातून मानसिक समाधान मिळेल. मित्रांमध्ये गैरसमज निर्माण होऊन ते दुरावू शकतात. नोकरीत काम लक्षपूर्वक करा, एक चूक महागात पडू शकते. दाम्पत्य जीवनातील कुरबुरींकडे लक्ष देऊ नका. प्रवासात काळजी घ्या.
वृश्चिक : मर्यादा ओलांडून वागणे टाळा. अति विचार करू नका. नवीन नोकरीची संधी येऊ शकते. काही मंडळींना अचानक आर्थिक लाभ होतील. शेअर, सट्टा, लॉटरीतून नशीब चमकू शकते, पण त्यात गुंतू नका. जुनाट आजार डोके वर काढेल. व्यावसायिकांनी काम सरळमार्गी पूर्ण करावे. व्यवहार चोख ठेवा. नव्या व्यक्तीची ओळख अडकलेले काम मार्गी लावण्यात उपयोगी ठरेल. पण, सांभाळून पावले टाका. नातेवाईक मदतीसाठी हात पुढे करतील. निर्णय घेताना सर्व बाजू तपासा.
धनु : मोहाच्या गोष्टींपासून दूर राहा. कामानिमित्त बाहेरगावी जावे लागू शकते. मेडिकल, कृषी क्षेत्रात उत्तम काळ आहे. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ राहणार आहे. मामा-मावशींकडून मदत होईल. बंधूवर्गाची तब्येतीची तक्रार निर्माण होईल. जुने दुखणे डोके वर काढेल. मुलांकडे लक्ष द्या. नोकरीत चांगली स्थिती राहील. काहीजणांचे प्रमोशन होईल. तरुण मंडळींच्या नव्या संकल्पनांचे व्यवसायात रूपांतर होईल. समाजसेवेतून मानसिक समाधान मिळेल.
मकर : नोकरी, व्यवसायातील जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, यश मिळेल. उच्चशिक्षणासाठीचे विद्यार्थ्यांचे प्रयत्न यशस्वी ठरतील. जुन्या ओळखींमधून लाभ होईल, अडलेले काम मार्गी लागेल. अचानक मोठी शुभवार्ता कळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. निर्णय घेताना भावना गुंतवू नका, त्याचा त्रास होऊ शकतो. व्यवसायात पैशाचे योग्य नियोजन करा. बँकेचे कर्ज मंजूर होईल. जुने येणे वसूल होईल. आर्थिक बाजू बळकट राहणार असली तरी वायफळ खर्च नको. मालमत्तेचे व्यवहार काळजीपूर्वक करा.
कुंभ : नोकरीत टोकाची भूमिका घेऊ नका. व्यावसायिकांना यश मिळवून देणारा काळ. संमिश्र घटनांचा अनुभव येईल. प्रवास करावा लागेल. संशोधकांसाठी उत्तम काळ. प्रेमी युगुलांचीही मज्जा आहे. पती-पत्नीत वाद घडतील. खेळाडूंना यश मिळेल. महिलांनी आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे. धारदार वस्तू वापरताना काळजी घ्या. एखादी घटना मनाविरुद्ध झाली म्हणून नाराज होऊ नका.
मीन : नातेवाईकांशी संभाषण करताना काळजी घ्या. अडकलेली कामे मार्गी लागतील. काहींचे नोकरीत प्रमोशन होईल. व्यवसायात काही अडचणी निर्माण होतील. ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. मित्र-मंडळींची टिंगलटवाळी करू नका, त्यातून गैरसमज निर्माण होतील. शुभघटना कानावर पडल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक ठिकाणाला भेट दिल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. महागडी वस्तू खरेदी करण्याचा मोह होईल, पण खिसा पाकीट पाहून निर्णय घ्या.